आयडीमागचा माणूस!!!

Submitted by ह.बा. on 11 April, 2011 - 04:01

*********************************
! !
*********************************

आज सकाळी सकाळी एका मायबोलीकर मित्राचा फोन आला...
"हबा मला तुमच्या त्या संस्थेत काम करायचं आहे"
"स्वागत... विशाल कुलकर्णीना फोन करा ते सांगतील तुम्हाला"
"पण मग त्यात ती ही (माबोवरचा एक आयडी) असणार का?"
"हो हो असतील ना"
"आणि तो असेल का?"
"हो हो असणार ना"
"मग नाही जमणार"
"का?"
"त्यानी माझे खूप खालच्या भाषेत अपमान केलेत."
"मग?"
"ते नसतील तर आम्ही चौघेजण आहोत"
इ.इ.इ. अर्धा तास एकच गोष्ट तो बोलत होता. मी समजावण्याचा प्रयत्न केला. सगळे येतील. बाहेरचे वाद बाहेर, काम करताना त्याचा संबंध नाही. पण बिचारा लहान मुलासारखा एकच म्हणत राहीला. 'तो असेल तर मी नाही' फोन बंद झाल्यावर मला माझा माबोप्रवास आठवला. कट्ट्यावर माझे जंगी अपमानमय स्वागत करणारा विशल्या आज मैत्र जिवांचेचा सचिव आहे. कधी चांगले तर कधी वाईट संवाद झालेले... प्रगो, आर्या, कोमल, चनस, विदीपा, उमेश, भारत, भुंगा, मुग्धानंद, प्राजू, अश्वीनी, आणि इतर अनेकजन सहभागी होताहेत. सम्या रानडे, सुक्या, देसाई काका येऊन भेटून कामाविषयी माहीती घेऊन व आपला सहभाग काय असू शकतो हे सांगून गेले....

मला भेटलेला एकही माणूस जसा वाटलेला तसा भेटला नाही. शब्दांच्या रंगानी रंगविलेल्या खोट्या चेहर्‍यांच्या कोलाहलात गुंतल्यामुळे आयुष्यातल्या उदात्त, आणि निर्भेळ आनंदाला मुकण्याचे पाप आपल्या हातून घडू नये. रंगाच्या आत एक खरा चेहरा आहे तो चेहरा ज्या मनाचा आरसा आहे ते कुरूप की देखणे हे ठरवण्याची घाई प्रतिसाद वाचता वाचता करू नये इतकेच...
*****************************************

विचार बदलल्यास नक्की कळव मित्रा!!! मला किंवा ज्याच्याविषयी बदलला त्याला.

**********************************************
सर्व वाचकांना सुचना :

या लेखाचा विषय कुणी कसे वागावे हा नसून कुणाच्या आयडी लक्षणांवरून कुणाचे खरे व्यक्तिमत्व ठरवू नये इतकाच आहे. कुणी कसे वागावे याविषयी मार्गदर्शनाचे कोणतेही अवाहन येथे केलेले नाही.

-हबा (मायबोली आयडी)

गुलमोहर: 

लेखाचे नाव पाहुनच "तो" किस्सा आठवला Rofl

बाकी तुही मला बालीश समजला होतास ....वा वा ...आता माझ्याबद्दल माझ्याकडुन हे क्लॅरीफिकेश

मला मायबोली वर येवुन पोरी पटवायच्या नाहीत की इथले कॉन्टॅक्ट वापरुन बीजीनेस सुरु करायचा नाही ....अन त्या मुळे मी खरा कसा आहे हे इथे व्यक्त करण्याची मला गरज वाटत नाही
उलट खर्‍या लाईफ मधे जसे वागता येत नाही तसे वागता येईल अशी वर्च्युअल आयडेंटीटी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे

संदर्भ : अवलोकन http://www.maayboli.com/user/28567 ....प्रगो

ह बा... खरंच आहे... कामाच्या वेळी काम... इतर वेळी तुमचे जे काही वाद असतील ते साग्रसंगीत चालूद्यात... Happy

Lol
खरय हबा.... सगळे मुखवटे घेउन वावरत असतात इथे! प्रत्यक्ष भेटीत सगळं कळतं की हा माणुस खुप वेगळा आहे. कदाचीत आपण असं व्हावं अशी सुप्त इच्छा असावी लोकांची म्हणुन ते स्वतःची तशी प्रतिमा बनवतात.
प्रतिसादावरुन व्यक्तिमत्त्व ठरवु नयेत.... हा चांगला धडा ठरावा!

मला मायबोली वर येवुन पोरी पटवायच्या नाहीत >>> हे तू आवर्जून सांगतोयस!!! यावरून एका लेखाचे.... अज्ञात लेखकाचा... चोराचा शोध घेण्याचे मार्ग इ इ इ संदर्भ आठवले Biggrin

दिनेशदा,
मलाही तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. नक्की भेटू!!!

ठमे,
दॅट्स राइट!!! Happy

हबा, अत्यंत सुंदर!!! तू आत्तापर्यंत लिहिलेल्यातील सर्वात आवडलेले.
रच्याकने, नीधप तुला हबा वयस्कर म्हणतोय आणि चक्क समंजसही (कुरापत काढणारा आगाउ) Proud

मस्त लिहियलस हबा... Happy
खरय खोट्या चेहर्‍याचे मुखवटे घेऊन वावरताना आपला खरा चेहरा तर पुसुन जाणार नाही ना..

ह. बा. - मोक्याच्या वेळी चांगला विषय मांडलास मित्रा!!

तुला ज्याने फोन केला होता आणि ह्या एकमेव कारणावरून जो विधायक काम करायला यायला 'का' 'कू' करीत होता त्या सद्गृहस्थाला "गेट वेल सून पापे"

दक्षीणा, मामी, जयश्री, अश्वीनी के, गुब्बी, निधप या समंजस, वयस्कर महिला.
>>> समंजसबद्दल - आभार. वयस्करबद्दल - णिशेद! महिलांबद्दल - काही नाही. Happy

बाकी लेख मस्त.

वयस्करबद्दल - णिशेद! >>> मामी मी णोंद घेतली आहे पुण्हा णाही म्हणनार...

या सगळ्या माझ्यापेक्षा किमान तीसेक वर्षांनी लहान आहेत !!>>> दिनेशदा, तुम्ही शहाजहानला भेटलाय का हो?

सर्वांचे आभार!!!

ह.बा. नेहमीप्रमाणेच मस्त लिहिलं आहेस. Happy

>>आणि ऑनलाईन भांडणाचा साईन आउट झाल्यावर विचार करणं म्हणजे मुर्खपणाच हे स्वतःला हजर वेळा सांगून घोटवून घेतलं

ह.बा. तू समजूतदार आहेस. दुर्दैवाने ही समज सगळ्यांच्यात नसते. एका आयडीने रागात तर एकाने रडतरडत मला फोन केला होता अमुक अमुक का बोललास म्हणून. असो. ज्याचा त्याचा पोक्तपणा Happy

आगावा, तो नुसतं समंजस नाही तर समजंस लोक नंतर लहान वाटले असंही म्हणालाय.. Happy
तर आता णिशेद करावा की हसावं की सोडून द्यावं....
सोडून द्यावं झालं!!
लिहिलंयस चांगलं.

सानी आणि इतर विसेक लेडीज आयडी म्हणजे बेफिकीरांचे ड्युआयडी>>> Rofl असो, पण इतर (गैर)समजांच्या पुढे हा समज कितीतरी पटींनी बराच... Wink Proud

बाकी, हबाची आजवरची माबो इमेज आणि हा त्याचा लेख यातही जमीन आस्मानाचा फरक जाणवला... गुड वन! Happy

हबा स्पेशल Happy छान लिहिलायस

हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट आठवली

Pages