माझी बाजु..

Submitted by Anaghavn on 10 June, 2008 - 06:23

सुहास :- बस अर्चना बस. अग किती बोलशिल तिला. तिचा काय दोष? आणि आता ती माझी लग्नाची बायको आहे. आपण केव्हाच वेगळे झालो आहोत. अगं, मी तुझ्या अडीअडचणींना अजुनहि मदत करतो आहे.पण आता तु आधीसारखी माझी बायको राहिली नाहीस. आपण वेगळे होऊनही बराच काळ लोटला आहे.
नेहा तुला समजुन घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत आली आहे. आधीच्या बायको बरोबर अजुनही मी बोलतो,तिचं कौतुक करतो,तिच्या अडचणींना मदत करतो, हे सगळं मोठ्या मनाने accept केल आहे तिने. पण शेवटी ती माझी बायको आहे आता. तुला वाईट वाटु नये म्हणुन मी गप्प राहतो. पण शेवटी तिचा जास्त अधिकार आहे माझ्यावर. ती बायको आहे माझी आता.

अर्चना :- सुहास--

सुहास :- I am Sorry , आज पर्यंत माझी बायको म्हणुन खुप सहन केलं आहे. तुझी कायम सन्शय घेण्याची ती सवय!! yes I know तो एक आजार होता-- आहे, पण त्याचा मला किती त्रास झाला माहिती आहे? माझ्या अनेक clients मला सोडावे लागले. वकील आहे मी. हजार प्रकारचे clients येतात माझ्याकडे. कितीदा संगायचो मी तुला.
हा आजार हा एक भाग झाला अर्चना, पण आपल तेच खरं करण्याचा तुझा स्वभाव!! त्याच काय? तो बदलणं तरी तुझ्या हातात होतं. कुठे काही मनाविरुध्द झालं की घर डोक्यावर घ्यायचीस तु. जराही petiance नाही.
आता सुध्दा, नेहाला Aurjent meeting होती म्हणुन मी तिला सोडायला गेलो होतो. तिथे गेलो तर कळाल की meeting postporn झाली आहे. नेहा म्हणाली की मी पण येते, म्हणजे मला मुलांना भेटता येईल. आणि आल्या आल्या तु सुरु झालीस. १५/२० मि. उशिर झाला म्हणजे आभाळ नाही डोक्यावर पडलं.
तुला आठवतं अर्चना, तुझ्या लग्नानंतरच्या पहील्या वाढदिवसाचं किती छान planning केलं होत आपण!! तुला आवडतात म्हणुन मोगर्याचे १०० गजरे आणले होते. तुझ्या आवडत्या रंगाची साडी,तुला आवडतो म्हणुन skirt,जीन्स,टॉपस्,कपड्याची प्रत्येक व्हरायटी आणली होती मी तुझ्यासाठी!!! मी स्वतः तयार केले होते पदार्थ तुला आवडणारे. आणि तु चिडलीस एका क्षुल्लक कारणासाठी!!!! घरातुन निघताना client चा फोन आला आणि त्यात १५/२० मि. गेले--म्हणुन तु सगळा plan spoile करुन टाकलास. माझ्या मनाचा जराही विचार केला नाहीस? इतका कसला राग होता? मी कितीदा विचारायचो तुला त्याबद्दल्--तुझं मन कळाव म्हणुन. पण तुला वाटायचं की मी तुला मुद्दाम डिवचतो आहे. तुला कमी लेखतो आहे. अगं तुला कमी लेखुन मला काय मिळणार?
नंतर तुला विचारण सोडुन दिलं मी.तर त्यावरुनही चिडायचिस. माझी किंमत वाटतनाही आत म्हणुन.
अर्चना, तुझ्यावरचं प्रेम म्हणुन मी सगळं सहन केल गं. सहन कराव लागतय म्हणुन नाही, तर तु मला आवडत होतीस म्हणुन. तुझ्या मनातली ही negativity मी दुर करेन असं वाटायच म्हणुन. तुझ क्षुल्लक गोष्टिंवरुन चिडणं,त्रागा करणं,आदळाअपट करण--सगळ्या गोष्टिंकडे मी एक challange म्हणुन बघायचो. आणि मी हे कस बदलु शकेन याच्यावर निरनिराळे तोडगे काढत रहायचो.
पण पहील्यांदा तु माझ्यावर माझ्या एक client वरुन संशय घेतलास आणि मी कोलमडलो. खुप चिडचिड झाली.रागराग केला मी तुझा--पार ढासळलो गं मी. त्यानन्तर तुझं हे संशय घेणं वाढतच राहीलं. आणि मी जास्त घराच्या बाहेर रहायला लागलो. खरं सांगतो, तेव्हासुध्दा मला तु आवडायचीस. पण तुझं वागणं मला असह्य झालं होतं हे पण तितकच खरं. त्यामुळे माझं office मधलं काम मी वाढवलं. खुप वाटयच की तडक उठुन घरी जावं,तुझ्याशी बोलावं. तुला विचारावं की तु कशामुळे खुष राहशिल सांग. डॉ. मेहतांनी तुझ्या आजाराचं निदान केल तेव्हा मी हबकुनच गेलो होतो. संशयाचा आजार. मनात कायमच संशय--partner विषयी.
तुला बरं कराव म्हणुन काय काय करता येईल त्याचा खुप विचार केला. डॉ. मेहता आणि डॉ. पारसनीस यांच्याशी बोलुन आम्ही एक workout plan केल होता.
पण तु कधीच साथ दिली नाहिस. तुझा स्वभाव आणि तुझा आजार यात माझीच गल्लत होऊ लागली. खुप गोंधळुन गेलो मी. पण माझ्या या अवस्थेविषयी सुध्दा तु संशय घेतलास.
एकीकडे मी तुझ्या आजाराची माहिती घेउन तो बरा होण्यासाठी जंगजंग पछाडत असताना, तु एकेदिवशी माझ्यासमोर घटस्फोटाचे कागदपत्र ठेवलेस--तुझ्या सह्या असलेले!!!!
पुढचे अनेक दिवस मी सुन्न होतो. आणि एक दिवस तु घर सोडुन निघुन गेलीस!!!!

गुलमोहर: 

अनघा!! ह्म्म!! इंटरेस्ट्रींग सुरुवात. पटापट पुर्ण कर. मी वाट पहातेय.

स्पेलिन्ग्ची गल्ल्त करु नका अर्थ वेगळा होतो....

स्पेलिन्ग्ची गल्ल्त करु नका अर्थ वेगळा होतो....

विशाल,
नक्कीच. चेक न करता टाकलं.
पुढच्या वेळेसाठी मला याचा उपयोग होईल.