बोलगाणी - प्रवेशिका ६ (पारिजात३०)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 13:33
मुलीचे नाव - श्रीया
वय - ३ १/२ वर्षे


श्रीयाच्या आत्यानी तिच्यासाठी आणि तिच्या खेळण्यांसाठी लिहिलेली कविता

एकदा आमच्या श्रीयाने भरवली
खेळण्यांची शाळा
पटापटा खेळणी सारी
होऊ लागली गोळा

सर्वात आधी आला
बुंकी पिंकी चा जोडा
टबड्क टबड्क करीत आला
ऑस्टीनचा घोडा

लुडी आली तिकडे
करीत थोडे नखरे
घरंगळत घरंगळत
चेंडु आले सगळे

ममा पांडा आजी पांडा
किती ग हुशार
पायी पायी नाही
त्या घेऊन आल्या कार

पोलर बेअर आले
खुप खुप दुरुन
बेबी पांडा आला
त्याचे बोट धरुन

ऑस्टीनच्या हम्माला
थोडा उशीर झाला
पाठगुळी बसुन तिच्या
कोआलाही आला

सगळे आले शाळेत
आता रांगेमधे बसा
शाळेत कोणी रडायचं नाही
खदाखदा हसा

थोडी मस्ती थोडा अभ्यास
खेळु थोडा खेळ
सगळ्या शहाण्या खेळण्यांना
मी देणार आहे भेळ
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप खुप दुरुन- कित्ती गोड.
किती छान एंन्जॉय करत म्हणलिये गं श्रीया. Happy
हवेला अनुमोदन.

श्रीयाकडून सगळ्यांना धन्यवाद. मागच्या ८-१० दिवसांपासून वेणी घालतांना आमचा हाच उद्योग चालायचा. तरी शेवटच्या कडव्यात गडबड झालीच...पण यातले बाकीचे इफेक्ट्स आवडले म्हणून तेच पाठवले.
तोषवी, हे रेकॉर्डींग तर वेणी घालत-घालत झालेले आहे, पण गाण्यात आलेल्या सगळ्या खेळण्यांची शाळा भरवून विडिओ करणार आहे, जर त्या प्रयत्नात यश मिळाले तर करीन इथे अपलोड.

श्रीया कित्ति मस्त मस्त!!! थुप थुप दुलुन खुपच आवडल. मला वाटलच नव्हत कि तुला पुर्ण कविता पाथ होईल. दुड जॉब. शाब्बास.