लिली

Submitted by स_सा on 25 March, 2011 - 01:19

मागच्या वर्षी हे लिली (प्रकार माहिति नाही) लावले, मागच्या अठवड्यात फुले आलेली दिसली मग लगेच त्याचे फोटो सेशन केले, त्याबरोबर टेरेस वरील अन्य काही फुले पण घेतली. पण उन्हामुळे सध्या फुले पारशी नाही आली या वेळेस..

lili00.jpglili04.jpglili01.jpglili02.jpglili03.jpg

रानभेंडी / भेंडी गुलाब (??)
raanabhendi0.jpg

कॉफी
coffee.jpg

कोंबडीचा तुरा. cocks comb
unknown0.jpg

गुलमोहर: 

छान Happy

सचिन सगळे फोटो एकदम मस्त...

सचिन ती रानभेंडी आहेत? बहुतेक नसावीत. रानभेंडीही पिवळीच पाहिलीत आणि भेंडीला पेरापेरात फुले लागतात. अशी लगडत नाहीत.

लिली माझ्याही शेजारी फुललीय. बरेच दिवस टिकते हे फुल. एक फुटबॉल लिली म्हणुनही आहे. शेजारी आहे, फुल लागले तर टाकेन इथे. मे महिन्यात त्याला फुले येतात.

शेवटचा कोंबडीचा तुरा. cocks comb

तु कॉफिचे रोप कुठून मिळवलेस? मस्त आहे एकदम. त्याच्या फुलांचे अजुन फोटो टाक ना. मागे दिनेशनी टाकलेले.

तु कॉफिचे रोप कुठून मिळवलेस?<< मी नाही, वडिलांनी आणले महाबळेश्वरहुन

बहुतेक नसावीत.<< मलाही शंका आहेच

छान फोटो.
लिलित बरेच कलर आहेत आता, पण हा पारंपारिक रंग.
कोंबड्याचेहि अनेक रंग आता मिळतात. त्याच्या मानेवर नखाने खरवडले, कि काळ्या बिया मिळतात.
त्या सहज रुजतात.
कॉफी तिथे वाढतेय, याचे कौतूक वाटले.