''कोठे मनाला वाटतो आराम पहिल्या सारखा''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 7 April, 2011 - 11:34

नव्या तरही वरील माझा सहभाग. ही ओळ सुचवल्याबद्दल भूषणजींचे मनःपू र्वक आभार

=============================================================

जेथे मिळे करतो तिथे विश्राम पहिल्यासारखा
कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा

गंधाळण्या घामामुळे कामात घेतो झोकुनी
अंगास कोठे लाभतो तो घाम पहिल्या सारखा

झोडावया ,फोडावया,ठेचावया, वृत्तीस त्या
होशीलका आता तरी बेफाम पहिल्यासारखा

पाणी जरा से घालुनी डोक्यास केले थंड मी
होईल राडा वागलो उद्दाम पहिल्यासारखा

''कैलास''च्या विनयास जे षंढासमानी मानती
आता तिथे वागेन मी मुद्दाम पहिल्यासारखा

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मक्ता सुपर्ब!!

मतल्यात दोन मिसर्‍यांच्या मधे 'तरी' हा शब्द गृहीत धरावा लागत आहे असे वाटले, चुभूद्याघ्या. Happy

क्लास Happy

''कैलास''च्या विनयास जे षंढासमानी मानती
आता तिथे वागेन मी मुद्दाम पहिल्यासारखा>>> आवडला.

(अवांतर - कणखरराव, मी काही गझलकारांचे काहि शेर असे पाहिले आहेत की जे या मतल्याप्रमाणे होते व त्यात 'तरी' या शब्दाची गरज 'जाणवत' नव्हती. कदाचित अनेक गझला वाचल्यानंतर ती गरज नष्ट होते की काय कुणास ठाऊक! मला यामतल्यात ती जाणवली नाही. क्षमस्व!)

-'बेफिकीर'!

कदाचित अनेक गझला वाचल्यानंतर ती गरज नष्ट होते की काय कुणास ठाऊक!>>>

भूषणजी,

खूप गझला वाचणार्‍यांचे, गझला लिहीणार्‍यांचे होत असावे. मी दिलेले मत 'लेमॅन'ला काय वाटेल ह्या आशयाचे होते. अर्थात कैलासरावांच्या गझलेवर इतका बारीक प्रतिसाद(प्रतिकूल असल्यासारखा असला तरी) मी, तुम्ही देऊ शकतो असे आपल्या त्यांच्याबरोबरच्या असलेल्या ओळखीच्या अनुषंगाने वाटले म्हणून लिहीले.

मनमोकळेपणाने आपणही मुद्दा डिस्कस केलात ह्याचा आनंद वाटला. मायबोलीवर मनमोकळेपणाची जरा उणीवच आहे, नाही का? Happy

''कैलास''च्या विनयास जे षंढासमानी मानती
आता तिथे वागेन मी मुद्दाम पहिल्यासारखा

फटॅक!!!!

>>'कैलास''च्या विनयास जे षंढासमानी मानती
आता तिथे वागेन मी मुद्दाम पहिल्यासारखा

षटकार!!!!!!!!!!!!

आवडली गझल.

गंधाळण्या घामामुळे कामात घेतो झोकुनी
अंगास कोठे लाभतो तो घाम पहिल्या सारखा

वरील शेर सर्वाधिक आवडला.
मस्त आहे कैलासजी, धन्यवाद!

काय बोलू!!
मी गझल लिहिण्यापूर्वी ही वाचली होती. म्हणून मलाही बर्‍यापैकी जमली..!