टवाळक्या ....

Submitted by निवांत पाटील on 22 March, 2011 - 00:18

आबा : अगं शालू , जरा डोकं चेपून दे गं फारच अस्वस्थ वाटतंय....
शालू : या बया , आता हे काय बरं सारखं सारखं. म्या काय म्हणती, कशाला पाहिजे उठ उसाबर...
आबा: अगं १० वी अ चा सेक्रटरी हाय मी. सगळं बघाय लागतयं कमी जास्ती. आख्या शाळंत एक नंबर हाय बघ.
शालू : आवं पार त्याला काय परमान हाय काय नाय. करावं ना माणसानं. म्या कुठं नाय म्हटलंय का? पण सोसलं तेव्हडच करावं माणसानं.

आबा: अगं त्यो बाबश्या सेक्रटरी हुता तवा म्याच म्हटलं पोरास्नी, अरे ह्यो बाबा आपलं काय भलं करणार न्हाय. ह्यो बसलाय दुसर्याच्या वर्गात काड्या करत, त्येच्या बाबा सारखं आणि सगळ्यांच्या डोस्क्याला झालाय ताप. ह्यो दुसरी पोरं भांडत बसतील म्हणून त्यांची भान्न सोडवायला गेला पाटीलकी करत , आणि त्योच भांडत बसला. अगं भांडायला नेलेली पोरं पण सगली वापस नाय आली.

शालू : आवं त्यो आता भूतकाळ झाला. इतिहास त्यास्नी कधीबी माफ करणार नाय.
आबा: अगं शाने हळू बोल.
शालू: हं आ SS ता. मला काय कुणाच्या बाची भ्या हाय व्हय? १० वे अ च्या सेक्रटरीची बायको हाय म्हटलं. काय म्हणत्यात हो त्याला, हं ' पैली बाई ' या बया !!!

आबा: अगं म्हणूनच म्हणतो हळू बोल. त्यो बाबश्या खुर्चीवर बसला हुता तवा वाटलं काय झ्याक वाटत असलं नाय, मऊ मऊ ... गुबगुबीत... लई मज्जा येतं असल. आन आता बसल्याव कळतंय बाभळीच काटं कस रुत्यात ते.
शालू : हुं तुमचं आपलं कायतरीच. ते दिलुभावजी कसं कायम हासत असायचं खुर्चीत बसल्यापास्न. त्यात आणि ते मनिलाबी घेऊन बसायचं. आन तुमाला काय हे बाभळ काटं सुचतंय.

आबा: अगं त्या बाबश्याच्या बुडालाच काटं हुतं. म्या सेक्रटरी झाल्याव त्या कडव्यानी लगेच माझ्या हातनं कबुतरं उडवली आणि पाठीलाबी काटं लावलं. पाट टेकायचीबी पंचायत झालीय.

शालू: आवं पर कबुतरं उडवायला किती मजा आलती म्हणून सांगू. साम्दिजन नुस्ता जळत हुती. आवं लोकं रातध्यान काम करून म्हातारी हून मरूनबी गेली. तरीबी त्यास्नी न्हाय गावल कबुतरं उडवायला. अन तुमास्नी बगा कसा चानस गावाला त्यो. गुणाचा माझा धनी बाय. थांबा अलाबला काडते. काsssड....

आबा: अगं ती कबुतरं कशासाठी असत्यात म्हायत नाय तुला. कुठ्बी मारामारी करायची न्हाय, मारामारी करायला पोरं दुसर्याच्या वर्गात पाठवायची न्हायत, पैलवान अंगावर सोडायचं न्हायत, उलट हे कुठ कोण करत असल तर त्याला तसं करू नको बाबा म्हणून विनवायच., त्यालाबी रागवायचं न्हाय. त्याला फकस्त पराववृत्त काय म्हणत्यात ते करायचं.
शालू: मंग तुमी कुठ मारामारी करताय का कुठ पोर पाठवताय तवा त्या दोनी बाबश्यासारखं?

आबा: तेच तर मोठा प्रोब्लेम झालाय. मागं त्यो ५ वी छ मधला सेक्रटरी लई दंगा करत हुता, पोरं म्हटली आमाला ह्यो सेक्रटरी नको, तर त्यो पोरांस्नी माराय लागला. त्याला असा दमात घेतला म्हणतीस.. जरा का कु करत हुत पार त्याला माझा हिसका ठाव हुता.

शालू : व्हय...
आबा: आता ८ वी ळ मधला सेक्रटरी लई म्हंजे लैच दंगा कराय लागला हुता. त्यांच्याच वर्गातल्या पोरास्नी मारत हुता. मग म्हटलं हे काय बरोबर न्हाय... जरा दोन मोठ्या पोरास्नी म्हटलं जारे जरा बघून या काय चाललाय ते. काय हाय त्यांच्या वरगात ते पाण्याचे हौद हैत ना, म्हटलं बघूया काय चानस मिळतोय काय ते. ती पोरबी जाऊन उभा राहिली राहिली, त्यांच्याचान काय ते बघावना. त्यात १० वी ड वाला आणि ९ वी ड वाला बी म्हणला, हे जरा ह्यांस्नी दम देऊच आता.
शालू: मग व आता.

आबा: मग काय? आमचीबी पोरं भिडली आणि त्यांचीबी. म्हणल हून जाऊंद्या कुणाला गावल त्याला पावलं. पाण्याचा प्रश्न तर मिटल.
शालू: मग हे ब्येस झालं की.
आबा: अग कसलं ब्येस आन काय .... थोरला बाबश्या गेला ७ वी इ च्या वरगात मारामारी कराय गेला, त्याला काय ती मारामारी सपली नाय बघ, मग धाकटा बाबश्या गेला त्येच स्वप्न पुरं कराया, तेव्हड्यात मी चानस घेतला आणि त्याला घालवला. त्या दोघांचा डाव बी पाण्याचाच हुता..

शालू: मंग त्यात काय बिघडलं, त्यात तुमचा काय बी दोष नाय. इतिहास हे ध्येनात ठेवल. आणि तुमचा लई उदो उदो व्हैल नंतर....
आबा: (आता कसं सांगू हिला ) अगं मी बी त्यांच्यासारखच करतोय गं, पर म्या अगोदरच कबुतरं उडवून बसलोय... त्यात मागच्या टायमाला संगितलोय मी ह्यंव करीन त्यंव करीन आता उद्याच्याला परत कंच्या तोंडानं सांगू मला परतच्यान सेक्रटरी करा म्हणून.

शालू : आव, लई इचार करू नगसा. जावन्द्या द्या सोडून...
आबा: आगं माझे बये, सोडून द्यायला हि काय सिगारेट हाय व्हय.... की दिली सोडून आणि खाल्लं चिंगम....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दादाश्री,
तुमी असं म्हणताय कि, चित्र कशाचं हाय ते कळना, पर रंगकाम आवडलं, म्हण्जे सगळच गंडलय तर Happy

एनी वे, मी सांगतो, डोक कुठ आहे नि हात पाय कुठ आहेत.

आबा म्हन्जे ओबामा साहेब आणि शालु म्हण्जे मिशेल बाई. त्यांना इकडे first lady म्हनत्यात.
सायबांना शांततेच नोबेल मिळालय...( म्हन्ण्जे कबुतरं उडवलेत) खरं आता युद्दात मिसाइल पण उडवायला लागलेत. अगोदर दोन्ही बुश सायबांनी पण तेच केलं होतं (हेतु बर्यपैकी तोच होत, तेल मिळतय का बघायच)... आणि त्याच बर्यापैकी भांड्वल प्रचाराच्या वेळी केलं गेलं होत.

आणि नुकतच, आपल्या आर आर आबांसारख (तंबाखु सोडुन वेल्दोडा) साय्बांनी सिगरेट सोडुन चिंगम खायला सुरुवात केलीय.

धन्यवाद....