मुलांची IQ टेस्ट करावी का?

Submitted by आश on 22 January, 2011 - 15:15

मुलांची IQ टेस्ट करावी का? मला ह्या प्रश्नाबद्दल येथे चर्चा करावीशी वाटली. आपलं काय मत आहे?
मला स्वता:ला ही कल्पना नाही आवडली. मुलांचा IQ स्कोअर जास्त आला तर काय त्याकडे जास्त महत्वाने पाहुन लक्ष देणार का कमी आला तर गरज आहे वर काढायला म्हणुन लक्ष देणार?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आय क्यू टेस्ट करून घ्या पहिले मग करा बदल.. नाहीतर कापूस कोंड्याची गोष्ट टाक मग होईल बदल आपोआप..
Wink दिवा घे.

आश , जर तुम्हाला मुलामधे काही स्पेशल टॅलेंट्स दिसत असतील किंवा वाटत असतील तर करुन घ्यायला हरकत नाही. माझ्या इंटरनेट वाचनाप्रमाणे अति हुषार मुले काही वेळा रेग्युलर अभ्यासामधे बोअर होऊ शकतात. तेव्हा त्यांना नेहेमी हवं ते चॅलेंज देणं जरूरी असु शकतं. आयक्यु टेस्ट मुळे हे लक्षात येऊ शकतं. (माझी हि वाचलेली माहीती आहे , अधिक जाणकार लोक सांगतीलच.)