फ्लेमिंगो गटग - १३ फेब्रु २०११

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

गेला महिनाभर शक्य तेवढ्या बाफांवर मुंबईतल्या हितगुजकरांनी काळा घोडा नाच नाच नाचवला. १२ फेब्रुवारीला काळाघोडा फेस्टीवलात सगळ्यांनी भेटायचं असं पुन्हा पुन्हा सगळ्यांनी ठरवलं. १२ तारीख जवळ यायला लागली तशी आमच्या या वरातीतली एकेक सोंगटी माघार घ्यायला लागली आणि अकराच्या संध्याकाळपर्यंत तर घोड्याने मुलुंडबाफावरच बसणे पसंत केले. Proud

मुलुंडावरूनच घोषणेची सुरुवात होऊन तिथेच ती विरून जावी.... यापेक्षा..... असो.

पण घोडा बसायला आणि दुसर्‍या गटगाची चक्रं फिरायला कुंडलीत (कोणाच्या? घोड्याच्या?) एकच मुहुर्त मांडलेला असावा. ११ ला संध्याकाळी इंद्राचा सांडणीस्वार आमच्या शामियान्यात दाखल झाला आणि इंद्राने धाडलेला एक तातडीचा खलिता आमच्या समोर धरता झाला. त्यात शिवडीच्या खाडीवर जायचा बेत शिजत असल्याचे नोंदलेले होते. आता तिथे मासेमारी करून तिथेच कालवण ओरपायचा याचा बेत किंवा कसे हे आम्हास कळेना. तेव्हा आम्ही उलट पृच्छा केली असता, तिथे गुलाबी पक्षी निरखण्यास जावे असा बेत आहे, असा त्रोटक खुलासा आला. मग आम्ही काय ते समजून घेतले. तरीही नंतर आशुतोषशी बोलताना "तीन तास तिथे काय माश्या मारायच्यात?" असा आमच्या मनातला प्रश्न आम्ही बोलून दाखवलाच. मग आम्ही म्हणजे मी, गिरिविहार, योरॉक्स, मंजूडी, जिप्सी, इन्द्रा आणि आशुतोष असे एकेकजण, ओहळ मिळे नाल्याला - नाला मिळे ओढ्याला - ओढा मिळे नदीला - नदी मिळे दर्याला - असे करत करत शिवडीच्या दर्यात उतरलो. ओहटीची वेळ साधल्यामुळे सगळा किनारा गुलाबी फ्लेमिंगोंनी फुलून गेला होता. तिथे अडीच-तीन तास कुठे गेला कळले नाही. त्यानंतर आम्ही मणीसमध्ये थोडा नाश्ता केला आणि माहिमला महाराष्ट्र निसर्ग उद्यानातल्या गुलाबांच्या प्रदर्शनास गेलो.

तर हे तिथले मज पामराच्या कॅमेर्‍यातले काही क्षण (अंधारात तीर) -
(चांगली चित्रे बडे उस्ताद योगेश(जिप्सी) यांच्या पोतडीतून लवकरच बाहेर पडतील, अशी आशा करू या.)

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

प्रकार: 

फ्लेमिंगो गुलाबी दिसतात ना ? हे तर पांढरे किंवा काळपट दिसतायत.. !! Uhoh
की माझ्या मॉनिटरचा / डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे ??

१ ला आणि ५ वा जबरीच.

फ्लेमिंगो गुलाबी दिसतात ना ? हे तर पांढरे किंवा काळपट दिसतायत.>>>

पराग, मुंबईतल्या उन्हात टॅन झाले असतील. Proud

पाचव्या फोटोत कळतय थवा केवढा मोठा आहे ते. एवढे पक्षी बघायला मिळाले म्हणजे रोहीत गटग अगदी यशस्वी पार पडलेले दिसतय .

जीडी, मस्त वर्णन आणि फोटो Happy
हा घे झब्बू माझ्याकडून.

प्रचि १
IMG_0266_mod.JPG

प्रचि २
IMG_0267_mod.JPG

प्रचि ३
IMG_0269_mod.JPG

प्रचि ४
IMG_0271_mod.JPG

प्रचि ५
IMG_0272_mod.JPG

प्रचि ६
IMG_0274_mod.JPG

गजानन एकदम खुसखुशीत वृतांत. फोटुपण मस्तच!!!

ओहळ मिळे नाल्याला - नाला मिळे ओढ्याला - ओढा मिळे नदीला - नदी मिळे दर्याला - असे करत करत शिवडीच्या दर्यात उतरलो>>>>>>:फिदी:

मणिस>>>>>> Biggrin

>>>पण घोडा बसायला आणि दुसर्‍या गटगाची चक्रं फिरायला कुंडलीत (कोणाच्या? घोड्याच्या?) एकच मुहुर्त मांडलेला असावा>>> Happy
एsssस्स्स्स्स भारी!!!!! फोटु नी लि़खाण पण
योगेश आता मणिस ला ईतका हसतोय आता त्याचा किस्सा पण सांगून टाक.

गजानन, ५ आणि १० लय भारी! Happy

मागचे गुलबट आणि पुढचे राखाडी दिसत आहेत. पुढच्यांना जास्त ऊन लागलं का? Proud

फ्लेमिंगो गुलाबी दिसतात ना ? हे तर पांढरे किंवा काळपट दिसतायत.>>> खरयं पराग... Juvenile Flamingos मुंबईचा पाहुणचार झोडून गुलाबि होतात.

माहुलच्या बाजूला खुप मोठ्ठा Lesser Flamingosचा थवा होता.

Pix Adesh Shivkar.jpg

फोटो आंतरजालावरून साभार

मस्तच. दोन वर्षापुर्वी ह्यातलेच काही पक्षी कदाचित आमच्या खाडीत येत असतील.

हाईला!! माझा चक्क फोटोंवर झब्बू Wink

हे नविन आलेले फ्लेमिंगो

1.jpg

हे इथल्या दलदलीतले किडे खाऊन असे गुलाबी होतात

2.jpg

हे 'लिटिल स्टिन्ट' नावाचे पक्षी. हे चिमणीपेक्षाही आकाराने लहान असतात. हे थव्याने उडतात तेव्हा पांढर्‍या पंखांमुळे दिसून येतात, वार्‍याने जमिनीवरचा कचरा उडतोय की काय असेच वाटत राहते. परत खाली बसले की दलदलीच्या रंगात मिळून जातात.

3.jpg

हा एकुलता एक दिसलेला खंड्या पक्षी

4.jpg

हि सगळी माहिती इंद्राकडून साभार.

त्याने दाखवलेल्या बगळ्याचा पण मी फोटो काढला आहे. Proud

ओह्ह! फ्लेमिंगो आधी राखाडी असतात आणि नंतर किडे खाऊन गुलाबी होतात हे आजच समजले!! सहीच.

मन्जू, तुझेही फोटो मस्त आलेत. 'लिटिल स्टिल्ट' एकदम भारी! Happy

फोटो आंतरजालावरून साभार >> जल्ला तरीच म्हणतो.. तू पाण्यात कधी गेला होतास.. Lol

गजा.. इतका छोटा वृ. ???? पण सगळे आले त्यात.. मस्त.. नि फोटोपण छान.. Happy

मंजू.. तो खंड्या पक्षी माझ्या नेहमीच लक्षात राहील.. Lol

तो खंड्या पक्षी माझ्या नेहमीच लक्षात राहील..>>>>> Proud

योगेश(जिप्सी) यांच्या पोतडीतून लवकरच बाहेर पडतील, अशी आशा करू या.)
>>>>गजानन, एक-दोन दिवसात मी फोटो प्रदर्शित करतो Happy

आदल्या दिवशी पेब ट्रेक करून थकुन आलेलो मी सुरुवातीला या गटगला नाहीच म्हणत होतो :-). अर्थात गेलो नसतो तर खुप काही मिस केले असते Proud

काही ठळक घडामोडी:

फ्लेमिंगोचे उडत असताना फोटो काढायचे होते, म्हणुन त्यांना "दगड" मारून उडव असे म्हणताच झालेला विनोद Proud

मंजुडीने आणलेला घरगुती मावा केक Happy

फ्लेमिंगोचे झालेले मनसोक्त दर्शन

किडे खातान फ्लेमिंगो पक्ष्यांचा कलकलाट चालु होतो, तेंव्हा इंद्राने "यांना जेवताना बोलायचे नाही, असे शिकवले नाही का?" म्हणत केलेली कोटी Proud

जहाजावर केलेली चहाची फर्माइश आणि पर्यायाने एक मायबोलीकराची आलेली आठवण Happy

फ्लेमिंगोच्या ऐवजी एक कावळा शिडावर येऊन सारखा कावकाव करत असताना गिरीविहारने त्याला "ये रे बाबा, तुझाही "पोर्टफोलियो" तयार करतो" म्हणत दिलेले निमंत्रण Proud

"मणिस"मधला स्नॅक्स Happy

निसर्ग उद्यानातील गुलाबांचे प्रदर्शन

"गुलाबी फ्लेमिंगो" ऐवजी चुकुन गजाननने "गुलाबी पेंग्विन" म्हंटल्यावर झालेला हास्यकल्लोळ Biggrin

निसर्ग उद्यानात "उडीमारून" फोटो काढण्यासाठी केलेला आग्रह
इ. इ. Happy

मस्त फोटो.
वीणीच्या काळात ते एक खास प्रकारची समुद्री वनस्पति खातात (अल्गी) म्हणून त्यांच्या पिसांवर ती खास गुलाबी छटा येते.
शिवडी माझ्या घरापासून जवळच. बिल्डींगच्या गच्चीवरुन तो परिसर दिसतो. पण इतक्या वर्षात कधी जाणे झालेच नाही. ती इच्छा इथे पूर्ण झाली.

जिप्स्या, ठळक घडामोडी मस्तच. दिनेशदा, शिवडी माझ्याही घरातून दिसते. फक्त मध्ये ५ किमीचं तरी अंतर असेल.

हे फ्लेमिंगो बघायला भरती की ओहोटीच्या वेळी जावं लागतं ना? मी नेहमी चुकीच्या वेळी गेलेय आणि ते फ्लेमींगो खूप दूरवरून पाहिलेत. मला त्यांचं (एकदाचं) जवळून दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद.

Pages