ऑफलाईन केलेलं लिखाण मायबोलीवर कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 9 June, 2008 - 21:17

१. ऑफलाईन केलेलं लिखाण जर युनीकोड फाँटमधे केलं असेल (जुन्या मायबोली प्रमाणे रोमन मराठी लिपीत नसेल) तर ते, जसेच्या तसे, इथे Cut+Paste करता येते.

२. ऑफलाईन केलेलं लिखाण जर जुन्या मायबोली प्रमाणे रोमन मराठी लिपीत असेल (उदा. he mi lihile aahe) तर

या चित्रात प्रतिसाद लिहीतो त्या जागेवरील बटणांमध्ये, लाल वर्तुळात दाखवलेल्या सफरचंदाच्या बटणावर क्लिक केले असता, रोमन लिखाण देवनागरीमध्ये बदलता येईल अशी सुविधा असलेली खिडकी उघडेल. त्यात तुमचे रोमन लिखाण आपोआप युनिकोडमधे दिसेल. तिथून ते लिखाण, जसेच्या तसे, इथे Cut+Paste करता येते.

३. तसेच ऑफलाईन लेखन 'बरहा'मध्ये कसे कराल? हे पण बघा.

माला १ चानगालि रेसिपि हावि आहे.

>>>>>>>> ऑ़फलाईन केलेलं लिखाण जर युनीकोड फाँटमधे केलं असेल (जुन्या मायबोली प्रमाणे रोमन मराठी लिपीत नसेल) तर ते, जसेच्या तसे, इथे Cut+Paste करता येते.
म्हणजे नक्की कसे युनीकोड वर्ड मधे वापरायचे का ? तसे असेल तर नक्की काय करावे लागेल ?

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

मस्त लिहििलय

मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो
आणि आनंद परत मिळाला की जिवनाचा खरा अर्थ कळतो
मी आनंद दिला पण मला आनंद मिळाला नाही,
जिवनाचा अर्थ कळाला नाही
मी कुठेतरी वाचलं
आपण आपल्या प्रेमाला जगात मुक्त सोडावं
परत आलं तर ते आपण स्विकारावं
नाही आलं तर ते आपलं नव्हतंच

पण ते परत आलंच नाही,
मला कधी कोणी माझं वाटलंच नाही

आता मी वाचणं सोडलं
पण जगणं सोडलं नाही
आनंद देणं सोडलं नाही
प्रेम करणं सोडलं नाही
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या

आता जिवनाचा अर्थ कळू लागलाय
मी जवळ गेलो तरी
प्रत्येक माणूस दुर पळू लागलाय

क्षितीजापलीकडे पाहण्याची दृष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता येत.

आपल्या रक्तातच धमक असेल,
तर जगंही जिंकता येत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं

Belief:----"Your time is limited, so don't waste it living someone else's life. Don't be trapped by dogma – which is living with the results of other people's thinking. Don't let the noise of other's opinions drown out your own inner voice. And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. Everything else is secondary."

दिलीप, बरहा [किंवा तत्सम] सॉफ्टवेअर वापरून केलेले लिखाण आहे का हे?
मायबोलीवर नवीन लेखनात पेस्ट केल्यावर दिसत नाही असे म्हणायचे आहे का?

तुमच्या मायबोलीकराना नम्स्कार.
खरच तुम्हि लोक छान साईट चालवत आहात.पण तिथे मराठीत टाईप करणे अवघड आहे बाबा.
वरच्या ओळीतील दुसरया शब्दापासून मी सरळ गुगलची सोय वापरून मराठी लिहले आहे.
प्रयत्न करीत राहीन.

धन्यवाद ! !

श्रीलिपीमधे टायपिंग केले तर ते मायबोलीवर टाकता येईल का? किंवा पेज मेकर मधे पीडीएफ फाईल बनवली तर ती ईथे टाकता येईल का?

अजय, इथे युनिकोड फाँटमधे लिहिलेलेच डकवता येइल. श्रीलिपीचे फॉण्ट्स माझ्या माहितीप्रमाणे तसे नाहीत. पीडीएफ फाईल इथे ठेवायची सोय नाही. इतरत्र जसे मेडियाफायर.कॉम वर अपलोड करून इथे लिंक देऊ शकाल.

मी जर रोमन लिपीत ऑफलाईन टाईप करून ठेवले असेल तर अशी कुठे सोय आहे का की ते मला एकदम ट्रान्सलिटरेट करून घेता येईल मराठी लिपीत?
ते वर जिथं ऑप्शन दिलं आहे 'इथे' असं लिहुन तिथं लिहायला box येतच नाही आहे. Sad

शिवाजी ०५ फॉन्ट वापरून केलेले लेखन इथे टाकता येत नाही. तरी असं कन्व्हर्जन करून देणारी कुठली साईट आहे का? एक सापडली पण ती फक्त २०० अक्षरांची मर्यादा ठेवते, बाकी विकत घ्यावं लागेल.जो अर्थातच शेवटचा पर्याय असेल. Happy

जर लेख कागदावर हाताने लिहिलेला असेल तर तो word document मध्ये convert करता येईल का,please सांगा

सोपं आहे.
१) मोबाइलने फोटो काढा. कॅमस्कॅनरने पिडीएफ बनवा पिडीएफची वनड्राइव/ड्राइवची लिंक द्या/
२) फोटो इथे अपलोड करा आणि तेच इथे द्या/
३) लेख मोठ्याने वाचून पंधरावीस मिनिटांच्या ओडओडिफाइल तयार करा. गुगल ड्राइव किंवा clyp _dot_it वर अपलोड करून लिंक द्या ( इकडे iframe tag चालत नाही त्यामुळे ओडिओ प्लेअर दिसणार नाही.

-आजची संध्याकाळ-

वेगवान भयावह निसर्ग वादळ पसरे चौफेर |
छप्पर पत्रे जहाजेही नेई वाहुनिया दूर. |

मध्येच वारा मध्येच पाऊस आणि जलमय झाल्या वाटा |
मनामनातून उठल्या असतील भीतीच्याच लाटा |

वेगवेगळ्या तर्क कुतार्का आली मोठी भरती |
वेधशाळेच्या अंदाजांस कधी नव्हे ती आली महती |

झाडेझुडुपे खांब विजेचे झाले नतमस्तक |
दूरदर्शन ते दावी ऐसे जणू ते त्यांचे हस्तक |

खालून आले वळून गेले मुंबईला चकवून |
निसर्ग वादळ आले गेले माणसा चक्रावून|

रुद्र रूप दाखवी निसर्ग तुम्हा आम्हाला |
दिवसभराच्या कथा-कहाण्या मिळाल्या मीडियाला |

पर्यावरणाची करतो हानी, मानव समजून सर्वेसर्वा |
एकच दणका दिला नियतीने उतरवून त्याच्या गर्वा |

दिपक पत्की.

-आजची संध्याकाळ-

वेगवान भयावह निसर्ग वादळ पसरे चौफेर |
छप्पर पत्रे जहाजेही नेई वाहुनिया दूर. |

मध्येच वारा मध्येच पाऊस आणि जलमय झाल्या वाटा |
मनामनातून उठल्या असतील भीतीच्याच लाटा |

वेगवेगळ्या तर्क कुतार्का आली मोठी भरती |
वेधशाळेच्या अंदाजांस कधी नव्हे ती आली महती |

झाडेझुडुपे खांब विजेचे झाले नतमस्तक |
दूरदर्शन ते दावी ऐसे जणू ते त्यांचे हस्तक |

खालून आले वळून गेले मुंबईला चकवून |
निसर्ग वादळ आले गेले माणसा चक्रावून|

रुद्र रूप दाखवी निसर्ग तुम्हा आम्हाला |
दिवसभराच्या कथा-कहाण्या मिळाल्या मीडियाला |

पर्यावरणाची करतो हानी, मानव समजून सर्वेसर्वा |
एकच दणका दिला नियतीने उतरवून त्याच्या गर्वा |

दिपक पत्की.