उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या चेहर्‍यावर खुप तीळ आलेले आहेत. (specially after delivery) त्यावर काही घरगुती उपाय आहे का?
Olay Regenerist कसे आहे? त्यांचे microdermabrasion cream कोणी वापरले आहे का?

ते नक्की तीळ च आहेत का हे dermatalogist कडून चेक करून घ्या. तपकीरी -काळे रंगाचे लहान मोठ्या आकाराचे स्पॉट हे seborrheic keratosis असू शकते. हे तीळ असल्यासारखेच दिसते पण ती स्कीन ग्रोथ असते. जर ते तसे असेल तर त्याला क्रीम, लेप असा काही उपाय नाही. Dermatalogist कडे ह्याची ट्रीटमेंट मिळते. एका इलेक्ट्रीक सुईने हे सर्व तिळ्सद्रुश ठिपके जाळले जातात. एका सिटिंग मध्ये ट्रीट्मेंट पूर्ण होऊ शकते. फारसा काही त्रास होत नाही. फक्त ट्रीट्मेंट घेण्यापूर्वी डॉक्टरला एक दोन ठिपक्यांवर ट्रायल द्यायला सांगणे. मग एक महिना थांबून त्या जागेवर काहि व्रण न राहता स्कीन चांगली दिसत असेल तर पुढील ट्रीट्मेंट घ्यावी.

माझ्या हाताला सारखी खाज सुटते आणि तेथील त्वचा पांढुरकी होते. यावर काही उपाय आहे का? हे फंगल इन्फेक्शन असू शकते का?

बोटांच्या मध्यभागी जर होत असेल तर स्कॅबिज पन असु शकते, सवीस्तर तपशिल कळवा.

chehryala aathvdyatun 1 -2 badam ugalun lavavet, chehara tajeldar disto.
Visheshtaha jyanchi skin kordi ahe tyani he karun paha.

I think you should consult dermatologist! bcoz cheherya var til yene he sadhya upayani janare nasate! allergy pan asu shakel

मागे जुन्या हितगुज वर कुठे तरी instant glow येण्यासाठी चा उपाय वाचला होता.. E vitamin असलेला... सापडत नाहीये. कोणी link देईल का?
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

ते जुने काही मला माहित नाही... पण मध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहर्‍याला लावून १५-२० मि ठेवून धुतल्यास चेहर्‍यावर ग्लो येतो हे माहित आहे.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है

संत्र्याची साल + चिमूटभर हळद + नीरसं दूध हे सगळं मिक्सरवर फिरवा, चेहेर्‍यावर लावा १५/२० मि. धुवा. बर्फ फिरवा, ह्याने पण ग्लो येतो! sensitive skin ला पण चालते. try करा. Happy

बदाम तेल (atleast 5 ml) + व्हिटामिन इ ची एक capsule हे मिक्स करायचं आणि चेहेर्‍याला मसाज करायचा . for nourishment & glow

plain म्हणजे काय?? जरा नीट explain केलं तर नक्की सांगता येइल!

Aga Amruta plain mhanje chehryawarche kale daaag je pimples ne yetat..aani pimples mule ch je chehryawar khadde wagaire padtat te bharun kadhnyasati che uppay....mazi maitrin aahe Rima tila hya cha far tras aahe ....
aani tee nehmi vichyarat aste ki yawar kahi upay karta yetil ka mhanun..tari mee tila aataaparent barech upay sangitle aahet..tarihi kahi navin upay miltil ka mhanun ti vichar te aahe.............

नमस्कार ,
हे माझे पहिले पोस्त.
इथे फार पुर्वि , मुडिताई चे एक पोस्त होते.
It was regarding -
चेहेर्या वरिल पिंपल आणि काळे डाग जाण्यासाठि दुर्वांचा लेप.
क्रुपया ती माहिति मिळु शकेल काय ?

धन्यवाद.
मनी.

The strength of a nation derives from the integrity of the home.

विषयांतराबद्दल क्षमस्व
पण मायबोलीवर देवनागरी टाईप करण्याची सोय असताना इंग्रजीमधे का टाईप केलं जातय?
मराठी टाईप करण्यासाठी मदत हवी असेल तर किमान विचारा...

--------------
नंदिनी
--------------

ओ के,सोनाली कळलं आता, तुझ्या मैत्रिणीला सांग की पिंपल्समुळे खड्डे नाही पडत ते फोडल्यामुळे पडतात्.तेव्हा तस करण आधी थांबव! हे खड्डे भरावे लागतील dermatologist/ cosmatologist कडुन!! तशी चौकशी कर
काळे डाग जायला चंदन पावडर १चमचा + हळद चिमूटभर +नीरसं दूध याचा लेप लावायचा २० मि. आणि गार पाण्याने धुवायचा. जर कस्तुरी हळद मिळाली तर उत्तम! हे झाले वरुन करायचे उपाय, तिला सांग कि livactin घे रोज दोन चमचे दोन वेळा!! याने नक्की फरक पडेल!

थान्क्स अम्रउता,मी हा ऊपाय नक्की कल्वेल तीला....ए पन माला सान्ग livactin हे नेम्का काश्याकरिता अस्त...

अग नन्दीनी मी प्र्यत्न तर कर्ते आहे मराथित लिह्न्न्याचा पअन जरा अवघ..च जाताय लीहाय्ल्ला..
वरील साग्ल्ली वाक्य पहुन लक्षात च आले असेल तुझ्या.....

माहित आहे की इथे लिहिणे योग्य नाही पण कुठे लिहिणे योग्य आहे हे माहित नाही.

सोनाली , अग सोपे आहे ईथे लिहिणे . एक काळजी घे की अक्षर पूर्ण कर.
जसे प्रयत्न साठी pra ya tna
लिहायला li haa ya laa
सगळी sa ga Lee
आणि ण, ठ, ळ लिहायला अनुक्रमे Capital एन, टी एच आणि एल वापर.

क्रुपया ( सौदर्यंवतींनो आणि सौदर्यं तज्ञांनो ) मदत करा. इथे पुर्वि मूडी ताई चे पोस्ट होते. चेहेर्या वरिल पिम्पल्स आणि काळे दाग या साठि दुर्वां चा उपाय सांगितला होता. ती महिति कोणा कडे असेल, तर क्रुपया इथे पोस्ट करा किंवा लिंक दया.
धन्यवाद.
मनी.

The strength of a nation derives from the integrity of the home.

इथे जोरदार उन्हाळा आहे सध्या अन मुलं जवळ जवळ रोज स्विमिंग पूल मधे जातात. शिवाय बाहेर खेळणं तर आहेच. कितीही सन ब्लॉक लावलं तरी काळवंडली आहेत. एकदा थंडी सुरू झाली की सगळा टॅन उतरेल, पण त्याचे काही दुष्परिणाम होउ नयेत म्हणून सन ब्लॉक शिवाय अजून काय करता येइल? मी ४५ एस पी एफ चं सन ब्लॉक लावते त्यांना.

Happy धन्यवाद मदत_समिति (लालु, रुनि, चाफा).
त्वरीत माहिती बद्द्ल धन्यवाद. Happy

मनी.
The strength of a nation derives from the integrity of the home.

हे जरा मराठीत लिहील॑ आसत॑ तर आम्हालापण कळाल॑ आसत॑......!

अश्विनी
मला १० वर्षापासून Acne चा त्रास होतो आहे. Antibiotics ने तात्पुरता फरक पडतो. काही उपाय सूचवशील का?

किती वेळ लागला हे शोधायला.

anyway आता trader joe मधे फिरत होतो तेव्हा tea tree oil ची बाटली दिसली, त्यावरुन आठवले, ते oil pimples वर लगेच काम करते, try करु बघा.

read other user of it here, it can be used in shampoo also for dandruff.

http://answers.yahoo.com/question/index?qid=20061004083153AAdgCDc

http://www.acne.org/tea-tree-oil-reviews/99/page1.html

माणसा, तुला पिंपल्स आलेत ? Happy

एनीवेज, मला तो शांपू हवाय.. ट्रेडर जोज मधे मिळेल का.. बघीन मी..

हाय सोनाली, sorry खुप दिवसानी reply करतीये! livactin हे blood purifier आहे, याने pimplesची tendency कमी होते! वापरुन कळव!!

आणखी एक उपाय जायफळ (किसून /सहाणेवर उगाळून) + नीरस दूध , हे रात्री चेहेर धुवुन लावयच सकाळी धुवायचे, याने पण फोड जातात, माझ्या आई ने हिमालय चे purim tab.s घ्यायला सागितले आहे

Pages