''जत्रा''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 19 April, 2011 - 00:05

नवी मुंबई परिसर्,जो पूर्वी उत्तर साष्टि जिल्हा म्हणून ओळखला जायचा,आग्री-कोळी समृद्धिने परिपूर्ण असून येथिल विविध गावांतून चैत्रात जत्रांना सुरुवात होते.

बेलापूर ची रामनवमी,करावे गावची जत्रा,दाराव्याची जत्रा या सुरुवातीलाच होतात. मात्र हनुमान जयंतीच्या दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी भरणारी नेरुळची जत्रा पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे.

हनुमान जयंतीच्या पालखी सोहळ्यानंतर जत्रेचे वेध लागतात. विविध कुटुंबियांच्या ''तरव्यां''नी जत्रेस सुरुवात होते.भोपी,म्हात्रे,कडू,ठाकूर्,पाटील कुटुंबियांची तरवी,वाजतगाजत देवळात येवून विसर्जित होतात. व दोन दिवस खाउ,खेळणी,पाळणे,मौत का कुऑ,जादू,नाच गाण्याची धमाल उडते.

जत्रेस प्रारंभ होण्याआधीचि ही प्रकाश चित्रे.

मंदिराचे प्रवेश द्वार

विस्तीर्ण पिंपळ वृक्षामागे दिसणारा मंदिराचा कळस.

आकाश पाळणे....

दुपारनंतर व उद्या अजून फोटो टाकतो. Happy

गुलमोहर: 

सायबानु फुडचे फटू आणिक म्हायतीची वाट बगतू बर्का. रच्याक तुमची मर्चिडीज्बी बिगिटली की देवा Wink

तुमची मर्चिडीज्बी बिगिटली की देवा>>>>>>>>>> कुटं मर्चिडीज हाय वं...... म्हपला त कुटं बी दिसंना राव..... हा यक फटफटी बिगीटली म्या..... आबाबा ....केवडं मोठ्ठाले चक्र आनी झुलं हायती

तुमची मर्चिडीज्बी बिगिटली की देवा>>>>>>>>>> कुटं मर्चिडीज हाय वं...... म्हपला त कुटं बी दिसंना राव..... हा यक फटफटी बिगीटली म्या..... आबाबा ....केवडं मोठ्ठाले चक्र आनी झुलं हायती

अशा जत्रात ते खेळ असतात नाही का ? म्हणजे एक कठपुतळीचा खेळ असतो. एक मुलगी पायाने सगळी कामे करते तो खेळ असतो, दोन फटफट्या घेऊन लाकडाच्या विहिरीसारख्या भागात गोलगोल फिरवणे..

युगं लोटली अशा जत्रा बघून. लहानपणी मला त्या आकाशपाळण्यात बसायला खूप भिती वाटायची. बरीच वर्षे लांबच राहिलो त्यापासून. मग परदेशी बसून बघितले. नाही वाटली भिती !!