कहां गये वो लोग.........

Submitted by बाळू जोशी. on 27 March, 2011 - 03:45

चित्रपट पाहताना अनेक छोटे मोठे कलावन्त लक्षात राहून जातात. त्यात काही सेलेब्रेटी तर काही अगदी एक्स्ट्रॉ देखील असतात. सकारण, अकारण ते आठवत राहतात. बर्‍याचदा ते परत कुठेच दिसत नाहीत . काय करतात, कसे दिसत असतील, कुठे असतील ,जिवन्त तरी आहेत का असे अनेक प्रश्न आपल्याला कारण नसताना एका अनामिक सॉफ्ट कॉर्नरमुळे सतावीत असतात.

मी अमि यांच्या राज किरण यांच्याबद्दलच्या एका प्रश्नामुळे अशा लष्कराच्या भाकरी भाजणारे लोकही आंतरजालावर आहेत असे दिसून आले. त्यांचा तुमचा या धाग्याद्वारे परिचय करून देण्याच्य उद्देशाने
या बीबीचा प्रपंच...
आशा आहे हा धागा माबोकरांच्या पसन्तीस नक्कीच उतरेल .. आपणही त्या माहितीत भर घालावी ही विनन्ती...

http://passionforcinema.com/kahan-gaye-woh-log/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय. बर्‍याचदा आठवतात असे कलाकार. एखादी घटना, चित्रपटातला सीन वा कधीही ती व्यक्ती आपसूकच डोळ्यांसमोर येते. सोबत आता कुठे असेल वगैरे वगैरे प्रश्न.. मग तेवढ्यापुरते आठवून पुन्हा विस्मृतीत दडतात.
पुन्हा एखादी घटना, एखादा सीन..
तो अरविंद (की अरविंदम) स्वामी नावाचा एक उत्कृष्ट दाक्षिणात्य अ‍ॅक्टर होता. रोजा, बॉम्बे चा नायक.
तो कुठे गायबला?
अजून एक, ती 'धबधबा कन्या' मंदाकिनी बद्दल माहित्येय का कुणास?

रच्याकने, बाजो, हा लेख आपण फक्त ग्रुप सभासदांसाठीच ठेवलाय का?

वा बाजो, आज सकाळीच काहीतरी वाचत असताना माझ्या मनात नेमके हेच विचार आले.

तो तुम्हाला 'लम्हे' मधला श्रीदेवी बरोबर काम केलेला हँडसम दीपक मलहोत्रा आठवतोय? त्याची माजी बायको आमच्या सोसायटीत राहते म्हणून बरेचदा लिफ्टमध्ये दिसायचा. एकदा माझी मैत्रिण म्हणाली हा 'तो'. मी मुळात 'लम्हे'च पाहिला नाहीये मग दीम बद्दल दीमाग की बत्ती जळलीच नाही. पण कुतुहल म्हणून गुगलून पाहिले. तेव्हाचा तो आणि आताचा तो - ओळखू न येण्याइतका बदललाय. भरीत भर म्हणून त्याने आपले नावही काहीतरी इटालियन टाईप घेतलेय. आता म्हणे गोव्याला रेस्टॉरंट चालवतो.

रच्याकने, बाजो, हा लेख आपण फक्त ग्रुप सभासदांसाठीच ठेवलाय का?

>>
नाही तसा अजिबातच उद्देश नाही . किम्बहुना तो अधिक अधिक लोकानी पहावा अशीच इच्छा. पण मायबोलीची तांत्रिक बाजू मला फारशी माहीत नाही. हा धागा सर्वासाठी खुला होईल असे काय करावे लागेल?
मी प्रयत्न केला आहे. तो सार्वजनिक झालाय की नाही समजत नाही...

ट्यागो
मध्यंतरी अरविंद स्वामी ('रोजा' फेम) ची मुलाखत वाचली होती. तो चेन्नैई मध्ये एक कंपनी चालवतो.'रोजा ' नंतर त्याने काही हिंदी व दाक्षिणात्य सिनेमे केले व MBA करुन कंपनी सुरु केली.
काही महिन्यांपूर्वी त्याचा डिवोर्स झाला.त्याला दोन मुली आहेत.( ह्या अवांतर लष्कराच्या भाकरी)
धबधबा कन्या' मंदाकिनी ने एका तिबेटियन डॉक्टरशी लग्न केले आहे (तो दलाई लामांचा अनुयायी आहे) . ती तिबेट मध्ये योगा चे क्लासेस चालवते. ती व तिचा नवरा एक सिनेमा काढणार होते.

फिरदोस दादी (गिरिश कर्नाड बरोबर दूरदर्शन वर एका सिरीयल मधे होती.), व `तॄष्णा`' (ही सुद्धा जुनी सिरीयल ) याच्या हिरोईन बद्दल माहिती हवी होती.

फिरदोस दादी इम्तिहान मध्ये रेणुकाची बहिण म्हणून दाखवली होती.

अस्तित्व - एक प्रेमकहानी मध्ये वरुण बडोला ची बहिण म्हणून दाखवली होती, ती अ‍ॅक्ट्रेस कोण आहे? ती दम मध्ये विवेक ओबेरॉय ची बहिण म्हणूनही दाखवली होती. तसेच शुभा मुद्गल च्या "सीखो ना नैनो की भाषा, पिया" या गाण्यातही होती.

तृष्णा ची नायिका म्हणजे निशा सिंग ना. ती मध्यंतरी एका सिरियलमध्ये दिसली होती. फिरदोस दादी परवा परवा 'बंदिनी' मध्ये होती व्हॅम्प म्हणून.

'यादोंकी बारात' सिनेमातले धर्मेंद्रचे दोन्ही भाऊ विजय अरोर आणि तारीक..त्यांच्या बद्दल काही माहिती आहे का?

विजय अरोरा मला वाटते एक्स्पायर झालाय. तारीक बद्दल माहीत नाही. विजय अरोरा ने मध्यंतरी कुठलातरी रहस्यपटही दिग्दर्शित केला होता. आता नाव आठवत नाहीये.

विजय अरोराचा शेवटचा आठवणारा रोल म्हणजे रामायण मालिकेतील इन्द्रजीत.

तारीक बहुधा नासिर हुसेन चा फेवरिट असावा, नंतर हम किसीसे कम नही मधे ही होता, "क्या हुवा तेरा वादा" गाणे त्याचेच.

तो नंतर कधी दिसलाच नाही>>>
बरय ना. त्याने सोबत काजल किरणला पण नेले असावे.

गंगु तेली राहुल रॉय व आदर्श तेलीण अनु अगरवाल पण गायबले.

तारीक बहुधा नासिर हुसेन चा फेवरिट असावा, नंतर हम किसीसे कम नही मधे ही होता, "क्या हुवा तेरा वादा" गाणे त्याचेच.

फार एन्ड,
तारिक हा नासिर हुसेनचा पुतण्या. अमिर खानचा चुलत भाउ.
म्हणून तो नासिर हुसेनच्या पिक्चर्समध्ये असायचा.

चुनौती नावाची एक मालिका होती दूरदर्शन वर ( टायटल साँग मधे अमितकुमारचा आवाज असलेली एकमेव ).. कॉलेजमधे अंमली पदार्थ विकणा-या गँगवर आधारीत पहिली मालिका.. तिचाच पुढचा भाग कँपस या नावाने आलेला होता.

यात सलीम नावाचा एक अभिनेता होता. गँगचा मुख्य हस्तक !! पुढे तो सोल्जर या सिनेमात मुख्य व्हिलन म्हणून दिसला... जबरदस्त अभिनय होता.

का मागे पडला कुणास ठाऊक !!

हमसे का भूल हुई
हे गाणं ऐकल्यावर खुद्द मोहम्मद रफी देखील ज्याच्या आवाजाला फसले तो अन्वर कुठे गेला ? शब्बीर / मुन्ना अजीज वगैरे टिनपाट लोकल ट्रेन गायकांना जेव्हढी मिळाली त्याच्या १ टक्का सुद्धा प्रसिद्धी त्याला मिळाली नाही.

हमसे का भूल हुई
हे गाणं ऐकल्यावर खुद्द मोहम्मद रफी देखील ज्याच्या आवाजाला फसले तो अन्वर कुठे गेला ? शब्बीर / मुन्ना अजीज वगैरे टिनपाट लोकल ट्रेन गायकांना जेव्हढी मिळाली त्याच्या १ टक्का सुद्धा प्रसिद्धी त्याला मिळाली नाही. > अनुमोदन.

चुनौती च टायटल साँग `हर पल जीवन का एक चुनौती है !' मस्तच होत.

तृष्णा ची नायिका म्हणजे निशा सिंग नव्हती. दुसरीच कोणीतरी होती (हांडा किंवा असच काहीतरी अडनाव होत तिच).

मला 'विवा गर्ल्स' बद्द्ल अशीच उत्सुकता आहे? काय झालं या मुलींचं पुढे? मी जर बरोबर असेन, तर हा पहिला वहिला रिअ‍ॅलिटी शो होता. प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यावर अचानक कशा गायब झाल्या ४ जणी. अनुश्का मनचंदा एकटीच आहे अजुन पडद्यावर.

चुनौती मधला सलीम घौस नंतर 'भारत एक खोज' मधे कृष्णाच्या भूमीकेमधे दिसला होता. चुकीची पात्रयोजना होती असे मल वाटते.
अजुन गायब झालेले लोक म्हणजे ब्योमकेश बक्शी (रजत कपूर), अनीता राज वगैरे बरेच...

चुनौती मधला सलीम घौस नंतर राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित अक्स चित्रपटात एका स्वामीच्या भूमिकेत होता.