'चिमार'

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'चिमार'
ही गाठ शब्दाला आलेली (अस एक मत)
व्यक्त करण्याकरता तिलाच पुढे धरा
व्याकरणात ती बसत नाही
कुठेतरी बसावा असेही नाही
एखादे चिंब भारले पण
एखादं फळासारखं दुःख
ह्यांच्या तळव्यावर ठेवण्यास उत्सुक आहे
बिया कोया पाने फुटणारी मुळे
झारी धरणारे हात
गंजलेले पण सर्वव्यापी
ह्यांचया कुळातील
कदाचित
पण माहीत नाही!

'चिमार' ही परंपरा आहे
आत्मसात करून
स्वतः रंग होऊन
ओतून घेण्यास आसुसण्याची
कदाचित
पण तेही मला नक्की माहीत नाही

--------------------------------
माबो आर्काईव्ह खणताना अनेक 'अरे हे मी कधी लिहीले?' मोमेंट्स सापडल्या. त्यातली एक इथे डकवत आहे. उरलेल्या ब्लोगवर संग्रहीत केल्या. रुद्रायानाच्या अधीची तशीच जातकुळी असलेली ही खरड Happy

प्रकार: