तुझ्या अपेक्षा काय आहेत?

Submitted by संगमनाथ on 17 February, 2011 - 20:39

लग्न' हा शब्द ऐकला की काहीजणाच्या अंगावर काटे तर काहीजणाच्या अंगावर शहारे येतात. लग्नपत्रिकेत स्व:ताच्या नावापुढे छापायला साजेशी एखादी डिग्री मिळविली की आपले आईवडिल, नातेवाईक आपल्या समोर लग्नाचा यक्षप्रश्न उभा करू लागतात. एका रविवारी सकाळी गरमागरम कांदेपोहे देत आईने मला विचारले,
"तुझ्या अपेक्षा तरी काय आहेत?"
मी ठामपणे आईला म्हणालो,"आई, सध्यातरी माझा लग्न करण्याचा अजिबात विचार नाहीये"
"का?"
"का म्हणजे? अग तुला माहीत आहे ना, रामदास स्वामी भर मंडपातून पळुन गेले होते लग्न नको म्हणून. मला आत्ताच हा सगळा व्याप नकोय" मी थोडक्यात उरकल.
"एवढ्या मोठ्या लोकांची नाव कधी पासून घेऊ लागलास तू? तब्ब्येत बरी आहे ना तुझी? रामदास स्वामी जगभर लंगोट घालून फिरायचे, तू पण फिरशील का आजपासून?"
मी खाली मान घालुन पोहे खात काहीही न ऐकल्यासारखे केले.
"अरे मेल्या जर शिकायच असेल तर चार चांगल्या गोष्टी शिक ना त्यांच्याकडून..., ते काही नाही उद्यापर्यंत मला तुझ्या अपेक्षा सांग, त्यानुसार आम्ही मुलगी पाहायला सुरूवात करू" असा सज्जड दम भरुन ती स्वयंपाकघरात निघुन गेली.
दिवसेंदिवस ती अधिकच आक्रमक होवू लागली। 'तुझ्या अपेक्षा काय आहेत?' हा प्रश्न मला दिवसातून दहा-दहा वेळा भेडसावू लागला. कुरुक्षेत्रात चक्रव्यूह तोडू पाहणार्‍या अभिमन्यू प्रमाणे लाचार होवून अखेर मी तिच्यासमोर गुडघे टेकले.

’लग्न’ या विषयाबाबत मी पूर्ण अडाणीच होतो, याच्याबद्दल थोड जाणकारांच मत घ्याव म्हणून मी माझा मित्र रमेशला विचारले, तर तो म्हणाला, "Marriages are made in Heaven but they make hell on earth....फक्त सामाजिक, भावनिक आणि शारीरिक गरजा भागवण्यासाठी लग्न करणे हा सामान्य माणसाचा पर्याय आहे, लग्नामुळे व्यर्थ जबाबदारी वाढते, खर्च वाढतो. लग्नानंतर आघाडी पक्ष(बायको) आणि विरोधी पक्ष(आई) यांच्या मध्ये सामान्य जनतेची (आपली) त्रेधा तिरपिट उडून जाते. काही वर्षानी जर सेना मनसे (बंडू, पिंकी etc.) जन्मास आले की आणखी उपद्व्याप वाढला. भारतीय संस्कृती प्रमाणे आज ना उद्या लग्न करावच लागणार आहे, मग थोडा उशीराच करू या ना., नशिबाने जर चांगली बायको मिळाली तर एवढे दिवस वाट पाहिल्याच चीज झाली अस वाटेल आणि जर वाईट मिळाली तर आपल्या आयुष्यात थोडे दिवस तरी सुखी गेले याच समाधान वाटेल" त्याच म्हणण मला बर्‍यापैकी पटल.
"One night at call center" मध्ये चेतन भगत म्हणतो,"Americans are fat, loud, scared and divorced" पण त्याच हे म्हणण खोडुन काढणारा माझा एक मित्र आहे. तो गेली १० वर्षे लग्नकरून सुखाने संसार करत आहे. एके दिवशी मी त्याला सहज छेडले,
"What is the secrete of your happy married life?"
यावर तो उत्तरला, "First of all you have to understand marraige is nothing but give and take, you better give it to her or else she will take it anyway."
थोडासा इमोशनल होवून तो पुढे म्हणाला,"I never knew what real happiness was until i got married and by then it was too late. You want to know the secrete of my happy married life? We take time to go to a restaurant two times a week, a little candlelight dinner, soft music and dancing. She goes on Tuesday and I go on Friday." त्याच हे म्हणण ऐकून मी तर आवाकच राहीलो , अस काही मला नक्कीच जमण्यासारख नव्हत. या दोघांच म्हणण ऐकून माझ्या छातीत आणखीनच धडकी भरली पण पुढच्याच क्षणी आईच रौद्ररुप माझ्या डोळ्यासमोर आल आणि माझ्या अपेक्षा शब्दान्कित करणे भाग आहे हे समजून चुकले. या आईसुद्धा किती कठोर होतात ना कधी कधी..:-/

’माझ्या अपेक्षा काय आहेत?’ हे जाणून घेण्यासाठी मी १ आठवडाभर स्वत:सोबत चर्चासत्र घेतले, पण रोज न्युज चॅनेल वर होणार्‍या चर्चासत्रासारखेच ते निष्कर्षहीन आणि वायफळ निघाले। माझा नेहमीचा मिस्टर डिपेन्डेबल गुगल बाबाला विचारले तर, "The person should be one with whom you can continue to grow, laugh, be surprised, share your interests and ideas year after year with out getting bored।" अशी एक जेनेरिक व्याख्या सांगून त्यानेही स्वत:चे हात झटकले. बहुतेक त्याला वाटले असावे जर त्याने काही स्पेसीफ़ीक सांगितले आणि त्याच्या म्हणण्यावरून मी तिची निवड केली आणि नंतर तिच्यामध्ये काही त्रुटी निघाल्या तर आयुष्यभर मी गुगल च्या नावे खडे फोडत बसेन.

गेली पंचवीस वर्षे जेवढा विचार केला नव्हता तेवढा विचार गेले पंधरा दिवसात करावा लागला. एखाद्या व्यक्तीला मोजक्या वेळा भेटून, मर्यादित वाक्य बोलून त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणे हे प्रॉजेक्ट प्रपॉजल बनविण्याएवढ सोप नव्हे हे प्रकर्षाने जाणवल. आपल्या सहचारिणी सोबत प्रथम मैत्री, नंतर प्रेम आणि शेवटी आयुष्यभर एकमेकांची सवय करून घ्यावे लागते हे तत्वज्ञान सुद्धा माझ्या विचारमंथनातून मला समजले. आपल्या जश्या अपेक्षा आहेत तश्याच तिच्याही असतील, त्यात आपण किती खरे उतरू? याचेही परिक्षण केले व त्यानुसार स्वत:मध्ये बदल करायला सुरूवात केली आहे. या दिवसात आसपासच सार जगच अचानक बदलल्यासारखे दिसत आहे, पण हे लाल झालेले आकाश नुकताच झालेला सूर्यास्त दाखवित आहे की नवा सूर्योदय हा येणारा काळच ठरवेल.

-संगमनाथ खराडे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

संगम लिखाणाची शैली छान आहे....... लेखन चालू राहू दे.... शुभेच्छा..... Happy

बाकी, इथल्या मॅरिड लोकांचे विचार ऐकायच्या अपेक्षेत राहू नकोस.... "मायबोलि २१ अपेक्षित" छापावं लागेल... Proud आणि ते वाचून तुझ्या सर्वच अपेक्षा गळून पडतील.... Wink

बाकी इतर येणार्‍या प्रतिसादांचा रोख पाहून काही जास्त शेअर करेनच.... पण नंतर... बाय बाय. Happy

आपला खुप खुप आभारी आहे..,अजुन पक्क पोहता येत नाही, जमेल तसे पाय हलविले आहेत...:)

"मायबोलि २१ अपेक्षित" आयडियाची कल्पना छानच आहे, माझ्यासारख्या दिशाहिनाना नक्की उपयोगी पडेल...:)

शैली छान आहे. पण प्रचलित विनोद लेखात घालण्यापेक्षा स्वतंत्र लेखन करावे असे वाटते. पुलेशु.

<<चांगले लिहीलय, पण अचानक मध्येच संपवल्यासारखे वाटले.>>
+१
अजून थोडा विषय खुलवला असता तर जास्त चांगला झाला असता लेख......
Happy
पुलेशु.

सर्वाच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे...पुढच्या लेखात तुमच्या सर्व सुचनावर अम्बलबजावणी करायचा प्रयत्न करेन...!!!

छान Happy

संगमनाथ्जी. शादीचा लड्डू खाकर देखिये. मजा आयेगा. खरी मजा ४५ नंतर अनुभवा.लोणचे मुरल्यावरच चवदार लागते. बाकी सल्ले, उपदेश आणि सुखी मॅरीड लाईफ च्या रेसिपी सारे काहि विसरा. पाण्यात पडल्यावर पोहायला येतेच.

सॅम, प्राची आणि रंगासेठ आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, पुढचा लेखासाठी नक्किच हुरुप येईल...:)

सुनिल, भुंगा तुमच म्हणण १००% पटतय, लोणचे मुरल्यावरच चवदार लागते...:)
लव्ह मरेज किन्वा अरेन्ज मरेज..याला काहीच अपवाद नाही...!!!