केल्याने भाषांतर- प्रवेशिका ३ (अरुंधती कुलकर्णी)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 12:56

शीर्षक : आता काय करणार, तो काय करणार?
मूळ कवी : बुल्ले शाह (इ.स.१६८०-१७५८)
भाषा : पंजाबी

आता काय करणार, तो काय करणार?

आता काय करणार, तो काय करणार?
तुम्हीच सांगा प्रियतम काय करणार?
एक घरी ते नांदत असती पडदा हवा कशाला
मशीदीत तो नमाज पढला, मंदिरीही तरी तो गेला

तो एकचि पण लक्ष आलये, हर घरचा स्वामी तो
चहूदिशांना ईश्वर जो सर्वांच्या साथी असतो
मूसा फरोहा जन्मुनी मग तो दोन बनुनी का लढतो?
सर्वव्यापी तो स्वयंसाक्षी मग नरकात कुणाला नेतो?

गोष्ट ही हळवी नाजूक, कोणा सांगू, कैसे साहू
इतुकी सुंदर भूमी जेथ एक जळतो, एक दफनतो
अद्वैत अन् सत्य-सरितेत सारेचि तरंगत आहे
ह्या बाजू तोचि त्या बाजू, तोचि सकल स्वामी अन् दास
वाघासमान प्रीत ही बुल्ले शाहची जो पीतो रक्त अन् खातो मांस.

अनुवाद - अरुंधती कुलकर्णी

मूळ पंजाबी पाठ

की करदा हुण की करदा,
तुसी कहो खाँ दिलबर की करदा।
इकसे घर विच वसदियाँ रसदियाँ नहीं बणदा हुण पर्दा,
विच मसीत नमाज़ गुज़ारे बुत-ख़ाने जा सजदा,
आप इक्को कई लख घाराँ दे मालक है घर-घर दा,
जित वल वेखाँ तित वल तूं ही हर इक दा संग करदा,
मूसा ते फिरौन बणा के दो हो कियों कर लड़दा,
हाज़र नाज़र खुद नवीस है दोज़ख किस नूं खड़दा,
नाज़क बात है कियों कहंदा ना कह सक्दा ना जर्दा,
वाह वाह वतन कहींदा एहो इक दबींदा इक सड़दा,
वाहदत दा दरीयायो सचव, उथे दिस्से सभ को तरदा,
इत वल आपे उत वल आपे, आपे साहिब आपे बरदा,
बुल्ला शाह दा इश्क़ बघेला, रत पींदा गोशत चरदा।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूसा फरोहा जन्मुनी मग तो दोन बनुनी का लढतो?
सर्वव्यापी तो स्वयंसाक्षी मग नरकात कुणाला नेतो?>>> मस्तच अरुंधती... भाषांतर तर झक्कासच.

मणि, गूगल, इंटरनेट, ऑनलाईन डिक्शनरीज च्या जमान्यात सर्वसाधारण समजावून घेणे तितके अवघड नसते अगं! त्यात बुल्ले शाह यांच्या बर्‍याच रचना इंग्रजीत अनुवादित आहेत. मी आपली सर्वाचा आधार घेत घेत, पंजाबी मातृभाषा असणार्‍या स्नेह्यांना विचारत विचारत अर्थ लावते. Wink

साजिरा, धन्स! Happy