ज्याचा त्याचा कॅलिडोस्कोप

Submitted by नोरा on 30 December, 2010 - 01:22

पिल्लू घरी येतो ते नाचतच.त्याच्या शाळेतल्या बाईं त्याला फार आवडतात आणी शाळेतल क्राफ्टही.काय काय गम्मत असते ती त्याच्यासाठी!कधी रंगवलेली चित्रे तर कधी मण्यान्च्या माळा,कधी पेपरच्या पपेटस तर कधी स्टीकर्स. ते सगळ आपण स्वतः तयार केल्याचा अभिमान त्याच्या इवल्याश्या मनात भरुन रहिलेला असतो.मग ते कागदाचे विमान असल तर सगळ्या घरातून उडत्,मण्याच्या माळा आईच्या गळ्यात पड्तात्.सगळ्या भिन्तीवर मग मॉडर्न आर्ट चे प्रदर्शन भरते.

मग हळू हळू सगळ्या गोष्टी जुन्या होतात्,नव्या नव्या कलाकुसरी घरात येतच रहातात.------पिल्लुची आई हळूच त्या जुन्या गोष्टी कचर्यात टाकून देते!एक दिवस पिल्लुला भिंतीवरचा डायनासोर गायब झालेला दिसतो. मग कितितरी वेळ शोधून झाला कि त्याला आईचा संशय येतो.मग रडण्,रागावण,माझा डायनो ट्रॅश मध्ये टाकलास म्हणुन रडारडीची माफकशी एकांकिका सादर होते. आई त्याला हसते, आणी त्याला नकळता आणखी चार कलाकुसरी कचर्‍यात फेकून देते! काय उपयोग आहे या सगळ्याचा,नसता पसारा...आई विचार करते. काही कळत नाही पिल्लुला ...कधी मोठा होणार रे तु पिल्लू,म्हणून रुसलेल्या पिल्लुला गोड पापा देते.

एकदा पिल्लू शाळेत कॅलिडोस्कोप बनवतो.आता चार वर्षाच्या मुलाने बनवलेला कॅलिडोस्कोप जसा बनायला हवा तसाच तो बनलेला असतो. पण पिल्लु मात्र नेहमीसारखाच जाम खूष असतो त्या नव्या खेळण्यावर! त्याला त्यात इतके सुन्दर आकार,डिझाइन्स बघताना खूप मज्जा वाटत असते. घरातल्या सगळ्यान्ना तो ते बघायलाच लावतो. आई कामात असते,ती त्याला ओरडते.मग बघीन ह आता,जा खेळ जा चल म्हणुन कटवते.

दुसर्या दिवशी केर वारे करताना ,पिल्लुचा कॅलिडोस्कोप केरात्.बाई ग आज नको टाकायला उद्या टाकू ती स्वतःशी उदगारते.
पिल्लूला शाळेतून पिक अप करते, आणि भाजी आणायला बाजारात जाते.बाजारात एक फुगेवाला असतो.त्याच्याकडे छान छान फुगे असतात्.रंगीत रंगीत! पिल्लू जाम एक्साइटेड् असतो...त्याचे डोळे विस्फारलेले...त्या फुगेवाल्याच्या काठीला बान्ध्लेले फुगे हवेत छान डोलत असतात. पिल्लू भान हरपून त्या फुग्यान्च्याकडे पहात असतो...आता आजुबाजुची गर्दी,माणसे,बाजार ..यातल त्याला काहिही दिसत नसत. फक्त तो आणी ते फुगे. एवढ्यात त्याची आई फुगेवाल्याला पास करून पुढे चालत जाते.पिल्लू भानावर येतो, आई कडे रागाने बघतो. आईचं लक्श फुग्यान्च्याकडे अजिबात नसते. ती कसल्यातरी घाईत असते.पिल्लूचा रामबाण उपाय तो लगेच अमलात आणतो.चार चौघाना ऐकू जाईल अशा आवाजात "फुगा............" म्हणुन ओरडतो.(घरात जास्तीचा गुलाब्जाम हवा असेल तर तो आईला गोड पापा देतो, शाळेत जायचे नसेल मनात तर पोटात दुखते म्हणुन सान्गतो...थोड्क्यात वेगवेगळ्या प्रसंगानुरुप त्याच्या स्ट्रॅटे़जीज ठर्लेल्या असतात!) आई जरा बिचकते,रागवुन बघते, पण हा काही बधत नाही. तो आता जवळपास रस्त्यात बसेल कि काय अशी चिन्हे दिसतात्.मग आई मुकाट्याने फुगे घेते. दोन दोन फुगे...पिल्लू हसतो.

त्याचे स्वपनाळू डोळे चमकतात्.किती वेळ मग तो फुग्यातच रमतो.एव्हाना आईची भाजी खरेदी आटोपते. बरं झालं ,या फुग्यान्च्या नादाने हा शान्त तरी राहिला;अस तिला वाटून जात्.रस्त्यात त्याची बड्बड चालू असते.आई च लक्श नसत्,ति त्याला "हो रे,हो रे' करत असते.
रिक्शात तो अगदी फुगे साम्भाळून बसतो. निट घरी आणतो. आत्ता त्याला मोकळ वाट्त्.तो अन्गणात मनसोक्त फुग्यांशी खेळतो. एवढ्यात एक फुगा हातातून निसट्तो.आणी वर वर आकाशात जातो. पिल्लु ते मान वर करून अनिमिष पहात रहातो.. आई पिल्लू कडे बघत रहाते.. आता हा भोकाड पसरणार म्हणून्....पण तिला त्याच काही कळत नाही ..पिल्लू दुसरा फुगा हातात घट्ट धरतो..आणी मग चक्क स्वतःच दुसरा फुगा आकाशात सोडुन देतो.. ...'काय नतद्रष्ट आहेस रे" आई खेकसते...तो मात्र त्या वर जाणार्‍या फुग्यान्च्याकडे टक लावून्...आई पण आकाशाकडे बघते...एवढ्यात पिल्लू म्हणतो ..."आई बघ ना निळ्या निळ्या आकाशात ,लाल लाल फुगे...." आई चमकते...आता तिला ते निळ आकाश भेट्त्...त्यातले लाल फुगे पण... ती पहात रहाते मान वर करून्... निळ्या निळ्या आकाशात लाल लाल फुगे... कितीतरी वेळ ...

.............................................................(आधारीत)

गुलमोहर: 

सहीये.
.............................................................(आधारीत) ? कशावर आधारीत?

आवडलं. Happy

स्वतःचा जीव जडलेल्या वस्तु आई केरात भिरकावते म्हणून रुसणारे पिल्लू आणि फुगा मात्र आकाशात गेला तरी जाताना बघायला आवडणारे पिल्लू अशी पिल्लूची दोन्ही रुपे भावली. Happy

धन्यवाद मंडळी. लहानपणी म.टा.मध्ये एका रशियन कथेचा अनुवाद वाचला होता.त्यात वाचलेले "निळ्या निळ्या आकाशात लाल लाल फुगे " क्लिक झालेले.त्यावर आधारित आहे. शिवाय घरात आजुबाजुला चालती बोलती "पात्रे" आहेतच! Happy