कसर

Submitted by कौतुक शिरोडकर on 5 April, 2011 - 00:45

गुज ऐकवी नजर तुझी
मन नोंदवी बखर तुझी

क्षण सोहळे ऋतूतले
तैसी फिरे लहर तुझी

ना मोगरा, जुई रुचे
मज मोहवी तगर तुझी

सरली निशा सयींसवे ?
दे जांभई खबर तुझी

हा स्वर्ग ओंजळीत पण..
सलते अता कसर तुझी

गुलमोहर: 

सो कूल मॅन, कसलही अवडंबर नाही, शब्दच्छलाचा साज नाही की तंत्राचा माज नाही.>>> That is Kautuk ! Hats off bro !!

>>ना मोगरा, जुई रुचे
मज मोहवी तगर तुझी
आणि
हा स्वर्ग ओंजळीत पण..
सलते अता कसर तुझी >> हे दोन्ही शेर प्रचंड आवडले.

कधी कधी कविता वाचून काय वाटलं ते शब्दात व्यक्त करता येणं निव्वळ अवघड असतं.... Happy