चांदणे अंधार झाले....

Submitted by विशाल कुलकर्णी on 31 January, 2011 - 07:57

कैलासदादांच्या ओळीवर माझाही प्रयत्न.....

आठवांचे वार झाले
दु:ख आता फार झाले!

बोलवी, तो मृत्यु आता
थांबणे बेकार झाले..!

भोगले आघात सारे
अश्रुही बेजार झाले..!

भावनांचे श्वान दारी
स्वार्थही लाचार झाले

कैक झाले घाव मोठे
भाव वेडे ठार झाले!

ना कशाची भीड आता
लाजणेही भार झाले

चालतो मी रात सारी
चांदणे अंधार झाले...

या.., सुखांना जोजवा रे
दु:ख आता फार झाले!

विशाल

गुलमोहर: 

चालतो मी रात सारी
चांदणे अंधार झाले...

या.., सुखांना जोजवा रे
दु:ख आता फार झाले

भन्नाट शेर..... Happy

उत्तम गझल... अभिनंदन विशाल.

छान! श्वानाचा शेर वेगळाच आहे. भुभु:कार हा शब्द मला माहीत नव्हता. लाजणेही भार झाले हा शेर सर्वात छान!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

माझ्या माहितीनुसार वानरांच्या ओरडण्याला भूभू:कार म्हणतात... लहान मुलांच्या भाषेतल्या "भू भू"शी भूभु:कारचा संबंध असेल असं वाटत नाही... रामायणामध्ये सुग्रीवाच्या सैन्यातील वानरांनी एकच भूभू:कार केला होता असं वाचल्याचं आठवतं..
जाणकारांनी प्रकाश टाकावा...
>>
आता मूळ शेरच बदलला गेल्यामुळे, या प्रतिक्रियेचं प्रयोजन उरलेलं नाहीये. तरीही, प्रतिक्रिया उडवत नाही. एक मोठा फुल्स्टॉप,, .

अरे व्वा! एकदम जोरदार गझल विशाल!

भोगले आघात सारे
अश्रुही बेजार झाले..!

खास!

चालतो मी रात सारी
चांदणे अंधार झाले...

सही!

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार Happy
रच्याकने 'श्वानाचा' शेर थोडा बदललाय, आता कसे वाटतेय, बरोबर आहे का? मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत ! Happy

बदललेला शेर लक्षात आला नाही विशालराव!

क्षमस्व!

म्हणजे स्वतःपुढे स्वतःचा स्वार्थही लाचार झाला असे आहे का?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

@बेफिकीरजी...

तिच्याबद्दलची ओढ, प्रेम, एकंदरीतच तिच्याबद्दलची प्रेमाची ती भावना एवढी प्रबळ आहे की 'तू नही तो और सही ' सारखा स्वार्थीपणा करणेदेखील जमत नाहीये. ते प्रेम त्याच्या स्वार्थावरही वरचढ ठरतेय अशी कल्पना. त्या अर्थाने स्वार्थही लाचार,,,,,!

(त्याला तिला विसरायचेय पण जमत नाहीये, म्हणुन त्या प्रेमभावनेला तो चिडून श्वानाची उपमा देतोय. श्वान कसं निष्ठावंत असतं धन्याप्रती तसं. श्वानासारख्या निष्ठेने मन पुन्हा पुन्हा तिच्याकडे ओढले जातेय. Wink )

आभार Happy