फ्लेमिंगो गटग - १३ फेब्रु २०११

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गेला महिनाभर शक्य तेवढ्या बाफांवर मुंबईतल्या हितगुजकरांनी काळा घोडा नाच नाच नाचवला. १२ फेब्रुवारीला काळाघोडा फेस्टीवलात सगळ्यांनी भेटायचं असं पुन्हा पुन्हा सगळ्यांनी ठरवलं. १२ तारीख जवळ यायला लागली तशी आमच्या या वरातीतली एकेक सोंगटी माघार घ्यायला लागली आणि अकराच्या संध्याकाळपर्यंत तर घोड्याने मुलुंडबाफावरच बसणे पसंत केले. Proud

मुलुंडावरूनच घोषणेची सुरुवात होऊन तिथेच ती विरून जावी.... यापेक्षा..... असो.

पण घोडा बसायला आणि दुसर्‍या गटगाची चक्रं फिरायला कुंडलीत (कोणाच्या? घोड्याच्या?) एकच मुहुर्त मांडलेला असावा. ११ ला संध्याकाळी इंद्राचा सांडणीस्वार आमच्या शामियान्यात दाखल झाला आणि इंद्राने धाडलेला एक तातडीचा खलिता आमच्या समोर धरता झाला. त्यात शिवडीच्या खाडीवर जायचा बेत शिजत असल्याचे नोंदलेले होते. आता तिथे मासेमारी करून तिथेच कालवण ओरपायचा याचा बेत किंवा कसे हे आम्हास कळेना. तेव्हा आम्ही उलट पृच्छा केली असता, तिथे गुलाबी पक्षी निरखण्यास जावे असा बेत आहे, असा त्रोटक खुलासा आला. मग आम्ही काय ते समजून घेतले. तरीही नंतर आशुतोषशी बोलताना "तीन तास तिथे काय माश्या मारायच्यात?" असा आमच्या मनातला प्रश्न आम्ही बोलून दाखवलाच. मग आम्ही म्हणजे मी, गिरिविहार, योरॉक्स, मंजूडी, जिप्सी, इन्द्रा आणि आशुतोष असे एकेकजण, ओहळ मिळे नाल्याला - नाला मिळे ओढ्याला - ओढा मिळे नदीला - नदी मिळे दर्याला - असे करत करत शिवडीच्या दर्यात उतरलो. ओहटीची वेळ साधल्यामुळे सगळा किनारा गुलाबी फ्लेमिंगोंनी फुलून गेला होता. तिथे अडीच-तीन तास कुठे गेला कळले नाही. त्यानंतर आम्ही मणीसमध्ये थोडा नाश्ता केला आणि माहिमला महाराष्ट्र निसर्ग उद्यानातल्या गुलाबांच्या प्रदर्शनास गेलो.

तर हे तिथले मज पामराच्या कॅमेर्‍यातले काही क्षण (अंधारात तीर) -
(चांगली चित्रे बडे उस्ताद योगेश(जिप्सी) यांच्या पोतडीतून लवकरच बाहेर पडतील, अशी आशा करू या.)

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

प्रकार: 

"गुलाबी पेंग्विन" >>> Rofl

मामी भरतीच्या वेळी फ्लेमिंगो किनार्‍यावरील खारफुटीच्या जंगलात लपून बसतात... भरती ओसरली की खाण्यासाठी बाहेर पडतात ते थेट पुढिल भरती येई पर्यंत (किमान ९ तास)... म्हणून आम्ही ओहटी नंतरची ३ तासाची अचूक वेळ ठरवली होती.

हा माझा झब्बू... लिटिल स्टिन्ट

इकडे लेक नाकुरु पण फ्लेमिंगोचे घरच आहे. पण इथली काही माकडे (हो माकडेच ) त्यांना पकडून खातात. या पक्षाना उडण्यासाठी बराच वेळ धावावे लागते, त्या वेळी झडप घालून हि माकडे त्यांना पकडतात. म्हणून जावेसे वाटत नाही.

दिनेशदा Sad

परत जायचा कधी बेत आहे >>> पक्षीतज्ञ श्री.गं.टि. म्हणजेच केपी साहेबांच्या सोबत जाण्याचा बेत आहे.

दिनेशदा,.खरच ते फारच भयानक दृष्य असेल. Sad

पक्षीतज्ञ श्री.गं.टि. म्हणजेच केपी साहेबांच्या सोबत जाण्याचा बेत आहे. >>> गं.टि. ? कांदेपोहे साक्षात गंगाधरपंत टिळकांचा पुनर्जन्म की काय? Happy

<< फ्लेमिंगो आधी राखाडी असतात आणि नंतर किडे खाऊन गुलाबी होतात हे आजच समजले!! >>
हे खरं असेल तर कुणी मला किड्यांची रेसिपी द्याल का प्लीज ? Wink

धन्यवाद धन्यवाद. Happy

रुनी, हो खूप होते फ्लेमिंगो. पुढे माहुलच्या बाजूला तर सगळा पट्टा गुलाबी झाला होता. पण ते माझ्या साध्या डिजीकॅमेर्‍याच्या टप्प्यात येत नव्हते. द्विनेत्रीतून चांगले दिसायचे. फ्लेमिंगोंबरोबर इंद्रा म्हणतोय त्या इटुकल्या पिटुकल्या लिटल स्टिंटांचे पण जागोजागी भले थोरले थवे होते. ते थवे उडताना बघायला मजा येते. उडताना अख्खा थवाच्या थवा एकदम काही क्षण चमकताना दिसतो आणि लगेच मूळ रंग.

जिप्सी, ठळक घोडामोडी Proud
तुझी प्रकाशचित्रंही टाक लवकर.

असुदे, पूर्ण भरतीची वेळ खारफुटीत दबा धरून बसायचे आणि ओहटी सुरू झाली की गाळात खरपूस नाश्ता तयार असतो, त्यावर ताव मारायचा. असे किमान दोन महिने तरी केले तर माणसालाही छान गुलाबी रंग यायला हवा खरे तर. Proud

हे खरं असेल तर कुणी मला किड्यांची रेसिपी द्याल का प्लीज ? >>> ती रेसिपी ना इम्युंच्या कामाची ना माशांच्या कामाची... माणसां बद्दल गजाननाने खुलास केलाच आहे. Wink

गं.टि. ? कांदेपोहे साक्षात गंगाधरपंत टिळकांचा पुनर्जन्म की काय? >>> श्रीयुत गंगाधर टिपरे :p

हे खरं असेल तर कुणी मला किड्यांची रेसिपी द्याल का प्लीज ?>>>>अम्या Proud

असुदे, पूर्ण भरतीची वेळ खारफुटीत दबा धरून बसायचे आणि ओहटी सुरू झाली की गाळात खरपूस नाश्ता तयार असतो, त्यावर ताव मारायचा. असे किमान दोन महिने तरी केले तर माणसालाही छान गुलाबी रंग यायला हवा खरे तर>>>>>>>:हहगलो:

प्लेमिंगोचे फोटो अपलोड केले Happy (माझी रीक्षा :फिदी:)
http://www.maayboli.com/node/23602

मी, गिरिविहार, योरॉक्स, मंजूडी, जिप्सी, इन्द्रा आणि आशुतोष >>
वरील सर्व व जे लोक या गटगला गेले होते त्यांचा निषेध. Proud

इंद्रा आपण कधी जायचे? या गटगची उद्घाटन व पायभरणीची कुदळ मी मारुनही तुम्ही मला न घेता गेलात याबद्दल तुमचा परत निषेध. Sad

केप्या, निषेध करायच्या आधी 'मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम' हा बाफ वाच. आमची ही 'पायलट व्हिजिट' होती. Wink

केपी अरे, खरंच हे अगदी अचानक ठरले.

आणि अगदीच निषेध करू नको हो, आम्ही कॅमेर्‍याच्या प्रत्येक क्लिकसोबत तुझी आठवण काढत होतो.
(आणि फ्लेमिंगोदेखील प्रत्येक घासाबरोबर केपीकेपीच म्हणत होते.)

रोज मुलुंड-ऐरोळी पुलावरून जाताना फ्लेमिंगोचा थवा प्रवाहाच्या काठावर दिसतो. पण कालपासून मधोमध पाण्यात विहार करताना दिसतो.
काल फोटू घ्यायचा प्रयत्न केला. पण फोटो म्हणजे अगदीच द. मा. मिरासदारांच्या कथेतल्यासारखा आला आहे.

flamingo05.04.16.JPG

(याद्वारे जिप्सी, इंद्रा, नामक सशक्त भिंगांच्या हे निदर्शनास आणून देण्यात येत आहे.)

Pages