द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - २

Submitted by बेफ़िकीर on 1 February, 2011 - 05:02

"आमची इमारत त्या निर्मल जैनलाच विकली! इमारत म्हणजे फ्लॅट सिस्टीम नव्हती.. एका बिल्डिंगमध्ये चार चार खोल्यांची चार घरे... खालची दोन्ही घरे मालकांची.. आम्ही आणि शर्मा भाडेकरू... शेजारी शेजारी, वरच्या मजल्यावर... निर्मल जैनला तेथे मॉल बांधायचा आहे.. बांधेलही तो... आम्हाला पर्यायी जागा देणार होता.. ती जागा आहे कात्रज घाटापाशी... काय संबंध पुणे स्टेशन आणि कात्रज घाटाचा... कसे काय जाऊ आम्ही तिथे? तर म्हणे तुम्ही रेन्टवरच राहताय..

आम्हाला मॉलमध्ये जागा हवी होती.. ती तर देणे शक्यच नव्हते कारण मॉलमध्ये कोण रेसिडेन्शिअल ठेवणार? ... मग आम्ही पैसे मागीतले तर नाही म्हणाला... आम्ही म्हणालो आम्हाला दहा लाख द्या.. आम्ही जातो... तर म्हणे जागा काय तुमची आहे का? तुम्ही भाडेकरू... आम्ही फार तर पर्यायी जागा देऊन तितक्याच भाड्यावर.... दोन हजार भाडं द्यायला तयार असलात तर स्टेशन विभागात देऊ...

का म्हणून इतकं भाडं द्यायचं? आधीचं भाडं फक्त एकशे तीस रुपये.. आम्ही आमच्याच मालकाला भेटलो जाऊन.. तर म्हणे बिल्डिंग माझी आहे..मी कुणालाही विकेन.. आपल्या अ‍ॅग्रीमेन्टमध्ये काही असं नाहीये की तुमची सोय तुमच्या मनाप्रमाणे लावल्यानंतरच मी माझी जागा विकायला काढावी.... इतक्या महागाईत मागच्याच पिढीतले एकशे तीस रुपये भाडे देऊन इथे राहायला तुम्हाला शरम वाटत नाही का?

प्रश्न पैशांचा होताच, पण त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न होता वडिलांच्या आजारपणाचा.. एक तर पाण्यासारखा पैसा चाललेला होता.. आठवड्यातून दोन वेळा डायलिसीस... त्यातच इतर अनेक प्रॉब्लेम्स.. माझी नोकरी साधीसुधीच... पण बाबांना निदान जहांगीर हॉस्पीटल जवळ तरी होते... कात्रजहून कसे येणार सारखे?

खूप भांडणे झाली मालकांशी... शेवटी मालकांनी निर्मल जैनला सांगीतले.. त्याने तीन माणसे घरी पाठवली.. एकदम सभ्य वागत होते ते तिघे... म्हणाले.. तुमच्याच भल्यासाठी सांगतोय की जागा लवकर रिकामी करा.. कारण हे लोक फार वाईट असतात वगैरे... ही माणसे त्याचीच होती... पण असे भासवत होती कीजणू आमचेच हितचिंतक आहेत.. आम्हाला ते समजले नाही... मी त्यांना म्हणालो.. तो त्रास कसला देतोय.. त्यालाच त्रास होईल आमच्या नादी लागला तर...

काही दिवसांनी पुन्हा वेगळे लोक आले.. यांनी मात्र दमच भरला.. महिन्याच्या आत जागा खाली केली नाही तर त्रास होईल.. त्यांना मी हाकलून दिले.. मालक मजा बघत होता.. मी सरळ जाऊन चौकीवर कंप्लेन्ट लिहून आलो.. त्या दिवसापासून सारखे पोलिसच यायला लागले.. म्हणजे चौकशी निर्मल जैनच्या माणसांची करायला पाहिजे ... तर आमच्याकडेच येऊन भाड्याच्या पावत्याच दाखवा.. अ‍ॅग्रीमेन्टच दाखवा.. तुमचे उत्प्पन्नच किती ते सिद्ध करा... काहीही.. शेवटी मी त्यांना म्हणालो की मुद्दा काय आणि तुम्ही तपास काय करताय.. मला सॉलीड दम भरला घरातच माझ्या... तेव्हा कुठे लक्षात आले.. सगळे स्साले सामील.. मी वैतागून एक दिवस चौकीवर जाऊन मोठ्या साहेबालाच बोललो सगळ्यांदेखत.. म्हंटलं सामान्य माणसाकडे दहा वेळा पोलिस पाठवून चौकश्या करताय.. लाजा वाटत नाहीत का?.. त्या बिल्डरला सोडलाय मोकळा... चारत असेल तुम्हाला... फारच बाळबोध वागलो... मला मारले वगैरे नाही.. पण इतका दम भरला की ते नावच सोडले चौकीचे..

पण आता प्रश्न बिकट होऊ लागला.. मधेच एखादा दगड आमच्या खिडकीवर येऊन पडू लागला.. धावत बाहेर जाऊन पाहिले तर कुणीच नसायचे.. टू व्हीलरवरून येऊन दगड वगैरे फेकून जायचे...या दरम्यान आमचे शेजारी म्हणजे शर्मा यांनी जागा सोडून दिली.. ते कात्रज ऐवजी थोडे जास्त भाडे भरून धनकवडीत राहायला गेले.. जाताना आम्हाला म्हणाले.. तुम्हीही जागा सोडाच... कारण भयंकर त्रास होईल..

आम्हालाही वाटू लागले होते... की आपण आपले या प्रकारापासून दूरच असावे.. तर एक दिवस सरिताच रडत घरी आली.. सरिता माझी सख्खी बहीण.. कॉलेजला होती.. भर रस्त्यात तिला चौघांनी छेडले होते... ती ओरडायचेही धाडस करू शकली नाही.. कशीबशी सुटून घरी पळत आली होती.. आता मी सरिताच्या मागावर राहू लागलो... चार पाच दिवस मी तिची सोबत म्हणून मागून मागून जायचो.. एक दिवस पुन्हा तो प्रकार घडू लागला.. कुठून तरी दोन मोटरसायकलींवरून चार जण आले आणि एकदम उतरले आणि त्यांनी सरिताला धरले.. मी तेथे धावत गेलो.. मी येत आहे असे पाहूने ते घाईघाईने मोटरसायकलवर बसणार तेवढ्यात मी एकाला फटका लावलाच... त्या दिवशी मी त्याला कसे काय मारले हेच मला समजत नाही.. खरे तर माझी अशी वृत्तीच नाहीये.. पण संताप संताप झाला होता.. सरिता गर्भगळीत होऊन रडण्याच्याही पलीकडे गेलेली होती.. मात्र मी फटका लावल्यावर मात्र चौघेही पुन्हा उतरले गाड्यांवरून आणि... आणि मला प्रत्येकाने मारले... ते फटके खाताना मला ओरडण्याचीही संधी मिळत नव्हती... प्रतिकार करणे तर दूरच राहो...

सरिताला मी कसेबसे घरी सोडले आणि तडक पुन्हा चौकीवर गेलो.. तिथे जाऊन मी पुन्हा भडास काढली.. वेड्यासारखाच वागत होतो मी... यावेळेस मात्र एका पोलिसाने मला खाडकन वाजवली.. मी त्यालाच शिवीगाळ केली... मग मला तिघांनी धरले आणि दम भरला... त्यांचे ते आवेश पाहूनच मी गळाठलो होतो...

काही दिवस तसेच गेले.. आता दगड वगैरे पडत नव्हते खिडकीवर... निर्मल जैन शांत झाला की काय असे वाटत होते... तर मालकाने एक दिवस सरळ मजूरच आणले घर पाडायला.. पुन्हा भांडणे झाली.. मी मालकावर केस केल.. वकील दिला... पैसे तर आजारपणातच जात होते...

या सगळ्या प्रकारात बाबांनी हाय खाल्ली.. ते म्हणाले माझे उपचार थांबवा... माझं आता काय राहिलं आहे? माझी काळजी करू नका... आपण कात्रजला जाऊन राहू...

मी मालकाकडे जाऊन कात्रजला जायला तयार आहोत असे सांगीतले... तर तो भडकलाच... म्हणाला माझ्यावर केस करतोस?? तुला आता कोण पर्यायी जागा देईल?? माझ्या पायाखालची वाळूच सरकली.. म्हणे आधी चांगले सांगत होतो तेव्हा ऐकले नाहीस.. आता चालता हो.. मी हे घर पाडायला घेणार आहे... वास्तविक पाहता त्याला घर पाडायची गरजच नव्हती.. ते काम निर्मल जैनने केले असते.. पण आम्ही बाहेर पडत नाही तोवर तो मधे पडत नसावा...

मालकाचे ते बोलणे ऐकून मी ठरवले.. डायरेक्ट निर्मल जैनलाच भेटायचे...

त्याच्या ऑफीसमध्ये मला त्याला भेटूच देईनात... मी काहीसा तमाशा केल्यावर तो स्वतःच बाहेर आला आणि मला आत घेऊन गेला..

मी माफी मागीतली... आजवर बाहेर पडलो नाही याबाबत... आणि म्हणालो की मला पर्यायी जागा द्या... तर तो हासला आणि म्हणाला 'विसर आता जागा वगैरे'... मी खूप विनवण्या केल्या... तो हासतच होता.. शेवटी सिक्युरिटीला बोलावून मला बाहेर काढायला लावले... तेव्हा मात्र मी ऑफ होऊन त्याला त्याच्याच ऑफिसमध्ये शिव्या घातल्या.. परिणाम असा झाला की त्याच्याकडे जे लोक संभाव्य ग्राहक म्हणून आले होते त्यांच्यादेखत तमाशा झाला....

भयंकर भडकला निर्मल जैन.. रात्री सरळ आपल्या चार माणसांना घेऊन घरी आला..बाबा त्याही परिस्थितीत त्याच्या समोर हात जोडून नम्रपणे बोलत होते.. सरिता आतल्या खोलीत जाऊन बसली होती..

तो बाबांना सरळ म्हणाला....

'थेरड्या... तुझ्या वयाकडे बघून गप्प होतो... या पोराला आवर नाहीतर तुला आग द्यायला उरणार नाही कुणी...'

या वाक्यावर मात्र मी पुन्हा भडकलो... घरातली एक काठी घेऊन त्याच्या अंगावर धावलो... मग सरिताही बाहेर आली.. बाबा आणि सरिता मला रोखू लागले तर त्याची माणसे माझ्याच घरात मलाच बडवू लागली.. आणि थोड्यावेळाने ते निघून गेल्यानंतर आमच्या घरात सन्नाटा पसरलेला होता.. त्यावेळेस सरिता म्हणाली की उद्या सकाळी जाऊन तू दुसरी कंप्लेन्ट लिहून ये की घरात दमदाटी आणि मारहाण केली.. हे वाक्य ती बोलून एक तास होत नाही तोवर पोलिसांची व्हॅनच आली तिथे...

निर्मल जैननेच उलटी कम्प्लेन्ट केलि आमच्यावर.. निगोसिएशन्ससाठी घरी बोलावले आणि काठीने मारले... आम्ही सटपटलोच... मला चौकीवर घेऊन गेले.. त्या दिवशी मी पहिल्यांदा कोठडीची हवा म्हणजे काय ते अनुभवले.. मला मारत कुणीच नव्हते.. पण त्यांचे आवेश, ते दम भरणे, ती शिवीगाळ आणि त्या सगळ्यातून दिल जाणारा तो एकच संदेश... ती जागा खाली करण्यातच तुझे भले आहे हा संदेश... हे सगळे भयावह होते.. मी शेवटी मान्य केले की मी ताबडतोब ती जागा खाली करतो..

पण.. तिकडे भलताच प्रकार घडत होता... मला चौकीवर नेल्याने आधारहीन वाटू लागल्यामुळे सरिताने जवळच्या कोपर्‍यावरील दुकानातून फोन करून आमच्या मावसबहिणीला घरी बोलावले.. आणि.. सरिता स्वतःच्या घरी पोचलीच नाही... तिला किडनॅप केले गेले... हे असे होईल याची सूतराम शक्यता जरी मला जाणवली असती तरीही मी निर्मल जैनबाबत कधी अवाक्षरही काढले नसते... मला चौकीत या प्रकाराची काही कल्पनाच नाही... मावसबहीण म्हणे तिच्या नवर्‍याला घेऊन घरी आली तर बाबांनी तिला सांगीतले की सरिता कुठे गेली इतका वेळ तेच समजत नाही आहे.. मावसबहिणीने आणि तिच्या नवर्‍याने आसपास शोध घेऊन केलेल्या चौकशीत एक टपरीवाला म्हणाला की तिला कारमधून कुणीतरी जबरदस्तीने घेऊन गेले.. हे दोघे आता चौकीवरच गेले थेट.. पण दुर्दैवाने ते दुसर्‍याच एका भागातील चौकीवर गेले... तय चौकीवर माझ्या बहिणीच्या अपहरणाची कंप्लेन्ट आणि इकडे मी निर्मल जैनला मारहाण केल्याची.. या दोन्ही तक्रारी परस्परविरोधी असल्याचे निर्मल जैनला बहुधा ताबडतोब समजले असावे... कारण त्या चौकीवर म्हणे दोन तासांनी मावसबहिणीला कुणी उत्तरच देईना.. सरिताच्या तक्रारीचे काय झाले यावर...

पण सगळ्यात दुर्दैवी प्रकार म्हणजे... मध्यरात्री बाबांना हार्ट अ‍ॅटॅक आला.. बाबा.. गेले..!

मला ताबडतोब घरी सोडून देण्यात आले.. आक्रोश कशाचा करावा हेच समजत नव्हते... आई नव्हतीच.. आता बाबाही गेले.. आता तर मला असे वाटत आहे की ते गेले तेच बरे झाले.. मी जेलमध्ये गेलो हे त्यांना बघावे तरी लागले नाही..."

आकाशची ती कहाणी सुन्न मनाने मुल्ला, वाघ आणि बाबू ऐकत होते.

वाघ - पण... मग... जेलमध्ये कस्काय आला तू??

आकाश - सरिताची कहाणी आणि बाबांचा मृत्यू हे प्रकार पाहून मी पुन्हा जैनच्या ऑफिसमध्ये गेलो... आणि यावेळेस मी.. यावेळेस मी एक सुरी घेऊन गेलेलो होतो... आय रिअली वॉन्टेड टू किल हिम... पश्चात्ताप होतो मला.. की त्यावेळेस वार करण्याचेही धाडस माझ्या निर्जीव ब्राह्मणी रक्ताला झाले नाही... पुचाट संस्कार सगळे.. हाफ मर्डरची खोटी केस आणि खुनाचा प्रयत्न अशीखरी केस झाली... आणि आता... मी इथे आलेलो आहे... फॉर.. नेक्स्ट फाईव्ह इयर्स... पुढची पाच वर्षे मी इथे आहे... आणि बाहेर पडल्यानंतर जर तो ***** जिवंत असला तर त्याला खरोखरचा खलास करून पुन्हा इथेच येणार आहे...

आकाशचा आत्ताचा आवाज हा मगाशी त्याच्यावर गुदरलेल्या प्रसंगाच्या मानाने फारच जहाल होता. त्याच्या खंबीर चेहर्‍याकडे बघताना आत्ता बाबूही चरकलाच!

मुल्ला - लेकिन.. तेरे बहनके साथ हुवा क्या???

आकाश - दोन दिवसांनी घरी आली.. आणि म्हणाली स्वेच्छेने गेले होते... कुठे विचारले तर म्हणे मुंबईला.. अशी कशी स्वतःच्या इच्छेने गेलीस विचारले तर मला त्वेषाने ढकलून ओरडत म्हणाली... आता तरी अक्कल यायला पाहिजे तुला... आता तरी प्रश्न बास...आता तरी शहाणा हो.. मी ... मी बरबाद झालेले आहे...

सुनसान शांतता होती बरॅकमध्ये! लांबवरून काही कैद्यांचे विव्हळणे, दंगामस्ती, ओरडाआरडा वगैरे ऐकू येत होते. पण या बरॅकमध्ये शांतताच होती.

वाघने हे सगळे ऐकून एक अत्यंत घाणेरडी शिवी उच्चारली आणि थुंकला! सगळ्यांनाच तिडीक आलेली होती.

मुल्ला - बाबू.... तेरा और इसका दुष्मन तो.. एकही है यार...

आकाशने बाबूकडे पाहिले. अंधुक अंधारात बिडी पिणार्‍या बाबूचा चेहरा भेदक दिसत होता. डोळे लालभडक होऊन जमीनीकडे ताणलेले असावेत.

आकाश - तुम्हारे साथ क्या किया उसने??

बाबूने तश्याच नजरेने आकाशकडे पाहिले. आणि पुन्हा खाली पाहून बोलू लागला.

"वो क्या करेगा मेरे साथ? मैहीच करेगा उसके साथ जो करनेका है... "

बराच वेळ शांतताच होती. अचानक सगळे दचकले. कारण बाबूने एक शिवी हासडली आणि भिंतीवर लाथ मारली.

आता बाबू बोलू लागला.

"उस भोसडीकेके कहनेपर चार मर्डर किये मैने... हर मर्डरकी एक पेटी.... और पुलिससे बचानेका.. जिधर बोलेगा उधर जाके आदमीको मारनेका... ये ऐसे.. छुरीसे पेट फाडके... चार मर्डर उसके कहनेपर... जिनका जिक्र आजभी फाईलमे यहीच है ... अन्जान आदमीने मारा... लेकिन तीन मर्डर मैने अपने दिलसे किये... निर्मल जैनकी गॅन्गके लोगोंके... मादर** स्साले..

निर्मल जैनका दाया हाथ था मै... मेरे बगैरे वो चलही नही सकता था... जहांका प्लॉट लेना है उधर पहिले.. वो क्या बोलते है रे वाघ??? साम दाम दंड और भेद.... साम का मतलब उसका वकील... दाम का मतलब वो खुद... दंड का मतलब तेरे बहनको भगानेवाले होते है वैसे लोग... और भेद का मतलब संजयबाबू... मतलब मै... बाबू... !!!

जहां आदमी मानताच नही उधर मैने जानेका... सीधा आरपार छुरा... खल्लास... शेर कहलाता था मै शेर... निर्मल जैनके गॅन्गका... लेकिन एक चीज जरूर थी... जिनको मैने मारा था वो और ये निर्मल जैन.. सब मरनेकेच लायक थे... जीनेके लायक कोई भी ** नही है उनमे...

लेकिन मेरेको मेरी एक पेटी देनेके बाद और पुलीससे बचानेके बाद वो भ्यें** मुझे कुत्ते की तरहा साइडमे फेक देता था... मेरेको एक फ्लॅट मंगता था.. मै पैसा देनेको भी तय्यार था... तो चार पाच लोगोंके सामने गालीखरोश किया मेरेको... बोला तू गलीका गांडू गुंडा है... कुत्ता बोला मेरेको.. बोला तेरेको गटरमेच जनम लेनेका, गटरमेच सडनेका और उधरच मरनेका...

मै काफी दिन अपना गुस्सा पीताही रहगया.. लेकिन जब मर्डर करनेका होता तो मेरे साथ ऐसे पेश आता जैसे मै उसका बापच है...

एक बार ऐसाही हुवा... विरारमे कोई शांतीसदन करके है... वो गिराके अपार्टमेन्ट बनानेका था... वहांका टागोर नामका आदमी पॉलिटिक्समे था... वो बडा हप्ता मांग रहा था... नही दिया तो काम रोकनेकी नोटीस लाता था.. उसको उडानेका काम आगया.. निर्मलसेठने मुझे बुलाया..

मैने सीधा नही करके बोल दिया... तो बोलता है पुलीसमे तेरी सारी केसेस फिरसे खुलवाउंगा.. सडके मरेंगा जेलमे... तो मैनेभी सीधा बोलदिया... स्साले तू तो कुत्ताभी नही हो सकता क्युंकी कुत्ता इमानदार होता है.. तेरा ये काम मेरे सिवा करेगा कौन??

मुझे लगरहा था के वो मुझसे डर जायेगा... लेकिन अंदर पाच लोग थे... लाला.. प्रकाश... मन्सूर... उल्टाखोपडी... और स्वामी!

सब बाहर आगये... फिर निर्मलसेठ बोला... तू ये काम नही करेगा तो चलता बन... आजसे वो काम ये लोग करनेवाले है... और अब दिन गिनता रह... जल्दही जेलमे सडनेकेलिये जायेगा..

मै भडक मातेका आदमी है... मैने अपना असली रंग उधरच दिखादिया.. सीधा स्वामीके पेटमे छुरा डालदिया.. निर्मल जैनका थोबडा देखनेलायक होगया था... अपनेही एक पुराने ऑफीसमे एक मर्डर होजायेगा ये उसको अंदाजाही नही था.. लेकिन एक क्या? तीन मर्डर हो गये... मैने निर्मल जैनके पेटमे लाथ मारी तबतक मन्सूर और उल्टाखोपडी मेरी तरफ आये... उनके भी हाथमे छुरे थे... मुझे क्या डर छुरे का? मैने लाथसेही उनको दूर हटाया.. जैन चिल्लाने लगगया था... तबतक मैने प्रकाशके पेटमे छुरी डालदी.. और फिर वही छुरी लेके मैने निर्मल जैनको भी पकडलिया...

सबके सामने बोला उसको... स्साले मादर** दो बापकी औलाद.... तेरा इधर मर्डर कर रहा है मै... फिर नर्कमे जितनी बिल्डिंग बांधनी है उतनी बांध... उसकी आखोंमे मौतका डर देखा था मैने... आजतक उसका थोबडा कभी ऐसा नही हुवा था... तबतक उल्टाखोपडी और लाला डरकर बाहर भागने लगे... अकेला मन्सूरही था जिसने मुझे पीछेसे पकडलिया.. ये देखकर निर्मल जैनके आखोंमे जान आगयी... और यहीच देखकर उल्टाखोपडी और लाला भी मुझे पकडनेके लिये आये.. स्वामी और प्रकाशका आखोंके सामने मर्डर हुवा है ये देखकर मन्सूर बोला...

तेरेको इधरच फाडरहा है मै...

लेकिन हुवा कुछ औरही... मैने निर्मल जैनको छोडके पीछे मुडकर मन्सूरका पेट फाडदिया... उसके आतडे छुरेपे लेकर मैने निर्मल जैनको दिखाये.. और उसको बताया...

ऐसाच तेरा हाल करनेवाला है मै... उसके थोबडेसे आवाजच नही आरही थी... लेकिन फिर मुझे होश आया... स्साला.. यहांके यहां मैने तीन पेट फाडे है... अब मुझे कौन बचायेगा???

मै भागने लगा.. मुझे लालाने और खोपडीने जखडनेकी कोशिश की... हाथसे छुरीभी लेली... लेकिन मै एक एक फाईट देकर भाग निकला...

दोही घंटेमे अ‍ॅरेस्ट होगया... मिनी बहुत रोरहेली थी... कोर्टमे तीन महिनेमे केस खतम हुई.. निर्मल जैन तो दो दिनमेभी केस खतम करता था... लेकिन वकीलने क्या क्या बकवास किये इसलिये केस लंबी चली..

मेरे स्टेटमेन्टमे मैने सीधा बोलदिया... ये हरामीके कहनेपर मैने चार आदमी पयलेच मारे थे करके... माहौल अजीब बनगया था... मेरेको पता था मुझे तो फासीही होगी... लेकिन हुवा ये के मेरे वकीलने जो गेम खेली... मेरेको सिर्फ आठ सालकीच सजा हुई... उसने बोला ये अचानक हुवे झगडेसे हुवी वारदात है करके... बाबूका मर्डर करनेका कोई पहलेसे इरादा नही था... और एक तरीकेसे स्वामी, प्रकाश और मन्सूर मर जाना अच्छा भी है करके प्रूव्ह किया उसने.. अजीब माहौल बनगया कोर्ट मे.. मुझे सजा सुनाते वक्त कोर्ट ये भी बोला.. वो पीछले मर्डर का क्या मामला है वो पुलीस छानले....

पुलीसने कभी कुछ नही किया... अपनी मांको ही ***वाली औलाद होती है पुलीस... निर्मल जैनने बहुत पैसा खिलाया... पुलीस ठंडी पड गयी... मै इतनाच शुकरगुजार है भगवानका की मेरेको फासीपे नही चढाया... और वो भी इसलिये के जब मै बाहर जायेगा... वो... निर्मल जैनका आखरी दिन होगा.. "

बाबूचे बोलणे संपले तेव्हा आकाश शुन्यात पाहिल्यासारखा अंधारात पाहात होता. मुल्ला आणि वाघला बाबूची ती हकीगत आधीच माहीत होती. पण तरीही त्यांनी ती ऐकून घेतलेली होती.

मुल्ला - मैने आजतक मर्डर नही किया... लेकिन मेरेको बाबूसे जादा सजा मिलगयी...

आकाश - कशी काय?

मुल्ला - बाबूने जिनको मारा वो गुंडेही हुवा करते थे... मैने जिनको लुटा वो सीधेसाधे लोग थे..

आकाश - तुमने... क्या क्या किया है??

मुल्ला - छब्बीस घरके ताले तोडे है... दो सालतक मेरा नाम बॉम्बेमे ऐसे गुंजा है जैसे सुनील गावसकरकाभी नही गुंजा होगा.. एक बार बच्चा भूतको नही डरेगा... लेकिन मेरा डर गब्बरसिंघ जैसा छाया हुवा था.. और मै सिर्फ लुटताही था पब्लिकको...

आकाश - क्युं लेकिन?? ऐसेही?? फालतूमे??

मुल्ला - हां! फालतूमे.. ऐसेही.. मै बुराही आदमी हूं... मुझमे अच्छाई नही है एकभी..

आकाशलाही ते पटले. उगाच अंगात ताकद आहे आणि डोके चालत आहे म्हणून सामान्य लोकांना लुटणारा माणूस वाईटच असणार हे त्याने ताडले.

आकाश - तुला... असं नाही वाटलं कधीच की एखादी नोकरी करावी???

मुल्लाचे ते विद्रूप हासणे येरवडा कारागृहाच्या भिंतींना थरथरवून गेले.

आकाश दचकून ते हासणे बघत होता. बाबू आणि वाघला तश्या हासण्याची सवय होती.

मुल्ला - नौकरी.. !!! आई *** नोकरी करणार्‍यांची... शिकायला मदरश्यात घातलं मला... बाप बेवडा.. पण रंगेल... पाच बायका केल्या.. पहिलीपासून मी झालो.. बाकीच्यांना मुलीच... त्यातल्याच एकीशी निकाह करणार होते माझा... पण मी मुल्ला झालो.. उर्दू शिकवायला लागलो.. इस्लाम शिकवायला लागलो... आणि एक दिवस मशीदीवर धाड पडली.. एकही शस्त्र नव्हतं... पण तरीही शस्त्रे होती असे सिद्ध केले... त्या दिवशी मी खाल्लेला मार मी कधीही विसरू शकत नाही... आत्ता तिथे नसीमला मारत नसतील असं मारलं मला त्या दिवशी... कशासाठी?? तर उगाचच... फालतूमे.. फालतूमे लुटेरा क्युं बना पूछरहा है ना?? तो सुन फिर... तूभी फालतूमेही सुन ... मला मारून मिळालं काहीच नाही... कारण मी मनापासून इस्लामी होतो... अतिरेक्यांशी काहीच संबंध नव्हता माझा... पण पेपरात नावबिव आलं.. मी बदनाम झालो.. दोन वर्षांनी सुटलो.. मला का पकडले होते आणि का सोडले यातील काहीही मला समजत नाही... पण सुटल्यावर कुणी माझा स्वीकार करेना.. उपासमार व्हायची वेळ आल्यावर गुन्हेगार झालो... वेगवेगळ्या गावात अत्यंत वेगात दरोडे घातले.. मला इकडे शोधावे तर मी तिकडेच दरोडा घातलेला असायचा.. पोलिसांची हवा टाईट झालेली होती.. प्रकरण वरपर्यंत गेलं होतं.. मला नशा चढली होती लुटालूट करण्याची... लोकांचा मला पाहून झालेला थरकाप... घाबरत घाबरत मला सर्व दागिने स्वतःच देणे... कॅश देणे... मारू नका म्हणून विनवणे... या सगळ्यात मी जगावर सूड उगवल्याचा आनंद मिळवू लागलो...

एकदा असाच बसने कुठेतरी लांब पळून चाललेलो असताना एक मुलगी पाहिली बसमध्ये... तिच्या नातेवाईकांबरोबर चाललेली होती... नखशिखांत दागिन्यांनी मढलेली होती... रात्र झाल्यावर मी अचानक भयानक पावित्रा घेतला.. दोन्ही हातात तीक्ष्ण हत्यारे घेऊन मी ओरडून शिव्या देऊ लागलो... घाबरलेल्या बायका काहीही दिसत नसतानाही किंचाळू लागल्या... ड्रायव्हरने लाईट लावून बस साईडला घेतली... एका लहान बाळाला मी डाव्या हातात घेतले... आणि कॅश टाका, दागिने काढून द्या असे ओरडू लागलो... आश्चर्य म्हणजे... दुनिया हिजड्यांची असते हे मला माहीतच नव्हते... खरच लोकांनी कॅश माझ्यासमोर फेकली... दागिनेही फेकले.. ते बाळ कर्कश्श रडू लागले.. पण त्याची आई माझ्याकडे पाहताना भेदरलेली होती... मी एका पोरीला ती सगळी कॅश आणि दागिने तिच्या ओढणीत भरायला सांगीतले.. तिने ते पटकन भरून माझ्याकडे दिले.. टेरर झालो होतो मी टेरर... त्या बसमधून मी पळून अंधारात गेलो आणि आक्रोश करणार्‍या प्रवाश्यांसकट बस निघून गेली... एकाच्या **त दम नव्हता मला अडवण्याचा... आणि मुख्य म्हणजे त्या दागिन्यांनी मढलेल्या मुलीने आपले जवळपास सगळेच दागिने मला देऊन टाकले..

त्यानंतर मी कर्नाटकातच काही वेळ राहिलो... वाट्टेल तेथे जाऊन राहायचो.. मग मला बसेसच लुटण्याची इच्छा झाली... कारण ते सोपे असायचे... रात्री अंधारात हायवेवर बस लुटायची... कुलुप तोडावे लागत नाही... काहीच प्रॉब्लेम नाही... पण आपल्याला कुणी काही करू नये म्हणून मी अधिक भीतीदायक असे एक गावठी पिस्तूल मिळवले... त्याचा आवाजही खूप जोरात यायचा..

त्या एका पिस्तुलाच्या जोरावर मी आणखीन चार बसेस लुटल्या... ही सगळी लूट मी पुढच्या चार दिवसात मार्गीही लावायचो.. सोने विकून टाकायचो.. कॅश जमेल तशी उडवून टाकायचो... कारण हे सगळे जमवून कसे ठेवायचे तेच समजत नव्हते...

आणि ती पाचवी बस... काटा आला माझ्या अंगावर त्या आठवणीने... अशीच तीही बस लुटल्यानंतर दारातून उतरताना माझा पाय कशाततरी अडकला आणि मी चक्क दाराबाहेर पडलो... पण माझीही एक चूक झाली... पडल्या पडल्या जरी मीपब्लिकला भीती दाखवली असती तरी चालले असते.. पण झालेल्या वेदनांनी मी खच्चून ओरडलो.. तसे लोकांना वाटले मी जायबंदी झालेलो आहे.. दोघांनी पटकन दारातून बाहेर उड्या मारल्या... एकाने माझे पिस्तुल ओढले आणि लांब फेकले... तेवढ्यात अनेक जण खाली उतरले... आता मार खायची, घाबरायची वेळ माझी होती... जमीनीवर पालथा पडून हात डोक्यावर ठेवून मी मार खाल्ला.. पण पब्लिकने मला उताणे केलेच... मला उजव्या डोळ्याने दिसत नाही.. दृष्टीच गेली एका आघाताने... सहा हाडे मोडली माझी.. तसेच मला चौकीवर आणले... मग अ‍ॅडमिट केले गेले.. जवळपास पाच सहा महिन्यांनी मी बरा झालो... तोवर जाबजबाब झालेले होते.. मग मी पोलिसांना लुटलेल्या सर्व संपत्तीची जमेल ती माहिती दिली... मला त्य सर्व ठिकाणच्या सोनारांकडे नेण्यातही आले.. पश्चिम आणि दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मी कामगिरी केलेली होती...

खरे तर आधीचा मशीदीत शस्त्रे ठेवण्याचा आरोप आणि त्यात हा भयानक लुटीचा इतिहास बघता मला खलासच केले जायचे... खरे तर एन्काउन्टर करणार असेही माझ्या कानावर आले... पण कशी कुणास ठाऊक.. मला काही वर्षांचीच शिक्षा झाली... अल्लाहने हा रहम का केला असावा यावर मी खूप विचार केला.. नक्कीच त्याचे हे कारण असणार की... मी एकाही माणसाला इजा पोहोचवली नाही... फक्त लुटले मी लोकांना.. आणि त्यातलीही अर्ध्याहून अधिक संपत्ती त्यांची त्यांना मिळालीसुद्धा नंतर...

आज मी इथे आहे.. जवळपास रोज मार खात आहे.. अजून अनेक वर्षे मी इथे असेनही... पण एक नक्की... मला हे नक्की माहीत आहे की... एकेकाळी मी अगदी चांगला होतो... आणि आता अगदी वाईट... आणि दोन्ही..... उगाचच... फालतूमेच!

मुल्लाचे ते बोलणे ऐकून आकाश गारच पडला होता. मुल्ला हा खराखुरा निर्ढावलेला बदमाष होता. बाबूने तर मर्डरही केलेले होते. पण निदान ते अशा लोकांचे होते जे मुळातच मर्डरच करण्याच्या लायकीचे होते. पण मुल्ला तर... केवळ जगण्यासाठी दरोडे घालत होता...

"तुमचे काय झाले??"

वाघला अरेतुरे करणे आकाशला प्रशस्त वाटले नाही. त्याला तो वयाने बराच मोठा वाटत होता. तेवढा मोठा नसूनही!

वाघ - बायकोला ठार केले...

आकाश - पण.. म्हणजे.. चुकून झाले की...

वाघ - तुला कुणीतरी बोललेलं दिसतंय... की वाघ म्हणतो की चुकून मर्डर झाला... अं??

आकाश - नाही नाही... सहज विचारलं...

वाघ - ठरवून मारलं मी तिला... चुकून बिकून काही नाही...

आकाश - ............... पण... का???

वाघ - तिची खाज जास्त होती... तिला चार पुरुष पुरायचे नाहीत...

आकाश - ......... म्हणजे काय???

वाघ - घरात धंदा काढून बसली होती ******

आकाश - ... पण.. पण म्हणून... मारायचं????

आकाशला जे अपेक्षित नव्हते ते झाले. वाघ अचानक उठला आणि आकाशपाशी आला आणि आकाशकडे डोळे रोखत म्हणाला..

"तुझी आई तुझा काका, तुझे आजोबा, तुझा चुलतभाऊ... सगळ्यांबरोबर झोपते हे कळल्यावर काय करशील तू????? आ??? आणि समाजात तुझी याच गोष्टीवरून नाचक्की व्हायला लागली तर काय करशील??? ********"

असली शिवीही कधी आकाशने ऐकली नव्हती आणि असला प्रकारही!

खरे तर त्याला आत्ता वाघची भयानक भीती वाटली. तो एकदम मुटकुळे करूनच बसला स्वतःचे! वाघ काहीसा शांत होऊन जागेवर जाऊन बसला.

आणि काही वेळाने बोलू लागला.

" माझा धाकटा भाऊ... तो समोर आला की मुद्दाम पदर पडू द्यायची.. माझा बापाच्या शेजारी जाऊन त्याला खेटून बसायची... मी दिवसा घरात नसायचो... रात्री माझ्याबरोबर ****... पण सकाळ झाली की मी जो निघून जायचो तो डायरेक्ट रात्रीच यायचो... दहा वाजता..

भावासमोर तिचा पदर वारंवार पडतो हे पाहूनही मला कधी तशी शंका आली नाही.... बापाला खेटून बसली तरी मला ते मुलीचे प्रेम वाटायचे..

मधेअधे मुहल्ल्यात मी कुणाकुणाशी गप्पा मारायचो.. सुट्टीच्या दिवशी वगैरे ... अचानक मला काहीसे विचित्र विचार ऐकू यायला लागले.. उगाचच एखादी म्हातारी बाई सुनेला सांगतीय... सगळ्यात महत्वाची इज्जत गं बये... नवर्‍याशिवाय कुणाशी बोलू नये बाईमाणसाने.. कारण बाई एकदा मोकळी वागायला लागली की तिचा सासरा काय अन दीर काय... सगळेच कुत्र्यासारखे घोटालायला लागतात.. हे ती म्हातारी आपल्या सुनेला सांगत असताना सुनेने खरे तर मान खाली घालायला पाहिजे असायची... पण सून तर गालातल्या गालात हासलेली मी पाहिली... म्हंटलं असेल काहीतरी... पण काही दिवसांनी पारावर थांबलो तर दोघे जण माझ्यासमोरच गप्पा मारू लागले.. एक सांगत होता की अशी अशी म्हणे एक बाई त्याच्या ओळखीत आहे.. जी सासरा आणि दीर यांच्याबरोबर संबंध ठेवते... अन नवर्‍याला माहीत नाही.. दुसरा म्हणला तशा बायका तर काय... कुठेही असतात... इथेही असतील.. असाच प्रसंग आणखीन एकदा घडला तेव्हा मात्र माझ्या डोक्यात किडा आला... हे सगळे आपल्याला ऐकवण्यासाठी तर बोलले जात नसेल??

मात्र एकदा तर वाण्यानेच माझी इज्जत काढली... मी काहीतरी घ्यायला गेलो तर म्हणाला... तुमच्या भावाचं लग्न झालं का हो?? म्हंटलं नाही... का?? तर म्हणे रोज निरोध विकत घेऊन जातो.. म्हणून विचारलं... आता मात्र माझं टाळकंच सरकलं...

मी आता घरात मुद्दाम अधिक लक्ष द्यायला लागलो... भाऊ आणि वडील तर तिच्याशी इतक्या सलगीने वागत असत की मला हेच कळेना की या दोघांचेही तिच्याशी संबंध आहेत हे त्यांना आपापसात माहीत आहे की नाही?? पण माझ्या वडिलांशी तिने संबंध ठेवले असतील असे मात्र माझे मन स्वीकारत नव्हते..

पण माझ्यासमोर बहुधा ती जरा जपूनच असावी असे वाटले.. म्हणून मी दुसर्‍या दिवशी कामावर जातो असे सांगून निघालो आणि कोपर्‍यावरून पुन्हा घरी आलो.. लांबून पाहिले तर लहान भाऊ घराबाहेर बसलेला होता... घराचे दार बंदच होते.. मला पाहून तो एकदम त्वरेने घराकडे बघून काहीतरी बोलला असावा... तो हादरलेला दिसत होता... मी काहीच झाले नाही असे दाखवून घरापाशी पोचलो...

मी त्याला विचारले की बाहेर का बसला आहेस तर म्हणे वहिनी कपडे बदलतीय.. मग दादा कुठे आहेत विचारले तर म्हणे ते असतील आत.. त्याला तयचीही लाज वाटली नाही... बायकोने अगदी हसतमुखाने दार उघडले आणि मी परत कसाकाय आलो याची चौकशी केली... काहीतरी राहिल्याची बतावणी करून मी म्हणालो... तू कपडे बदलतेस तेव्हा दादांनाही बाहेर बसायला का सांगत नाहीस?? तर म्हणे ते वडिलांसारखे आहेत... ते इकडे अजिबात बघत नाहीत.. माझा संताप झालेला होता... आणि मुख्य म्हणजे तिने कपडे बदलेलेच नव्हते... जे कपडे मी निघताना तिच्या अंगावर होते तेच आत्ताही होते.. मी निघून गेलो.. संध्याकाळी ययच्या ऐवजी दुपारीच आलो तर.... दादा वाटेत पारावर बसलेले आणि सगळ्यांशी गप्पा मारतायत... मी त्यांच्याकडे पाहून तडक वर गेलो.. माझ्याइतक्या त्वरेने वर घराकडे जाणे त्यांना शक्य नव्हते.... पण मला पाहून त्यांचा चेहरा अत्यंत घाबरला होता हे मी ताडले..

मी दार वाजवल्यापासून दार उघडेपर्यंत जी काही दोन मिनिटे गेली त्यात मात्र दादा जिना चढून वर आलेले होते आणि मला कहीतरी विचारत होते... मी भावाची अन बायकोची अवस्थ पाहिली.. तो नुसताच लुंगी नेसून बाहेर आलेला होता... ती तिचे कपडे अस्ताव्यस्त वाटत आहेत की काय या शंकेने ते सावरत होती...

मला काही जाणवले आहे किंवा नाही याबद्दल त्यांचे काहीच ठाम मत नसताना मी आत आलो आणि पहिल्यांदा भावाच्या कानाखाली ठेवून दिली.. त्याला त्या दिवशी बेदम मारला मी... बापालाही शिव्या घातल्या... मला सगळेच माहीत आहे हे कळल्यावर तिघेही रडू लागले.. खाली पब्लिक जमा होऊ लागलेले होते... आणखीन बदनामी नको म्हणून मी बायकोला मोजून चार लाथा घातल्या आणि बापाला बजावले... तू बाप आहेस म्हणून आज सोडतोय... पुन्हा काही झालं तर माझ्याशी गाठ आहे... भावाला मी त्याच दिवशी घरातून हाकलून दिले... खरे तर घर बापाचे.. पण मी हाकलतोय म्हंटल्यावर तो काही बोलला नाही..

बायकोने रात्री गळा काढून माझी हजारवेळा माफी मागीतली... असे बोलायला मात्र तिची जीभ रेटेना की दोघे जबरदस्ती करत होते... कारण ते स्पष्ट झाले असते चौकशी केल्यावर... तिला रात्रभर मी दम दिला... माहेरी सोडेन अशी धमकी दिल्यावर मात्र तिने पाय धरले... आणि शपथ घेतली असे काहीही करणार नाही म्हणून...

आणि महिन्याभराने एकदा मी खरोखरच काही कारणाने घरी आलो तर.. पुन्हा आपले दादा पारावर बसलेले.. यावेळेस त्यांचे माझ्याकडे लक्षच नव्हते.. मी सरळ वर गेलो... दार लोटून घेतलेले होते... अर्थात यावेळेस मलाही काहीच शंका नव्हती... मी आपला तडक आत गेलो तर...

आमच्याच पलंगावर माझा एक रिक्षावाला मित्र... जो खूप जवळचा होता... माझ्या बायकोच्या अंगावर झोपून...

.. मी कोपयातली काठी घेऊन पहिला त्याला तुडवला... तो बोंबलत कसेबसे कपडे घालून बाहेर पडतोय तोवर बाप वर आला... त्याच्या कंबरेतही मी काठी घातली तसा तोही बोंबलत जिना उतरून खाली पळून गेला... आणि नंतर...

मी तिला तश्याच अवस्थेत पुन्हा पलंगावर पाडले... तिरस्काराचे शेवटचे टोक गाठलेले होते मी... पहिल्यांदा उशी दाबली तिच्या चेहर्‍यावर.. कसे माहीत नाही... पण त्या पकडीतून ती निसटली... श्वास घेऊन बोंब मारायला लागेपर्यंतच काही माणसे दारावर आली.. मी त्यांना सांगीतले की हा घरातला मामला आहे... ती दाराबाहेरच उभी राहिली... मी दार लावून घेतले.. बायको तश्याही अवस्थेत त्या माणसांसमोर जाऊन त्यांना मदतीला बोलवायचा प्रयत्न करत होती...

मी तिच्या पायात पाय घालून तिला जमीनीवर खाली पाडले... आणि सर्व शक्ती वापरून तिचा गळा दाबला..

मला माहीत नव्हते... कसे माहीत असणार?? ती पहिली आणि शेवटचीच वेळ होती मर्डर करण्याची...

... की माणूस मरायला इतका वेळ लागतो... कित्येक मिनिटे मी तिच्या गळ्यावर माझे दोन्ही हात दाबलेले होते... श्वास लांबला की माणसाची जी तडफड होते ती प्राणान्तिक असल्यामुळे फार ताकदवान असते... बायकोच्या पायांच्या जोरामुळे मी तर एकदा उडून बाजूलाही पडलो.. पण पकड तशीच ठेवली... तिचा आवाज, हातापायांची धडपड क्षीण होऊ लागली... माणूस मरायला इतकी मिनिटे लागतात याची कल्पना नव्हती... मी प्रचंड संतापाने तिचा गळा दाबून ठेवलेला होता... शेवटी ती थाडथाड उडायला लागली तसा मी परत तिच्या अंगावर बसलो... अजून माझ्या डोळ्यासमोरून तो चेहरा जात नाही... डोळे मोठे मोठे होऊ लागले तिचे... इतके... की जणू बाहेर येत आहेत खोबणीतून... आणि जणू बाहेर कसले... खरच बाहेर आले.. भयाण... इतका भयाण चेहरा मी आजवर पाहिलेला नाही... ते डोळे पाहिले मात्र मला जाणीव झाली... हा खून होतोय...बाकी काही नाही... आता माझा संताप ओसरून पश्चात्ताप सुरू झालेला होता.. पण त्या दोन क्षणांमध्ये तिची जीभ बाहेर येऊ लागली... तसा मात्र माझा धीर खचला... मी दोन्ही हात सोडले... तसाच कितीतरी क्षण मी तिच्या पोटावर बसूनच तिला निरखत होतो... कित्येक मिनिटांनी मला जाणीव झाली... ती मेलेली आहे... मी भीती वाटून ताडकन बाजूला झालो आणि हंबरडा फोडला..

तितक्यात बाहेरचे आवाज वाढले.. मी माझा चेहरा भयानक केला.. हातात एक काठी आणि एक सुरू घेतलीआणि दरवाजा उघडला... समोर जो दिसला त्याच्यावर दोन्ही हात उगारले.. लोक एकदम घाबरले.. पळून जिना उतरू लागले.. दोघे तर पडलेही... आणि तीच संधी समजून मी पळ काढला...

त्यानंतर साहजिकच मी पकडला गेलो..

पण आज मला पश्चात्ताप वाटत नाही... कारण.. ती जगली असती तर.. अनेकांचे संसार तिने बरबाद केले असते...

सर्व काही ऐकून आकाश अवाक झालेला होता. तो एकटाच असा होता की जो मूळ गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नव्हता तरीही तिथे होता..

बर्‍याच वेळाने तो म्हणाला....

"इथून... इथून सुटका करून घेता येते का??? काही माहीत आहे???"

ज्या माणसाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि ज्याला येथे येऊन एकच दिवस झालेला आहे आणि त्या दिवसात त्याने अत्यंत अमानवी कृत्ये सोसलेली आहेत त्या कोवळ्या तरुणाचा हा प्रश्न ऐकून सगळेच चपापले..

सन्नाटा पसरला बरॅकमध्ये...

आणि खूप खूप... खूप वेळानंतर मुल्ला म्हणाला...

"पाच जण असतील अन त्यातला एक मरायला तयार होणार असेल तर चार जण सुटू शकतील...."

गुलमोहर: 

भाग २ आला.... धन्यवाद बेफिकीरजी...

अजून वाचला नाही, पण आमच्यासारख्यांची निराशा न केल्याबद्द्ल आभारी

सर्वांचा आभरी आहे.

शिल्पा बडवे,

धन्यवाद!

याही कादंबरीचे भाग लिहिण्याचा प्रयत्न करणारच आहे.

आपले प्रोत्साहन असावे.

-'बेफिकीर'!

खरच भयानक आहे हे सगळ... नुसतं विचार करुन ही हे सगळं किळसवाणं वाटत पण ज्यांना हे सर्व सहन कराव लागत हे सर्वांत मोठ दुर्दैव आहे त्यांच.......

मि आजपर्यन्त कधिहि प्रतिसद दिला नव्हता परन्तु तुमच्या लेखनचा रेगुलर वाचक आहे.आजपर्यन्तचे तुमचे सर्व लिखन मनापासुन खुप आवदले .तुमच्या अगोदरच्या सर्व काद्मबर्या मस्तच होत्या.पु. ले. शु.

भाग बरा आहे.
पण व्यक्तिशः मला अशा प्रकारच्या भाडेकरू आणि मालक भांडणात मालकाची बाजू पटते.
१०० नी २०० रु. भाड्यात वर्षानुवर्षे रहायला लाजा कशा वाटत नाहीत?
फुकटात चांगला दहा लाखांचा फ्लॅट मिळतोय तर घ्यायला काय होतं?

बापरे, किति भयानक अस्ते नाहि. माणुस वाईट नसतो, परिस्थिति त्याला वाईट काम करायला भाग पाडते हे पटले.
भुषणराव सर्वांचे भावविश्व एकदम छान मांडलय तुम्हि.