खरंच निबंध चुकला?

Submitted by चित्रा on 17 January, 2011 - 07:58

रुणु तेव्हा दुसरीत होती. नेहमी तिचे पैकीच्या पैकी मार्क पहायची सवय झालेली मला. सहामाहीचा निकाल हातात आला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. इंग्लिश मध्ये एकदम आठ मार्क कमी!!

झाले .. माझ्यातली कडक आई जागी झाली. वेगवेगळे प्रश्न विचारून मी त्या सात वर्षाच्या चिमुरडीला भंडावून सोडले. बिच्चारी .. तिला मला काहीही सांगता येत नव्हते. तिचे एकच उत्तर... मी सगळे बरोबर लिहिले आहे.. मला नाही माहिती काय झाले ते. शेवटी मी म्हटले पाहू या ओपन डे ला. पेपर पाहायला मिळतीलच ना. मग समजेल नक्की कशावर काम करायला हवे आहे ते.

मी पुढचा पूर्ण प्लान हि तयार केलेला. कसा अभ्यास घ्यायचा.. किती वेळ खेळायला सोडायचे.. किती वेळ TV पाहून द्यायचा. चांगली शिस्त लावली पाहिजे. रोज भरपूर लिखाण करून घेतले पाहिजे. पुस्तके आणली पाहिजेत अवांतर अभ्यासासाठी. मी पूर्ण विसरले होते कि माझे पिल्लू फक्त सात वर्षाचे आहे.

पाहता पाहता ओपन डे आला. मी शाळेत पोहोचले. पेपर हातात घेतला. पहिल्या पानावर सगळे बरोबर...... दुसऱ्या पानावर सगळे बरोबर...... तिसऱ्या पानावरही तसेच. पानागणिक माझा आवेश कमी आणि उत्सुकता वाढू लागली.

शेवटच्या पानावर.. निबंधात दहा पैकी दोन मार्क.... का?.... निबंध तर सुरेख लिहिलेला. पूर्ण दहा ओळि. मग काय चुकले ? मनातले प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेवून मी तिच्या टीचर कडे पहिले... आणि कसनुसे हसून त्या म्हणाल्या .... तो निबंध सुरेख आहे पण विषयाला धरून नाहीये म्हणून मार्क काटले.

निबंधाचा विषय होता "My Favorite Family Member".. आणि रुणुनी लिहिले होते .... " My Favorite Family Members are Mummy, Papa, Aai, Baba and Rutu. I love all of them. They also love me a lot. ................................................"

खरंच निबंध चुकला?

गुलमोहर: 

हे लोक्स नाव इंटरनॅशनल देतात, पण असतात देसीच..त्यांची कुवत तेव्हढीच असते..
आपण भारतीय शिक्षणाच्या बाबतीत फार म्हणजे फार मागास आहोत.

तो निबंध सुरेख आहे पण विषयाला धरून नाहीये म्हणून मार्क काटले.

निबंधाचा विषय होता "My Favorite Family Member".. आणि रुणुनी लिहिले होते .... " My Favorite Family Members are Mummy, Papa, Aai, Baba and Rutu. I love all of them. They also love me a lot. ................................................"

खरंच निबंध चुकला? Happy

निबंध चुकला का बरोबर ते जाऊ दे पण पैकीच्या पैकी मार्कांचा एवढा अट्टाहास कशाला ?
काय बिघडत ८ मार्क कमी पडले तर ?
ती सात वर्षांची चिमुरडी आहे हो रोबोट नाहीये

....

आठ मार्क??? टेक इट ईझी चित्रा. हे पैकीच्या पैकी मार्क्स हवेतच चा अट्टाहास कशाला?

माझ्या मुलीला परवा प्रिलीम मध्ये हिंदीत स्वच्छ भारत वर निबंध लिहायला होता. तिला पण दोन मार्क मिळाले दहा पैकी. हिंदी बरोबरच आहे. व्याकरणाच्या चुका पण नाहीत. पण तिने मोदीजी के बारे में जो भी विचार हो. यह अभियान जरूरी है असे लिहीले होते. आता काय आरती गायला हवी होती का? मला तर तिच्या सम्यक नॉन जजमेंटल वृत्ती चे कौतूकच वाटले. आता फायनल का काय विषय
देतात कोण जाणे. कसलाही एक परिच्छेद अजून लिही असे सांगितले आहे.

कपोचे अहो मला पण शप्पत ते वाक्य तिने वाचून दाखिवल्यावर इथलीच आठव्ण झाली.

काय आहे ही मुले आता सर्व जगाबद्दल माहिती गोळा करत असता त त्यातील एक भारतातील घडामोडी. सिरीअन रेफ्युजी प्रश्न, जेंडर इश्यूज, रेस इश्यूज, ट्रंपची मुक्ता फळे, शास्त्र सामान्यज्ञान, कथा कविता, गंमत व इतर बरेच काही ब्रेन स्टिम्युलेटिंग माहिती ते लोक इंटरनेट, सोशल मीडिआ, अभ्यास बोलणे ऐकणे ह्यातून मिळवत असतात. प्रचाराला फारसे बळी पडत नाहीत. देश स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. हे मेन त्यांनी घेतले व त्या बद्दल लिहीले आहे. प्रचार काही लिहीला नाही. डोके बंद करून ते लिहा असे काही मी सांगणार नाही. खरे काय ते लिहा. अजून भारताबद्दल तसेच देशातील इश्यूज बद्दल माहिती वाढवा वाचन करा असे सांगितले. एक परिच्छेद लांबी अजून वाढायला पाहिजे निबंधाची असे ही सांगितले. तो अगदीच लाँग आन्सर टाइप दिसत होता. पण बेसिक करेक्टच लिहीले होते. आपल्याला जे म्हणायचे आहे ते म्हणून त्यावरच पास व्हावे. इथून पुढे हिंदीचा अभ्यासात काही संबंध राहणार नाही. बाकी बोलायला गाणी ऐकायला व्यक्त व्हायला इतर भाषांच्या बरोबरीने हिंदीचाही उपयोग होतोच आहे. तो तसाच होत राहील.

अमा मस्तंच !

माझा प्रश्न असा होता जो बहुतेक धागाकर्तीचा पण आहे...
जेव्हां आपला पाल्य बरोबर आहे याची खात्री असते आणि आपल्या दृष्टीने विचित्र कारणाने मार्क्स कापले जातात तेव्हां त्या मुलाला काय समजावून सांगायचं हे मला अजून कळत नाही. कारण आपले विचार आपल्या जागी योग्य असले तरी शेवटी याच शाळेत नांदायचेय हे एक , याची उलट बाजू म्हणून अशी सवय लागली तर ते तरी कसं मान्य करायचं ? शिक्षकांबद्दल आदर राखून त्याला सांगणे आव्हानच वाटतेय.