माझी बाजु (२)...

Submitted by Anaghavn on 10 June, 2008 - 07:56

मी नेहा--नेहा म्हणजे छान डोळे..की छान द्रुष्टी?
सुहासला माझे डोळे खुप आवडतात. खुप कौतुक करतो तो माझ्या डोळ्यांचं. त्या जे जे म्हणुन आवडतं त्या सगळ्याचं तो भरभरुन कौतुक करत असतो. अर्चनाचं पण! अर्चना--त्याची पहीली बायको.
मला अर्चना बद्दल personaly राग असण्याच काहिच कारण नाही. पण, जेव्हा सुहास तिचं कौतुक करतो ना, तेव्हा I feel jelous. असं वाटतं की कायदेशिर रीत्या हा तिच्यापासुन केव्हाच मुक्त झालाए--मनाने केव्हा होणार? म्हणजे सुहास मनाने तिच्या पासुन बायको म्हणुन केव्हाच मुक्त झाला आहे. पण एक मैत्रिण म्हणुन तो अजुनही तिला मदत करतो. तशा त्याच्या अनेक मैत्रिणी आहेत--ज्या आधी त्याच्या clients होत्या. अजुनही त्या काही अडचणीला याला फोने करतात. मला त्या बद्दल काही objection असण्याच कारणच नाही.पण अर्चना काही झालं तरी त्याच्या पहील्या लग्नाची बायको. तिच्यामुळे त्रास झाला हे खरं पण त्या दोघांचे असे काही खास क्षणही असतिल.सुहास ला ते आठवत असतिल का तिला भेटल्यावर?
खर तर सुहास एकदम royala माणुस!! एकदम दिलखुलास. बायको म्हणुन मल किती जपतो! माझ्या आवडी निवडी,माझे मुड्स किती छान ओळखतो! माझ्या कामाच्या वेळा--आणि घरातली कामं--यांची सांगड घालायला काही problem आला तर मोकळेपणाने मदतिला तयार--मदत नाही करता आली तरी ते मोकळेपणाने सांगणार. regrets ही गोष्ट तर त्याच्याकडे तोंडी लावयला सुध्दा नाहीये.
एक व्यक्ती म्हणुन त्याची आदर देण्याची पध्दत,रुसवा काढण्यासाठी काढलेल्या ऊठाबशा--कशाला तोड नाही.माझ्या पहील्या लग्नाचा अनुभव---किती depress झाले होते तेव्हा. सगळ्यात माझीच चुक आहे,असंच वाटत होतं मला. पण आत लक्शात येतयं, त्यावेळी मी जशी परिस्थिती होती,त्यानुसार बरोबर वागले होते.
सुहासला पहील्यांदा भेटले तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व खुपच आवडल होतं. पण अर्थातच मी त्याच्या बद्दल तसा विचार करणं शक्यच नव्हतं--कोणबद्दलच नाही. मी माझ्यातच गुंग झाले होते. माझ्या दु:खात रमले होते. एक मैत्रिण jim मध्ये मला बळजबरीने घेउन गेली, आणि माझ्या नावाने तिथे enrollment केली. तिथे हा पण भेटला. हळुहळु ओळख वाढली. त्याची कहाणी पण कळाली--मैत्री वाढल्यावर. त्याचा attitude वाखाणन्यासारखा होता. पहील्या बायको चा आजार, त्याला झालेला त्रास, तिचा स्वभाव--पण कुठेही कटुता नव्हती, तिच्याबद्दल दया नव्हती,पण सहनुभुति होती.एक प्रकारचा acceptance होता. तिला होणारा त्रास बघुन त्याला वाईट वाटंत होतं. आपण काय मदत करु शकु--एक मित्र म्हणुन असा विचार वेगळं झाल्यावरही होता.
मला तो खुपच आवडला--आवडायलाच लागला. माझ्यातला अपराध गंड कमी होत गेला--माझा attitude ही बदलत चालला होता त्याच्या सहवासात.
हळुहळु माझं काम्--ड्रेसडिझायनर चं मी सुरु करत होते. त्याच्या office मध्ये त्याने माझी add लावली.त्याच्या female clients माझ्याकडे यायल्या लागल्या. माझा व्यवसाय वाढु लागला. माझ्यातला गमावलेला आत्मविश्वास परत येऊ लागला. मी जोमाने नवीन नवीन आयडीयाज वर काम करु लागले. माझे कपडे वेगळे म्हणुन ओळखले जाऊ लागले. मी हळुहळु खुलायला लागले होते..असा अनुभव मला कधीच आला नव्हता. सुहास असताना मला छान वाटायचं.secure वाटायचं. इतके दिवस डीझायनर असुनही मी साधेच कपडे घालायचे. पण आता मला छान रहावसं वाटु लागलं.
सिनेमा बघणं, खुप खुप लांब फिरायला जावसं वाटणं, गाणी म्हणणं,खळखळुन हसणं--सगळं सगळं परत आलं होतं.
jim चा आमचा एक group च जमला होता छान्.काहीतरी programas ठरवायचे,त्याचं planning करायच,आणि काहीतरी पदरात पाडुन घ्यायचं. कुठेतरी picknik ला जायचं. किती तरी मजा करत होतो आम्ही.
त्यातच एकदा आमच्या group मधल्या मैत्रिणीने मला सुहास बद्दल विचारलं--माझ्या नकळत मी लाजले होते म्हणे--ति मैत्रिणच म्हणाली तसं. खरं तर माझ्यात आणि सुहास मध्ये १० वर्षांचं अंतर होतं.
त्याच मैत्रिणी ने नंतर सुहासला ही विचारलं. दोघांनी मिळुन बोलल्यावर, विचार केल्यावर्--आम्ही पक्कं केलं--लग्नाचं.
साधेपणानेच पण घरचे, मित्र-मैत्रिणि--यांच्या साक्षीने लग्न झालं.
माझा संसार सुरु झाला. यात खरच खुप मजा होती. माझं मन ओळखणारं कोणितरी होतं. मनात भिती नव्हती.
आमच्या संसारात अजुन कोणितरी होतं--प्राजु आणि सई--सुहासच्या पहील्या लग्नापासुनच्या मुली--एकदम गोड. मी हे आधीच accept केलं होतं. अर्थात त्या मधुन मधुन असायच्या आमच्याकडे.
त्यांना मी आवडायचे की नाही काय माहीत? पण मी त्यांना accept केलं होतं.

गुलमोहर: 

वाचतेय ग,... येउ दे पटकन पुढचे भाग. छान लिहितेयस.
-प्रिन्सेस...