काल आमच्याकडे आलेला पाहुणा !

Submitted by अवल on 6 January, 2011 - 01:22

काल रात्री मी हॉलमधे वाचत बसले होते. अचानक चीssssर्रssss ... ,चीssssर्रssss ... असा आवाज ऐकू आला. दोन क्षण काही कळलच नाही. मग एकदम टुब पेटली.
धावत बेडरूममध्ये गेले तर हे महाशय आलेले. बेडरूमच्या खिडकीत हे बसलेले. चांगले पूर्ण वाढलेले स्पॉटेड औल.
बसले होते तेव्हा चांगले फूटभर उंचीचे दिसत होते. पटकन कॅमेरा घेउन त्याचे स्वागत केले. मग जवळ जवळ तासभर त्याने आमचे घर अवलोकले अन मग गेली स्वारी आपल्या घरी .
उडाला तेव्हा कसला ह्यूज दिसला. पंख पसरले तेव्हा ४-५ फूट वाटला त्याचा पसारा Happy

काल आमच्याकडे आलेला पाहुणा !

काल आमच्याकडे आलेला पाहुणा !

काल आमच्याकडे आलेला पाहुणा !

काल आमच्याकडे आलेला पाहुणा !

गुलमोहर: 

बित्तूबंगा, अरे माझ्याकडे असे वेगळे फोटो खुप आहेत. एक पाय असलेला पक्षी, कबूतराची शिकार केलेली घार, माकडाचे "विचारवंत" पोए Happy

काल मटात वाचलं चिऊ च्या पाठोपाठ घुबडांची संख्याही रोडावतेय आता.. हे प्राणी-पक्षी आता फोटोंमध्येच पाहावे लागणार का पुढच्या पिढीला? Sad

अवल, ३ रा प्रचि सुकि म्हणाला तसा अव्वल!!!

रच्याकने... घरात घुबड येऊ नये चांगलं नसतं असं म्हणतात ते का? अंधश्रद्धा काय???
रच्याकने... मला कोणीतरी रच्याकने चा अर्थ सांगा ना.. बर्‍याचजणांच्या पोस्टीत वाचलेलं म्हणून ढापून लिहीलं Proud

काल मटात वाचलं चिऊ च्या पाठोपाठ घुबडांची संख्याही रोडावतेय आता.. हे प्राणी-पक्षी आता फोटोंमध्येच पाहावे लागणार का पुढच्या पिढीला? Sad

अवल, ३ रा प्रचि सुकि म्हणाला तसा अव्वल!!!

रच्याकने... घरात घुबड येऊ नये चांगलं नसतं असं म्हणतात ते का? अंधश्रद्धा काय???
रच्याकने... मला कोणीतरी रच्याकने चा अर्थ सांगा ना.. बर्‍याचजणांच्या पोस्टीत वाचलेलं म्हणून ढापून लिहीलं Proud

मस्त.

घरात घुबड येऊ नये चांगलं नसतं असं म्हणतात ते का? अंधश्रद्धा काय???
>>> नक्कीच अंधश्रद्धा Happy सहसा घुबड मानवी वस्तीत फारसं येत नाही. त्यामुळे ते आलच तर ते जरा वेगळे ना म्हणून असावं Happy
धन्स मित्रमैत्रिणींनो. घुबडाच्या फोटोला "वा छान" असं म्हणणारे ही जरा कमीच नाही का Wink

मस्त... मी राष्ट्रीय छात्र सेनेत असताना पहाटे उठून जेंव्हा जात असे तेंव्हा पहाटे ४-५ च्या सुमारास एक घुबड नेहमी माझ्या घरा समोरच्या विजेच्या खांबावर बसलेले असायचे. अनेकदा त्याला तिथे पहिले आहे. एकदा त्याच्या बरोबर २ पिल्ले सुद्धा दिसली होती. मग मी घर बदलले.. आता आमच्याकडे चिमण्या येतात.. भूर्र..भूर्र.. करत सर्वत्र बागडत असतात. त्यांच्यासाठी हे असे घर बनवून ठेवलंय... Happy राहायला जागा आणि फिडर म्हणून एक जागा..

काही देशांमध्ये घुबड लक्ष्मीचे प्रतिक मानतात. त्यामुळे आपणही तेच मानुन खुश्शाल घरात येऊ द्यावे.
नव्या मुंबईत खुप आहेत घुबडे. संध्याकाळच्या वेळेस वटवाघळे आणि घुबडे खुप दिसतात. आपण त्यांच्या जागांवर अतिक्रमण केलेय. कधीमधी त्यांना वाटले जुन्या जागी जरा फिरुन यावे तर तेवढी सुट द्यावी आपण.. Happy

बरोबर आहे साधना... प्रत्येकाने स्वतःच्या तेरेस / खिडकी मध्ये एक टोप भरून पाणी सुद्धा ठेवावे... पक्षी घरात येतात याचा मला तर भारीच आनंद होतो... Lol

साधना अगदी अगदी Happy
योगेश अरे मलाही आवडत नाहीत ती. पण काल खुपच वेळ त्याला खुप जवळून पाहात होते तर ते चक्क गोंडूस ( माझ्या लेकाचा शब्द ) वाटले मला. Happy कधी ते उंदरासारखे दिसत होते, तर कधी नागाच्या फण्यासारखे तर कधी संभावित साधू सारखे Happy

पभचे नेस्टबॉक्सेस बघून आठवलं!

नाशिकला महम्मद दिलावर नावाचे पक्षीप्रेमी गृहस्थ आहेत. चिमण्यांची रोडावत जाणारी संख्या या विषयावर त्यांचा जागतिक पातळीवर विशेष अभ्यास आहे. त्यांची वेबसाईट इथे पाहायला मिळेल!

त्यांच्याकडे पक्ष्यांसाठी लाकडी नेस्टबॉक्सेस, हँगिंग फीडर्स देखिल विक्रीस उपलब्ध आहेत. काही महिन्यांपूर्वी मी एक नेस्टबॉक्स आणि एक फीडर कुरीयरने मागवले होते. भरपूर चिमण्या त्याचा लाभ घेत आहेत Happy

अवल, घुबडांचे फोटो आणि प्रत्यक्षही खूपदा पाहिली. पण तिसर्‍या फोटोप्रमाणे 'प्रोफाईल' अजून पाहिले नव्हते. मस्तच आहेत फोटो.

मुंबईत २००६ साली लोकलमध्ये बॉम्बमालिका झाली तेव्हा माझ्या कंपनीने सर्वांना सुरक्षित घरी जाण्यासाठी म्हणून बसची व्यवस्था केली होती. रात्री अकराला या बस फेर्‍या मारायला सुरू झाल्या. आमच्या बसमध्ये बसायला आम्ही बसकडे निघालो तेव्हा बसच्या पुढच्या काचेवर एक भले मोठे घुबड निवांतपणे बसले होते. नंतर त्याला हाकलून लावले. पण काही महिलांनी त्या बसने प्रवास करायला नकार दिला.

Pages