या आपुल्या मायबोलीवर

Submitted by पुरंदरे शशांक on 30 December, 2010 - 00:33

सर्व कविवर्य, आदरणीय समीक्षक व रसिकांना,
कोणाविषयी आकस न ठेवता हे मांडले आहे. - हे वास्तव का अवास्तव - सुज्ञासि सांगणे न लगे. कृपया कोणी फार (?) मनाला लावून घेणार नाही अशी आशा करतो.

सर्व साहित्यकृतींना वाव देणारे - मा बो हे फार उत्तम व्यासपीठ आहे अशीच माझी धारणा आहे.

अवचित येती जुन्याच कविता उसळुनिया पहिल्या पानावर
प्रतिसादाने घडते जादू इथेच अपुल्या मायबोलीवर

पहिल्या पानासाठी झुंजी कलमबहाद्दर सरसावुनि उठले
रामायण घडतसे कधी तर महाभारती कोणी पडले

उदंड कवी समीक्षकही उदंड ते, रण येथे का सतत पेटले
अवचित कोणी रसिक कवी तर चांदणसुख पेराया झटले

समाजातले प्रतिबिंबचि का मायबोलीवर सहज प्रकटले
निरखुनि घेउ मुखतरी आपुले आज रडविले का ते फुलले

शब्दखुणा: 

अजब आहे 1 पण पोस्ट नाही खरे बोललेले पचत नाही वाटते नाही त्या टुकार रहस्यकथेला ढीगभर पोस्ट देतात असो...... तुम्ही जे लिहिलय ते खरे आहे

व्वाह छान आहे.

उदंड कवी समीक्षकही उदंड ते, रण येथे का सतत पेटले
>>>>>
???:)