लक्षणे...

Submitted by विशाल कुलकर्णी on 13 January, 2011 - 07:04

खुप जुनी कविता आहे ही, परवा जुन्या ट्रंका उचकताना सापडली.

माझ्या शर्टच्या बटनात
अडकायचं सोडलय
तुझ्या केसांनी...

ह्म्म्म...
भिरभिरत नाहीत अताशा
तुझ्या पापण्यासुद्धा,
मला पाहताना...
...
....

निष्क्रिय होवू लागलाय आजकाल
अंगठा..., तुझ्या पायाचा!

अन् ...

पुसट होत चाललीय...
माझ्या हातावरची,
तुझी रेषही....

हि लक्षणं..
शिशिराची का गं ?
का ग्रिष्माची?

विशाल

गुलमोहर: 

अ प्र ति म कविता, विकु !!!

<<पुसट होत चाललीय...
माझ्या हातावरची,
तुझी रेषही....

हि लक्षणं..
शिशिराची का गं ?
का ग्रिष्माची? << मस्त!

व्वा!!

अरे बाबा विशाल, ही लक्षणे नाहीतच. ही अवलक्षणे आहेत. Lol

आपल्याले २१ व्या शतकात जायचं न्हवं?
मग केसांमध्ये बटना लटकल्यातर प्रगतीचा मार्ग अवरुद्ध होईल ना? Wink

ते जाऊ द्या. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. Happy

छान !
तुमच्या कवितेवरून मलाही एक कविता सुचली.:)

आठवतं का तुला मी लिहिली होती कोरीच पत्रे
आत ठेवून दिली होती सोनचाफ्याची फुले....

त्यावर तुझं उत्तर आलेले....
अक्शर अगम्य..(पण तेन्व्हा तु साधा शिंकलास तरी वाटायचे कित्ती गोड...!)

आठवतं का तुला माझ्या हट्टापायी आपण दोघे मिळून
वाचत होतो एकच पुस्तक..कुठ्लं बरं... नक्की ना.धो. महानोरांचा कवितसन्ग्रह होता? हम्म नाही आठ्वत आता ..पण दहा मिनिटात तू ढाराढूर... ते आठ्वतय!

आठवतं का पहिल्यान्दा दोघे समुद्रकिनार्यावर गेलो होतो...सुर्यास्त पाहिला होता..मी झालेले "शब्दान्च्या पलिकड्ची.".. तू मात्र हळुच आजुबाजुच्या "प्रतिभा आणी प्रतिमा"न्याहाळत होतास...!

आठवतं का तुला एकदा चिंब पावसात भिजत दोघे घरी आलो...माझ्या केसांवरून मोती ओघळत होते..रेडिओवरती " एक लडकी को देखा तो ऐसा लगा".. ऐकू येत होतं...
आणी तू गावाला फोन लावून तुझ्या आईला सांगत होतास्.."पावसात भिजलो, आल्या आल्या तू करतेस त्या मिरची भजी आठवल्या गं.."!

सांग ना हा ग्रिश्म का शिशिर?
सांग ना रे...हेलो हेलो ...आज काल हे सिलेक्टीव बहिरेपण पण भारी वठ्वतोस बुवा...:)

विशाल मस्त लिहिलय... अजुन काही जुन्या ट्रंका, कपाटं, कप्पे, चोरकप्पे उचकायचे राहिले असतील तर तेही उचकुन जुन्या सापडलेल्या कवीता आम्हाला नव्याने वाचायला टाक इथे Happy

चिमुरीला १००००००००० %अनुमोदन. नाहीतर उगाच दरोडा पडायचं शब्दांच्या सोन्यावर.

प्युअर अन पर्फेक्ट फिलिंग्स !

धन्यवाद सगळ्यांचे Happy
नोरा, सलाम...... Wink अर्थात यावर उत्तर म्हणता येइल अशी कविता आहे माझ्याकडे, टाकेन लवकरच Proud

अर्थात यावर उत्तर म्हणता येइल अशी कविता आहे माझ्याकडे, टाकेन लवकरच << उत्तरांची माळ असेल रे तुझ्याकडे.

उमेश खरोखर बेस्ट ऑफ विशालच चालू आहे.

विशालभौ , जुनं ते सोनं असतं हे खरं आहे हे दाखवून दिलंस.

पण..

कदाचित..
तुझ्या ट्रंकेत पत्रं , लिफाफे , चिठूर्‍या
शेजंन लावून ठेवलेली होती..
म्हणून कदाचित सोन्यासारखी राहीली..
पण तीच्या मनाच्या कोपर्‍यातही
रोज भिजणार्‍या पत्रांची आख्खीच्या आखी ..
ट्रंक असेलच ना..?
तीला कोण उघडणार?

खुप जुनी कविता आहे ही, परवा जुन्या ट्रंका उचकताना सापडली.

>>>

अर्र्र्र्र्र्र्र्र गल्लत झाली माझी .मला वाटलं हीच कवितेची पहिली ओळ आहे. हल्ली काय काहीही खपतं ना कविता म्हणुन प्रामाणिकपणाच्या लेबलखाली . त्याचा प्रिणाम . Wink Proud

पण काय लिवलयस ते आवडलं रे भौ विशाल .

धन्यवाद Happy
नाखु... खरच रे ! या विषयावर एक कविता लिहीली होती मागे माबोवर, बघू तिची लिंक सापडली तर देइन येथे Happy

एक शेर आठवला
तुम जो चाहो तो इन हातोंकी तलाशी लेलो,
मेरे इन हातों मे लकीरोंके सिवा कुछ भी नही

अरे हे आठवतय तेवढच आपल्या हातात , आणी आता तिच्या शिवाय सगळा वैशाख वणवाच!
हे आता कळतय, आणि कविता पुर्वीची आहे, तेव्हाचे भावही खरेच आहेत.
आवडली कविता.

थोडक्यात बराच आशय .... छान
--------------------------------------------------------------------------------------
अवांतर : ग्रीष्म/शिशिर जाऊन
लवकरच प्रेम-वर्षाव होऊ दे ही सदिच्छा. Happy

विशाल.. कविता आवडली रे.. Happy
नोराची कविताही आवडली.. सिलेक्टीव बहिरेपणासाठी अगदी अगदी..

Pages