द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ३

Submitted by बेफ़िकीर on 2 February, 2011 - 10:46

ब्रिस्टॉल पेटवून आढ्याकडे पाहात नवलेने पहिल्या झुरक्याचा धूर सोडला आणि कुशीत आवळून धरलेल्या मिनीला म्हणाला..

"मझा आया... स्साली तू आजकल भाव बहोत खाती है.... पंधरा दिनमे आती है"

"बाबूसे मिलना था"

"तेरी *** की... चल्ल... फ्रेस हो के आजा वापस... दस मिनिटमे..."

दचकलेली मिनी त्याच्या मिठीतून विलग होत उठली. याचसाठी ती जेलमध्ये यायला नाखुष असायची. बाबूव्यतिरिक्त तिचे यार नव्हते असे नव्हते. स्वतः निर्मल जैनने तिला काही वेळा बोलावलेले होतेच, त्या शिवाय रॉजर म्हणून एक ख्रिश्चन श्रीमंत म्हातारा होता जवळपास राहणारा! तोही बोलवायचा तिला!

पण नवलेकडे यायचा तिला मनस्वी तिटकारा होता. एक संपूर्ण रात्र तो तिला उपभोगायचा! त्यात त्याला असुरी आनंद हा मिळायचा की तिचा नवरा दारू, सिगारेटसारख्या क्षुल्लक बाबी मिळत राहाव्यत म्हणून बायकोला आपल्याकडे सोपवतो आणि आपल्या विरुद्ध काहीही करू शकत नाही.

नवलेची फॅमिली गावाकडे होती. हा इथे निवासी अधिकारी म्हणून होता. त्यात जेलचा प्रमुख! सरकारी दस्तऐवज आणि येणारे पाहुणे यांच्याकडे लक्ष देण्यातच त्याचा दिवस जायचा! जेलमध्ये सतरा प्रकारचे लोक यायचे. कुणी कैद्यांना मनोरंजन म्हणून कार्यक्रम करणारे, तर कुणी कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवणारे, तर अनेकदा सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते! पाहणी वगैरे करण्यासाठी! त्यातच डिपार्टमेन्टचे वरिष्ठ अधिकारी तर सारखेच यायचे.

त्यामुळे नवलेचा दिवस कसाही आरामात निघून जायचा.

रात्र मात्र त्याला खायला उठायची. बायकोची आठवण यायचीच नाही. त्याला आठवण यायची अनेक इतरच बायकांची! स्टाफमध्ये असलेल्या एका डोके नावाच्या शिपायाची बायको एकदा डबा द्यायला आली होती. ती पहिल्यांदा अर्थातच ऑफीसमध्येच आली आणि नवलेलाच भेटली परवानगीसाठी! डोकेला इन्टरकॉमवरुन बोलवून तो येईपर्यंत त्याच्या बायकोला बघून नवले घायाळ झालेला होता. त्याने तिच्यासाठी चहा वगैरे मागवून तिला 'येत राहा अधून मधून भेटायला' असेही सांगीतलेले होते.

अशा अनेक आठवणी होत्या. नारायणगावच्या एका हॉटेलमध्ये त्याने अनेकदा रात्री घालवलेल्या होत्या. विविध पोरींबरोबर! या पोरी त्याला कैदीच सप्लाय करायचे. पेपर्स हवे तसे बनावेत, शक्य तर लवकर सुटका व्हावी, कैदेत असताना अनेक सुविधा मिळाव्यात वगैरेसाठी! मात्र बाबूसारखी त्याची सोय मात्र कुणीच केलेली नव्हती. खुद्द आपल्याच क्वार्टरमध्ये मिनी येते आणि येऊ शकते ही बाब नवलेला अत्यंत आवडायची. हा प्रकार करता यावा यासाठी त्याने आपलीच चार माणसे विश्वासात घेऊन ठेवलेली होती. त्यांना तो चिरीमिरीच्या नावाखाली त्याला मिळालेले ब्लॅकचे काही पैसे द्यायचा. तेही खुष, हाही खुष! जेलमध्ये आत आल्यानंतर पार पलीकडच्या बाजुस जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी जी हिरवळीची वाट होती, जिथपर्यंत एकही कैदी पोचू शकायचा नाही, त्या वाटेने मिनी एका हवालदाराबरोबर अंधारात एका क्वार्टरपाशी यायची. तिथे काही वेळ थांबून सगळा अंदाज घेतला, सगळे काही अजूनही शांतच आहे असे लक्षात आले की मग हळूहळू ते दोघे नवलेच्या क्वार्टरवर यायचे. तेथेही हवालदार जवळपास एक तास बसून राहायचा. त्या दरम्यान कुणाला शंका वगैरे येत नाही ना हे एकदा कन्फर्म झाले की मग तो हळूच सटकायचा! आणि क्वार्टरबाहेर सेन्ट्री म्हणून तीन तास थांबायचा. त्यानंतर दारावर टकटक करायचा. नवलेची इच्छा झाली तर मिनीला तो त्यावेळेस सोडून द्यायचा. नाहीतर मग दुसरा विश्वासातला हवालदार यायचा आणि एकदम पहाटेच मिनी जेलमधुन पसार व्हायची.

यापुर्वी मिनी बाबूला अनेकदा भेटलेली होती. पण ते दिवसा ढवळ्या आणि नवले आणि इतर काही पोलिसांच्या उपस्थितीतच! त्यामुळे रात्री आलेली मिनी सकाळी ऑफीस सुरू होईपर्यंत थांबून वगैरे कधीच बाबूला भेटलेली नव्हती. ते अशक्यच होते.

मात्र आज आल्यापासून तिने तीन वेळा ते वाक्य उच्चारलेले होते. की मला बाबूला रात्रीच भेटायचे आहे. नवलेला ती मागणी पूर्ण करणे शक्यही नव्हते आणि तशी त्याची इच्छाही नव्हती. आणि या पवित्र प्रेमाचा पहिला बहर ओसरल्यानंतर नवलेने तिला पुन्हा तयार होऊन यायची आज्ञा केलेली होती.

तिच्या त्या पाठमोर्‍या नग्न रुपाकडे पाहात नवलेने ग्लास पुन्हा तोंडाला लावला आणि विचार केला की आत्ताच हिला बाबूला का भेटायचे असावे? काही... लफडे तर नाही?? नाहीतर.. आपलाच मुडदा पाडायचे दोघं! स्साला त्याने तर अनेक मर्डर केलेले आहेतच!

नवलेने पटकन मिनीची पर्स तपासली. त्यात तरी काही शस्त्र वगैरे नव्हतंच! अर्थात, ते तपासल्याशिवाय तिला हवालदाराने इथपर्यंत आणलंच नसतं हे त्याला माहीत होतं!

नवले तसाच ग्लास आणि सिगारेट हातात धरून आरश्यासमोर उभा राहिला उगाचच! त्याच अवस्थेत!

तर्र झालेले स्वतःचेच डोळे आणि तो अगडबंब केसाळ देह पाहून त्याला स्वतःचा कोण अभिमान वाटला. याच रुपाला सगळे कैदी टरकून असतात. त्या नव्या पोराला... आकाशला.. एकदा इथे बोलवायला पाहिजेल... मिनीनंतर तो म्हणजे व्हिस्कीनंतर हातभट्टीच! पण भुकेला केळं अन उपासाला रताळं!

नवलेने क्षंणभर विचार केला. नक्की काय गेम असावी? हिला बाबूला रात्री का भेटायचे असावे? आपण एक डाव खेळून पाहायला पाहिजे. आपल्याच क्वार्टरमध्ये बाबूला बोलवायचा आणि आपल्यासमोरच दोघांना बोलायला लावायचे. असे व्हायला ती तयार असली तरच बोलवायचे, तिला बाबूशी काही 'शेपरेट' बोलायचे असले तर परवानगी द्यायची नाही.

त्याने इन्टरकॉमवरून तश्या सूचना दिल्या.

"साडी भी पहन"

बाहेर आलेल्या मिनीच्या अंगावर फक्त पेटिकोट होता. तिने चकीत होऊन विचारले.

"भर गया मन?????"

"अभी तो रात बाकी है.... बाबू आरहा है..."

दचकलेल्या मिनीने शीघ्रपणे साडी नेसायला सुरुवात केली आणि नवलेला विचारले...

"इधर????"

"हं... लेकिन जो बोलनेका वो मेरे सामने बोलनेका.. "

मिनीला यात अडचण नव्हतीच! फक्त तिला शरम वाटत होती ती याची की याच नवलेच्या क्वार्टरमध्ये आपण आपल्या नवर्‍याला कसे भेटायचे??

"लेकिन.. वो.. इधर होते हुवे मै आपके साथ होगी तो..."

"शरम आती है?? "

नवलेचा तो 'दरडावणीस्वरूप' प्रश्न ऐकून मिनी चूप झाली. अजून काही बोललो तर हा कपडे न घालताच बाबूसमोर बसायला सांगेल आपल्याला! तेवढ्यातच तिच्या लक्षात आलं! हा स्वतः तसाच बसलाय!

"आप... आपभी तो पहनो कपडे"

"मेरी मर्झी... "

फक्त शॉर्ट्स चढवून नवले दार वाजायची वाट बघत बसला.

तिकडे आकाश, बाबू, वाघ आणि मुल्ला एकमेकांना आपापल्या कहाण्या सांगून झोपायच्या मूडमध्ये होते. नसीमला मगाशीच चेंबरमध्ये नेलेले होते. तेवढ्यात गजांचा आवाज आला तसे सगळे दचकून उठले.

"बाबू... साहब बुला रहे.. ऊठ"

बाबू खरे तर घाबरलाच होता. इतक्या रात्री आजवर नवलेने त्याला बोलावलेले नव्हते. काय कारण असू शकेल ते बाबूला समजत नव्हते. त्यातच हवालदाराने ऑफीसकडे न नेता बाबूला क्वार्टर्सच्या रस्त्यावर लावले तसा बाबू आणखीनच हादरला.

'उडवणार???"

आपल्याला उडवणार की काय? निर्मल जैनकडून पैसा खाऊन?? की मिनी आलीय आणि तिनेच काही हंगामा उभा केलाय??

जीवाच्या भीतीने बाबू सावधपणे चालू लागला. मागे एकदा असेच झालेले होते. हरेन नावाच्या एका कैद्याला असेच रेसिडेन्शिअल क्वार्टर्सपाशी नेतोय असे दाखवून मधूनच उचलले होते आणि गेटपाशी नेऊन एका जीपमध्ये टाकले होते. नंतर तो कुणालाही दिसला नाही. दोन महिन्यांनी उडत उडत बातमी आली. त्याचा डिपार्टमेन्टनेच गेम केला म्हणून!

बाबू डोळ्यात तेल घालून चालत होता. पण धोका झाला नाही.

नवलेच्या बंगल्यात प्रवेश करतानाही बाबू बिचकलेला होता. पण आतल्या खोलीत गेल्यावर समोर मिनी दिसली तसा त्याने देवाचे आभारच मानले. आणि नवलेला पाहिले तसा मात्र तो मनातून अतोनात भडकला. नवले फक्त शॉर्ट्सवर होता. सरळ दाखवून देत होता की तुझी बायको माझी गुलाम आहे. मान खाली घालून बाबू भयानक डोळ्यांनी जमिनीकडे पाहात असतानाच नवले म्हणाला...

"तेरी बिवी पर्मिशन लेने आयी है इधर... तेरेसे मिलनेके लिये..."

बाबूने जळजळीत डोळ्यांनी नवलेकडे पाहिले तसा नवले खदखदून हासला आणि मग बाबूने मिनीकडे पाहिले.

मिनी भयानक शरमलेली होती.

"क्या री... क्या होना??"

बाबूने मिनीला विचारले.

"वोह.. लाला... वो लाला आके छेडता है मेरेको बाबू..."

लाला! निर्मल जैनच्या गॅन्गमधील पाचपैकी तीन जणांचे बाबूने मुडदे बशीवले होते. आणि उरलेल्यांमध्ये उल्टा खोपडी आणि लाला होते! लाला! एक खतरनाक व्यक्तीमत्व!

पण मिनीचे हे विधान ऐकून बाबूच्याऐवजी नवलेच ताडकन उठून बसला. आणि म्हणाला..

"कौन लाला?? तू कंप्लेन कर ना??? स्साले का छिछुंदर बनाता हूं... आं??"

"आप छोडदो साहब.. मै देखलेगा..."

बाबूने थंडपणे उच्चारलेले वाक्य ऐकून नाही म्हंटले तरी नवले हादरलाच! बाबू या माणसाने आजवर सात खून केलेले आहेत हे त्याला माहीत होते. आत्ता या क्षणी इथे एक हवालदारही होता यामुळे बाबू शांत बसला आहे याचीही नवलेला जाणीव होती. तो हवालदार नसता तर बाबूने कदचित आपल्यावरही हल्ला केला असता असे नवलेला वाटले. त्यातच बाबू पुढे उद्गारला...

"मेरी बिवी को छेडनेवालेका क्या हाल होता है इक बार दिखायेगाच मै..."

या वाक्यामुळे नवलेतला 'डेप्युटी इन चार्ज ऑफ द जेल' जागा झाला.

तो ताडकन उठून पुढे आला आणि त्याने बाबूच्या कानाखाली सणसणीत ओढली.

"मादर**... मेरे क्वार्टरपे आकर धमकी देता है??? चेम्बरमे भेजू?? आ?? स्साले... रंडीकी औलाद... इन्सानियत करके तेरेको बिवीसे मिलने बुलाया.. तो इधर दमबाजी करता है??? आ??"

बोलणे संपताना नवलेने आणखीन एक वाजवली. बाबू ढिम्मच होता.

मिनीला ते पाहावत नव्हते. तिचे बाबूवर प्रेम होते. कोणत्याही मर्यादेपर्यंत!

तिने चिडलेल्या नवलेला हातांनी बाजूला केले. नवले उद्दाम होता. त्याने जवळ आलेल्या मिनीला डाव्या हाताने सरळ जवळ ओढले अन म्हणाला..

"ये देख... ये देख **** मै तेरी बिवीको ** रहा हूं... देखेगा??? इधरही बैठ.. अभ्भी... तेरे सामने.."

बाबूचा बॉम्ब झालेला होता. आणि मिनीचा ससा, घाबरून!

बाबूच्या वळलेल्या मुठी आणि ताणल्या गेलेल्या घशाच्या शिरा पाहून उद्दाम नवले आणखीनच भडकला आणि त्याने जोरात एक लाथ घातली बाबूच्या नडगीवर!

नवलेला आश्चर्याचा धक्का बसला!

बाबू ढिम्म!

मग नवलेने मिनीला सोडून दिले आणि मिनीकडे बघत हवालदाराला म्हणाला..

"लेके जा रे इसको.. सुब्बे देखता स्साले को... अब्बी कुछ और देखनेका मन कर रहा है..."

बाबू स्वत:च उठून बाहेर जायला लागला. तसा हवालदारही निघाला!

बाबूने मागे वळून पाहिले आणि मिनीला म्हणाला...

"मिनी... फिर इधर मत आना... कभीभी"

खवळलेला नवले अंगावर यायच्या आधीच बाबू बाहेर गेला होता आणि नवलेला क्वार्टरच्या बाहेर तमाशा नको असल्याने...

.. त्याने बाबूचा सूड रात्रभर मिनीवर उगवला..

===================================

अतीव वेदना झाल्या आकाशला त्यावेळी! सकाळ काय अन दुपार काय! इथे तर झोपच लागू शकत नाही! डास, ढेकूण, सतावणारा गार वारा किंवा भयानक उकाडा! आणि त्यातच भीती, पुन्हा आपल्याला उठवून तेच करतील की काय जे संध्याकाळी केले.

पण प्रातर्विधीच्या वेळेस मात्र त्याला प्रकर्षाने जाणवले.

कालचा अत्याचार अमानवी होता. तोंडात कैदेचा सदराच कोंबला होता त्याने!

आणि त्याच वेळेस त्याच्या मनाने निर्धार केलेला होता. संधी मिळाली की या चौघांवर सूड उगवायचा!

हा राग निर्मल जैनवर असलेल्या रागाइतकाच मोठा होता. माणसाला भावनांपेक्षाही आपले शरीर अधिक प्रिय असते याचेच हे निदर्शक होते. काल साहेबांना भेटून आल्यानंतर बाबूने इतका भयानक शिवीगाळ का केला हे मात्र त्याला समजत नव्हते.

आणि त्याचवेळेस मुल्ला आणि वाघ खदखदून हासत का होते हेही त्याला समजत नव्हते.

नाश्त्याच्या रांगेत नेहमीप्रमाणे इसाप आपला आकाशच्या मागे!

"खून निकला क्या सुबहे?? ... मेरा निकला था... "

आकाशने आजवर इतक्या जळजळीत नजरेने कुणाकडे पाहिलेले नसावे.

"गुस्सा मत कर यार... मैने कुछ बिगाडा है तेरा क्या??"

शरमेने काळा ठिक्कर पडलेल्या आकाशने एक उकडलेलं अंड, एक चिक्कीचा तुकडा आणि उसळ पानात घेतली. उसळ खायची कशाशी हे समजत नव्हते. पण कैदी हाताने नुसती उसळच खात होते. मग आकाशनेही हातात थोडी उसळ घेतली अन घास घेतला.

आह!

उसळ तरी बरी होती जेवणापेक्षा! अंड तो कधीतरी खायचा! आज ती आवश्यकता झालेली होती. अंड खाताखाता त्याला समजले.. एका बाजूला इसाप आहे... आणि दुसर्‍या बाजूला..

'बाबू'!

"रातमे गाली क्युं दे रहे थे??"

आकाशचा हा प्रश्न अस्थानी होता.

बाबूने संतापाने, पण घुसमटत्या स्वरांमध्ये उत्तर दिले..

"क्या खा रहा है वो याद रख... वही बाहर निकलते हुवे भी दुबारा उतनाही तकलीफ देगा..."

ही असली धमकी आकाशला फारच हिडीस वाटली. दोघेचौघे मात्र खदखदून हासले. तेवढ्यातच एकाने विचारले..

"बाबू... नयी दुल्हन पसंद आयी???"

पाच एक फुटांवर असलेला एक हवालदार तेवढ्यात खिजवत म्हणाला..

"अरे ये तो खुदकी बिवीको सुलाता है साहबके पास... ये क्या दुल्हनको **गा??"

बाबूने संतापाने नाश्ताच सोडला आणि उठून निघून गेला.

आकाशसाठी हे वाक्य अती होतं! काल काहीतरी उल्लेख झालेले त्याने ऐकले होते बाबूच्या बायको संदर्भात! इतकेच काय तर वाघ आणि बाबूची मजेमजेत पण सिरियस मारामारी झाली हेही पाहिलेले होते.

आकाश उठला, एका हातात अंड आणि दुसर्‍या हातात चिक्की घेत बाबूच्या मागे निघाला. इसापच्या 'किधर जा रहा है' या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून!

बाबू खूप लांब गेला होता. तेथेही पहारा मजबूतच होता. कुणीतरी हवालदारने बाबूला विचारलेही..

"क्या?? इधर कैसे?? नाश्ता नही आज??"

एक अक्षरही न बोलता बाबू एका कठड्यापाशी जाऊन थांबला. त्याला कळलेच नाही की आकाशही मागे आलेला आहे.

"काय झालं काय???"

आकाशच्या या प्रश्नावर बाबू भयंकर दचकला! आकाशला तिथे पाहून उडालाच तो!

"इधर क्या कर रहा बे मच्छर?? चल्ल ज्जा... नाश्ता कर..."

"लेकिन... तुमको क्या हुवा??"

बाबूने खाडकन कानाखाली आवाज काढला आकाशच्या! दोन हवालदार धावत आले. कैद्यांमध्ये मारामारी होऊ नये म्हणून! बाबूने त्यांना 'दोस्तीमे चलरहा है' सांगीतल्यावर ते निघून गेले.

"तू इधर किसलिये आया बे??"

"तुम.. तुम ऐसे.. चले क्युं आये??"

कालच या माणसाने आपल्यावर अत्याचार केले असले तरीही अनेक कारणांनी आकाशला बाबूशी बोलायचे होते. एक म्हणजे तुरुंगात राहावेच लागणार होते. दुसरे म्हणजे बाबूचा आणि त्याच शत्रू एकच होता. तिसरे म्हणजे बाबूशी नीट राहिले तर अत्याचार होणार नव्हते. आणि चवथे म्हणजे....

.. इसापने सांगीतलेले होते की बाबूमुळे तुमच्या बरॅकमधल्या लोकांना अनेक गोष्टी मिळतात.. दारू, बिड्या, साबण वगैरे!

याचाच अर्थ बाबू महत्वाचा होता.

म्हणूनच आकाशने बाबूला जिंकण्याचे ठरवलेले होते.

"तेरी बहन का रेप किया निर्मलसेठेके लोगोंने????"

आकाशला हा प्रश्न अपेक्षित नव्हता. तरी त्याने मान डोलावली.

"मेरी बीवीका रेप करता है *****"

"कौन??"

"नवले"

".... ??? ... पर.... क्युं???.. मतलब.. कैसे क्या??? .. वो होती किधर है??"

"उसको आना पडता है इधर... "

"क्युं???"

"अगर वो... अगर वो उसके नीचे नही **गी तो..."

"??????"

"तो मुझे... मुझे दारू कैसे मिलेगी??? बिडी कैसे मिलेगी???"

आकाश खाली बसला. बाबू या माणसाच्या डोळ्यात पाणीही येऊ शकते हे त्याला पहिल्यांदाच समजले होते.

चक्क जमीनीवर बसला आकाश!

"जगायला एक नंबरचा नालायक माणूस आहेस तू... "

काल आलेल्या पोराने, ज्याचा सर्वप्रथम आपणच अनिसर्गीक शारिरीक संबंधाशी अत्याचारी पद्धतीने परिचय करून दिला, त्याने केवळ काही तासातच आपल्याला उद्देशून हे वाक्य उच्चारावे???

पण बाबूला ते वाक्य... चक्क पटलेले होते...

"तू तिचा दलाल आहेस.. नवरा नाहीस..."

या वाक्यावर तरी बाबूने खवळून आकाशला मारायला पाहिजे होते.

अंहं!

खिळलेल्या नजरेने समोरच्या खडकाळ जमीनीकडे पाहात राहिला बाबू!

"इतकेच काय... दारू आणि बिड्यांसाठी... आई, मुलगी, बहिण ही नाती तुझ्यासाठी महत्वाची नाहीत.."

धिस वॉज टू मच!

पण बाबू तसाच!

"नसीमच्या ऐवजी... तुला चेंबरमध्ये न्यायला हवा... तिथेच ठेवायला हवा..."

बाबूने तीव्र नजरेने त्या खडकाळ जमीनीकडे पाहिले... पण... अक्षर उच्चारले नाही...

"तुझ्या बायकोला जास्त अक्कल आहे... ती निदान नवलेबरोबर तरी झोपते... तुझ्यासारख्या दलालाबरोबर झोपण्यापेक्षा..."

या वाक्यावर तरी स्फोट व्हायलाच हवा होता. नाही झाला. हे वाक्यही एक जहाल वेष्टनच ठरलं शेवटी!

"आणि तो... कोण तो??? .. हां.. मुल्ला.. तो म्हणतो ना?? तसं जर एखाद्या बरॅकमध्ये पाच जण असतील.. तर त्यातला एक मरायला तयार असेल तर बाकीचे चौघे सुटतील.. असंच म्हणाला ना??? ... तुला जर एक कणही लाजलज्जा आणि शरम असली... तर तो मरणारा तू असायला हवास ... संजयबाबू.."

लांब, आपल्या बरॅककडे चालत चालत चाललेल्या आकाशकडे बाबू अभ्यासू नजरेने बघत होता...

गुलमोहर: 

मला तर पटल बुवा आकाशच बोलण बेफिकिरराव लिहित रहा
माझ्यासारखे जे वाचक आहेत त्यांची भुक भागविण्यासाठी लिहित रहा
बाकी कोणी निंदा कोणी वंदा स्वांत शुखाय लिहित रहाणे हा तुमचा धंदा
हे चालु ठेवा बाकी मला तर सुमार उथळ अस काही वाटत नाही आहे
माझा एक परिचित होता आर्थर रोड कारागृहात त्याच्याकडुन ऐकले होते
काय चालते कसे चालते ते आज ते सगळ पटतय .....

आर्थर रोड कारागृहात असेच काहीसे चालते ऐकले होते काय चालते कसे चालते ते आज ते सगळ पटतय. आणि हे वास्तव आहे --- आपल्या सारख्यांच्या सुरक्षित आयुष्या पलिकडचे

आपण लिहीत रहा - पु. ले.शु.

मस्त झालाय भाग!

यात उथळ वाटण्यासारखे काय आहे.('सुमार' म्हणणे न म्हणणे हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे.)
मायबोलीवर फक्त गुडी गुडी लेखन अपेक्षित आहे का?

<<आणि हे वास्तव आहे --- आपल्या सारख्यांच्या सुरक्षित आयुष्या पलिकडचे>> अगदी अगदी १००% अनुमोदन

पु.ले.शु.

बेफिकिर सर

खुप सुन्न झाले वाचुन प्रतिसाद आज देत आहे तुम्हि जे काहि लिहिता ते वास्तव मधे होत असते आनि म्हनुन मला जग कळ्ते १०.३० ते ६.३० ओफ्फिस मधे जग कलत नाहि मला तुम्ह्चया सगळ्या कादंबरि मि वाचते तुम्हि असेच लिहित राहा बेफिकिर होउन ......................... गोड ब्लेस यु

बेफिकिर सर

खुप सुन्न झाले वाचुन प्रतिसाद आज देत आहे तुम्हि जे काहि लिहिता ते वास्तव मधे होत असते आनि म्हनुन मला जग कळ्ते १०.३० ते ६.३० ओफ्फिस मधे जग कलत नाहि मला तुम्ह्चया सगळ्या कादंबरि मि वाचते तुम्हि असेच लिहित राहा बेफिकिर होउन ......................... गोड ब्लेस यु

थँक्स बेफिकीर. तुमचा वेग आणि स्टाईल दोन्हि प्रशंसनीय आहे. रोज एक भाग येतो, त्यामुळे लिन्क तुटत नाहि. गुड लक आणि गॉड ब्लेस्.

आणि हे वास्तव आहे --- आपल्या सारख्यांच्या सुरक्षित आयुष्या पलिकडचे>> अगदी अगदी १००% अनुमोदन
माझेपणं!!

भुषणराव... छान लिहिलत. आणि हो, खरच सामान्य माणसांच्या चाकोरि बाहेरिल हे जग आम्हि फक्त तुमच्याच लिखानातुन अनुभवु शकतो. (२०३ डिस्को चि आठवण झालि, तेवढिच जळजळित आणि तेवढिच वास्तव)....