स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo

Submitted by अभय आर्वीकर on 26 March, 2011 - 16:22

ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.
चॅनेल : स्टार माझा TV मराठी
दिनांक : २७-०३-२०११
वेळ : सकाळी ९ वाजता

BLOG MAJHA 3 GROUP PHOTO.jpg
……………………………………………………..

त्या निमित्ताने दि. २६-०३-२०११ ला स्टार माझावर झलक दाखविण्यात आली. व्हिडीयो येथे पाहता
येईल.

========******================*+++++=============

दि. ३०.०३.२०११

स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo

ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.

१) आज Blog Majha 3 कार्यक्रमाच्या Vdo चे सर्वच पाचही भाग अपलोड केले आहेत.
ते खालील लिंकवर पाहता येईल.
http://gangadharmute.wordpress.com/vdo/starmazavdo/

२) मोबाईल फ़ॉर्म्याट मध्ये सदर भाग उपलब्ध आहे.

कोणास हवे असल्यास

ranmewa@gmail.com

या मेलवर मागणी नोंदवावी. विनामुल्य पाठविण्यात येईल.

धन्यवाद.

-----------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन.
बाकी अजुन कोणी आहेत का मायबोलीकर?
समोरच्या रांगेतील, डावीकडुन चौथा, मायबोलीकर असल्यासारखे वाटते ?

व्वा , मुटेभाउ अभिनंदन , फोटुत तुम्ही कुठे हाव ? नंबर लिवा.
समोरच्या रांगेतील, डावीकडुन चौथा, मायबोलीकर असल्यासारखे वाटते ?
तो तुमचाच का ?

डावीकडुन चौथा मधुकर रामटेके, त्याच्या शेजारी गंगाधरदादा, त्यांच्या शेजारी परीक्षक माधव शिरवळकर, माधवजी आणि स्टार माझाच्या अँकर यांच्या मध्ये अस्मादिक (विशाल कुलकर्णी) आणि उजवीकडून दुसरी मायबोलीकर मणिकर्णिका !
अभिनंदन Happy

अभिनंदन ... Happy
त्या स्टार माझाच्या अँकरच्या बाजुला उभ्या आहेत त्या लीना मेहेंदळे का ?
मी त्यांना भेटल्यासारख वाटतय...

अभिनंदन, गंगाधरजी !
अशा प्रकारच्या स्पर्धाविषयी माहिती आपण मायबोली माध्यमातून प्रसारित करावी. जेणेकरुन जास्तीत जास्त मराठी माणसं त्या स्पर्धांचा लाभ घेतील,

मी आज दुपारी २-२.१५ च्या सुमारास टिव्ही लावला तर हा प्रोग्रॅम चालू होता. गंगाधर मुटे नाव पाहून पुढे बघू लागले तर त्यांच्या ब्लॉग बद्दल सांगितलं आणि पुढे विशालचं नाव घेतल. मग बराचे वेळ पाहिला प्रोग्रॅम. ती मुलगी मणिकर्णिका होती होय ! Happy

सर्वांचं अभिनंदन Happy

पुर्ण कार्यक्रमाची लिंक असेल तर येथे देणार का ?

मी पूर्ण कार्यक्रम रेकॉर्डिंग केला आहे. लवकरच अपलोड करतो. त्याची लिंक देईन.

(टीव्ही कार्यक्रम रेकॉर्डिंग करून क्लिप बनविने, हा नवा अनुभव आहे. फारच जिकरीचे काम आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येतो आहे. अनुभव असणार्‍यांनी मार्गदर्शन केल्यास उत्तम)

अरे वा. छान. काल एक मिटिंगमुळे मी मिसलं होतं.
आता बघायला मिळेल.

हे शूटींग गमतीशीर प्रकार असतो.>>>>>>

खरय नीरजा, फक्त पहीले दोन तास गंमतीशीर वाटतो, नंतर त्रासदायक वाटायला लागतो आणि शेवटी शेवटी कुठून झक मारली आणि.............................. असे वाटायला लागते Wink Proud

गंगाधरदादा, पुर्ण क्लिप अपलोड केली की कळवा.
रेकॉर्डींगसाठी मनःपूर्वक धन्यवाद ! (च्यामारी मला का नाही सुचलं हे. Wink )

विशाल, मुंबईत काही असे लोक आहेत जे गेल्या दोन महिन्यातल्या कुठल्याही चॅनेलवरच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या क्लीप्स देऊ शकतात. काही पैसे घेऊनच अर्थात. नंबर मिळाला तर बघते.

सर्व विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन. Happy मायबोलीच्या कुणाकुणाला पारीतोषीक मिळाले हे सुद्धा वरती नमुद करता आले तर बरे होईल.

Pages