.

Submitted by क्ष... on 24 March, 2011 - 15:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. इथे कुठे मिळणार ह. पाला? Sad
या भाजीवर थोडी आंब असते. त्यामुळे भाजी दोन पाण्यातूनतरी काढून घ्या.

त्यामुळे भाजी दोन पाण्यातूनतरी काढून घ्या >>> त्या आंबसाठीच तर ताजी भाजी खायची ना ? नाही तर सुक्या भाजीत वेगळी चिंच घालावी लागते.

इथे हरभर्‍याची ताजी भाजी नाही बघितली कधी. मी सुकी भाजी भारतातुन आणते. पण त्याची पिठल्यासारखी पातळसर भाजी होते.

इथे मिळत नाही म्हणूनच जास्त आठवण येते Sad मागे पेरावी का यावर्षी??

अंजू, आम्हाला त्याची आंबट चव आवडते त्यामुळे मग मम्मी खुप धुवुन आंब घालवत नाही.

मी पेरली होती एके वर्षी. चांगले देशी हरभरे आहेत का ? माझे घरुन आणलेले संपलेत. इंडियन स्टोअरमध्ये मिळतील ते घेऊन येते.

फार आंब ठेवली तर तोंड येतं (का घशात खवखवतं, नक्की आठवत नाही पण) त्यामुळे का़कू दोनदा पाण्यातून काढायची.

मस्त रेसीपी आणि माहिती. भाजीवाल्याला सांगून ठेवत्ये भाजी आणायला.
ही भाजी आणल्यावर/केल्यावर घरभर वास घमघमत राहतो.

मस्त रेसिपी, आम्ही पण डाळीचे पीठ घालुन गरगटी भाजी करतो.
कृती साधारणता :
भाजी निवडुन, धुवुन दोन वाट्या, १ मोठा चमचा हरबरा डाळ भिजवुन, लसुण, लाल तिखट, मिठ, हळद, हिंग, डाळीचे पीठ अर्धी वाटी, गरम पाणी.
फोडणीत लसुण लाल झाल्यावर, हिंग, भाजी टाकावी, परतुन ह.डाळ टाकावी. झाकुन ठेवावे. चांगली मऊसर शिजल्यावर (डाल बोटाने चेपुन पहावी) त्यात डाळीचे पीठ व इतर साहित्य मिसळावे. एकजीव झाल्यावर गरम पाणी टाकुन हवी तितकी पातळ करावी. चवीला गुळ टाकावा (कारण ही भाजी आंबट असते).
गरम गरम भाताबरोबर किंवा कळण्याच्या भाकरीबरोबर एकदम तोंपासु.
अशीच सेम भाजी वाळलेल्या पाल्याचिही करतात फक्त फोडणीत भाजीऐवजी आधण टाकावे व नंतर डाळीचे पीठ व भाजी एकत्र कुस्करुन टाकावी.

येस.. नी आमच्याकडे न धुताच करतात ही भाजी. साबा स्पेशल घेउन येतात शेतातली. मग ३-४ वेळा ही भाजी. मला नुसती भाजी पण आवडते खायला... यम्मी अगदी.

वाळवुन ठेवलेल्या पानांची नंतर ६-८ महिने. पण ताजी लागते तशी वाळवलेली नाही लागत Uhoh

सुकवलेल्या हरबर्‍याची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने करतात. >> याची पण रेसिपी टाक ना तुझी Happy

आम्ही थोडि गरम करुन घेतो. मग हाताने चुरुन त्यात तिखट , मीठ , डाळीचे पीठ कालवुन घ्यायचे. मस्त जीरे , मोहरी , हिंग घालुन फोडणी करुन त्यात पाणी टाकायचे. उकळी आली की भाजीचे एक्त्र केलेले मिस्रण टाकुन शिजली की काढायची. ( भाजी आंबट नसेल तर फोडणीत पाण्याआधी एक टोमॅटो टाकायचे चिरुन )

वाळवलेली पानं पण मिळतात का? कुठे?

मी गेल्यावर्षी भीमथडी जत्रेत खाल्ली होती ही भाजी. तेव्हापासून करायचीये पण भाजीच मिळत नाहीये. आता सुके हरभरे कुंडीत लावूनच करावी काय!

अगदी आवडती भाजी. प्रकार १ नी नेहेमी केली जाते आईकडे. मला अजून कधीच इथे बाजारात भाजी दिसली नाहीये. त्यामूळे आमच्याकडे फक्त सुकी भाजीच.

नी, बहूतेक तरी बाजारात मिळत नाही वाळवलेली भाजी. आमच्याकडे पण गावाकडूनच येते.
वर्षा, सिंडीने एक रेसेपी टाकलिये सुकवलेल्या भाजीची, पीठ लावून पिठल्यासारखीच पातळ. ही रेसेपी - http://www.maayboli.com/node/7847?page=1

भाजी कोरडी करून त्यात कच्चे तेल, मीठ, लाल तिखट आणि दाण्याचे कुट घालून कालवायचे. हे तोंडीलावणे म्हणून खायचे असते. <<< त्याला घोलाना म्हणतात. Happy

छान लागते हि भाजी. मूळातच या भाजीला एक छान चव असते.
मुंबईत पण मिळते हि भाजी. मला आवडते म्हणून आणली होती, पण शिजायला खूप वेळ लागला, मनासारखी शिजली नाहीच.
आजोळी मात्र सुकवून ठेवायची पद्धत आहे.

नी, वर्षा - तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे ही भाजी धुतली की गेली!!!! जो आंबट-खारटपणा असतो ह्या भाजीला तो धुतला की गेलाचं. म्हणून कशीबीन का असेना ती न धुताचं खावी. आणि ह्या भाजीला फकतशी लसणीची फोडणी असते. जिरे-मोहरी नग नग. तवा सन्न तापला की तेल सोडावे नि हिरवी-लाल मिरची हातानीच अर्धी करुन तळावी, लगेच लसणाचे तुकडे.

घरच्या लोकांनी भाजी काढली असेल तर न धुता खाण्यास हरकत नाही. पण विकत आणलेली असेल तर धुवावीच लागेल. का आणि कशासाठी ते प्रत्येकाने ठरवून घ्यावे Wink Proud

मी काल मेथीची केली या पध्दतीने. थोडं डाळीचं पीठपण लावलं. मस्त झाली होती. धन्यवाद मिनोती.

मस्त मिनोती. माहिती एकदम इंट्रेस्टिंग आहे.
सिंडीने लिहील्यापासून शोधते आहे. पाहुयात कधी मिळेल ते. Happy