'लेखणीची फुले'

Submitted by आशुचँप on 27 February, 2011 - 03:41

पुणे श्रमिक पत्रकार संघाने आज मराठी दिनाचे औचित्य साधून काही निवडक पत्रकारांच्या 'लेखणीची फुले' या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे हा सोहळा पार पडला.
माझ्या दृष्टीने उल्लेखनीय म्हणजे, चक्क माझ्या तीन कविता या कवितासंग्रहासाठी निवडल्या गेल्या.
मी काही कवी नाही आणि पूर्वी कधीही कविता केल्याचे आठवत नाही. पण मायबोलीवरील कविता वाचून मीही काही ओळी खरडल्या...
त्यांना माबोकरांनी भरभरून दाद दिल्यामुळे प्रोत्साहन मिळाले आणि आणखीही काही कविता सादर करू शकलो. माझ्यात आत लपलेल्या या कवीची जाणिव मला मायबोलीने करून दिली त्याबद्दल सर्वांचे विशेष आभार...

http://www.maayboli.com/node/20608
तुमच्या माझ्या मनातला कर्ण

http://www.maayboli.com/node/20589
तुझ्या माझ्या मीलनाची ती वेळ

http://www.maayboli.com/node/20805
औदा तरी पाऊस पाड गे माय

या त्या तीन कविता...
तुमचे प्रेम आणि प्रोत्साहन असेच लाभो आणि आणखीही काही लिखाण माझ्या हातून होवो हीच प्रार्थना...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मानुषी, अश्विनी..
रश्मे येतीयेस ना पुण्याला
आलीस की देतो Happy

प्राची, अमित आणि राम..खूप खूप धन्यवाद
आर्या - कसले गुण उधळलेत ना मी..:)
जोक्स अपार्ट..खूप धन्स गं
तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळेच शक्य झाले

धन्यवाद दोघांनाही...
रुणू होतीस कुठे तु इतके दिवस...
माझे सगळे लेख तुझ्या प्रतिसादांची वाट पाहून राहीलेत Happy

जुन्नरचे मग्रुर आमदार श्री. वल्लभ बेनके यांच्या कुशल नेत्रुत्वाखाली जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला . तमाम जुन्नरच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन

Pages