खा गये ना धोखा !! (इन्स्पेक्टर, क्ल्यू दिलाय - भाग २ )

Submitted by Kiran.. on 1 January, 2011 - 13:30

( हा भाग वाचण्याआधी आधीचा भाग इथं वाचावा
http://www.maayboli.com/node/22326 )

दादा माझी डायरी वाचतो.

आधी लपून. आता माझ्यासमोर.

मग फोनवर बोलत बसतो.

डोक्टरांशी बोलत असेल..

एकदा मी रिडायल केला होता.. घारी होती पलिकडं. मग पटकन ठेवून दिला.

माझ्या आत्महत्येचा किस्सा वाचून दादा घाबरला असेल.. पण तसं काही दिसलं नाही. घारीचा फोन आला होता. रात्री उशिरा डॉक्टरांचा फोन आलेला.. मीच घेतला होता आणि दादाला दिला होता.

डॉक्टर मला गूड नाईट म्हटले.

दोन दिवसांनी दादा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. माझी डायरी त्यांच्या टेबलवर होती.
दादाचं काम

याला ना काही कळत नाही.
छे

त्यात इन्स्पेक्टर जाधवांचं नाव आहे. तो माणूस खरा आहे..

हे माझ्या प्लॅनमधे नाही रे दादा

खूप काम वाढवलंस तू.

डॉक्टर आणि मी एका खोलीत होतो.

ते गप्पा मारत होते.
श्वास घे म्हणाले. श्वास सोड
श्वास घे. श्वास सोड..

काय नाटक आहे ?

परत तेच..

आता डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास..
मी बघतो ना रामदेव महाराजांना.

हे पण बघत असतील.

यांना माहीत नाही..

बरं आता ?

श्वासावर लक्ष केंद्रीत करायचं..

बरं तर बरं

श्वासावर,,

विचार झटकायचे सगळे ?

यांना कसं कळलं ? माझ्या मनात आत्ता खूप विचार आहेत..
नाही झटकणार..

पण मग श्वासावर लक्ष जात नाही..

श्वास..आत येतोय

वेगळं वाटतंय

कलकलाट थांबला..

डॉक्टरांचा आवाज येतोय.

या श्वासाशिवाय काहीच नाही दुनियेत. सगळं विसरा.

विसरलो..

भान गेलं माझं

"डोळे बंद करा..माझा आवाज येतोय ?

कॉन्सनट्रेट ..

डाव्या हाताचा अंगठा हलवा. "

ओह .. मला डाव्या हाताचा अंगठा आहे.. तो हलवायचाय.

आदेश गेला. अंगठा हलला. आता आवाज आणि अंगठा.

"गूड !"

"ढ !!! नाही का ?.. नाही ..सचिन..!!"

" शाळा का सोडली ?"

"मला काढलं शाळेतून.."

"का काढलं ?"

" लक्ष नव्हतं ..! "

" तुझं शाळेत लक्ष का नव्हतं ?"

" माझं लक्ष नव्हतं.."

" का नव्हतं ?"

" माझं... अं...माझं... लक्ष नव्हतं.."

"काही विशेष घडलं होतं ?"

" अं... थोडं.. नाही.. नाही आठवत "

"घरी कोण कोण असतं "

" मी आणि दादा..!"

" आणि आई बाबा ?"

" आई गं...!! "

" रिलॅ़क्स.. काय होतंय ?"

"अ अं ..आह "

"आई....आ ..आ..ई "

"आठव बेटा "

" आई बाबा देवाघरी गेले "

" कसे गेले ?"

" मी शाळेत गेलो होतो. शाळेतून घरी आलो तर..
घरात माणसं होती. आई बाबा झोपलेले होते पांढ-या चादरीत. घरात खूप पाणी होतं... पोलीस पंख्याचे आणि तुळईचे फोटो घेत होते. त्याला दो-या बांधल्या होत्या "

" अजून आठव बेटा "

"आई गं !! नको.. सोडा मला ..सोडा "

" आठ्व प्लीज "

"सोडा मला ..सोडा "

" ओके. शांत हो बेटा"

"श्वास घे..
रिलॅक्स.
पायाचा अंगठा हलव..
आता दुस-या पायाचा.
दोन्ही अंगठे हलव.
गूड ..
गुडघ्यापासूनचे पाय हलव.

वर मांड्या आहेत.. जाणीव होऊ दे. पोटाची जाणीव कर. श्वास घे. पोट आत गेलं.. बाहेर आलं.

डावा हात हलव. संपूर्ण हलव..
आता उजवा हात..
उठ उभा रहा..

सगळं शरीर हलव. संपूर्ण शरीराची जाणीव होऊ दे..
श्वासा कडे आता लक्ष देऊ नको. डोळे उघड .

बाहेर ये !!"

मला माझ्या शरीराची जाणीव झाली होती.. यानं श्वासाच्या सहाय्यानं मला संमोहीत केलं होतं. जड पणा आला होता. जरा रिलॅक्स व्हावंस वाटत होतं.

मला सगळं आठवत होतं.
सगळंच..
संमोहनाच्या अंमलाखाली
संपूर्ण अंमल तरी कुठं होता ?

माझा विरोध होता ताब्यात जायला.

सगळं कुठं सांगितलं होतं ?

आई बाबा कसे मेले ?

कि त्यांना मारलं होतं..

कुणी ?

कदाचित मला ते माहीत होतं...!!!!

आत्ता आठवलं होतं.
पण मी सांगितलं नव्हतं.

इन्स्पेक्टर जाधव आले होते. मला खूप प्रश्न विचारत होते.

मी अबोल झालो होतो.

बर्फाच्या लाद्या.. बर्फाच्या लाद्या

सगळे सारखे बर्फाचा उल्लेख करत होते.

आई बाबा मेले होते का ?
मग त्यांना आता बर्फाच्या लादीवर झोपवणार असतील..

नाही नाही.

हे खोटे विचार आहेत.
हे वरवरचे आहेत.

खोलवरून काहीतरी वर येतंय

त्याला दाबायसाठी हे बाह्य आवरण आहे.

ते तुटलं

मघाशी ...

पायाखाली लादी घेऊन आत्महत्या !!

जाधव म्हणाले. इन्स्पेक्टर जाधव.

सारखे येत होते त्यानंतर.

दादाचं सात्वन करायचे.

मग काही दिवसांनी धमक्या द्यायचे.

दादा पाया पडायचा.

मला राग यायचा त्यांचा..

दादा एकदा त्यांना खूप पैसे देऊन जा म्हणत होता. निघून जा म्हणत होता..

मग सगळच गुंता होता.

मी ढ झालो.

शाळा सुटली.. आम्ही इथं आलो.

दादा आणि मी.

तेव्हां मी खूप लहान होतो. आता नाही.

माझा सतरावा वाढदिवस पण झालाय. ..आता या वर्षी खूप मोठा वाढदिवस करायचाय.
सगळे येणार आहेत...वकीलकाका पण येणारेत..
लहानपणी चॉकलेट देणारे...

बाबांच्या मी मांडीवर असायचो. वकीलचाचा रोज यायचे.

केव्हढं मोठं घर होतं..
नोकर चाकर होते. गाड्या होत्या.
बाबा होते. दिवाणजी होते, आई होती
आणि मी होतो..!!

आणि दादा ??

तो कुठं होता ? आठवत कसा नाहि ? कि मीच होतो ...फक्त मीच होतो ?

.............

माझी डायरी परत आली होती.

कशी गंमत केली होती ?
बर्फाची लादी.. किती जुनी ट्रीक ना ?
आणि माझ्या आयडियाज लिहील्या असत्या तर ?
नाही पण मला तेच तर लिहायचं होतं.

बर्फाची लादी.

मला आठवलेलं ते !
जे विसरलो नव्हतो मी कधीच !!

काचेवर धूळ जमा व्हावी तसं धूसर झालं होतं फक्त. पण ते इथंच होतं. अंतर्मनात.

खरं तर मी शाळेत गेलो होतो. पण त्या दिवशी लवकर घरी आलो होतो.
मी आईला मला शोध म्हणालो होतो..

मग मी आई गं म्हणालो..
मग डॉक्टरांनी बास केलं.
...................

दादा आता खूप काळजी घेत होता.
माझ्या रूमची आतली कडी काढली होती.
लॅच बसवलं होतं.

एक चावी त्याच्याकडं होती.

माझा आवाज नाही आला कि तो लॅच उघडून आत यायचा.

काय बघत होता ?

मी आत्महत्या केली कि नाही ?

वेडाच आहे..

तो वेडा.. ते डॉक्टर वेडे.. इन्स्पेक्टर जाधव वेडे !

मी वेडा नाही..

.....................

रूमला लॅच बसलं हे चांगलं झालं.

मी डायरीत आता सगळं लिहीत नाही.

डॉक्टरांना पण सगळं सांगितलं नव्हतं..

इन्स्पेक्टर जाधव भेटायला पाहीजे. मला पोलीसांचा राग आहे. पैसे घेतात.

त्यांची पळापळ करायचीय.

......

दादा आवाज देत होता.

घाई करायला हवी . दादा लॅच मधे की सरकवत होता.

हा असा दोर ओढला. ही मारली गाठ आणि अडकवला गळ्यात..

लॅच की चा खट्ट आवाज

मी खुर्चीला लाथ मारली.

आणि दादा आत घुसला. माझे पाय उचलून धरत ओरडत होता.
एका पायाने खुर्ची ओढत होता. माझा अवजड देह उचलून धरताना त्याचा श्वास फुलला होता. मग खुर्चीच्या पायावर पाय मारत त्याने खुर्ची सरळ ओढली..

आणि खुर्चीवर चढून माझ्या गळ्यातला दोर काढला. मला घट्ट धरलं आणि शांत उभा राहीला. त्याचा श्वास फुलला होता..

दमला होता.

माझ्या हातात मोजे होते.
दादा थकलेला होता. मी त्याच्या हातातून गाठ घेतली आणि त्याच्या गळ्यात घातली आणि उडी खात खुर्चीला लाथ मारली !!

दादा च्या चेह-यावर क्षणभर अविश्वास आणि मग तो लटकायला लागला.
त्याचे डोळे मोठ्ठे होते होते.

आता त्याची जीभ बाहेर येईल
असंच होतं
बाबांचं पण असंच झालं होतं
मग आई आत आली तेव्हा तिला धक्का बसला होता..

चांगले पांग फेडलेस असं म्हणेपर्यंत तिची पण अशीच अस्वथा झाली होती.

मला आठवलं आता ते

आता पाणी ओतायचंय खूप.

मग दार लावून घ्यायचं.

हॉलची फरशी साफ करायची.

सगळीकडं दादाचे ठसे असतील.

वर गच्चीवर मोठे बूट घालून गच्चीवरून बाल्कनीत दोरही सोडलेला होता. पोलीस चक्रावणार होते. बाल्कनीचं दार बंद होतं.
बेडरूमला लॅच होतं

बाबांच्या बेडरूमला होतं तस्सं..!!

आता चावी फेकायला जायचं होतं..
आता घारी येणार होती. मी ऐकलं होतं पॅरलल फोनवर.

मग बाहेरून फोन करायचा.
घारी फोन उचलेल..

बँकेच्या लॉकरची चावी खिशात टाकून मी बाहेरचा रस्ता धरला. कुणीही मला पाहणार नव्हतं हीच वेळ होती. ये जा कमी असण्याची. मुद्दाम निवडली होती.

डायरी मेजावर ठेवली होती...ती खिशात टाकली

मला प्रश्न विचारले जाणार होते. ते मला आधीच माहीत होते.

मला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायचं होतं. त्या आधी बॅंकेच्या बाहेरून पब्लिक फोनवरून फोन करायचा होता. ..

( पुढचा भाग सावकाश :))

गुलमोहर: 

ओह.... 'ढ' ने बारीकसारीक शक्यता ही लक्षात घेतल्या आहेत....जवळ जवळ फुल्प्रूफ बनवलीय योजना.

चावी फेकायची,बाहेरुन फोन करायचा... जो घारी उचलेल...

गूढ हे आहे की दादावर राग का? १७ व र्षाचा होई पर्यंत दादा कसा आठवत नाही 'ढ'ला...?

दादाने इस्टेतीसाठी आईबाबांचा खून करुन ती आत्महत्या भासवली आहे ( बर्फाची लादी पायाखाली घेवून गळफास )... हे 'ढ'ला ज्ञात असल्याने त्याचा दादा वर राग आहे व त्याने तो दादाचा तश्याच प्रकारे खून करुन शांत केला आहे.... अ‍ॅम आय करेक्ट्?की एसीपी मामी येईपर्यंत थांबावे... Uhoh

रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी, मस्त ट्वीस्ट हं! खुपच आवडली.

वकीलकाका येणारेत म्हणजे इस्टेटीसंबधी कागदपत्र तयार होणार. 'ढ' १७ वर्षांचा झालेला आहे म्हणजे दादा कदाचित १८ चा झालेला आहे. त्यामुळे त्याच्या नावावर इस्टेट करणार असतील. आणि ही बोलणी ऐकल्यामुळे 'ढ' ला दादाचा राग आलाय आणि काटा काढायचाय.

रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी Happy
हे नाव आहे होय. मी खूप वेळ विचार केला होता या नावावर काय असु शकेल याचा...
मामी तुसी ग्रेट हो

.
रिन्हाभिंतुंला कोड डिकोडेड... !!!
मामी ग्रेटच आहे.. उगीच एसीपीमामी नाव नाही ठेवलं Happy

मला वाटतं दादा हा सख्खा भाऊ नसून 'ढ'च्या आईबाबांचा मानलेला मुलगा असावा. त्याने धोक्याने आईबाबांचा खून करून ती आत्महत्या असल्याचे भासवले. 'ढ' त्याच खोलीत लपलेला होता आणि त्याने हे सगळे बघितले होते.
आता 'ढ' चा १८वा वाढदिवस असेल आणि तो १८ वर्षाचा झाला की इस्टेट त्याच्या नावावर होईल. त्यामुळे, दादा त्याचा काटा काढायच्या मागावर असेल. त्याला वेडा वगैरे ठरवून. म्हणून आता ढ त्याच पद्धतीने दादाचा खून करणार. मग घराबाहेर पडून बाहेरून फोन करणार, तो घारी उचलेल, म्हणजे दादाच्या मृत्युच्या वेळी तो घरी नव्हता हे सिद्ध होईल आणि त्याच्यावर संशय येणार नाही. Happy

डॉक्टर, एसीपीमामी आणि प्राची...

मस्त भर टाकताय.. आवड्या !!

माशाचा डोळा फुटला तर इथंच समारोप करावा म्हणतो.. नाहीतर आहेच तिसरा भाग !!

बापरे... काटच आला वाचून... मस्त जमलीय.
आधी जरा भीत भीतच वाचायला घेतली... पण मस्त गुंगवून टाकलत Happy
आवडली Happy

मित्रांनो ..आभार !

सांज
अरे मित्रा सहज टाईमपास म्हणून लिहीलं रे.. मतकरी म्हणजे मा़झ्यासारख्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे.

माझ्या मते 'ढ' मनोरुग्ण तर आहे पण कदाचित त्यामुळेच त्याच्या बुद्धीला एक तिव्रता लाभलीय. त्याच्या राग दादावर नाहीये, त्याचा राग आहे तो पोलीसांवर कारण त्यांनी दादाला खुप हैराण केलेले आहे.
मुळात आई-बाबांचा खुन देखील 'ढ'नेच केलेला आहे. त्यावेळी दादाने आपली सगळी ताकद पणाला लावून त्याला पोलीसांच्या तावडीतुन सोडवले आहे. पण त्यामुळेच ढ चा पोलीसांवर राग आहे, त्यांची पळापळ पाहणे त्याला विलक्षण सुख देतेय. (दादाने त्याला वाचवायचे कारण कदाचित आई-बाबांनी आपली संपत्ती ढ च्या नावावर केलेली असु शकते, वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे तो त्याच्या सख्खा भाऊ नसावा) Happy

सॉलीड ट्विस्ट आहे राव ! हम तो फॅन हो गये आपके !! मंडळात स्वागत आहे देवा Happy

उथळ पाण्याला खळखळाट फार ...... Proud
बाप्रे म्हणी भरपूर आहेत त्यामुळे आयडी पण बरेचदा बदलता येतील.

Pages