माझी कोकण यात्रा

Submitted by प्रथम फडणीस on 26 January, 2011 - 10:09

नुकताच मित्रांसोबत बाईकवरून कोकणात जायचा योग आला. श्रीवर्धन, दिवे आगार आणि हरिहरेश्वर असा २ दिवसांचा कार्यक्रम ठरला.
गेल्या गुरूवारी भल्या पहाटे ५.३० वाजता डोंबिवलीहून निघालो. बोच-या थंडीत बाईक चालवणं फ़ार जिकिरीचं होत होतं. साधारण सकाळी ६.१५ ला पनवेल फ़ाट्यावरच्या श्री दत्त मध्ये चहासाठी पहिला ब्रेक झाला. ६.४५ ते ८.३० riding करून पुढे NH १७ वर अलिबाग च्या थोडं पुढे काशिद बिचला पोहोचलो. हा होता आमचा दुसरा थांबा. काशिदला निवांत चहा, नाष्टा, recliners वर आराम आणि थोडीफ़ार photography करून आमचा काफ़िला पुढे मार्गस्थ झाला.
त्या नंतर मजल दरमजल करत, थोड्या लांबच्या पण किना-याला समांतर अशा नागाव, काशिद, मुरूड, राजपुरी, दिघी आणि शेवटी श्रीवर्धन अशा कोकणातल्या आतल्या लहान लहान गावांमधून जाणा-या निसर्गरम्य रस्त्यांवरून अखेरीस आम्ही दुपारी १२ च्या सुमारास श्रीवर्धनला पोहोचलो. आमचा मित्र तेजसच्या घरी सामानसुमान टाकलं आणि परत हुंदडायला मोकळे.
भर दुपारी २.३० च्या तळपत्या उन्हात गाड्या निघाल्या आणि पहिला थांबा ठरला तो श्रीवर्धन गावाजवळचा जिवना बंदर. मनसोक्त photography करून त्यानंतर आम्ही विसावलो ते श्रीवर्धनच्या विस्तीर्ण किना-यावर. पाण्यात यथेच्छ डुंबून, photography चे सगळे शौक पूरे करून संध्याकाळी दिवेलागणीला परत आमच्या तात्पुरत्या घरट्याकडे परतलो.
दुस-या दिवशीचा plan होता तो सकाळी लवकर निघून दिवेआगार, हरिहरेश्वर करायचं, तिकडून थेट म्हसळा फ़ाटामार्गे माणगाव वरून NH17 वरून परत डोंबिवली. पण तेजसच्या घरामागे असणा-या वाडीतून पाय निघेल तर ना? नारळ आणि सुपारीच्या त्या बागेतून निघून दिवेआगार कडे निघालो तर मध्ये माझ्या गाडीने थोडा त्रास दिला. त्यात बराच वेळ गेला आणि आम्हाला दिवेआगारात पोहोचायलाच वाजले दुपारचे १.३०.
त्यानंतरही photography ची हौस काही थांबेना. कोकण आहेच इतका photogenic. मध्ये मध्ये थांबून photo काढून हरिहरेश्वरला आम्ही धडकलो ३ वाजता. हरिहरेश्वराचं दर्शन, डोंगराला पदभ्रमण, आणखी photography, जेवण करून अखेरीस परतीचा प्रवास सुरू झाला संध्याकाळी ४.३० वाजता.
वाटेत म्हसळा फ़ाट्याच्या अलिकडे आमचा एक गाडीस्वार मातीवरून घसरून पडल्यामुळे थोडा वेळ थांबावं लागलं. त्यानंतर मात्र सगळे सुसाट सुटले आणि माणगावला बरोब्बर ५.४५ ला टेकले. चहा ब्रेक नंतर तर सर्वांना NH17 खुणावत होताच. सगळे आपापल्या bikes च्या top speed ने भरधाव निघाले आणि ठिक १.५ तासांनी पनवेलला आणि रात्री ९ ला डोंबिवलीला पोहोचले.
त्या २ दिवसांत एकूण ५०० किलोमिटर चा प्रवास झाला. पण हा सगळा प्रवास निसर्गरम्य कोकणातला असल्यामुळे कोणालाही कसलाही शिणवटा जाणवला नाही.
या सफ़रीतले काही photos सोबत टाकत आहे. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहेच.

गुलमोहर: 

त्यानंतरही photography ची हौस काही थांबेना. कोकण आहेच इतका photogenic. >>> माफ करा, पण तुमचेच फोटो जास्त आहेत फोटोजेनिक कोकणापेक्षा.

त्यानंतरही photography ची हौस काही थांबेना. कोकण आहेच इतका photogenic. >>> माफ करा, पण तुमचेच फोटो जास्त आहेत फोटोजेनिक कोकणापेक्षा.

त्यानंतरही photography ची हौस काही थांबेना. कोकण आहेच इतका photogenic. >>> माफ करा, पण तुमचेच फोटो जास्त आहेत फोटोजेनिक कोकणापेक्षा.

श्री, पण तू हे तीनतिनदा का सांगतोयेस? Lol
व्यक्तिचित्रणापेक्षा समुद्र, पायर्‍या आणि रस्त्याचे फोटो आवडले.
उड्या मारलेल्या पाहुन यो रॉक्सची आठवण झाली.

फोटो सुंदर आहेतच. पण.................
कोकणनिसर्गाचे अजून फोटो अपेक्षीत आहेत. टाकणार ना? Happy