माझी बाजु(२)(पुढे चालु)

Submitted by Anaghavn on 11 June, 2008 - 02:03

Accept करुन मी काही त्यांच्यावर उपकार करणार नव्हतेच. काही गोष्टी आपसुखच समजत जातात. त्या आहेत तशा आपण स्विकारत जातो. जबरदस्तीने स्विकारण्यात कसली आलीये मजा?त्यापेक्षा कुठलंही किल्मिष न ठेवता स्विकारल्या तर आपल मनही मोकळं राहतं.
या मुली गोड होत्याच,पण खुप smart ही होत्या. सुहास शी खुप जुळायचं त्यांच. बाबा कसला,मित्रच होता तो त्यांचा.कायम काहीतरी गुजगोष्टी चालायच्या त्यांच्या. आजकाल हळुहळु मलाही त्यांच्यात येऊ देत असत.मी त्यांची ताई होते. मला खुप मजा वाटायची-- तो बाबा आणि मी ताई.
कधी कधी मी एकटी पडायची. सुहास आणि मुली एकमेकांत रंगुन जायच्या.पण मी हे स्विकारलं होतं. अशावेळी मी माझा रियाज करायची. एकदा लक्षात आलं, सई हळुच येऊन दाराशी थांबायची.
एकदा गाण्याचा भेंड्या खेळताना लक्षात आलं आवाज गोड होता पोरीचा. म्हणायची पण अगदी रंगात येउन. मला आवडेल तिला शिकवायला. पण ती शिकेल का माझ्याकडुन? काही झालं तरी मी---!!
अर्चनाला आवडायचं नाही,मुली माझ्याशी हसुन खेळुन बोलल्याचं. ते ही बरोबरच होतं म्हणा. शेवटी तिची जागा आता मी घेतली होती--अगदी राजरोसपणे.
मुलींना घ्यायला ती यायची तेव्हा थोडी आखडुनच वागायची. असं दाखवायची की जणु मी खुप मोठा गुन्हा केला आहे. माझी काय चुक होती? त्यांच्या घटस्फोटा नंतर जवळजवळ २ वर्षांनी माझी आणि सुहासची भेट झाली होती.
anyway,आपल्या हातात जे आहे,आपल्याला जे पटतं, ते आपण करत जायचं.

गुलमोहर: