चला ऊसाच्या गुह्राळात.....

Submitted by गिरीविहार on 14 January, 2011 - 11:10

नुकत्याच झालेल्या कोल्हापुर भेटीत, कोल्हापुर-पन्हाळा रस्त्यावर ऊसाच्या गुह्राळाला भेट देण्याची संधी मिळाली. तेव्हा टिपलेले काही क्षण....

गुह्राळाचे चुलाण...

चुलाणात ऊसाची चिपाडे भरताना....

मोठ्या काहीलीत ऊसाचा रस उकळवताना....

रस उकळ्ताना त्याच्या गाठी होऊ नयेत म्हणुन रसाला जवळपास दोन तास असा घुसळतात...

उसाच्या रसाची काकवी तयार होताना...

गरम गरम काकवी...

काकवीची घनता तपासताना, काकवी चुलाणावरुन उतरावयास तयार झाली की नाही ते तपासताना थोडी काकवी थंड पाण्यात टाकुन बघतात, जर पाण्यात तिचा गोळा तयार झाल्यास काकवी उतरावयास तयार झाली असे ठरवतात....

काहीली चुलाणा वरुन गुळ तयार करावयाच्या ठिकाणी नेताना...

काहीली चुलाणा वरुन गुळ तयार करावयाच्या ठिकाणी नेताना (२)...

आटवलेली काकवी गुळ तयार करावयाच्या खोलगट चोउकोनी जागेत ओतताना...

आटवलेली काकवी गुळ तयार करावयाच्या खोलगट चोउकोनी जागेत ओतताना (२)...

आटवलेली काकवी गुळ तयार करावयाच्या खोलगट चोउकोनी जागेत ओतताना (३)...

आटवलेली काकवी गुळ तयार करावयाच्या खोलगट चोउकोनी जागेत ओतताना (४)...

आटवलेली काकवी गुळ तयार करावयाच्या खोलगट चोउकोनी जागेत ओतताना (५)...

आटवलेली काकवी गुळ तयार करावयाच्या खोलगट चोउकोनी जागेत ओतताना (६)...

काहीली परत चुलाणावर ठेवताना...

ओतलेला काकवी लगेच घट्ट होऊ नये म्हणुन तीला थोडा वेळ मोठया लाकडी चमच्यांनी असे परततात...

ओतलेला काकवी लगेच घट्ट होऊ नये म्हणुन तीला थोडा वेळ मोठया लाकडी चमच्यांनी असे परततात (२)...

अस्मादिक गुह्राळात काम करताना...

ढेप तयार करवयाच्या बादलीत गरम गरम गुळ भरताना...

ढेप तयार करवयाच्या बादलीत गरम गरम गुळ भरताना (२)...

तयार झालेल्या गुळाच्या सोनेरी ढेपा...

गुलमोहर: 

ओहो, अप्रतिम. सुरेख टिपलीये गुळाची सगळी क्रमवार कृती. सुरवातीपासून शेवटपर्यंत साधारण एकुण किती वेळ लागतो?

मामी,
एकदा रस उकळला की काहील उचलुन गुळ बनवायचा चौकोनात रस ओतायचा, त्यामध्ये गुळाला छान रंग यावा म्हणुन काहीतरी पावडर टाकतात त्यानंतर तो रस मोठ्या चमच्याने हलवायचा आणि मग तो रस गुळाच्या साच्यात टाकायचा आणि थंड झाल्यावर त्यातुन काढायचा. या सर्व प्रकाराला फक्त ३० मिनिटे लागतात.
रस उकळायला माझ्या अंदाजाने २ तास लागत असावेत. म्हणजे रस उकळ्यावर एकुण रसाच्या १/३ रस फक्त उरतो Happy

मी पण गेल्यावर्षी एका गुर्‍हाळात गेलो होतो (वडणगे गावात, कोल्हापुर - जोतिबा रस्त्यावर आहे हे गाव)
मी पण गुळ बनवण्याची संपुर्ण प्रक्रिया कॅमेर्‍यात टिपलीय, पण गिर्‍याच्या कॅमेर्‍यातुन निसटलेले काही प्रचि इथे देतोय Happy

मी जिथे गेलो होतो तिथे रस चौकोनात ओतताना काहील पुर्ण उलटी केली होती. बांबुच्या, दोरीच्या आणि कप्पीच्या साहाय्यने.
Gul 2.JPGGul 3.JPGGul 4.JPG

रस चौकोनात ओतल्यावर त्यावर आलेली साय म्हणजेच चिक्की गुळ उसाला लावुन काढतात. हा उस अगदी त्या चिक्कीसकट खायला मज्जा येते. तोंड अगदी चिकट होते आणि चव एक्कदम गोडमिट्ट Happy
Gul 5.JPG

गुर्‍हाळात काम करताना अस्मादिक Happy
Gul 6.JPG

गुळ साच्यात भरताना.......... गुळ भरताना जर चुकुन हाताला लागला तर भयानक पोळते आणि चिकट असल्याने लवकर निघत पण नाही Happy
Gul 7.JPGGul 8.JPG

माझी लेक पण गुर्‍हाळात मस्त रमली होती Happy
Gul 9.JPG

तयार झालेला गुळ Happy
Gul 1.JPG

वॉव.. पूर्ण प्रोसेस चे फोटो पाहतांना आपण ही ढवळून घ्यावेसे वाटत होते.. बरं झालं तुम्ही पण ट्राय करून बघितलं Happy
फारच छान माहितीपूर्ण लेख!!! ही प्रोसेस संपूर्ण होईस्तोवर किती वेळ लागला???

मस्त Happy

मस्त.

खुप वर्षान्पासुन गुर्‍हाळ बघायचं होतं पण आज या प्रचिंद्वारे योग आला.

एक [वेड्यासारखी] शंका : जर मी रसवंती गृहातुन थोडा म्हणजे साधारण एक लिटर गुळ आणिन ही प्रोसेस गॅसवर करुन बघितली तर मला घरच्या घरी गुळ तयार करता येईल का? [एक काहीतरी प्रयोग म्हणुन]

राज्या धन्यवाद. लेक खरचं गुर्‍हाळात मस्त रमलेली दिसते. गुळाच्या ढेपा फडक्यात करतात माहित नव्हते. तरीच त्यांच्यावर कधीकधी घड्या दिसतात.

मनिषा लिमये, करून का बघत नाहीस? दोन्-तीन सिलिंडरे भरून गॅस लागेल एवढच. Proud Light 1

खुप दिवसांपासुन गुर्‍हाळ पाहण्याची इच्छा होती. इथे आज सचित्र माहीती मिळाली त्याबद्दाल धन्यवाद.

ही प्रोसेस माहित नव्हती. आज योग आला.

काही शंका - १. काकवी म्हणजे अर्धवट उकळलेला उसाचा रस की फक्त पातळ गुळ? माझ्या गावी मी मधासारखी जाडसर काकवी पाहिलीय. याचा अर्थ रस अर्धवट उकळला तर तो प्रवाहीच राहतो, घट्ट बनत नाही का?

२. पुर्ण उकळलेली काकवी परत गुळ करायच्या भांड्यात का ओततात? साच्यात भरणे सोप्पे जावे म्हणुन, गुळाला रंग यावा म्हणुन रसायने घालणे सोप्पे जावे म्हणुन की अजुन काही कारण आहे?

मनिषा तु करुन बघ आणि इथे लिही. पण रस बाजारातुन आणुन लगेच गुळ करायला घे. रस थोडा वेळ जास्त असाच न पिता राहिला तर त्याचे पाणी होते, साखर घातलेले गोड पाणी, पिववतही नाही Sad
गेल्या आठवड्यात रसवाल्याकडे रस बाटलीत भरुन घेतला आणि भाजी वगैरे सगळे करत आरामात तासाभराने घरी येईपर्यंत रसाचे पाणी झाले होते Sad

मस्त फोटो, एकदम घमघमाट!!!
मी देखील ही प्रक्रिया कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोलीजवळच्या एका गुर्‍हाळात पाहिली. काकवी किती घट्ट असताना ओतायची हे जाणणारे अनुभवी लोक असतात त्यांना 'गुळव्या' म्हणतात, या सिझनमधे त्यांना भारी मागणी असते.

एक [वेड्यासारखी] शंका : जर मी रसवंती गृहातुन थोडा म्हणजे साधारण एक लिटर गुळ आणिन ही प्रोसेस गॅसवर करुन बघितली तर मला घरच्या घरी गुळ तयार करता येईल का? [एक काहीतरी प्रयोग म्हणुन]>>>>>

एक लिटर गूळ आणून तू परत त्याचा गूळच कसा काय बुवा बनवणार मनिषा? Proud

Pages