नॉस्टेल्जीया

Submitted by shashank pratapwar on 2 January, 2011 - 09:33

या अनाथ भकास आभाळाला सुचत असेल का एखादे गीत ? त्याच्या अर्धमिटल्या डोळ्यात तरळतो फिकटसा नॉस्टेल्जीया.पण रानातली सगळी झाडे त्या करड्या अंधुक प्रकाशात एकत्र उदास होतात.काहीतरी निसटत चालल्याच्या थंड अनोळखी गहिवरात.अचानक त्याच्या निबिड चेहर्‍यावरचे भाव स्पष्ट होउ लागतात.
फांदीवर सुस्त बसलेल्या चिमणीच्या डोक्यावर काही थेंब पडतात.मग माझे अर्धवट अस्तित्व
पुर्ण जाणवण्याआधीच मी खिडकी लावुन पाठमोरा होतो.डोळे घट्ट मिटुन.
अचानक मनात उमटतात चर्च ऑर्गनचे शापित स्वर आणि मला मी तारकोव्हस्कीच्या सिनेमातील पात्र वाटायला लागतो , आरंभ आणि अंत नसणारा शोध घेणारा.अशी मेटाफिजीकल संध्याकाळ मला नविन नाही पण स्वतःला ज्याच्यामधुन सोडवायचय ती गुंतवळ अजुनही सापडत नाही.

गुलमोहर: 

स्वतःला ज्याच्यामधुन सोडवायचय ती गुंतवळ अजुनही सापडत नाही.>>>
ह्यांना काय सांगायच काय आहे हे ह्यांनाच कळत नाही.....:हाहा:

छान. पण जरा छोटे आहे हो. यावर अजून बरेच संस्करण/काम राहिले आहे का?
तारकोव्हस्की आणि चर्च ऑर्गन सारख्या उपमा आल्या तेव्हा जरा खट्टु झाले. माफ करा पण किती लोकांनी खरंच चर्च ऑर्गनचे सूर अनुभवले असतात?

ए गपा रे.... तुम्हाला काही कळत का?
असच काहीतरी दुर्बोध "ग्रेस"सारख्यांनी लिहल तर न कळूनही "वाहवा वाहवा" करत फिराल.... आणि याला मात्र नावं ठेवताय? Wink

छान