दुःख आता फार झाले - तरही

Submitted by मी अभिजीत on 4 February, 2011 - 09:46

दुःख आता फार झाले
हे तुझे उपकार झाले

हाय मी ना मागताही
आज का होकार झाले

जिंकुनीही रंक झालो
हे कसे व्यवहार झाले

का मला मी मालवावे
भोवती अंधार झाले

बंडखोरी ही न माझी
विश्व हे गद्दार झाले

लागली खपली धराया
अन् नव्याने वार झाले

एक अश्रू ढाळला तू
केवढे सत्कार झाले

-- अभिजीत दाते

गुलमोहर: