ठरेन या जगात मी महान एकदा तरी .

Submitted by कमलेश पाटील on 24 February, 2011 - 03:26

असेन या जगात मी लहान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी .

जगावयास वाटते घरात मज आपल्या;
शमेल का उरातली तहान एकदा तरी?

खुळेच प्रेम मानले क्षणास तव भाळले;
पडेल भोवती तुझी कमान एकदा तरी.

जल्लोश मोकळा इथे सुरास करवादला;
जुळेल आज ही सतार, तान एकदा तरी.

सुवास चंदनी तुझा मनात उरतो किती
बनेन काय मी कधी सहान एकदा तरी?

गुलमोहर: 

  • मतला गडबडल्यामुळे काफिया घोटाळलाय कमलेश
  • बाकीच्या सगळ्याच शेरांत वृत्त चुकले आहे, शेवटचा शेर वगळता

matalyaat aani vruttat kay gadabad ahe tyache margdarshan karave

matalyaat aani vruttat kay gadabad ahe tyache margdarshan karave

matalyaat aani vruttat kay gadabad ahe tyache margdarshan karave

कमलेश,

मतला तुम्ही आता दुरूस्त केला आहेत पण त्याला काही अर्थ नाहीये... अर्थाचे नंतरही पहाता येईल

आधी तंत्र जमायला हवे त्यासाठी,

  1. जगावयास वाटते घरात मज आपल्या - इथे एक लघु कमी आहे
  2. खुळेच प्रेम मानले क्षणास तव भाळले - इथे एक लघु कमी आहे
  3. जल्लोश मोकळा इथे सुरास करवादला - 'ज' हा गुरू होतो, तुम्ही लघु म्हणून घेतला आहे, कर आणि वा मधे एक लघु कमी आहे
  4. सुवास चंदनी तुझा मनात उरतो किती - एक लघु कमी आहे

एकदा 'बेफिकीर' यांचा 'गझल परिचय हा लेख वाचाल का प्लीज?

धन्यवाद!!

कमलेश, छान प्रयत्न... Happy

तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहिती नाही... कदाचित गझलेसंबधी लिहिलेल्या लेखांमध्ये सापडतील...

गझल कार्यशाळा:- http://www.maayboli.com/karyashala हे सर्व लेख बारकाईने वाचायला हवेत आपल्याला. Happy