जर्मन आख्यान दास्ताने फुट बॉल वल्ड कप भाग १

Submitted by निनाद मुक्काम प... on 28 December, 2010 - 23:52

मला माझे मन परत भूत काळात घेऊन जात आहे . विश्व चषक तोही फुट बॉलचा .बाकी आता वाट पाहतोय ती २०११ ची माझा आणि माझ्या जर्मन पत्नीमध्ये दोन राष्ट्रात होतात तसा एक द्विपक्षीय अलिखित करार झाला आहे .फुट बॉलच्या स्पर्धेत मी जर्मनीला पाठिंबा द्यायचा (माझा जर्मन सासरा एकेकाळचा नावाजलेला फुट बॉल पटू /कोच / रेफ्री व सध्या निवृत्तीनातर स्वताच्या क्लब साठी काहीना काहीतरी करत असतात .) त्या बदल्यास तिने क्रिकेट च्या विश्व चषक स्पर्धेत हिंदुस्थानला पाठिंबा द्यायचा .(आमच्या दोघांचेही पाठिंबा देतांना तिला क्रिकेट व मला फुटबॉल ह्या खेळाविषयी फारशी आवड नाही आहे .)
बाकी लंडन मध्ये शिकत असताना माझा एक मित्र अचानक फुट बॉलच्या प्रेमात पडला मी मँचेस्टर युनाटेड ला पाठिंबा देतो असे उगाच जाहीर रित्या सांगत सुटायचा .मी त्याला विचारले अरे गधड्या मँचेस्टर नक्की कुठे आहे हे तुला नीट माहित नाही .उगाच काय लावले आहे .त्याने काकुळतीला येऊन सांगितले. अरे येथे सगळेच फुट बॉल चा जयघोष करतात .क्रिकेट बद्दल बोलतही नाही .मग मी पण चालू झालो मी कपाळाला हात मारला . मी मात्र कोणी विचारले कोणत्या क्लब ला पाठिंबा देतो .तर मी चक्क सांगतो मुंबई इंडियन (अर्थात सचिन असे पर्यत ) का नाही .आज कौंटी खेळणारे जगभरातील क्रिकेटर भारतात येतात .श्रींमत होतात .मागे वाचले होते त्यांच्याहून श्रीमंत फक्त अमेरिकन बास्केट बॉल च्या लीगचे खेळाडू आहेत .मुंबईकर असल्याने मला क्रिकेट आवडते .फुट बॉल नाही उगाच ओढून ताणून मला ह्यातले कळते वगैरे प्रकार मी केले नाही .कदाचित माझा हाच प्रामाणिक पणा माझ्या सासर्याला आवडला .असो .
तरी मी फुट बॉल चे सामने पाहायला जातो कधी सासर्या बरोबर तर कधी बायको सोबत .कारण मला आवडते ती तेथील प्रचंड गर्दी अलोट उत्साह व सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याची शिस्तप्रिय क्रीडाप्रेमी समाज तेथे एकवटला असतो .वाद्यवृंद तसेस धमाल मस्ती व रोमहर्षक व काळजाचा ठोका चुकवणारे क्षण व त्या साक्षीने किती तरी रिचवले जाणारे बियरचे मग हे प्रत्यक्ष अनुभवण्यात लई मजा असते .सगळ्यात महत्वाचे म्हणजे क्रिकेट सारखे हे सामने प्रत्यक्ष पाहताना भले मला वाटले जर्मनी जिंकावे .व तरी चुकून ते हरले तरी उगाच काळजाचे पाणी पाणी होत नाही .एक धमाल मस्ती करण्यात काही तास निघून जातात .(आपल्याकडे नाही का. क्रिकेट कळो न कळो चेहर्याला रंग रंगोटी करून अनेक लोक ड्रेसिंग रुमच्या बाजूच्या स्टेंड मध्ये बसून बियर/ वाईन प्राशन करत गप्पा गोष्टी करत अधून मधून क्रिकेट पाहतात ..तसेस माझेहि आहे .
.ह्या वेळची विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होती .शकिरा ताईने आग्रहाचे आमंत्रण आपल्या नृत्य व गायनातून आम्हाला दिले असले तरी प्रवास व तेथे निवास ह्याचा अवाजवी खर्च मला फकीरा (शशी कपूर फेम ) बनवायला कारणीभूत ठरला असता .म्हणून जर्मनीतून जर्मनीला पाठिंबा द्यायचे ठरले .आमचे कुटुंबाकडून मौलिक माहिती अशी मिळाली कि दुसर्या महायुद्धानंतर नाझी म्हणून शेजारी राष्ट्रातील लोक ह्यांना एवढे टोमणे मारीत कि .मी जर्मन असून मला माझ्या देशाचा अभिमान आहे अशी चारचौघात सांगायची चोरी ( हे म्हणजे बहुसंख्य हिंदुच्या देशात आम्हाला गर्वसे कहो म्हणायची चोरी असते ना लगेच कट्टर पंथीय असा शिक्का बसतो .) .त्यामुळे आधीच्या विश्व चषक स्पर्धेत इतर देशात कसे वातावरण असते तसा उत्साह ह्यांच्या कडे नसायच्या पण २००६ च्या वल्ड कप पासून तिने एका जर्मन ह्या नात्याने स्वताच्या देशात झेंडे /लोकांचा उत्साह /आणि हो वूवूझेला सगळे कसे दणक्यात सुरु झाल्याचे निरीक्षण नोंदवले
.व ह्या वेळी तर कहर होता ,मंदीमुळे आलेले नैराश्येचे मळभ दूर करण्यासाठी ह्यांचे सरकारच जर्मन फुट बॉल संघाची ह्यावेळी जिंकणार म्हणून हवा तापवत होते .त्यामुळे सगळे जर्मनी हे जर्मन झेंड्यात दिसत होते .त्यांच्या अस्मितेचे जाज्वल्य प्रतिक गरुड सर्वत्र आपला दरारा पसरवत होता ,मी त्याला मनोमन नमस्कार केला (आपल्या विष्णूचे वाहन नाही का ) बायकोने विष्णू कोण? तर ब्रम्हा विष्णू महेश ह्याची आख्यायिका थोडक्यात इंग्रजीत समजून सांगितली .(आमचे संवाद इंग्रजीत चालतात ) मी जातिवंत परप्रांतीय .म्हणून शिकू जर्मन भाषा आरामात असा खाक्या होता

गुलमोहर: