ऊठ तू आता तरी [तरही

Submitted by छाया देसाई on 23 April, 2011 - 00:36

नाकळे पुरुषार्थ त्यां रे ऊठ तू आता तरी
षंढ म्हणती लोक सारे ऊठ तू आता तरी

धैर्य आणी बुद्धी यांचा मेळ तू आहेस रे
गांगरूनी गप्प का रे ऊठ तू आता तरी

व्हायचे ते जाहले ती ईश्वरेच्छा मानुनी
घे भरारी पाखरा रे ऊठ तू आता तरी

राहिले आयुष्य त्याला देइ आता न्याय तू
त्या दिशेने वळव वारे ऊठ तू आता तरी

झाड तू औदुंबराचे दाट रे छाया तुझी
नभ बरसते अमृता रे ऊठ तू आता तरी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चांगली झालीय गझल.

मतला आणि

व्हायचे ते जाहले ती ईश्वरेच्छा मानुनी
घे भरारी पाखरा रे ऊठ तू आता तरी.......हे शेर फार आवडले....

धैर्य आणी बुद्धी यांचा मेळ तू आहेस रे.........इथे ''बुद्धि''असं असायला हवं.
गांगरूनी गप्प का रे ऊठ तू आता तरी

पुलेशु. Happy

विचार खूप वेगळे आहेत व आवडलेच!

(अवांतर - काही ठिकाणी 'रे ' टाळता आला असता की काय असे वाटले. चुभुद्याघ्या)

शुभेच्छ व धन्यवाद!

-'बेफिकीर'!