Egypt ... Waiting for the wave of liberalization to hit home !
कैरो मधलं Hotel Tiba Pyramid. खिडकीतून बाहेर बघत मी डायरी लिहितीये.
२७ जुलै २०१०...
- काल रात्री Frankfurt-Cairo flight घेऊन इजिप्त प्रवासाची सुरुवात. विमानात जास्त लोकं इजिप्शियन. बुरखा घातलेल्या बायका,प्रत्येकीच्या आजूबाजूला विविध वयोगटातली ४-६ लहान मुलं. युरोप अनुभवल्यानंतर आता हे वेगळंच वातावरण.
- एका काकांनी पाच-सात मिनिटं एक bag बेवारशी ठेवली. आमच्यासकट आजूबाजूच्या सगळ्यांच्या चेह-यावर जीवाची घालमेल स्पष्ट दिसतीये!! Unfortunately, the world has lost its innocence and faith in human beings!!
-आतिशय माजोरड्या आणि unfriendly चेह-याच्या माणसानं passport-visa तपासले. पुढे Custom officer ने आधी तोंडातलं पान थुंकल आणि मग custom clearance चा शिक्का मारला... Welcome to Egypt !!
- कैरो...वाळवंटातली रात्र..गुलजारच्या गाण्यातली ती ’गर्मियोंकी लू’ अनुभवायला मिळतीये. पहाटे तीन वाजता गजबजलेलं कैरो. 'बालगंधर्वच्या' पुलावर संध्याकाळी फिरायला जावं तसं पहाटे ३ वाजता हुक्का ओढत आणि coffee पित रस्त्यावर खुर्च्या टाकून गप्पा मारणारं कैरो !
- दिवसा रणरणत ऊन आणि दमटपणा ह्याचं आगळवेगळं मिश्रण असलेलं कैरो ! रत्यावर असंख्य वाहनं, त्यांचे आवाज. रस्त्यात एकीकडे Rolls-Royce आणि त्याच्या शेजारी गाढवाची गाडी...सगळंच अजीब ! उगाच काहीही काम न करता निरुद्योगी बसलेली आणि रस्त्यावरची रहदारी पाहात वेळ घालवणारी माणसं.
- बाहेर पडलो फिरायला तर रस्त्यात सगळ्या बुरखा घातलेल्या बायका. एका male dominating मुस्लीम देशात आल्याची जाणीव क्षणाक्षणाला अस्वस्थ करणारी. Egypt is supposed to be one of the most liberal Muslim Countries.. मग असं असतानाही इजिप्तमधे हे दृष्य़ तर इतर मुस्लीम देशात बायकांचं कसं होत असेल..! आपण खूपच open आणि ख-या अर्थाने liberal जगात राहतो याची मला सारखी जाणीव होतीये.
........
कैरो मधे पहिल्यांदा पाऊल टाकलं त्या दिवशीच्या माझ्या डायरीतल्या ह्या काही नोंदी.
पुढच्या अवघ्या एका आठवड्यात आम्ही या देशाच्या, इथल्या इतिहासाच्या, इथल्या लोकांच्या इतके जवळ येऊ असं त्या दिवशी आम्हाला वाटलंही नव्हतं.
इजिप्त मधल्या या एक आठवड्याच्या वास्तव्यात महमद, अहमद, करीम, हगार ह्यांच्या बरोबर हिंडलो काय..आठ दिवसात या जागेशी, या देशाशी, या माणसाशी जणू काही जन्मभराचं नातं जुळुन गेलं.
हिंदी सिनेमा, हिंदी गा्णी, अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी, शारुख खान, गु्लजार, soccer world cup.. अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतामारता, आम्हाला इजिप्त दाखवणारी ही सगळी तरूण गाईड मंडळी आमचे मित्र होऊन गेले.
इजिप्तची ४००० वर्षापूर्वीची संस्कृती,त्या एका एका जागेचा इतिहास, तिथले राज्यकर्ते, तिथे असलेले वेगवेगळ्या काळातले वेगवेगळे धर्म, जगात कुठेही दुसरीकडे निर्माण न होणा-या ममीज, इजिप्तमधलं आणि एकूणच जगातलं राजकारण, धर्मकारण...भारतासा्रखीच असलेली इथली कुटंबसंस्था...इथपासून ते इजिप्तमधली बदलणारी, नव्या युगाला सामोरं जाणारी, नव्या विचारांनी भारावलेली नवीन पीढी, शिक्षणाचं महत्त्व पटलेल्या आणि स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करणा-या नवीन पीढीतल्या मु्ली...आणि ४००० वर्षांपूर्वीच्या थडग्यांवर आजही उत्पन्न चालवणारा, रो्जीरोटी कमावून देणारा इजिप्तमधला tourism !
या आठ दिवसाच्या प्रवासात या नवीन generation बरोबर या आणि अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली , विचारांची देवाण घेवाण झाली...त्यांची मत ऐकायला मिळाली.
नवीन जगाची ओढ असलेली, एका मुस्लीम देशात राहूनही विचारांनी स्वतंत्र होऊ पाहात असलेली ही नवी्न पीढी पाहून मन कुठेतरी समाधानी झालं. डोळ्यासमो्र वीस एक वर्षा्पूर्वीचा भारत उभा राहिला... असाच नव्या संकल्पनांना, नव्या बदलत्या युगाला सामोरं जाण्यासाठी उत्सुक असलेला!
आठ दिवसांनी परत एकदा Hotel Tiba Pyramid च्या खोलीतून रात्रीची रस्त्यावरची रहदारी, माणसं पाहणारी मी... कैरो आज खूप जवळंच वाटतंय..त्यातला परकेपणा दूर पळून गेलाय ह्या मधल्या काळात. इथल्या लोकाची वागणुक, आपुलकी .. या माणसांनी लळा लावलाय..थोड्या वेळानं इजिप्त सोडायचं याची मनात कुठेतरी हुरहुर लागलीये खरं तर !
रात्रीचा एक वाजलाय.. कैरो सोडताना ’कायम आठवण राहावी असं जवळचं काहीतरी भेट दिल्यासारखा’ कैरो टीव्ही वर राजकपूरचा ’श्री ४२०’ लागलाय!
’चल बेटा जापानी’ म्हणत तोंडाने पिपाणी वाजवत, रस्त्यावरच्या वळवळणा-या सापाला पाहून सैरावैरा धावणारा राज असा इजिप्तमधे पाहायला मिळणं ... एकीकडे bags भरता भरता मी सिनेमा पाहतीये.
शांत, सुनसान रस्त्यावर आपल्याच धुंदीत मग्न असलेला राज कपूर गातोय...
निकल पडे है खु्ल्ली सडक पर अपना सिना ताने
मंजिल कहा? कहा रुकना है? उपरवाला जाने
बढते जाये हम सैलानी, जैसे एक दरिया तुफानी
सरपे लाल टोपी.....
फट...अचानक अंधार.. Hotel मधले दिवे गेले आहेत...त्या अंधारातच battery च्या प्रकाशात चाचपडत bags घेऊन आम्ही hotel सोडलंय...कैरो शेवटचं पाहिलं, शेवटचं अनुभवलं ते हे असं!
........
.... गेले दोन-तीन दिवस टीव्हीवर परत एकदा कैरो दिसतंय. कैरो सोडताना पडद्यावर पाहिलेल्या त्या गाण्याच्या ओळी आज परत एकदा TV च्या पडद्यावर पाहायला मिळताहेत.
कैरोच्या रस्त्यात उतरलेला,क्रांती घडवणारा तरूण वर्ग..सामान्य माणूस... मागे भर रस्त्यात दिसणारी मिलीटरी, अश्रू्धूराची नळकांडी, जागोजागी दिसणारे रणागाडे..अवघं यु्द्धाचं वातावरण. केवळ सहा-सात महिन्यांपूर्वीचं शात कैरो...आजचं पेटलेलं, धगधगलेलं कैरो !
निकल पडे है खु्ल्ली सडक पर अपना सिना ताने
मंजिल कहा? कहा रुकना है? उपरवाला जाने
ओळी त्याच... पण त्याचा अर्थ, संदर्भ आज किती वेगळा !
इजिप्शियन म्युझियम... कल्पनाही करता येणार नाही इतक्या दुर्मिळ वस्तुंनी भरलेलं..कोणत्याही क्षणी ऊठून बसतील असा भास व्हावा अशा वाटणा-या ३०००-३५०० वर्षापूर्वीच्या त्या ममीज...
’पिकत तिथं विकत नाही’ या न्यायानं इजिप्तमधल्या लोकांनाही पूर्ण कल्पना नाही असं भांडार इथे आहे. सरकारी office मधे शोभेल अशा वहीच्या कागदावर माहिती (!) लिहिलेल्या ’King Tut' च्या १११ किलो सोन्याच्या मुखवट्याकडे बघून आम्ही गमतीने म्ह्णलो होतो - "बरं झालं इथली खूप संपत्ती युरोपियन लोकांनी लुटुन नेलीये...निदान Louvre च्या museum मधे temperature and humidity controlled Egyptian Room मधे हा अ्मूल्य ठेवा नीट जतन तरी केला जातोय..इथे कधी वाट लागेल त्याची काही सांगता येत नाही "
गमतीमधलं हे बोलणं आज अवघ्या सहा महिन्यांत खरं होतंय की काय असं वाटायची आज वेळ आली आहे.
एकूणच युरोप काय किंवा इजिप्त पाहून काहीसे विचारात पडूनच आम्ही भारतात पोचलो होतो. कालमानाप्रमाणे पाहायला गेलं तर भारताचा इतिहासही इतकाच जुना. इजिप्शियन म्युझियममधे ते रथ, आयुधं, धनुष्यबाण पाहून रामायण-महाभारतावर खरंच घडून गेलं असावं यावर कोणीही विश्वास ठेवेल इतके ते पुरातन अवशेष जिवंत! काही कारणानं आपल्याला हे वैभव आणि त्याच्या खुणा, अवशेष जपणं जमलं नाहीये..आज त्या संस्कृतीचा ’दाखवण्याजोगा’ फारसा कोणताच पुरावा भारताजवळ नाही ही खंत इजिप्त पाहून खूप बळावली. जे आपल्याजवळ नाही. ...इजिप्तमधे जे आहे ते या सर्वच दृष्टीनी खूप अमुल्य आहे. इतके पुरातन अवशेष.. ज्याला स्पर्ष केला तरी ४००० वर्षापूर्वीच्या खुणा पाहतोय मानवी अस्तित्वाच्या ह्या कल्पनेनीच अक्षरश: शहारा येतो अंगावर !
क्रांती होतीये इजिप्तमधे.पण ती घडताना भावनेच्या भरात आणि mob mentality मधे,आवेशात काही दुर्मिळ गमावलं जातय का? हा विचार खूप अस्वस्थ करणारा आहे. शिवाय पोटापाण्याचा प्रश्ण आहेच...एक सक्काराचे गालीचे सोडले तर कोणतीही मोठी उत्पादन करणारी इंडस्ट्री इथे नाही...भारत,चीन, युरोपच्या तुलनेत सर्व्हीस इंडस्ट्री अजिबातच ना्ही....सगळा देश 'येन केन प्रकारेण' या पुरातन अवशेषांवर अवलंबून !
ही सगळीच जाणीव या क्रांतीच्या मार्गावर चालणा-यांना खूप काही अमूल्य गमावण्यापूर्वी,खूप उशीर होण्यापूर्वी व्हावी... गेले दोन दिवस इतका आणि इतकाच विचार चालू आहे मनात 'इजिप्तमधली क्रांती' बघून !
महिन्या दोन महिन्यापूर्वीच इजिप्तचे फोटो मित्रांना पाठ्वताना ’Waiting for the wave of liberalization to hit home!' असं caption किती सहज लिहून गेलो होतो आम्ही !
Liberalization ची ही wave इतक्या लवकर आणि अशी वेडीवाकडी धडकेल इजिप्तला असं वाटलंही नव्हतं तेव्हा!
कालाय तस्मै नम: ! दुसरं काय?
रार, किती सहजपणे समोर गप्पा
रार, किती सहजपणे समोर गप्पा मारतेस तसं लिहितेस!
रार. इजिप्तमधे असे व्हावे.
रार. इजिप्तमधे असे व्हावे. याचे वाईट वाटले. अवश्य भेट देण्याजोगा देश म्हणून आजवर स्वप्न बघत होतो. आशा करतो, ते पूर्ण होईल.
छान लिहिली आहेस डायरी. समोर
छान लिहिली आहेस डायरी. समोर बसून सांगतेयस असं वाटलं!
गेली दोन-तीन दिवस टीव्हीवर पहातोय! "गर्मियोंकी लू" फारच वाईट थराला गेली आहे.
फोटो फार बोलका आहे!
(No subject)
मस्तच..
मस्तच..
छान लिहिलयस रार! आज सकाळीच
छान लिहिलयस रार!
आज सकाळीच बातम्यांमध्ये पाहिलं की इजिप्तची म्युझियम्स लुटली जात आहेत. लोकांच्या मागण्या काहीही असो, पण त्याकरता नाहक एवढ्या अमूल्य ठेव्याची ते नासधूस करताहेत हे पाहून भयंकर वाईट वाटलं. अजून चार आठ दिवसात सगळ्या गोष्टी परत "नॉर्मल" होतील पण हे लुटले गेलेले वैभव मात्र नेहेमीकरता नाहीसे होईल.
खूप सुरेखं उतरलय हे स्फुट.
खूप सुरेखं उतरलय हे स्फुट.
उत्तम.
उत्तम.
छान लिहिलय!
छान लिहिलय!
अनीशाशी सहमत आहे. समोर बसून
अनीशाशी सहमत आहे. समोर बसून गप्पा मारल्यासारखंच हे.
खूप छान लिहीलं आहेस. ह्या
खूप छान लिहीलं आहेस. ह्या liberalization wave ला योग्य दिशा मिळावी अशी आशा करुया.
छान लिहीलं आहे
सुंदरच जमलंय रार.
सुंदरच जमलंय रार.
सुंदर लिखाण.
सुंदर लिखाण.
खुप सहज आणि ओघवत्या भाषेत
खुप सहज आणि ओघवत्या भाषेत लिहिलं आहेस . छान

"वैभव मात्र नेहेमीकरता नाहीसे होईल" >> अनुमोदन
मॉब मेंटॅलिटीची भिती वाटतेय.
मॉब मेंटॅलिटीची भिती वाटतेय. आणि इजिप्तच्या ह्या खजीन्याची भांडारकर इन्स्टीट्युट सारखी अवस्था होऊ नये अस वाटतय. कारण जे नुकसान होईल ते फक्त इजिप्तच नाही तर सार्या जगाच होणार आहे.
पण होस्नी मुबारक या वयातही का
पण होस्नी मुबारक या वयातही का चिकटून आहे खुर्चीला? जनमताच्या विरोधात एवढे सत्तेचे काय प्रेम?
टूरिस्ट लोकांना दाखविले जाणारे प्रदेश व खरी वेगळी ग्राउंड रिअॅलिटी यात नेहमीच फरक असतो. १०० लोकांचे जीव गेले आहेत. मला तर त्या जुन्या वस्तूंपेक्षा जिवंत लोकांच्या गरजा लक्षात घेतल्या जाउन
त्यांच्या / बहुमताच्या मता प्रमाणे व्हावे त्यात इतर शक्तींचा हस्तक्षेप न होता व्हावे असे वाट्ते. एक दोन अडीच वर्षाचा छकुला झेंडा फिरवित हसत होता. त्याला सुखरूप मोठे होता व्हावे हे महत्त्वाचे.
छानच लिहिलयस, अगदी मनातल सहज
छानच लिहिलयस, अगदी मनातल सहज उतरलय
स्फुट आवडलं. फोटो, कॅप्शन
स्फुट आवडलं. फोटो, कॅप्शन चपखल.
अश्विनीमामी, माझ्या या वरच्या
अश्विनीमामी, माझ्या या वरच्या लिखाणातून 'क्राती घडूच नये अथवा सामान्य लोकांच्या जगण्यापेक्षा त्या पुरातन वस्तू महत्वाच्या आहेत' असा किंचितही अर्थ निघत असेल तर माझा हा लिखाणाचा प्रयत्न फसला कदाचित
समूहाच्या 'जोश मे होश खो बैठना' या वृत्तीचे परिणाम त्या वेळेपुरते नाही तर पुढच्या पीढ्याना भोगावे लागतात... या वृत्तीबद्दल आणि त्याच्या परिणामाबद्दल खेद वाटला मनात कुठेतरी म्हणून हे लिखाण घडल इतकंच !
आवडलं
आवडलं
छान लिहिलंयस आरती... आवडलं.
छान लिहिलंयस आरती... आवडलं.
खरंच खूप सहज,ओघवतं उतरलंय !
खरंच खूप सहज,ओघवतं उतरलंय ! आवडलं.
छान लहिलयस खरं तर ही क्रांती
छान लहिलयस
खरं तर ही क्रांती कधी तरी होणारच होती, ट्युनिशियात झालेल्या क्रांतीमुळे ईजिप्तमधल्या क्रांतीला लोकांचा पाठिंबा लवकर मिळाला.
ईजिप्तमधल्या अनागोंदीला होस्नी मुबारक आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपापल्या परीने हातभार लावण्याचे काम ईमानेईतबारे केले.
चान्गले लिहीलय
चान्गले लिहीलय
अगदी सहज संवाद साधला आहे....
अगदी सहज संवाद साधला आहे.... डायरीतील ही टिपणं, निरीक्षण आणि चिंतन आवडलं.
छान लिहीलंय.. आवडलं!
छान लिहीलंय.. आवडलं!
सही आहे रार. अस्वस्थ व्हायला
सही आहे रार. अस्वस्थ व्हायला झालं.
आणि हजारो वर्षांपुर्वीच्या अवशेषांच्या सान्निध्यात गेल्यानंतरचा थरार अक्षरशः अनुभवला, क्षणभरासाठी का होईना, तुझ्या शब्दांतून.
आज होस्नी साहेबांच्या
आज होस्नी साहेबांच्या संपत्तीच्या बातम्या येताहेत. तिथला ठेवा आता खाजगी संग्राहक आणि काहि प्रमाणात युरपमधील संग्रहालये, यांच्या ताब्यात जाईलच.
छान लिहिलय डायरीतील ही
छान लिहिलय
डायरीतील ही टिपणं, निरीक्षण आणि चिंतन आवडलं. > > मलाही. लिहीण्याची ही स्टाईल छान आहे.