श्री स्वामी समर्थ

Submitted by हेमंत पुराणिक on 16 February, 2011 - 03:34

लाकुडतोड्या लाकडे तोडता
कुर्‍हाड पडली वारुळावर
वारुळातल्या समाधीस्ताच्या
पडली चुकुन मांडीवर

समाधीस्त यती बाहेर येता
यतीगंध कसा तो दरवळला
लाकुड्तोड्या आशिश देता
निघाले यती धर्म रक्षणा

दत्तावतार हे स्वामी समर्थ
नृसिंहसरस्वतीचा हा जन्म
कर्दळीवनातूनी गुप्त होवून
आले हिमालयी यती दिगंबर

अनेक ठायी एकाच रुपी
दर्शन देती भक्तांना
तरीही प्रिय होता एकची
तो स्वामीसूत समर्थांना

मानस पूजा कुणीही करता
मंत्र षडाक्षरी कुणीही जपता
दारिद्र्य दु़:ख्ख दूरची होता
सुख शांती तो देईल चित्ता

अक्कलकोटी यतीराज समर्था
दत्तावतारा श्री स्वामी समर्था
हे जगधीशा तू भाग्यविधाता
कृपावंता तू अनंत रुपा

गुलमोहर: 

छान.. Happy