वेगवेगळ्या प्रकाराच्या तव्यांबद्दल चर्चा

Submitted by रूनी पॉटर on 27 April, 2011 - 18:53

स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे या धाग्यावर परत परत तेच तेच प्रश्न विचारले जातात म्हणून हा वेगळा धागा काढला आहे.
इथे मुख्यतः पोळ्या, भाकरी, फुलके, पराठे, दोसे, उत्तपा, पुरणपोळी, खाकरा वगैरे प्रकारासाठी वापरण्यात येणार्‍या वेगवेगळ्या प्रकारांच्या (लोखंडी, नॉनस्टीक, हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड, अ‍ॅल्युमिनियम, माती, कास्ट आयर्न/बिड इ. इ.) तव्यांबद्दल तसेच कुठल्या तव्याची कशी काळजी घ्यावी, कसे वापरावेत इ. चर्चा अपेक्षित आहे.
स्वयंपाकाच्या इतर उपकरणांची चर्चा कृपया वेगळा धागा काढून त्या धाग्यावर करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडी | 6 March, 2009 - 01:38

कितीही चांगल्यातला नॉन-स्टीकचा तवा आणला तरी साधारणपणे वर्षा-दिड वर्षात त्याची वाट लागते. बाहेर डोसेवाल्यांकडे जसे तवे असतात ते घरगुती वापरासाठी उपयोगात येतात का? घावन, डोसे घालण्यासाठी इतर कुठल्या प्रकारचे तवे उपलब्ध आहेत का? कोणी वापरले आहेत का? किंमत किती? कुठे मिळतात? कृपया सांगा.

* प्रतिसाद

अनघा_मीरा | 6 March, 2009 - 02:49

मंजू, बिडाचा तवा चांगला असतो.. डोसेवाले कोणता वापरतात माहित नाही. पण निर्लेप तवा १ ते २ वर्षात खराब होतो असा माझाही अनुभव. बीडाच्या तव्याची भांड्यांच्या दुकानात चौकशी कर. बीडाला हिंदी/गुजराथीत काय म्हणतात माहित नाही, तरीही मी ही बाजारात गेले की करीन. स्मित

* प्रतिसाद

अश्विनी के | 6 March, 2009 - 03:22

हो मंजू, बिडाचा तवा असतो तो. तसेच आप्प्यांसाठीही माझ्या माहेरी बिडाचेच आप्पेपात्र होते. साधारण भुलेश्वर किंवा दादर स्टेशन समोरच्या मार्केट्मधे मिळायला हरकत नाही.
************
परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.

* प्रतिसाद

साधना | 6 March, 2009 - 04:07

मीही बिडाचाच वापरते तवा..

फक्त नविन आणल्यावर आई त्याच्यावर पाव लिटर तेल आणि पाव किलो कांदे चिरुन टाकते आणि मंदाग्नीवर तासनतास ठेऊन देते. असे केल्यानंतरच तो वापरायला तयार होतो असे तिचे मत आहे.
me_surabhee | 6 March, 2009 - 12:34

बिडाचे तवे, आप्पे पात्र चांगली खरी... खरपुस पणा त्यावर छान येतो, मात्र तेल खूप पितात.... आणी निर्लेप चे तवे न धुता, फक्त फुसून ठेवावेत अस ऐकल होत.

* प्रतिसाद

मिनोती | 6 March, 2009 - 12:55

बिडाचा तवा जर नीट सिझन केला असेल तर तेल पीत नाही. आता सीझन केला असेल तर म्हणजे काय तर वरती साधना म्हणाली तसे तेल आणि कांदा पसरून मंद गॅसवर ठेवायचे. असे साधारण २ वेळा करावे लागते. तो कांदा आणि ते तेल मात्र स्वयंपाकात उपयोगाला आणायचे नाही कारण त्यात लोखंडाची खर असते. बीडाचा तवा कितीही सिझन केला तरी पहिल्या एक दोन डोस्यांना तेल लावावे लागतेच.

राहीली गोष्ट निर्लेपची. निर्लेपपेक्षा हॉकिन्स फ्युचुराचे तवे एकदम मस्त आहेत. नारळाचा चोथा किंवा प्लास्टिकची घासणी आणि साबणाचे पाणी याने घासला तरी स्वच्छ निघतो. माझ्या मम्मीकडे आहे साधारण ४ वर्षापूर्वी घेतला होता फ्लॅट सरफेस वाला अजुनही तंदुरुस्त आहे. मात्र निर्लेपच्या मानाने महाग आहेत आठशे रुपयाना वगैरे तवा म्हणाजे जरा महाग वाटला होता तेव्हा पण मी हट्टाने घेतला होता आणि खरोखर चांगला निघाला. दर दोन वर्षानी दोनधे आडीसशे रुपय घालवण्यापेक्षा मला ते एकदा गेलेले पैसे बरे असे वाटले.

* प्रतिसाद

दिनेशदा | 6 March, 2009 - 16:51

आमच्याकडे आंबोळीला बिडाचाच तवा वापरते आई. मस्त चव येते. जूना आहे अगदी दणकट आहे.
हा तवा वापरायच्या आधी घासून घेतो आम्ही. वापरल्यावर घासून कोरडा करुन, त्याला तेल लावून ठेवतो.
मी पहिला जॉब हॉकिन्स मधे केलाय. त्यामूळे ते बेष्ट्च.
मनःस्विनी | 13 March, 2009 - 01:49

माझा अनुभव बीडाच्या तव्याबाबत वेगळा आहे. आईला तिच्या आईने जवळ जवळ वेगवेगळ्या आकारचे चार तवे दिले तिच्या लग्नात.(मी एकावर हक्क आधीच सांगून ठेवला स्मित) हे सांगायचे कारण की एकदम दणकट आहेत. पडला वगैरे कोणावर तर हरे राम होइल. असो.
तो तवा एकदम वापरायला मी इथे काढला तर फक्त एकदा गरम पाण्याने नुस्ता धुतला. मग कांदा कापून फक्त कांद्याच्या एका बाजूने तेल लावून पुसून घेतला. मला कधीच डोसा चिकटला वगैरे त्रास नाही झाला. साबण कधीच लावू नये. डोसे वा जे काही झाले की नुस्ते गरम पाण्याने धूवून झाले की थोडेसे नवीन गरम तेल लावून बांधून ठेवावा.
आंबोळी , घावनं बीडाच्या तव्यावरच मस्त लागते मलातरी. स्मित मी पूपो पण करते.

मी प्लग इन नॉन स्टिक पॅनकेक ग्रिड्ल वापरते डोसा/उत्तपम करायला, मोठ्या आकाराचा आहे, एका वेळी ३ मध्यम आकाराचे डोसे -उत्तपम होतील असा , छान टिकलाय वर्षं भर तरी.
टेंपरेचर कंट्रोल साठी नॉब आहे यात.

http://www.facebook.com/media/set/fbx/?set=a.458364614687.245399.7285596...

sneha1 | 17 December, 2009 - 23:15

मी वॉलमार्ट मधून सीझन्ड कास्ट आयर्न चा तवा आणला आहे.त्याच्यावर काय काय करता येइल्?पोळ्या होतील का?

* प्रतिसाद

मिनोती | 17 December, 2009 - 23:43

स्नेहा, हो पोळ्या होतात. कमी प्रमाणात केल्या तर मेथी, चार्डच्या भाज्या देखिल छान होतात.
sneha1 | 18 December, 2009 - 11:01

मी पोळ्या केल्या होत्या, पण त्या चिकटल्या तव्याला..काय चुकले माझे?

* प्रतिसाद

मिनोती | 18 December, 2009 - 11:19

तो तवा सीझन करुन घेतला होतास का? रोज २-३ टेबलस्पून तेल असे ३-४ दिवस कमित कमी लावुन ठेवायचे. ते मुरते त्यात मग वापरायचा. त्याने नाही चिकटत.

किंवा ही पद्धत वापर - http://whatscookingamerica.net/Information/CastIronPans.htm

neha1 | 18 December, 2009 - 11:22

मी सीझन केला नाही, कारण त्याच्यावर सीझन्ड आणि रेडी टू युज असे लिहिले आहे...

* प्रतिसाद

मिनोती | 18 December, 2009 - 11:26

कितीही लिहिलेले असले तरी सिझन करावा लागतो असा माझा अनुभव आहे.
शिल्पा८५ | 6 January, 2010 - 07:33

रोजच्या वापरासाठी चपातीसाठी चांगला तवा कोणता? माझ्याकडे नॉनस्टीक तवा आहे पण त्याच मधल्या भागाचच कोटींग गेलय त्यामुळे चपाती चिकटते तो दुरुस्त ( कोटींग ) करता येईल का? नवीन घ्यायचा झाला तर मजबुत नी टिकाऊ तवा कोणत्या कंपनीचा? नॉनस्टीकच चांगला की ईतर लोखंडी वा आणखी कोन्ता?

ईथे सुरवातीला तव्यावर चर्चा दिसतेय पण ती डोसे घावणे इ साठी आहे चपातीसाठी नाही. तरी कृपया मार्गदर्शन करावे.......

* प्रतिसाद

तोषवी | 6 January, 2010 - 10:14

लोखन्डी तवा सर्वात बेस्ट! नाहीतर हार्ड आनोडाइज्ड तवा आण त्यामानाने जास्त टिकतो साध्या नॉन्स्टीक पेक्षा.

* प्रतिसाद

प्राजक्ता | 6 January, 2010 - 10:48

नाहीतर हार्ड आनोडाइज्ड तवा आण >> सहमत! फ्युच्युराचा चांगला आहे.तेल /तुप सोडुन पराठे भाजले तर लगेच साफ करायचा मात्र.

* प्रतिसाद

रूनी पॉटर | 6 January, 2010 - 10:53

प्राजक्ता तू हाच तवा म्हणतेयस का? http://dva1.com/product_info.php?products_id=498

सीमा | 6 January, 2010 - 11:31

नॉन स्टिक तव्याच कोटींग निघायला सुरुवात झाली असेल तर अजिबात तो तवा वापरु नये. कोटींगचे कण
हार्मफुल असतात शरिरासाठी.
मागे बहुदा, मिनोती ने आणि लालु न लिहिलेल याविषयी.

* प्रतिसाद

मिनोती | 6 January, 2010 - 14:10

रुनी तो पण चांगला आहे अग पोळ्यासाठी आणि त्यांचाच एक फ्लॅट मिळतो तवा तो डोश्यासाठी वगैरे चांगला पडतो.

* प्रतिसाद

प्राजक्ता | 6 January, 2010 - 14:52

रुनी ! हो हाच आहे माझ्याकडे फक्त handle वेगळे आहे थोडे.

* प्रतिसाद

अल्पना | 7 January, 2010 - 07:48

रुनीने दाखवलेला तवा आहे माझ्याकडे. बहुतेक ८ वर्ष झाली असतिल. पोळ्या, पराठे मस्त होतात. अजूनतरी कोटिंग निघाले नाहीये.
शिल्पा८५ | 8 January, 2010 - 05:54

हार्ड आनोडाइज्ड तवा जास्त टिकतो ना? कोटिंग्च काय? नॉनस्टीक सारखे निघनार नाही ना? दर १-१ १/२ वर्षाने बदलायची गरज नाही ना? माझ्याक्डे २ तवे नॉनस्टीक्चे पडुन आहेत (कोटिंग निघाले म्हणुन).
रोज वापरला तरी चालेल ना हा तवा? साधारण अंदाजे काय किंमत असेल या हार्ड आनोडाइज्ड तव्यांची? यांची काही खास काळजी घ्यावी लागते का? cleaning etc बाबतीत (बीडाच्या तव्यांसारखी)?
प्लीज सांगा मला..... मला माहीत नव्हत कोटींग गेल्यावर वापराय्च नसत ते मी तसाच रोज वापरते आहे तरी मला लवकरात लवकर नवीन(टीकाऊ) घ्यायचा आहे....... help me

* प्रतिसाद

पौर्णिमा | 8 January, 2010 - 06:03

हार्ड अ‍ॅनोडाईज्ड तवा चांगला दणकट असतो आणि व्यवस्थित टिकतो. थोडा महाग असतो- ४५०-५०० रूपायाला मिळेल. काही काळजी घ्यावी लागत नाही, बाकी भांड्यांसारखा लोखंडी घासणीने घासला तरी चालतो.

पोळ्याच करायच्या असतील रोजच्या आणि देशात असशील तर अ‍ॅल्युमिनियमचा नेहेमीचा तवा का नाही घेत?

अवांतर- वापरून झालेले नॉनस्टीक तवे भांड्यांच्या दुकानात घेऊन जा. एक्सचेंज ऑफरमध्ये जुना तवा देऊन नवीन अ‍ॅनोडाईज्ड तवा मिळेल. घरातली अडचण कमी, पैसेही थोडे कमी पडतील. भांड्यांच्या दुकानात १२ महिने असल्या ऑफरी चालू असतात.
शिल्पा८५ | 8 January, 2010 - 06:10

thanks punam for immidiate reply,

अ‍ॅल्युमिनियमच्या तव्यावर चपात्या चिकटतात ना (भाजताना तेल नाही लावले तर नी मी रोज्च्या चपात्याना तेल नाही लावत) ? तो खुप जड नी जाड असतो तापायला पण वेळ लागतो, माझ्या माहेरी होता असा आधी.....
म्हणुन नॉनस्टीक ट्राय केला तर त्याचा ही अनुभव चांगला नाही आला, म्हणुन मग आता हार्ड अ‍ॅनोडाईज्ड तवा स्मित बाकी सविस्तर माहीती दिल्याबद्द्ल आभारी आहे......
सिंडरेला | 28 March, 2010 - 16:27

मला इथे अमेरिकेत पॅन केक पफ पॅन (आप्पेपात्र स्मित) घ्यायचय. जरा जास्त म्हणजे १२ वगैरे मोल्ड्स असलेलं. कुठलं चांगलं आहे आणि कुठे मिळेल ह्याची माहिती देणार का कृपया ? सध्या मला हे आवडलय. मी बेड-बाथ, टार्गेट वगैरेच्या २-३ चक्कर केल्या पण कुठल्याच प्रकारच मिळालं नाही अरेरे

* प्रतिसाद

मिती | 28 March, 2010 - 20:36

काय सही आहे हे आप्पेपात्र, हँडलसकट आणि डिल पण छान आहे..अ‍ॅमेझॉनवरून आमच्याकडे (कॅनडात) नाही मिळणार ना..अरेरे

* प्रतिसाद
मिनोती | 29 March, 2010 - 13:18

ते अप्पे पात्र मी विल्यम सनोमा मधे पाहिले पण त्यात अप्पे खुपच मोठे होतील असे वाटतेय. आहे छान आणि कास्ट आयर्न असल्याने छानही असेल. पण मला ते येवढे मोठाले अप्पे पाहून जरा नको वाटले.
देशातून कोणी येणार असेल तर निर्लेपचे मस्त आहे बघ. खाली सगळे स्लॉट्स जोडणारी रिंग आहे त्यामुळे त्यात आच सगळीकडे नीट लागते. अतिशय हलका आहे. घेउन येणार्‍यांना पण जड होणार नाही.

अवनी | 31 March, 2010 - 23:22

non-stick तव्याच्या कडेला चिकट थर जमा झाला होता.
एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार-----
तो काढण्यासाठी तव्यात पाणी घालून गरम केला आणि खायच्या सोड्याची चिमूट कडेने सोडली.
कड स्वच्छ झाली पण मधलं coating निघून तवा वाया गेला.
सावधान !
chamaki | 2 April, 2010 - 02:15

non-stick तवा वापरुन झाल्यावर, लग्गेच, थोडा गरम असतानाच, जाड फडक्याने कडेवरचा तेलाचा थर पुसुन घेतला तर स्वच्छ होतो. तवा गार झाल्यावर तो थर चिकट होतो आणि पाण्याने पुर्णपणे निघत नाही.
जयु | 30 April, 2010 - 13:04

माझ्याकडे चपातिचा तवा(व्हाइट) आहे. त्यात भाकरि केल्याने तो काळा झाला आहे.
स्वच्छ कसा करावा ? क्रुपया उपाय सुचवा.
प्राची | 1 May, 2010 - 08:28

तवा गरम असतानाच त्यावर चिंच आणि पाणी घालून ठेवा. ताक घातलं तरी चालेल. नंतर घासा. तवा स्वच्छ निघेल.
sneha1 | 22 July, 2010 - 15:13

मी t fal चा नॉनस्टिक सेट घेतला.त्याच्यावर लिहिले आहे की पहिल्यांदा आणि १० डिशवॉशर सायकल झाल्या की सीझनींग करा.ते धुवून झाल्यावर करायचे की आधी?
आणि मी भारतात एक हार्ड अ‍ॅनोडाईज्ड तवा घेतला होता.तिथे त्याच्यावर पोळ्या छान व्हायच्या.इथे आल्यापासून काय झाले आहे माहित नाही, पोळी त्यच्यावर टाकली की चिपकूनच बसते.काय चुकत असेल्?

* प्रतिसाद

रूनी पॉटर | 22 July, 2010 - 15:16

स्नेहा
तवा खूप जास्त तापतो का, तवा खूप तापला तर असे होते.

* संपादन
* प्रतिसाद

सीमा | 22 July, 2010 - 15:19

रुनी म्हणते तेच मे लिहिणार होते. तवा खुप गरम असेल आणि थोडस तेल अगोदर लावल नसेल तर तस होत.(माझ्याकडे तरी)

* प्रतिसाद

sneha1 | 22 July, 2010 - 15:22

धन्यवाद, रूनी आणि सीमा.पुन्हा करून बघीन, आणि चुकलं तर पुन्हा विचारीन.

सोनपरी | 11 October, 2010 - 14:17

मला उसगावात चांगला तवा कुठे मीळेल... कितीही चांगला तवा घेतला तरी २ वर्षात वाट लागते.रोजच्या पोळ्या आणी डोसे, उत्तप्पे करायला वेगवेगळे तवे घ्यावे का?

* प्रतिसाद

सिंडरेला | 11 October, 2010 - 15:10

रोजच्या पोळ्या आणी डोसे, उत्तप्पे करायला वेगवेगळे तवे घ्यावे का >>> हो. डोसे/उतप्पे करुन झाले की लगेच कापडाने नाही तर टिश्युपेपरने पुसून घेता का तवा ? अगदी गरम असताना धुवायची गरज नाही आणि तेलही तसेच रहात नाही तव्यावर.

हे असे तवे (स्मित) पोळ्यांना वगैरे चांगले आहेत.

* प्रतिसाद

सोनपरी | 11 October, 2010 - 16:00

हो, तवा जरा थंड झाला की कापडने पुसुन घेते..वेगवेगळे तवे (पोळ्या आणी डोसे) ठेवले तरी माझे तवे २ वर्षात खराब होतात त्याचे कोटिंग निघायला सुरवात होते . पोळ्यान्चा तवा मात्र मी ली॑॑वीड सोपने विसळुन घेते. ईथे कुठे मीळतील चांगले तवे?
मेधा | 11 October, 2010 - 16:17

मी पोळ्यांकरता भारतातून निर्लेपचा काठ नसलेला तवा आणलाय. तो फक्त भाकरी /पोळ्यांना वापरते. आता १०-१२ वर्षे झाली, तोच तवा आहे. त्यावर सराटा, चमचा असं काही लावत नाही. हाताने पोळी पलटते किंवा फुलका हातानेच उचलून गॅसवर टाकते.
ज्वारी / तांदळाची भाकरी पण त्याच तव्यावर करते. भाकरी करताना प्रत्येक भाकरी नंतर तवा पुसून घेते.

पराठे, डोसे, फिश फ्राय वगैरे करता कॅल्फलॉनचे किंवा तत्सम वापरते. जरा कोमट असतानाच किचन पेपर टावेलने स्वच्छ पुसुन घेते. कडेचे तेल नीट पुसले गेले पाहिजे दर वेळेस. शिवाय रिकामा तवा फार तापत ठेवू नये.
मिनोती | 11 October, 2010 - 16:34

माझ्याकडे गेली तीन वर्षे हा तवा आहे. पोळ्या, डोसे, उत्तपे, वगैरे सगळे त्यावरच करते. माझ्याकडे गॅस नाही सिरॅमिक ग्लास बर्नर आहे. त्यामुळे काम झाले की तो तवा लगेचच बाजुला काढून ठेवावा लागतो. नाहीतर तव्याची कढई होते स्मित - हे माझ्या मैत्रिणीने केलेले पाहिले आहे स्मित

या तव्याच्या आधी माझ्याकडे सर्क्युलॉनचा हा तवा होता. तो मी ७ एक वर्षे वापरला.

भाकरीसाठी मी कास्ट आयर्नचा तवा गेले ३-४ वर्षे वापरतेय मस्त होतात भाकरी.
तवा घेताना शक्यतो हार्ड अ‍ॅनोडाईझ्ड घ्यावा असे मला वाटते त्याचे कोटींग इतक्या सहजी निघत नाही.

तवा किती मोठ्या गॅसवर तापवता, तोन पोळ्यांच्या मधे किती वेळ तवा तापत रहातो, पोळीला वगैरे तेल तव्यावर लावता की पोळीवर - हे सगळे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.
सोनपरी | 12 October, 2010 - 00:25

खरे तर पोळ्यांना म्हणुन मी बिनाकाठाचाच तवा शोधतेय.. सर्क्युलॉनचा तवा माझ्या एका मैत्रीणीकडे आहे आणी तिचाही अनुभव चांगला आहे. आधी मी पोळ्या, डोसे करयला वेगवेगळे तवे वापरत होते पण एक तवा खराब झाल्याने ( मी एकदा डीश वाशरमधे धुतलेला, अगदी लगेचच त्याचे कोटींग निघायला लागले अरेरे ) सध्या एकच तव्यावर काम चालु आहे. दोन्ही तवे मी भारतातुनच आणलेय. कास्ट आयर्न नी सर्क्युलॉनचा तवा चांगले वाटताय.

* प्रतिसाद

जयवी -जयश्री अंबासकर | 13 October, 2010 - 15:27

शक्यतोवर पोळ्यांचा तवा आणि दोसे, पराठे, धिरडे, आमलेट ह्यांचा तवा वेगळा असावा. नॉन्स्टिक तवा पोळी सोडून बाकी सगळ्यासाठी एकदम सही !!

माझ्याकडेही फ्युचुरा कुकर गेल्या ८ वर्षापासून आहे. मस्त इडली, बिर्यानी वगैरे होतं. फक्त डीशवॉशर मधे मात्र चुकूनही टाकू नये.

एका ज्येष्ठ वैद्याने लोखंडाची भांडी स्वैपाकात असावीत असं आवर्जून सांगितलं होतं. पाणी तांब्याच्या तांब्यामधून प्यावे, तवा बिडाचा असावा असं त्यांचं म्हणणं होतं. आल्युमिनियम संयुगांची भांडी वापरू नयेत असं बरंच काही सांगत होते...

कुणी यावर प्रकाश टाकू शकेल का ?

राजकाशाना | 7 November, 2010 - 11:24
मी मागच्या आठवड्यात अंजलीचा नॉन-स्टीक तवा घेतला. विक्रेता म्हणाला की तेल कमी वापरा नाहीतर लवकर खराब होईल. दुसरी गोष्ट म्हणजे घासताना घासणीने घासायला नको त्याऐवजी स्पंजचा वापर करावा.

रचु | 16 November, 2010 - 07:33
मला फुलके आणि भाकरी करीता जाळी हवी आहे (सिरॅमिक गॅस टॉप वर ठेवायची).
देसी ग्रोसरी मधे मिळत नाही आहे अजुन कुठे मिळेल का ?

प्रतिसाद मिनोती | 16 November, 2010 - 08:12
त्याला कुकी कूलिंग रॅक म्हणतात. सगळीकडे मिळायला हरकत नाही. शक्यतो रंग लावलेले नसतील असे रॅक घ्या. ते दिसायला असे दिसते. माझे देसी स्टोरमधून आणलेले असेच आहे फक्त स्टीलचे आहे त्यावर कसलेही कोटींग नाही.

प्रतिसाद अंजू | 18 November, 2010 - 04:33
रचु, तुला डॉलर स्टोरमधे पण मिळेल. स्टीलची हॅन्डलवाली जाळी आहे. फुलके आणि भाकरी दोन्ही छान होतात.

आशूडी | 18 January, 2011 - 11:13
हो पुरेल.
मला शंका आहे की, भाकरी नॉन्स्टिक तव्यावर करता येते का? की तो जाड बुडाचाच लागतो? आणि येत असेल तर, तो तव पटकन तापून लवकर थंड होतो तर भाकरी करताना गॅसची आच कशी अ‍ॅडजस्ट करावी? (बटणाने सांगू नका, प्रमाण विचारतेय. )

प्रतिसाद मिनोती | 18 January, 2011 - 11:17
भाकरी नॉनस्टिकवर करता येते पण तो तवा गुळगुळीत असल्याने बरेचदा भाकरी पाणी लावताना सरकते. तवा पटकन गरम होतो त्यामुळे भाकरी टाकण्याआधी गॅस बारीक करून पाणी लावून मग मोठा करावा. उलटून दुसर्‍याबाजूने भाकरी भाजावी.
त्यामुळे शक्य असेल तर लोखंडी जाड तवा घ्या.

आशूडी | 18 January, 2011 - 11:18
ओके, धन्यवाद मिनोती. आधी प्रयत्न करुन बघते नाहीच जमली तर (न त ह)वा.

आशूडी | 8 February, 2011 - 10:29
काल नॉनस्टिक तव्यावर भाकरी करुन पाहिल्या. व्यवस्थित झाल्या. मिनोतीने सांगितल्यानुसार गॅस लहान मोठा करण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे.

पराग | 8 April, 2011 - 18:06
बरं झालं हा बाफ दिसला..
एक प्रश्न.. आधी येऊन गेला असेल आणि उत्तर असेल तर ते दाखवलं तरी चालेल.. मी बाफ वाचलेला नाहीये आधीचा..

आमच्या घरी हल्लीच हार्ड अयोडाईज्ड की तत्सम प्रकारचा तवा घेतला आहे.. त्याला बारीक काळे डाग पडतात.. म्हणजे खूप डार्क नाही.. अगदी फेंट.. आणि ते सहज जात नाहीत... तर ते कश्याने पडत असावे ? कसे टाळावे ? कसे घालवावे ? जोरात घासलं तर चालतं का ?

नासा | 8 April, 2011 - 19:34
पराग, हार्ड अ‍ॅनोडाईज्ड तव्याचं तापमान मला जमायला जरा वेळ लागला. त्याआधी तू म्हणतोस तसे काळे डाग पडायचे. तवा खूप तापला की तसे काळे डाग पडतात. मी metal sponge ने घासायचे, हलक्या हातने घासलेत तरी निघून जातात. तव्यावर scratches पडत नाहीत. ही भांडी dishwasher-safe नसतात.

प्रतिसाद प्रज्ञा९ | 8 April, 2011 - 19:42
पराग, हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड भांडं आधी घासून कोमट पाण्याने धुवून घेतलं का? तवासुद्धा.
आणि हार्ड अ‍ॅनो. ला मॅक्स हीट चालत नाही. ओरखडे येऊ शकतात. तवा तापयला वेळ लागणारच. त्यामुळे गरज असेल तेव्हा आधीच १० मिनिटं तवा मध्यम आंचेवर ठेवायचा तापवायला. खूपच छान टिकतो असा वापरला की.

प्रतिसाद पराग | 8 April, 2011 - 20:13
प्रज्ञा आधी म्हणजे ? वापरायच्या आधी ?? बहूतेक नाही..
तव्यावर scratches पडत नाहीत. >>> हा मग ठिक आहे... कारण मागे मी एक कोटेड भांडं जळलं आहे असं समजून जोरजोरात घासून त्याच्यावरच कोटींग घालवलं होतं.. त्यामुळे हा तवा घासायच्या आधी माहिती काढायची आहे.. !
अजून काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर सांगा..
धन्यवाद प्रज्ञा, नासा

प्रतिसाद अंजली | 8 April, 2011 - 20:15
पूर्वी इथे (अमेरीकेत) calphalon चा १३ इंची गोल, प्रोफेशनल हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड विथ नॉन्स्टिक कोटिंगचा तवा मिळायचा. साधारण $१०० च्या आसापास किंमत होती. अतिशय छान तवा होता. मी बरेच दिवस झाले शोधते आहे पण मिळत नाहीये. कुणाला माहित आहे का कुठे मिळेल?

नविना | 22 April, 2011 - 21:06
मला अमेरिकेत तवा घ्यायचा आहे. जवळपास २ वर्षांपूर्वी आणलेला नॉन स्टिक होता आणि त्याचं कोटींग निघेल असं वाटतं आहे आता. पण मला नवीन तवा तसा नको आहे. तो थोडा खोल झालाय वापरुन. कुठे मिळेल आणि कसा तवा योग्य राहील electric coil burners वर?

प्रज्ञा९ | 26 April, 2011 - 06:02
नविना,
मला electric coil burner चा अनुभव नाही, पण अमेरिकेत मी एक तवा घेतला होता, Calphaon चा. हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड. पण पोळ्या करायला तो मला तरी योग्य नाही वाटला. तुम्ही फक्त पोळ्या करण्यासाठी वापरणार की अजून काही?
पोळ्या करताना आपण गॅस कमी-जास्त करतो ते तंत्र या तव्यावर चटकन जमलं नाही मला तरी. तापायला आणि तापमान अ‍ॅडजस्ट व्हायला या तव्याला वेळ लागतो. शेवटी मी देशवारी केली तेव्हा नवीन तवे आणले २.
इंग्रो मधे इंडिअन ब्रँडचे तवे असतील तर ते पहा. त्यातला कॉइलसाठी कोणता हे मात्र आपणच ठरवावं लागेल.

तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देण्याऐवजी वेगळा अनुभव सांगितला म्हणून क्षमस्व, पण Calphalon चं नाव, हार्ड अ‍ॅनो...वगैरे मुळे इंप्रेस होऊन मी घेतला तो तवा नि उपयोग नाही झाला त्याचा. तुम्हाला तसा अनुभव येऊ नये म्हणून शेअर केलं.

प्रतिसाद मिनोती | 26 April, 2011 - 06:06
प्रज्ञा, माझा अगदी उलट अनुभव आहे calphalon चा

प्रतिसाद प्रज्ञा९ | 26 April, 2011 - 06:11
मिनोती, तुम्ही पोळ्या करायलापण वापरता तो तवा?
मी देशवारीत तो घरीच ठेवला. एक तर तो जड आहे, त्यामुळे साबा म्हणाल्या की मीपण रोज नाही वापरणार....
पण डोसे वगैरे भारी झाले त्यावर.
पोळ्यांसाठी वापरताना नक्की कसं अ‍ॅडजस्ट करायचं?

प्रतिसाद मिनोती | 26 April, 2011 - 06:33
प्रज्ञा, हो चपाती, पुरणपोळी, पराठे, उत्तप्पा, अडाई, डोसे इत्यादी सर्व प्रकार त्यावरच करते. माझा सिरॅमिक टॉप रेंज आहे. त्याला १-१० नंबर असलेली बटणे आहेत. तवा साधारण ५ वर तापायला ठेवते. हात साधारण इंचभर वरुन फिरवला तर उष्ण वाटेल इतपत गरम करते. तोवर घडीची पोळी तयार असते. मग ती टाकून गॅस ७ वर ठेवते. एका बाजून भाजून उलटताना तेल लावून उलटते. दुसरीकडे तेल लावते परत पहिली बाजू भाजते. अगदी व्यवस्थीत होतात पोळया माझ्यातरी. मी फुलके कधीही करत नाही कारण मला स्वतःलाच ते खायला आवडत नाहीत
सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेवटची पोळी झाली की लगेच तवा थंड बर्नरवर ठेवते नाहीतर तव्याची कढई होते!

मला अहो जाहो करू नको प्लिज.

प्रतिसाद सोनपरी | 26 April, 2011 - 06:39
प्रज्ञा, माझा अगदी उलट अनुभव आहे calphalon चा >> अनुमोदन! इथे विचारुनच मी पण calphalon तवा घेतला. पोळ्या, पराठे, दोसे सगळे त्यावरच करते. ६ महिने झालेत पण अजुनही अगदी नवाच आहे.

प्रतिसाद प्रज्ञा९ | 26 April, 2011 - 06:55
हम्म..
घरी गेलं की वापरून बघितला पाहिजे तवा.
मिनोती, सोनपरी, ठेंकू

प्रतिसाद अंजली | 26 April, 2011 - 07:36
मीपण १२-१३ वर्षे calphalonचा हार्ड अ‍ॅनोडाईज्ड तवा (१३ इंच) रोज पोळ्यांना वापरते. मस्त होतात पोळ्या. पुरण्पोळ्यापण छान होतात. मला आता नविन घ्यायचा आहे तर मिळत नाहीये.

प्रतिसाद प्रज्ञा९ | 26 April, 2011 - 08:03
तुम्ही ज्या सुगरणी त्या तव्यावर पोळ्या वगैरे करता त्यांना माझा दंडवत.

पण सिरिअसली, आता मलापण शिकायला हवं हे प्रकरण. सहज कोणाला जमलं तर पोळ्या करतानाचा व्हिडिओ टाका. खरंच माझं नक्की कुठे चुकतंय ते कळेल मला.
गंमत म्हणजे, मी सासरी पुण्यात असताना पोळ्या केल्या की एकदम मऊ होतात(म्हणजे साध्या तव्यावर.), इथे आले कीच (तसाच तवा असूनही) काहीतरी धाड भरते पोळ्यांना!

प्रतिसाद सायो | 26 April, 2011 - 08:47
प्रज्ञा, अशा वेळी कणकेवर सगळा दोष सोपवून मोकळं व्हायचं असतं.

प्रतिसाद मिनोती | 26 April, 2011 - 09:00
अंजली, हा किंवा हा पाहीला आहेस का?

प्रतिसाद अंजली | 26 April, 2011 - 09:08
मिनोती,
हे दोन्ही नाहीत गं. माझा १३ इंच गोल आहे आणि चांगलाच जड आहे. त्याला दोन्ही बाजूला हँडल्स आहेत. घेतला तेव्हा $१०० ला होता. उद्या फोटो काढून टाकते.

प्रतिसाद नविना | 26 April, 2011 - 20:44
सगळ्यांना धन्यवाद. मला सगळ्याच गोष्टींना (पोळ्या, दोसा, पुरणपोळी ) उपयोगी पडेल असा हवा आहे. माझा आताचा तवा चांगला आहे पण तो आमच्या घरी मी इथे यायच्या आधी पासून आहे. नवर्‍याला विचारलं तर त्याला आठवत नाहीये कुठून घेतला ते. ई. ग्रो. मध्ये पहिला मी पण घरच्या सारखा नाही. मागे घेतलेला फिलिला असताना घेतला होता त्यामुळे तिथल्या ईंग्रो मध्ये मिळाला असेल कदाचित. पीट्सबर्ग मध्ये फिली सारखे ईंग्रो नाहीत. त्यामुळे मी थोडी कंफ्युज्ड आहे.
मिनोती, तो स्क्वेअर ग्रिडल पोळ्यांसाठी कामात येइल का? मी तसा macys, JCP, Target वगैरे मध्ये पाहिला, पण मग शुअर नव्हते म्हणून नाही घेतला.
मला अजून एक प्रश्ण आहे. तो म्हणजे कास्ट आयन चे तवे दोसा साठी वगैरे वापरता येतात का? बाकी गोष्टींसाठी कसे असतात ते?

प्रतिसाद सिंडरेला | 26 April, 2011 - 20:55
प्रज्ञा, त्या तव्यावर पोळ्या करण्यासाठी सुगरण असायची गरज नाही, मला पण येतात पोळ्या करता त्या तव्यावर

प्रतिसाद नीधप | 26 April, 2011 - 21:03
माझ्याकडे हा असा तवा आहे. सेटमधला. हार्ड अनोडाइज्ड आणि थोडा खोलगट. तो कशासाठी वापरू? आणि हीट कशी ठेवू?

प्रतिसाद मिनोती | 27 April, 2011 - 03:26
नविना, माझ्याकडे स्क्वेअरच आहे मी बेड-बाथ-बियाँड मधे घेतला आहे बहुतेक. त्यात २ प्रकार असतात एकाची किंमत २९.९९ आणि एकाची ३९.९९ असते. त्यातला माझा बहुतेक ३९.९९ वाला आहे (स्टील हँडल हाच एक फरक आहे बहुदा दोन्हीत).

कास्ट आयर्न ग्रीडल मी डोसे करायला क्वचीत वापरते कारण एकच की मला दोसा कोरडा लागतो आणि त्यावर करताना मला अजुनतरी तेल लावावे लागते. मी त्यात भाकरी करते, मेथी, माठ, वगैरे पालेभाज्या करते. अधेमधे चपाती पण करते.

नीरजा, तुला तो तवा पोळ्या, फुलके, पराठे वगैरेसाठी वापरता येईल. दोसे/उत्तप्पे/अडाई वगैरेला शक्यतो सपाट बुडाचा तवा असावा. यातव्यावर भाकरी करायच्या असतील तर मी मागच्या पानावर आशूडीला तंत्र समजावले होते ते वाच

प्रतिसाद प्रज्ञा९ | 27 April, 2011 - 03:40
मिनोती, माझा तवापण असाच स्क्वेअर आहे. बहुतेक ३९.९९ चा आहे, बेड-बाथ मधलाच. तो तसला चौकोनी तवा बघून दुकानातच हातपाय गळून गेले असावेत माझे..
२ किलो तरी वजन असेल तव्याचं. रोज हाताळून घासताना कधी कधी माझी मानपण दुखायची (ती कहाणी वेगळी आहे). एकूण काय, तर त्या तव्याने माझा उरलासुरला आत्मविश्वास घालवायचंच काम केलं!
असो! ही साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी नुसतीच संपूर्ण!

प्रतिसाद नीधप | 27 April, 2011 - 07:55
मिनोती माझ्याकडे भाकरीचा तवा आहे वेगळा. अगदी टिपिकल लोखंडी. मी तर त्यावरही पोळ्या करू शकते. भाकर्‍या मला एकुणातच अजून म्हणाव्या तश्या जमत नाहीत आणि आता स्वै. बाई असल्याने मी करायला जात नाही.
हा तवा असाच आहे माझ्याकडे. कोणीतरी आईबाबांना सगळा सेट गिफ्ट दिला होता. त्याची गरज नव्हती म्हणून तो पॅकबंद पडूनच होता कित्येक दिवस. मग माझं घर झाल्यावर मी हात मारला त्यावर.
माझा नॉनस्टीक आणि फ्लॅट तवा होता तोच मी इतके दिवस रोजच्या पोळ्यांपासून धिरडी/ डोसे/ हाफ फ्राय सगळ्याला वापरायचे. पण तो मध्यातून वर आलाय आणि कोटींग थोडसं उखडलंय त्यामुळे तो आता वापरण्यात अर्थ नाही ना. तेव्हा आता हा एक्स्चेंजमधे देऊन नवीन घेणारे मी. पण मग तो रोजच्या पोळ्यांना नाही वापरणार.
आता हा जो हार्ड अनोडाइज्ड आहे तो रोजच्या पोळ्यांना वापरू? पण त्याला तर हीट कमी असायला लागते ना? काय लक्षात ठेवायचं? स्वै.बाईला कळेल असं? की लोखंडीच वापरूदेत तिला. मी करेन तेवढ्यापुरता हा वापरू?
नॉनस्टीक रोज वापरू नये म्हणतात मग त्यापेक्षा हार्ड अनोडाइज्ड बरा का?

मिनोती | 27 April, 2011 - 09:27
नीरजा, बाई आच मोठा करून पोळ्या करते का? तसे असेल तर हा तवा तिला शक्यतो देऊ नको. मध्यम आचेवर वापरण्यासाठी हे तवे चांगले असतात. तुला खात्री असेल की बाई तवा नीट वापरेल, मध्यम आचेवर वापरेल तरच तिला दे. तसे नसेल तर आपला हात जगन्नाथ असेल तेव्हाच वापर

मी नॉन्स्टीक तवे कधीही वापरलेले नाहीत त्यामुळे त्याबद्दल सांगू शकणार नाही.

प्रतिसाद नीधप | 27 April, 2011 - 09:31
हो ती आच मोठा करूनच करत असावी. मी काही एवढं लक्ष दिलेलं नाही. (कसली कुगृहिणी आहे मी! )
तसंच करते. तिला जमतायत त्या लोखंडीवर पोळ्या. तेच बरं तिच्यासाठी..

प्रतिसाद मी अमि | 27 April, 2011 - 15:21
>> हो ती आच मोठा करूनच करत असावी. मी काही एवढं लक्ष दिलेलं नाही. (कसली कुगृहिणी आहे मी! )
तसंच करते. तिला जमतायत त्या लोखंडीवर पोळ्या. तेच बरं तिच्यासाठी.. <<

माझ्या एका अ‍ॅनोडाइज्ड तव्याची वाट लावायला सुरूवात केली होती बाईने. मोठया आचेवर पोळ्या करायची सांगुनही दुर्लश करत असे. तिला दुसरा तवा चालायचाच नाही. तो तवा दिसला नाही की चिडचिड करायची. एकदा ती ८-१० दिवस सुट्टीवर गेली तेव्हा मी तो तवा गायब केला आणि लोखडि तवा आणून ठेवला. ती आल्यावर सांगितले की त्याचं हँडल तुटलं म्हणून दुरूस्त करायला दिलाय. मग ती रोज मला विचारायची की दुरूस्त झाला का? एकदा तिला सांगितलं माहेरी देऊन टाकला.... प्रश्न मिटला.

प्रतिसाद साधना | 27 April, 2011 - 15:49
गंमत म्हणजे, मी सासरी पुण्यात असताना पोळ्या केल्या की एकदम मऊ होतात(म्हणजे साध्या तव्यावर.), इथे आले कीच (तसाच तवा असूनही) काहीतरी धाड भरते पोळ्यांना!

सासरी best performance व्हायलाच हवा हे प्रेशर असेल ....

प्रतिसाद नीधप | 27 April, 2011 - 16:39
चला आता मी_अमि च्या पोस्टनंतर शिक्कामोर्तब की तो तवा बाईला वापरायला न देणे.

प्रतिसाद प्रज्ञा९ | 27 April, 2011 - 19:08
साधना

प्रतिसाद सुमंगल | 28 April, 2011 - 02:43
तव्यावर इतकी चर्चा झाली तर काही इनपुट माझ्याकडुन. चपाती साठी मी मातीचा तवा, जो ऊलटा असतो, वापरते. इंदुरला बरेच जण वापरतात. ह्या साठी गॅसचा स्टोव्ह हवा, इलेक्टिक कॉइलचा चालत नाही. ह्या पोळ्या पचायला खुप सहज असतात. पराठे लोखंडी तव्यावर करते. त्यामुळे लोह खनिज मिळते. नॉनस्टिक डोसे किंवा धिरद्यांसाठी.... अजुन तरी ठिक चाललय.

मंजू आणि रूनी सगळ्या पोस्टस इकडे हलवल्याबद्दल धन्यवाद.

सुमंगल, मातीचा तवा तापायला जाम वेळ लागत असेल ना? आणि त्याची उष्णता कशी कंट्रोल करता?

मिनोती तुम्ही सुचवलेला स्क्वेअर ग्रिडल आणला. मस्त आहे तो तवा. पोळ्या जमल्यात त्यावर मला चांगल्या. त्यावर भाकरी आणि दोसा पण करता येइल का?? करून बघीनच मी स्वत: पण हीट सेटींग कसं ठेवावं लागेल? मी आणलेला तवा calphalon चाच आहे.

नविना, मिडिअम ते हाय च्या मध्यावर ठेवून डोसे करायचे. कमी जास्त करायची गरज नाही.

भाकरीसाठी तवा तापवून मग मिडीअम वर ठेवून भाकरी टाकायची. पाणी लावून आच वाढवायची (मिडिअम ते हाय च्या मधे). मग पाणी अर्धवट कोरडे झाले की उलटायची. ती बाजू भाजली की आचेवर डायरेक्ट फुगवायची. फक्त हा तवा गुळगुळीत असतो त्यामुळे भाकरी सरकू शकते. तेव्हा हाताची काळजी घेत नीट पाणी लावायचे.

सुमंगल, मातीचा तवा तापायला जाम वेळ लागत असेल ना? आणि त्याची उष्णता कशी कंट्रोल करता?
<<<

नीधप, गॅसचा स्टोव्ह असल्यामुले उष्णता कंट्रोल करणे सोपे असते. तवा खुप जाड नसतो तेव्हा तापतो; आणि एकदा तापला कि पटपट फुल्के होतात. अजुन एक, समजा काही कारणाने फुलका करपला आणि कडेला ( मातीचा तवा) जळला तर लो़खंडी तव्यासारखे घासत बसावे लागत नाही. थंड झाल्यावर कापड किंवा पेपर टॉवेल फिरवला की पट्कन साफ होतो. संधि मिळाली तर नक्की वापरुन पहा. मी थेट इंदुरहुन अमेरिकेत हॅन्ड्बॅग मधे आणते; ५ आणते त्यातले १-२ वाचतात. जमल्यास मी फोटो टाकेन.

माझ्याकडे बिडाचा नाही पण कोणतातरी तवा कैक वर्षापूर्वी भारतातून घेतला आहे. त्यावरच माझ्या पोळ्या, भाकरी, डोसे, पराठे असं सगळं सुखेनैव चालू आहे. कोणतीही काळजी घेत नाही ह्या तव्याची. पण चालू आहे व्यवस्थित. यावेळी भारतातून कदाचित एक बॅकप घेऊन येईन. नॉनस्टीकचे पॅन टाईपचे फ्लॅट तवेही आहेत पण फारच क्वचित वापरते. इति तवा पुराण संपूर्णम .

बिडाचा आणि मातीचा दोन्ही आहेत पुण्याला. नेक्स्ट टाइम घेऊन येईन.
मग माझ्याकडे लोखंडी भाकरीचा, फ्लॅट नॉनस्टीक, खोलगट हार्ड अनोडाइज्ड, बिडाचा फ्लॅट, मातीचा खोलगट एवढे तवे होतील. बापरे कल्पनेनेच टेन्शन आलं.. इतका स्वैपाक करायचा... Wink

मी वॉलमार्ट मधुन लोखंडी तवा आणलाय व त्यावर पोळ्या, धिरडी, अडई, थालीईठ करते. छान होते. नेहमीच दोसे केले नाहीत पण ते पण छान होतील. तापायला खुप वेळ लागतो त्यामुळे २-३ पोळ्यापेक्षा जास्त करायचे असेल तरच वापरते. बाकीचे तवे अडगळीत गेलेत. ऑमलेट ला मात्र वेगळा छोटा नॉन्स्टीक.. मातीचा तवा!!! मस्त .

अगदी अगदी हाच घ्यायचा विचार करत होते , एक्जणाने रीवीव पण लिहिलाय दोसा चांगला होतो म्हणुन
घेउन टाकते थँक्स गं

अगदी तव्यांशी संबंधित असं नाही, पण मी नविन रेंज घेतली त्यात पाच बर्नर्स आहेत. मधला ओवल बर्नर ग्रिडलकरता आहे. कोटेड ग्रिडलही आलीय बरोबर. एकाच वेळी ३ पॅनकेक्स, डोसे किंवा अंडी मस्त होतात.

तव्यामध्ये माझ्याकडे अ‍ॅल्युमिनियम, नॉनस्टीक तवा आहे.
तसेच आप्पेपात्र, बिडाची काईल पण आहे.
लोखंडी तवा आता घ्यायचा आहे.

मी कायमची भारतात गेल्यावर बहुतेक तवा प्रदर्शन भरवू शकेन Wink कारण साबांचे २ तवे आहेत नॉन्स्टिकचे. एक जुना आणि एक नवा असे. २ लोखंडी तवे आहेत. लहान नि मोठा. मी नेऊन ठेवलेला, सध्या वापरात नसलेला Calphalon चा हार्ड अ‍ॅनो. तवा आहेच.
आणि इथे माझ्याकडे ३ तवे आहेत. १ पूर्ण गंडलाय पोळ्यांसाठी, पण तो ब्रेड भाजायला बराय. एक रोजचा पोळीचा. एक डोसे-धिरडी इ. चा. आणि हार्ड अ‍ॅनो भांड्यांचा सेट घेतला त्यात एक लहान नि एक मोठा असे २ शॅलो फ्राइंग चे पॅन्स मिळालेत, त्यातला मोठा मी आयते/ धिरडी वगैरे पटापट घालयची असतील तर दुसरा तवा म्हणून वापरते!
म्हणजे जवळजवळ डझनभर नुसते तवेच झाले की!! Uhoh

हो प्रज्ञा मी ही येते जोडीने प्रदर्शन लावूया...
नॉनस्टीकच्या सेटमधले ३ वेगवेगळ्या आकाराचे तवे, २ निर्लेपचे, २ हार्ड अनोडाईज्ड, एक अ‍ॅल्युमिनियमचा इंडीयात असतो तसा.. देवा.. एव्हढं करून डोश्यासाठी नाहीच बरा वाटत कुठला! Uhoh (बीडाचा घ्यायची इच्छा होती.. पण ही लिस्ट पाहून जाऊदे..)

बस्कूतै, माझ्या वरच्या लिस्टीत २ तवे अजून येऊ शकतात. साबांकडे बीडाचा तवा आहे का माहिती नाही. असेल तर तो अ‍ॅड होईल. आणि भारतात पोळ्यांना वापरतात तसा हिंडालिअम चा असेल तर तोही...कारण हे २ तवे असलेच, तरी मी अजून बघितले नाहियेत. वापरात नसतात रोज.

आता यावरून माझ्या पाककौशल्याची चिकित्सा करू णये. हाती का ही ही लागणार नाही! Proud

Induction Cooker वर पोळ्या करायला कोणता तवा योग्य आहे? कोणाला माहिती असेल तर कृपया सांगा.

Pages