Submitted by पाषाणभेद on 16 February, 2011 - 23:29
याहो याहो पाव्हणं तुम्ही
याहो याहो पाव्हणं तुम्ही जरा जवळ बसा
माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||धृ||
दिवसा र्हाती तुमची घाई
जरा बोलाया वेळच न्हाई
कसं व्हाव मग मन मोकळं
नका वेळ वाया घालू फुका
माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||१||
मी बाई राही एकटी घरात
दिस सरून जाई सरेना रात
सोबतीला तुम्ही याहो
तग धरला कसाबसा
माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||२||
थोडं मी बोलते थोडं तुम्ही बोला
दिसभराची ख्याली विचारा
रात आपलीच आहे विसरू नका
माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०२/२०११
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पाभे परत आलाय. पाभे इज
पाभे परत आलाय.:)
पाभे इज बॅक.
विथ अ कविता,साजेशी टू पाभेज ओन जॉनर.
आवडली कविता.