वळ चंद्रावरचे !

Submitted by Yo.Rocks on 23 April, 2011 - 09:59

मागे ग्रहण पानांचे म्हणून एक प्रयोग केला होता.. तसाच आणखीन एक प्रयत्न... यावेळी नारळाच्या झाडाच्या झावळ्यांनी ग्रहण साधले नि चंद्रावर वळ उठले गेले.. Happy

गुलमोहर: 

योयो..., तुला ना काहीही सुचते.. म्हणे, झावळ्यांनी ग्रहण साधले Proud

"सुंदर ग्रहण्"............आता.., म्हणा ग्रहण ही 'सुंदर' असते का कधी..?

पण सुंदरच Happy

मस्त फोटो. चंद्र नसुन गुरू आहे असे क्षणभर वाटले.

शुक्राच्याही चंद्राप्रमाणे कला दिसतात. फोटोत त्यांना टिपले तर चंद्र की शुक्र ओळखता येणार नाही. पण त्यांना टिपण्यासाठी एकदम पॉवरफुल कॅमेरा पाहिजे.

सहीच!

ग्रील केला कि रे चंद्र >> दिनेशदा.. Happy Happy

धन्यवाद Happy

शुक्राच्याही चंद्राप्रमाणे कला दिसतात >> साधना.. आता पॉवरफुल कॅमेरामॅन शोधायला हवा तर.. Happy

मस्त...आयडियाची कल्पना भारीये.

एकदम एक्स मेन मधल्या त्या धारधार पंजाच्या माणसाने (का प्राण्याने) चंद्राला मारल्यासारखं दिसतंय Happy

तुम्ही लिहल नसत तर गूगल करायच्या विचारात होतो... चन्द्र असा कसा झाला ... अप्रतिम....