Submitted by निवडुंग on 18 April, 2011 - 06:25
तुझ्या नजरेचा न्यूट्रॉन,
जेव्हा माझ्या युरेनियमी हृदयावर,
अचानक येऊन आदळला
हृदयभरून उठलेल्या ऊर्जेने,
रोमारोमाची काहिली होत राहिली..
तुझ्या नजरेचा न्यूट्रॉन
एवढ्यावरच न थांबता
रूपं प्रतिरूपं धारण करत,
हृदयाची शकलं करत गेला
एखाद्या अनियंत्रित अभिक्रियेसारखा..
राहिले फक्त हृदयाचे भग्न अवशेष,
बेरियम आणि क्रिप्टॉनच्या रूपात
आणि शरीरभर पसरलेल्या वणव्यात,
जळत राहिलेलं सर्वांग..
(अवांतर - केमिस्ट्री विषय न शिकलेल्या/विसरलेल्या माबोकरांसाठी
http://www.unc.edu/~erinb/NuclearFission.html )
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लई भारी... लईच मस्त...
लई भारी... लईच मस्त...
न्यूट्रॉन, जेव्हा हृदयावर
न्यूट्रॉन, जेव्हा हृदयावर आदळला असावा,
तेव्हा तो वरच्या (outer most) कक्षेमधुन आतल्या कक्षेत (lower enerrgy level) उतरला आणि म्हणूनच एनर्जी रिलिज झाली
ह्या सगळ्या प्रक्रियेत तुला मात्र जामच उकडलं अशणार रे...
हे हे...
मज्जा आली....
खूपच छान निवडूंग अनुबाँब
खूपच छान निवडूंग
अनुबाँब फोडला
धन्यवाद मुक्ता, किकु..
धन्यवाद मुक्ता, किकु..
बागेश्री,
फारंच Deep Meaning शोधलाय..
धन्यवाद..
धडाम ढूम्म...! झालं ते झालं..
धडाम ढूम्म...! झालं ते झालं.. आता पूढच्या किरणोत्साराचं काय?
चंबू धन्यवाद, (नाव भारी आहे..
चंबू धन्यवाद,
)
(नाव भारी आहे.. मला एकदम परिक्षानळी, बकपात्र, चंचुपात्रं, स्पिरिटचा दिवा वगैरे आठवलं..
पुढचा किरणोत्सार जो झालाय, तो आतल्या आतच आहे, त्यामुळे त्याचे परिणाम भोगतोय..