सावित्रिच्या लेकी ....

Submitted by झुम्बर on 8 January, 2011 - 07:21

"आज पासून पोळ्या तु कर संध्याकाळच्या" आईसाहेबांच फर्मान सुटल आणि अचानक का का का ????? काहूर उठल, अर्थात पोळ्या कारण ही फार मोठी बाब नवतीच मुळी ... पण ज्या कारणासाठी मला हे काम गळ्यात घ्यायला सांगण्यात येत होत ते कारण जवळपास संतापजनक होत... हो कदाचित चाणाक्ष माबो करांनी कारण ओळखल असेलच "जावई शोध " सुरु झाला होता...
अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नवती तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का? तर मला लग्न करायचं होत...
मला एक प्रश्न पडतो ज्या आया शिक्षणाच्या बाबतीत आमच्या नोकर्यांच्या बाबतीत पुरोगामी असतात त्या लग्न ही गोष्ट निघताच १८५७ काळात का जातात? तु कुठेही कमी नाहीस असा लहानपणापासून मनावर ठसवनार्या आया या बाबतीत तु ईथे कमी आहेस आणि तु सुधारायच असा कस म्हणतात?
वयाच्या २३ व्या वर्षी तडजोडीची दीक्षा देण्यात येते ती कशी साध्य होणार? उपवर मुलीनी करण्या सारख्या बर्याच गोष्टी तिचे पालक तिला कानी कपाळी ओरडून सांगत असतात ..हा त्यांचा दोष आहे की आधुनिकता आणि पारंपारिक पणा या दोन्ही दरडींवर पाय ठेवणाऱ्या आपल्या समाजाचा आहे ? उपवर मुलांना तुला लग्नानंतर या गोष्टी करायच्या आहेत हे किती मुलांचे पालक सांगतात? उलट मुलांच्या आई अगदी नाक वर करून म्हणतात आता बायको आली की घे तिच्या कडूनच सगळी काम करून... तेव्हा किती पालक विचार करतात की येणारी मुलगी ही आपल्या मुलाच्याच वयाची आहे आणि त्याच्या इतकीच शिकलेली आणि त्याच्या सारखीच कामाणारी आहे ... तिच्या कडून काम करून घे ,सांगण्या पेक्षा आता तुला तिलाही सहकार्य कराव लागेल हे का नाही शिकवत?
कोणती आई मुलाला किमान चहा करायला शिकवते? बर्याच ठिकाणी चित्र काहीश्या प्रमाणात बदलाल असाल तरी अजूनही अगदी आधुनिक आणि सुशिक्षित कुटुंबातून मुलीना तु मुलगी आहेस म्हणून हे करायचाच आहे हे ऐकवलं जात ... कितीही समानतेच्या गप्पा मारल्या तरी आयुष्याच्या या वळणावर मुलगी ही मुलगीच असते ...आता म्हणल मुलगी आहे तर मुलगीच म्हणणार ठीक आहे हे ,... पण इथे म्हणण एवढ्च आहे की ज्या तडजोडी मुलीला कराव्याच लागतील हे सांगितले जाते तेव्हा मुलानाही आम्ही ज्या तडजोडी करतो त्याची जाणीव असायला हवी ....
कधि नवत स्वयंपाक करनार्या मुलान्च जे कौतुक होत आजहि ..तसच आमच्या नोकरिचहि होउ दे हि माफक अपेक्शा नहिये का?
सावित्रीच्या लेकी म्हणून आज अभिमानानी मिरवतो पण या महत्वाच्या निर्णयाच्या वेळी मात्र तड्जोडिला सिद्ध होतोच न???
स्त्री पुरुश स्पर्धक नहि पुरक आहेत हा आपल्याच पुराणात सान्गितलेला विचार अमलात कधि येणार?

गुलमोहर: 

झुम्बर,
जरी लग्नाआधी कितीही चांगला स्वयपाक करायला शिकलीस तरी लग्नानंतर सासरच्या लोकांना तो पसंत पडेलच ह्याची खात्री नाही. कारण प्रत्येकाच्या घरातील पद्धती वेगळ्या असतात. आणि रेस्टॉरंट मधे मिळणारे नवीन पद्धतीचे पदार्थ खायला नवरा एका पायावर तयार असतो. पण बायकोने केलेला वेगळ्या पद्धतीचा पदार्थ खायची त्याची तयारी नसते.
त्यामुळे तुला मनापासून आवड असेल तरच स्वयपाक करायला शीक.

माझी एक ९० वर्ष वयाची आजी आहे. मला जेव्हा मुंबईत पहिला जॉब मिळाला तेव्हा मी त्यांच्या घरी काही दिवस रहात होते. त्या मला नेहमी संगायच्या की, तू शिकलीस, त्यामुळे तुला software कंपनीत नोकरी करून पैसे मिळवता येतात. तू जर घरातली सगळी कामं स्वतःच करायची ठरवलीस, तर ज्या बायका शिकल्या नाहीत त्यांनी कसे पैसे मिळवायचे?

हे लॉजिक तर कठीणच आहे.ज्या बायका शिकल्या नाहीत त्याना रोजगार मिळावा म्हणून घरातली कामे करायची नाहीत? म्हणजे ते एक बहिणाबाईंची कविता आहे. 'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नान्दते' असे.?(दुसरे एक उदाहरण आहे पण ते इथे प्रस्तुत नाही मला मेल करा सांगेन :))

पण बायकोने केलेला वेगळ्या पद्धतीचा पदार्थ खायची त्याची तयारी नसते.

>>

हाही एक बीएसेनएल चौकाच आहे. अहो नवरे हेच हक्काचे गिनिपिग असतात नव्या पदार्थांचे..
पूर्वीपासून नवर्‍यांनी शिकार करून आनायची आणि बायकानी ती शिजवायची ही कामाची विभागणीच आहे... पाश्चात्य देशात विशेषतः अम्रेरिकेत बेकरी प्रॉडक्ट्स चे फ्याड असल्याने ही स्वैंपाक बायकानी बन्द करण्याची फ्याशन आली. ती इकडे कारण नसताना उचलली. स्वैपाकाला बाई ठेवली तरी ती 'बाईच' शोधावी लागते हे लिम्बूचाचाचे म्हणणे खरेच आहे. स्वैपाक करणे ही महिलांची सहजप्रवृत्ती आहे (आणि खाणे तर आहेच आहे आणि तीही आणखी सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करीत :फिदी:) हाऊसवाईफचे ते भागधेय आहे आणि जॉबवाल्या बायकांना ते नाकारायचा जन्मसिद्ध हक्क आहे ही मांडणी चुकीची आहे...

मी चाणाक्ष माबोकरांमध्ये मोडत नाही, म्हणून काही प्रश्न आहेत
१) जावई शोध म्हणजे वर संशोधन म्हणायचे आहे का? कारण काही लोक "जावई शोध" वेगळ्याच अर्थाने वापरतात.
२) "अभियांत्रिका चा अभ्यास" ऐवजी "अभियांत्रिकीचा" अस म्हणायचं आहे का?
३) सर्व जन १८५७ सालच का वापरत आहात? १८ वे शतक म्हणा किंवा इतर कोणतेही साल म्हणा.
४) बाकी प्रत्येक वाक्यात चुका आहेत, लिखाण प्रसिद्ध करण्याआधी एकदा वाचून घेत जा, नाहीतर कोणालातरी दाखवून घेत जा..

(अवांतर प्रतिसादासाठी सर्व प्रतीसादकांची माफी मागतो)

मी चाणाक्ष माबोकरांमध्ये मोडत नाही, म्हणून काही प्रश्न आहेत>> नितीनजी, फिकीर नॉट! वादाचे सर्व मुद्दे संपल्यावरच टाइपिंगमधल्या,व्याकरणातल्या, इंग्रजी शब्दाच्या वापराबद्दलच्या; चुका उधळायच्या असा इथला रिवाज आहे Proud
स्वैपाक करणे ही महिलांची सहजप्रवृत्ती आहे>> Proud निखळ विनोद म्हणतात तो हा.

>>> स्वैपाक करणे ही महिलांची सहजप्रवृत्ती आहे>> निखळ विनोद म्हणतात तो हा.

आगावा, यात तुला जर विनोद दिसत असेल, तर मग मला तुझ्या "सूप्त परिस्थितीची" चान्गलीच जाणिव होत्ये, अन तुझ्या दु:खात मी सहभागी नाय होत, पण सहानुभूती नक्कीच दर्शवतो! Proud

स्वयंपाक म्हटले की भाजी पोळी दिसते मला. त्यात काये एवढे ? मलाही आत्ता येत नाही, पण शिकता येईल.
ड्रायविंग बद्दल मी थोडाफार लिंबूकाकांशी सहमत..

आमची थोरली "सावित्रीची ल्योक हाय" की नाय ते ठाऊक नै!
(अजुन तिला पोळ्या शिकवल्याच नैत, ती देखिल आवडीने करायला जात नै, आम्हिही आग्रह करत नाही, पण पोळ्या न करणे हाच क्रायटेरिया लावायचा तर कदाचित ती "सावित्रीची लेक" ठरुही शकेल, नै? Wink ) असो
तर विषय असा होता की त्यान्च्या कॉलेजने काल रक्तदानाचे भव्य शिबिर आयोजित केले होते.
सकाळी सकाळी तिने तिच्या आयेला (म्हणजे लिम्बीला) विचारले की रक्तदान करु का! लिम्बी म्हणाली बिनधास्त कर.
रान्गोळ्यावगैरे काढायला ती अन तिच्या मैत्रिणी सकाळपासुनच गेल्या होत्या, सुरवातीचे "मुहुर्ताचे" आठदहान्चे रक्तदान झाले अन ही देखिल तिथे रक्तदानास उभारली, वजन नीट पुरेसे भरले, हिमोग्लोबिन आहे निश्चित झाले, रक्तदानाला सुरुवात झाली, सुरवातीस नस सापडली नाही, बरेचसे दुखले, शिकाऊ डॉक्टर्/जड हाताचे होते, वगैरे वगैरे.
मग हिला बघायला कॉलेजचा सर्व स्टाफ, अगदी प्रिन्सिपॉल बाई देखिल येउन गेल्या!
कारण?
आख्ख्या कॉलेजमधे रक्तदान करणारी अशी हीच एक मुलगी होती!
मागे कुठे तरी मी उदाहरण दिले होते हिच्याच कॉलेजचे. एनेसेस च्या शिबिराला मुली कोणत्या? त्यावरुनचे!
इथे रक्तदानावेळेस तर कहरच! शेपाचशेन्च्या मधे जवळपास दोन अडिचशे मुली असलेल्या कॉलेजात सन्ख्यात्मक केवळ एका मुलिने रक्तदान करावे???
तात्पर्य इतकेच, की बाकी ल्योकिन्ना (अन लेकान्ना पण) "सावित्रीचे" बरेच काही शिकायचे आहे! नुस्ता त्या नावाचा जप करुन काही होणार नैये! नै का?

ठमाश्रीदेवी , आता पोळ्या सोडून नान आणायचे ठरले ना? मग पोळ्याचे काय राहिले. पोळ्या हे सिम्बॉलिक आहे. वुमेन्'स लिब सुरुवातीस आली तेव्हा नाही का पुरुषांना विरोध म्हणून ब्रा फेकून देउन त्या गुलामगिरीची निशाणी म्हणून वापरायच्या नाहीत असे ठरले होते. इथे कुंकू नाकारण्याचेही ठरले होते वाटते. नान हे बंडखोरीचे प्रतीक. बाकी स्त्रीस्वातंत्र्य शब्दही न ऐकलेल्या अरबानी पोळ्यांच्या झंझटातून अरबी बायकांची सुटका करून टाकण्याचे कृत्य खरेच द्रष्टेपणाचे.
तेणें स्त्रीमुक्ती सार्‍या साधियल्या...

आता फक्त चितळ्यांचे नान की काकाचे नान एवढीच चर्चेला संधी...

लिम्बूचाचा आता नान चावण्यासाठी एक 'पेशल' कवळी करायला टाका. नाही तरी तुमचे सगळे पेशलच अस्ते.

आख्ख्या कॉलेजमधे रक्तदान करणारी अशी हीच एक मुलगी होती! >>> हाहा. हसायच का. तुमच्या पोरीने तुम्हाला थाप मारलेली आहे लिम्बुटिम्बु. किंवा तुम्ही तरी . काय राव , आम्ही कॉलेजात होतो तेव्हासुधा- म्हणजे सुमारे १५-२० वर्शापुर्वीदेखिल - मुलामुलिइन्ची सारखीच गर्दी असायची असल्या कार्यक्रमात.

>>>> मुलामुलिइन्ची सारखीच गर्दी असायची असल्या कार्यक्रमात. <<< Lol
काल पण होतीना मुलिन्ची गर्दी, रविवार असुनही, पण ते रान्गोळ्या काढा, चाबिस्किटे आणून द्या वगैरेकरता होती! आतमधे जाऊन रक्तदान करायला नाही!
असो. तुम्हाला थाप वाटली तर वाटूद्यात! मी फ्याक्ट सान्गितली!

एम्यान, काल थोरलीकडून खात्री करुन घेतली बर्का, एकतर तिला थाप मारायची गरज नाही, मला तर त्याहुनही नाही!
तिला तुमची प्रतिक्रिया सान्गितल्यावर ती भडकलीच, म्हणाली घेऊन या कोणे त्याला माझ्या समोर! Proud
असो
रस्त्यावर अ‍ॅक्सिडेण्ट झाला की देखिल ही गर्दी उसळते, त्यातले बघे अन प्रत्यक्ष कृती करणारे यान्चे प्रमाण ओळखु येत नसल्यास अवघड आहे!
पुन्हा असो.
कारण आपण येवढे इथे खरडतोय, पण इथे तरी बघा, येताहेत कुणी लेकी? इथेतर रक्तदान नै ना करायच? Wink

लिंबू,हे तुमच्या लेकीच्या कॉलेजात होत असेल. माझ्या कॉलेजात २५-३० वर्षांपुर्वी रांगोळ्या नसत, हार तुरे नसत अन मुलांच्या बरोबरीने मुली रक्तदान करत होत्या. एका कॉलेजातल्या अनुभवावरुन जनरलायझेशन करु नका.

रक्तदान शिबिरात रांगोळ्या कशाला म्हणे! वेळ, शक्ती, पैसा सगळ्याचा अपव्यय:राग:

येताहेत कुणी लेकी? इथेतर रक्तदान नै ना करायच?

तुमच्या पोस्टींना उत्तरे देण्यात रक्त आटवण्यापेक्षा तेच रक्त दान द्यायला गेल्या असाव्यात बहुदा.

कारण आपण येवढे इथे खरडतोय, पण इथे तरी बघा, येताहेत कुणी लेकी?>>>>>
या वाक्यावरून व विजय यांच्या पोस्टवरुन मला अस वाटत अहे की लि.टि. मुद्दाम भलतेच काहीतरी लिहून मजा बघत आहे.. 'कुणाच्या तरी' प्रतिक्रियेची अपेक्षा होती पण दिलीच नाही असे आहे वाटते. बर. असु द्या मग.

मग मंडळी स्वस्तात नान कुठे मिळतात? मला रोजला लागतील ताजेच. नाहीतर १८९७ काळातल्या पोळी भाजी करणार्‍या बाया कुठे मिळतात? नाहीतर पोळ्या करणारे बापे ही चालतील पण स्वच्छ असतील तर. Proud

लिंबू, नेहमी सारखेच भरकटलेले लिखाण तुमचे. तुमच्या पत्रिकेतला बुध नीच युतीत आहे व गुरु वर कोणाची तरी दृष्टी म्हणून तर असे झाले नाही ना? Wink

बा.जो,
कसे आहात तुम्ही? नान करून दिता का?(हे 'फ्रेंडशिप देती का? अश्या चालीवर म्हणा) Wink

शूनूतै,
तुम्ही इथे सुद्धा... तुम्ही पार्ले बीबीवर जा अन कोण कुठल्या रेसीपीचे श्रेय कोणाला देतो का नाही ह्यावर चर्चा करा. Proud

ध्वनी, नै ग बै, भरकटल नाहीये. फक्त मी इस्पष्टशब्दात मुद्द्याला हात घालत नैये इतकेच!
तरी सन्दर्भ दिला होता पहिल्या पोस्ट मधे, पण जाऊदे
लोक काय? पाचपन्चवीस नैतर शेसव्वाशे वर्षान्पूर्वी "सदाशिव-नारायण" पेठेत काय होत होते अन आत्ता होतय याचे दाखले देऊन आजही "सावित्रीच्या लेकी" सर्वदूर सारख्याच असे ठरवताहेत त्याला मी काय करणार बापडा? माझे अनुभव/अनुभुती जरा जगावेगळीच हे अस म्हणायच अन सोडून द्यायचं! नै का?
असो
बाकी आमच्या आजुबाजुच्या पन्चवीसतिस वर्षान्पुर्वीच्या बहुतेक सगळ्या "सदाशिव-नारायणपेठी लेकी" केव्हाच, पुणेच काय, हा देशच सोडून गेल्यात... वा त्या वाटेवर आहेत - जातिल! Happy आहात कुठ? Wink

अहो, रागवता कशाला मेधातै? मी बघत होते की लोकांना स्वतः भाषणे देणारी लोकं स्वतः किती पाळतात व खरेपणाने वागतात.
रेसीपी कुणाची हा पाठपुरावा घ्यायचे काम आधी मिनोतीताई घ्यायच्या,आता मी घेते इतकाच फरक. तुम्हाला राग येत असेल तर करते बंद.

आता आहे जरासा संशयी स्वभाव त्याला काय करणार...
तुमचा नाहि का टवाळखोर स्वभाव दिसतो पोस्टीतून, आम्ही त्याला काहि बोलतो का?

फुक्कट आरोप करण्यापेक्षा हे बरे ना की समोरासमोर विचारावे.. तुमच्या भाषेत तिथल्या तिथे...

आता आहे जरासा संशयी स्वभाव त्याला काय करणार...
तुमचा नाहि का टवाळखोर स्वभाव दिसतो पोस्टीतून, आम्ही त्याला काहि बोलतो का?

फुक्कट आरोप करण्यापेक्षा हे बरे ना की समोरासमोर विचारावे.. तुमच्या भाषेत तिथल्या तिथे... >> येवढी समोरासमोर विचारायची हौस असेल तर खर्‍या आयडीने विचारा की ! मग कळू दे सगळ्यांना तुमचा स्वभाव !

पहिल्यांदा खरी आयडी म्हणजे नक्की काय ते समजवा मला.
इथे किती जणं स्वतःच्या नावाने येतात तेही सांगा पाहू? मग सांगते तुम्हाला.

खूप राग आला म्हणून एकदम त्याच त्याच जुन्या मुद्द्यावर "खरी आयडी" काढून विषय बदलू नका बाई. Proud
जावू दे.. झाले ना. केली जराशी तुमची गंमत त्यात इतका कसला राग.

Pages