प्रश्न प्रश्न प्रश्न .............

Submitted by चांगभलं on 15 March, 2011 - 05:15

नमस्कार लोक्स

मी इथे नवी आहे, आणि बर्याच जणांनी मला डु - आयडी म्हणूनही हिणवले , असो ते महत्वाचे नाही
मला काही मिक्स प्रश्न पडले आहेत, त्याची उत्तर मिळाल्यास आनंद होईल

१. कंपूबाजी म्हणजे काय?
२. कंपू आपण बनवावा, कि दुसर्यांच्या कंपूत सामील व्हावे?
३. आपल्याला इकडे येऊन २ वर्ष झाली म्हणजे आपण आपण काहीही धागे काढू शकतो, आणि आपल्याला बोलणारे कोणी नाही असे वाटणे कितपत योग्य आहे?
४ . या संस्थालांचे आपल्या आयुष्यातील महत्व. त्याचे फायदे किंवा तोटे?
५. "virtual " लाइफ जगता जगता आपण आपल्या हक्काच्या माणसांपासून दूर जात आहोत का?
६. इथे येऊन प्रसिद्धीची हाव सुटते का ?
७. अश्या साईट्स मुळे सामाज्प्रबोधानासारखे कार्य घडते कि उगाच चकाट्या पिटल्या जातात.
८. इथे असणार्या मित्रांपैकी किती जण आपल्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून येतात ?

मला माहितेय, मी नवीन असल्याने साहजिकच, या धाग्याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले जाईल, असो... जे वाटलं, ते लिहिलं.
"admin " ला पसंत न पडल्यास धागा खुशाल उडवल्या जाणे
--- मायबोलीची दुर्लक्षित वाचक (चांगभलं)

गुलमोहर: 

तुम्हाला डु-आय मधे राहुन लिखान करणे वा प्रतिसाद देण्यात कसली अडचण आहे हे आधी कळवा.
तुम्ही स्त्रि आहात म्हणुन कोणी त्रास देत असल्यास एडमीन ला कळवा

चला, या निमित्ताने आपण कुणाचा ड्यु आय आहात ते लक्षात आले. Lol

१. कंपूबाजी म्हणजे काय? - अनेकांनी मिळून एखाद्या आय डी ला त्रस्त करणे! हेच काम एकटाही करू शकतोच!

२. कंपू आपण बनवावा, कि दुसर्यांच्या कंपूत सामील व्हावे? - पात्रता असेल तर कंपू स्वतः बनवावा. लोक मागे येणार असतील तर जरूर बनवावा. कुणीच आले नाही तर इतर कंपूत प्रवेश मिळवावा.

३. आपल्याला इकडे येऊन २ वर्ष झाली म्हणजे आपण आपण काहीही धागे काढू शकतो, आणि आपल्याला बोलणारे कोणी नाही असे वाटणे कितपत योग्य आहे? - ती मायबोलीची पॉलिसी आहे. कुणीही काहीही धागा काढु शकतो. इतकेच की तो धागा वादग्रस्त नसावा. (म्हणजे क्यावरून भावना दुखावणे व तत्सम प्रकार घडू शकतील असा नसावा.)

४ . या संस्थालांचे आपल्या आयुष्यातील महत्व. त्याचे फायदे किंवा तोटे? - फायदा खूप आहे. तोटा एकच, आपण प्रत्यक्ष जगापासून दूर जातो असे मला वाटते.

५. "virtual " लाइफ जगता जगता आपण आपल्या हक्काच्या माणसांपासून दूर जात आहोत का? - होय, असे मला तरी वाटते. (आता 'मग इथे बसता कशाला ' असे विचारून मूळ आय डी सारखे वागू नयेत अशी विनंती)

६. इथे येऊन प्रसिद्धीची हाव सुटते का ? - सुटत असावी. मला प्रसिद्धी येन केन प्रकारेण मिळतेच त्यामुळे मला हाव नाही.

७. अश्या साईट्स मुळे समाज प्रबोधनासारखे कार्य घडते कि उगाच चकाट्या पिटल्या जातात. - एक ह बा म्हणून आहेत त्यांनि समाजकार्याचा वसा घेऊन काही माणसे जमवली आहेत व एक अत्यंत चांगला उपक्रम करत आहेत. मीही काही ना काही करत आहे. गरीब कवींचा कवितासंग्रह काढणे वगैरे, तसेच गझल मुशायरा घडवून आणणे व गझलेचा प्रसार (जमेल तसा). मायबोलीवर अनेक जण काही ना काही सत्कार्य करतच असतील. ते सर्व मायबोलीमुळे आहे की नाही हा भाग वेगळा असला तरी इथे त्याला व्यासपीठ व अधिक सहभागी मिळणारच! अर्थात, माझ्या मते निदान येथे तरी ४० % भाग चकाट्यांनी व्यापलेला असतो. लोक एक तर गप्पांच्या पानावर तरी असतात किंवा नवनवे बाफ काढून सामाजिक विषयावर मतमतांतरातून वाद तरी घडवून आणतात.

८. इथे असणार्या मित्रांपैकी किती जण आपल्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून येतात ?. - तुम्हाला काही लागले तर मला हक्काने सांगा, शक्य आहे ते सर्व करेन. मला काही अडचण आली तर मीही विचार करेनच आपला! अनेक लोक धावून येतीलच!

या निमित्ताने आपण कुणाचा ड्यु आय आहात ते लक्षात आले

परत नमूद करू इच्छिते , माझा आयडी हा पहिलाच आहे, पण वाचक मात्र खूप आधीपासून आहे

चांगभलं, मी उगाचच तुम्हाला पुरूष समजत होते इतके दिवस. तुम्ही स्त्री आहात हे आज कळले. असो.

१. कंपूबाजी म्हणजे काय?

हा प्रश्न इथे आल्यावर पडायचे कारण? इथे कंपू दिसले का तुम्हाला?

२. कंपू आपण बनवावा, कि दुसर्यांच्या कंपूत सामील व्हावे?

याच्यासाठी आपण थोडेच येतोय इथे?? इथे जे काही प्रसिद्ध होते ते वाचावे, आपल्याला खरडावेसे वाटले तर खर्डावे नाहीतर चुप्प्प पुढचे पान उघडावे. अमुक एक कराच असे काही बंधन कोणी कुठे घातलेले आहे?? घातलेले असेल तर त्याचा निषेध करावा.

३. आपल्याला इकडे येऊन २ वर्ष झाली म्हणजे आपण आपण काहीही धागे काढू शकतो, आणि आपल्याला बोलणारे कोणी नाही असे वाटणे कितपत योग्य आहे?

असे काहीही नाही. पहिल्याच दिवशी येऊन वाचनीय धागे काढणारे इथे आहेत आणि इथे वयाची ९० गाठली तरी काहीच्या काही लिहिणारेही आहेत. तुम्ही यातले काहीही करु शकता. धागा काहीही आहे की वाचनीय आहे हे शेवटी तुमच्यावरतीच आहे हो. मला सगळे वाचनीय वाटते.

४ . या संस्थालांचे आपल्या आयुष्यातील महत्व. त्याचे फायदे किंवा तोटे?

हे परत तुमच्यावर आहे. तुम्हाला वाटतेय फायदा होतोय तर पडिक व्हा. वेळ फुकट जातोय असे वाटले तर येऊ नका. इथे कोण कोणाच्या फायद्यासाठी काय करतोय??

५. "virtual " लाइफ जगता जगता आपण आपल्या हक्काच्या माणसांपासून दूर जात आहोत का?

हेही तुमच्यावर आहे. तुमची हक्काची माणसे तुमच्या कॉंप्युटरच्या बाजुला उभी राहुन तुम्ही त्यांच्याकडे कधी कृपाकटाक्ष टाकताहात ह्याची चातकासारखी वाट पाहताहेत हे इथे तुमच्याशी वर्चुअली गप्पा मारणा-यांना कसे कळायचे? ते तुम्हालाच कळणार.

६. इथे येऊन प्रसिद्धीची हाव सुटते का ?

हेही तुमच्यावर आहे. हाव हा प्रकार इतरजण आपल्या डोक्यात भरवुन देत नाहीत. आपल्यालाच त्याची ओढ लागते.

७. अश्या साईट्स मुळे सामाज्प्रबोधानासारखे कार्य घडते कि उगाच चकाट्या पिटल्या जातात.

हेही तुमच्यावर आहे. तुम्ही चकाट्या पिटत बसलात तर चकाट्या पिटल्या जातील. काही प्रबोधनात्मक लिहायचे असेल किंवा इतरांनी लिहिलेले मनावर घेऊन आचरणात आणायचे असेल तर ते तुमच्यावर आहे.

८. इथे असणार्या मित्रांपैकी किती जण आपल्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून येतात ?

हेही तुमच्यावर आहे. अडचण काय आहे? तुम्ही इथे मांडलीय का? तुम्ही इथे मित्र बनवलेत काय? ते इथले आहेत की परदेशातले? त्यांची मदत होऊ शकते काय? इ. अनेक गोष्टींवर ते अवलंबुन आहे. कोतबो मध्ये आपल्या अडचणी टाकणारे नेहमी नविन असतात. ते नंतर बहुतेक वेळा धन्यवाद देणा-या पोस्टीही टाकतात. यावरुन मदत होते असा निष्कर्ष काढता येईल. प्रत्येक वेळी फिजीकली धावुन जाणे शक्य होईलच असे नाही ना? तुमचे वर्चुअल मित्रांबरोबर कितपत जवळचे संबंध आहेत यावर ते अवलंबुन आहे. मी जरी इथल्या सगळ्यांशी पोस्टींमधुन गप्पा मारत असले तरी सगळ्यांनाच माझा पत्ता आणि फोन नंबर दिलेला नाही.

मला माहितेय, मी नवीन असल्याने साहजिकच, या धाग्याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले जाईल,
हे कशावरुन?? वर लिहिल्याप्रमाणे ज्याला वेळ आहे आणि योग्य वाटेल तो लिहिल. लिहिले नाही म्हणजे दुर्लक्ष केले असे थोडेच? तुम्ही प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रिया देता का? इतका वेळ आहे का तुमच्याकडे??

@साधना : तुम्ही तर " सगळं माझ्यावरच " ढकलून मोकळ्या झाल्यात...

अशी उत्तर देण खूपच सोप्पं आहे , काही विचारलं कि " ते तुमच्यावर डेपेंद आहे असं सांगण "

मला बेफिकीर यांचं उत्तर पटलं,

@प्रसन्न : धन्यवाद

साधना Happy

मलापण काही प्रश्ण पडलेत...
१. स्वतःला विचारायचे प्रश्ण इतरांना विचारुन काय उपयोग?
२. येवढे प्रश्ण पडत असतील तर इथे येण्याचं बंधन आहे का? (आतातर अशा बर्‍याच साईटस आहेत असं मी ऐकून आहे Wink )
३. सगळीकडे असेच प्रश्ण पडत असतील तर पुढे काय करावं? (हिमालयात जाव? ... नाही नाही... सन्यास नाही सिमला-कुलू-मनाली ला!)

साधी गोष्ट आहे... हे virtual जग म्हणजे रद्दीचं दुकान आहे, त्यात तुम्ही काय वेचुन घेता हे तुमच्यावरच अवलंबुन आहे न?

चांगभलं, कंपुबाजी सगळीकडे असतेच, थोड्याफार प्रमाणात. फक्त ती किती जणांच्या आणि का वाट्याला येते यावर विचार करणे महत्वाचे. काही काळापुर्वी मी देखील हा आरोप केला होता. त्यावेळी मायबोलीवरच्या काही जुन्या-जाणत्या मंडळींनी हा मुद्दा मला समजावून माझ्या दिला होता आणि मला तो पटलाही होता.

आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही कंपुबाजी तुमच्याच वाट्याला का येतेय ते बघू...

तुम्ही आत्तापर्यंत माबोवर वेगवेगळ्या धाग्यांवर दिलेले प्रतिसाद पाहू आधी...

ठमादेवी : झेन कथा : http://www.maayboli.com/node/24216
चांगभलं | 11 March, 2011 - 18:19
पक पक पकाअव

अनि बेफिकिर तर त्यहुन पकाअव

चांगभलं | 11 March, 2011 - 18:25 नवीन
माझी तलवार बाहेर आली कि स्वर्ग सुरु होतो, आणि आत गेली कि नरक

-- बे फकीर

चांगभलं | 10 March, 2011 - 13:51 नवीन
अगगागा, म्हणजे कपड्यान ऐवजी चांदणं दिलं असता तर परवडल असतं, असा विचार त्या गुरूने केला असावा

विशाल कुलकर्णी : भुक कुणाला चुकलीय.... ? http://www.maayboli.com/node/24286
चांगभलं | 11 March, 2011 - 18:49
धागा काढण्यासारखे काय आहे यात..

आहे क्यामेरा म्हणून उठायचा आणि फोटो काढत सुटायचा....

किती खाज ती प्रसिद्ध व्हायची
तुम्ही हजल का काय लिवा

बेफिकीरः http://www.maayboli.com/node/24245 : इ.स. १००००

चांगभलं | 9 March, 2011 - 15:12 नवीन
@शेताम्बरी

तुमचा आय डी डू आहे हे मस्तच सिद्ध केलंत तुम्ही

चांगभलं | 10 March, 2011 - 14:56
झकास

बेफिकीर : द वर्ल्ड ऑफ डिफरन्स : http://www.maayboli.com/node/23989#new

चांगभलं | 28 February, 2011 - 14:51 नवीन
अद्भुत अशी टुकार आणि तद्दन्तेने भारलेली कादंबरी......

नरेंद्र गोळे : मनोव्यवस्थापन : http://www.maayboli.com/node/24163#new
चांगभलं | 8 March, 2011 - 16:31 नवीन
सुरेख लेख, अजून मोठा असायला हवा होता

बेफिकीर : घर : http://www.maayboli.com/node/24024#new
चांगभलं | 1 March, 2011 - 13:18 नवीन
अतिशय, टुकार, तद्दन टाकाऊ, भिकार, फालतू....
शेवट.....

चायला यांच्याच घरात बरे रोज कोण न कोण गाडीखाली येत

बकवास

दिप्ती जोशी : खरेदी : http://www.maayboli.com/node/23977#new

चांगभलं | 28 February, 2011 - 17:00 नवीन
काय ग कारने जायच कां? व्वां.....कारने का? मग पुढच्या दिवाळीच्या भाऊबीजेपर्यंत येऊ घरी, डोंबिवलीचे रस्ते आणि ट्रॅफिक यावर तीने एक पीजे मारला. मग आम्ही स्कुटीच काढली.

आपल्याकडे कार आणि स्कुटी दोन्ही असून आपण सुखवस्तू आहोत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न

भुंगा :२४ खुन माफ : http://www.maayboli.com/node/23903?page=2

चांगभलं | 28 February, 2011 - 14:47
काहीही टुकार लिहायचं.. आणि मस्त ७० ८० प्रतिसाद मिळवायचे
चान चान

आणि परखड यांच्या गोठ्याची गाथा या लेखावर तूम्ही लावलेले दिवे तर अ‍ॅडमिननेच विझवून टाकलेत.

यापैकी बेफिकीर यांच्या ए.स. १०००० व गोळेकाकांच्या लेखावरील एक असे दोन जरा सोबर वाटणारे प्रतिसाद सोडले तर मला सांगा तुम्हाला विरोध करण्यासाठी इथले लोक का एकत्र येणार नाहीत. त्यासाठी कंपु असण्याची गरज काय आहे?

आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे...

१. कंपूबाजी म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर बेफिकीर आणि साधनाने दिले आहे. मी ही तेच म्हणेन कुठलीही गोष्ट चांगली असो वा वाईट त्याचे परीणाम आपल्यावर अवलंबुन असतात.
२. कंपू आपण बनवावा, कि दुसर्यांच्या कंपूत सामील व्हावे? तुम्ही जर सगळ्यांशी नीट वागलात तर तुम्हाला त्याची गरज पडत नाही, तूम्ही आपोआपच सगळीकडे स्विकारले जाता. म्हणजे साधनाने म्हटल्याप्रमाणे हे ही तुमच्यावर अवलंबुन आहे.

३. आपल्याला इकडे येऊन २ वर्ष झाली म्हणजे आपण आपण काहीही धागे काढू शकतो, आणि आपल्याला बोलणारे कोणी नाही असे वाटणे कितपत योग्य आहे?
आपण इथे येऊन दोनच आठवडे झालेत आपल्याला ओळखणारे कुणीही नाही म्हणजे आपण काहीही तारे तोडू शकतो असे वाटणे कितपत योग्य आहे?

४ . या संस्थालांचे आपल्या आयुष्यातील महत्व. त्याचे फायदे किंवा तोटे?
साधनाशी सहमत.

५. "virtual " लाइफ जगता जगता आपण आपल्या हक्काच्या माणसांपासून दूर जात आहोत का?
कदाचित जवळही येत असू. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात जिथे रोजच्या रोज प्रत्यक्ष भेट दुर्मिळ होत चाललीय, त्यात किमान वर्च्युअल भेट होत असेल तर काय हरकत आहे.

६. इथे येऊन प्रसिद्धीची हाव सुटते का ? मानवी स्वभाव आहे तो. कुठेही गेलात तरी प्रसिद्धीची हाव सुटत नाही. प्रत्येकालाच जर प्रकाशजी आमटे, अभय-राणी बंग बनता आले असते तर आज तुम्ही चांगभलं नसता .....!!

७. अश्या साईट्स मुळे सामाज्प्रबोधानासारखे कार्य घडते कि उगाच चकाट्या पिटल्या जातात.
याचे उत्तर इथे आहे http://www.maayboli.com/node/23228 किंवा http://www.maayboli.com/node/24189 किंवा http://www.maayboli.com/node/18380. शक्य झाल्यास कधी हितगुजमध्ये "ध्यासपंथी पाऊले" या विभागार चक्कर मारून पाहा. पण तुम्ही त्याच्याकडे बघीतलेलेच नाही, कारण त्यात तुम्हाला काड्या घालायला जागाच नाहीये.

८. इथे असणार्या मित्रांपैकी किती जण आपल्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून येतात ?
इथे आल्यापासून तुम्ही किती मित्र बनवलेत? केवळ चित्र-विचीत्र प्रतिसाद देण्यापेक्षा मायबोलीकरांशी मैत्री करून पाहा, तुमच्या प्रश्नांचे आपोआप उत्तर मिळेल. निदान माझा तरी अनुभव चांगला आहे. अरे हो.. ज्याला तूम्ही कंपुबाजी म्हणता त्याला आम्ही मैत्री म्हणतो. चांगले असो वा वाईट प्रत्येक प्रसंगी हे मित्र-मैत्रीणी येतातच धावुन. तुम्हाला जर मैत्री ही कंपुबाजी वाटत असेल तर देव तुम्हाला लवकर बरे करो हिच सदिच्छा !!

आता मैत्री म्हणजे काय ते बघा?
माझा एक मित्र नादखुळा याचा माझ्या विपुतील प्रतिसाद...

नादखुळा
17 March, 2011 - 20:58

तुझी पोस्ट वाचली कुठेतरी. कुणीतरी पातळं सोडली म्हणजे तु सुद्धा पातळी सोडून वागायचं हे पटलं नाही गड्या. आणि आता तर कंपुशाहीचा फ्लॅगऑफ लोगो घेऊन मिरवणं सुद्धा कितपत योग्य आहे. तद्दन फालतूपणाला उगाच महत्व देण्याचा अट्टहास म्हणजे काय रे?

तुम्ही चुकत असाल तर तूम्ही चुकताय हे सांगणारे नाखु सारखे जवळचे मित्र इथे मिळतात. निदान मलातरी मी नाखुचा मित्र असल्याचा अभिमानच वाटतोय त्याबद्दल. या सगळ्यानंतर तुम्ही माबोवर येवून काय कमावलेत याचा विचार करा.
शुभेच्छा !!

विशाल कुलकर्णींच्या नावानं....................चांगभलं !!!! Happy

विशालच्या हरेक मुद्द्याशी सहमत.

प्रिय चांगभलं ताई,
माबोवर येणार्‍या सगळ्याच अर्भकांना पडणारे प्रश्न तुम्हाला पडले आहेत. कुठल्यातरी थोर विचारवंताने म्हटले आहे की "बुक्की मारली की बुक्की मिळते आणि पप्पी दिली की पप्पी मिळते" (कदाचीत गांधीजीच म्हणाले असतील.... असा विचारही करू नका)हा विचार येथे काही अंशी लागू पडतो.

कंपूबाजीचे म्हणाल तर तो मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आणि समाजव्यवस्थेचा मुलभूत आधार आहे. कुणीच कुणाशी कंपू केला नाही तर विस्कळीत आणि दुर्बल समाज उदयास येईल. मी माझ्या काही मित्रांना 'माझ्या लेखनाची स्तुती करत जाऊ नका, त्यामुळे तुमचा कंपू तुमच्या विरोधात जाईल' असे स्वतःच सांगत असतो. आपण कंपूंचा आदर करायला हवा. त्यांची सहकार्याची वृत्ती, अभेद्य ताकद यांचा अभ्यास करायला हवा.

मला वाटते, आपणास जर टोच्या मारायला आवडत असेल तर आपण एक सुतारपक्षीछाप टोच्या कंपू संस्थापीत करावा. टीका करण्यात माणसांना रडवण्यात काही वाईट आहे असे मला आजिबात वाटत नाही. ती सुध्दा एक कलाच आहे. त्यातून काही माणसे कायमची दुरावतील संधी मिळताच तुटून पडतील. सोसायची आणि रोज नव्या उत्साहाने टोचलढायची तयारी ठेवा.

आपण माझ्या एका प्रतिसादानंतर कंपूबाजीचे वाक्य बोललात म्हणून एवढे लिहीले. नाहीतर तुम्ही काय नी मी काय नी विशल्या काय सगळे गेले गुच्च्या खायत!!! राग आला असेल तर कठीण टेबलवर मऊ उशी ठेऊन दहा वेळा डोके आपटून घ्या.

आपला प्रिय,
ह बा

सहमत आहे, विशालराव व श्री आगाऊ यांच्याशी!

(आता मला असे वाटू लागले आहे की मी उगाचच मूळ प्रतिसाद दिला.)

(हे असेच मला नेहमीच वाटते हे अवांतर! :हाहा:)

चांगभलं, आपल्याला आदराचा नमस्कार. मायबोली हि माझी वेबसाईट नसली तरी मी या वेबसाईटचा एक सदस्य आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. इथे लोक जे काहि लिहितात ते त्यांच्या विचारांच्या पातळी अनुसरूनच लिहितात. शेवटी मोठ्ठं व्हायलाही वेळ लागतोच ना. विचारांची प्रगल्भता अशी चुटकीसरशी आली असती तरी मी सुद्धा मी जागतिक व्हिजन २०२० चा अट्टहास धरणारा तो तो पटवून देणारा इसम बनलो असतो कि नै? आपले विचार जरी पटण्यासारखे असले तरी त्याचं प्रेझेंटेशन पटत नाही. वैयक्तिक तिरस्कार असेल कोणाबद्दल तर तो वैयक्तिक पातळीवरच हातळावा असे मला वाटते. वैयक्तिक पातळीवर तुम्ही तो पटवून देण्यात यशस्वी झालात तर तुमच्या ज्ञानाच्या पातळीला माझा सलाम असेल.

टार्गेट निवडण्याचा अधिकार तुम्हाला आहे नक्कीच आहे. पण गर्दिचा भाग असलेल्याला गर्दित उडवायचं हे तुमच्या दृष्टीने किती घातक ठरू शकतं हे मी काही वेगळं सांगायला नको. जर तो मनुष्य चूक असेल तर त्या गर्दिचा आधार घेऊनच त्याला शिक्षा करावी. पण त्याचा गुन्हा पुराव्यानिशी तुम्हाला पटवून देता आला पाहीजे.

पण टार्गेट हवंय कशाला? चर्चा करूनही गैरसमज दुर करता येतात. कारण कोणितरी एकाने कमीपणा घेतला तर वाद मिटू शकतात. तंटामुक्ती मधे हाच एक मुलमंत्र आहे. जे घडून गेलं ते वाईट होतं पण जे घडतंय-बिघडतंय ते टाळण्यासाठी माझा हा प्रपंच.

मला नसता 'भार' होण्यापेक्षा मला चांगल्या गोष्टीत 'हातभार' लावायला नक्कीच आवडतं. काय मग 'चांगभलं' येताय ना सोबत हातभार लावायला चांगल्या गोष्टींसाठी.

सगळ्यांचे प्रतिसाद मस्त. विशालचा प्रतिसाद वाचल्यावर चांगभल्यांना सगळे आपल्यावरच अवलंबुन असते हे छान पटले असेल Happy

धन्यवाद विशाल जी,

<<<<चांगभलं | 9 March, 2011 - 15:12 नवीन
@शेताम्बरी

तुमचा आय डी डू आहे हे मस्तच सिद्ध केलंत तुम्ही>>>>

हा चांगभलं यांचा माझ्या प्रतिसादावर आलेला प्रतिसाद आहे (बेफिकिर यांच्या 'घर' कादंबरीमधे). खर तर खुप वाईट वाटलेल वाचुन आणि राग पण आलेला, तरिही मी त्यांना, मी मायबोलीवर टाकलेल्या प्रचि (कोकण,वसईचा किनारा) यांची लिंक पाठवलेली त्यांच्या 'संपर्का'त, कारण मला ईथे कोणाशी वाद घालायचा नव्हता.

@चांगभलं, आधी आपण इतरांशी कसे वागतो ते बघा मग लोकांकडुन अपेक्षा करा, खर सांगायच तर मी बेफिकिर यांची 'सोलापुर..', 'डिस्को....' कादंबरी वाचली मला त्यांच लेखन आवडलं म्हणुन मी जॉईन झाले मायबोलीवर...मग त्यांच्याबद्दल मी काही लिहिल तर तुम्हाला काय फरक पडतो? ते माझं वैयक्तिक मतं होत आणि तेही चांगलच...

अवांतरः <<@शेताम्बरी>> नाव लिहिता नाही येत तर निदान कॉपी, पेस्ट तरी करायच...

ह्म्म्म.. स्वतःला ड्यु आय म्हणुन लोकांनी हिणवले अशी तक्रार एका बाजुने करत असताना दुस-यांवर तोच आरोप आपण करतोय... Happy काही लोकांच्या घरात आरसे नसतातच काय????????

.

बेफिकीर, विशाल, साधना... १००००% अनुमोदन...

१. कंपूबाजी म्हणजे काय?
२. कंपू आपण बनवावा, कि दुसर्यांच्या कंपूत सामील व्हावे?
.. कंपू बनावायला जमत असेल तर बनावावा.. नाहीतर सामील व्हावं..
दोन्ही नाही पट्लं किंवा जमलं तर एकटा जीव राहून एक चांगला वाचक , समिक्षक, लेखक बनून रहावं...
पण इतर लोक कंपू करतात .. मला त्यात घेत नाही अशी थेट किंवा छुपी तक्रार म्हणजे बालीश्पणा...

४ . या संस्थालांचे आपल्या आयुष्यातील महत्व. त्याचे फायदे किंवा तोटे?
घेणा-यावर ठरतात.... पण फायद्याची आपेक्षा ठेऊन येणा-यांसाठी आपेक्षाभंग हा तोटा निश्चीत..

६. इथे येऊन प्रसिद्धीची हाव सुटते का ?
७. अश्या साईट्स मुळे सामाज्प्रबोधानासारखे कार्य घडते कि उगाच चकाट्या पिटल्या जातात.
हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारला तर जास्त बरं होईल.. जर एखादी गोश्ट नाही पट्ली तर विरोध योग्य रितीनेही करता येतो..
उदा. तुमच्या प्रश्नांवर दिल्या गेलेल्या प्रतिक्रीया.. पण जाणून बुजून दुस-याला डिवचणा-या प्रतिक्रीया वारंवार करणं ही नक्कीच एका प्रकार्ची प्रसिदधीची हाव...

८. इथे असणार्या मित्रांपैकी किती जण आपल्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून येतात ?

अहो प्रत्यक्ष आयुष्यातल्या मित्रमैत्रीणींना सुद्धा हा प्रश्न लागू पड्तोच ना........

आणि हो चांगभलं... ''मला वाटलच सगळे आसंच म्हणणार..'' किंवा ''ही पहा गट्बाजी'' असा विचार करून क्रुपया प्रतीक्रिया वाचू नका.. ही गट्बाजी नाही एकमत आहे...