हसायदान

Submitted by अभय आर्वीकर on 24 December, 2010 - 04:27

हसायदान

आता माबोत्मके देवे । ना वाग्यज्ञे वैतागावे ।
तोषोनि माबोकरांस द्यावे । हसायदान हे ॥१॥

जे एकमेकांप्रती जळे । कळे तरीही ते ना वळे ।
तया परस्परांचे लळे । लागावेजी ॥२॥

आयड्यांचे घमेंड जावो । कंपूबाजी अस्त पावो ।
जो जे वांछील तैसा लाहो । प्रतिसाद ॥३॥

तू खाजव पाठ माझी । मग मीही खाजवितो तुझी
ऐसी सांठगाठ खुजी । जावो लयासी ॥४॥

काव्यत्त्वही जे रसहीन । ललीतही जे तथ्यहीन ।
तरीही रसिक सज्जन । सोयरे होतु ॥५॥

कुणी नर असो वा नारी । नसो लेखणी विखारी ।
अनवरत माबोवरी । नांदो संवादू ॥६॥

चला अॅडमिनचे गावी । तया ऐकवू कविता काही ।
काव्य आमुचे “रटाळ” नाही । समजाविण्याशी ॥७॥

दिवाळी अंक पद्याविन । हीन भासतो सर्वांगिन
जैसी कुणी अलंकारहीन । सुवासिनी ती ॥८॥

काव्य म्हंजे नोय रद्दी । नाकळे जया न चित्तशुद्धी
तयांस द्यावी शुद्धबुद्धी । गे मायबोली ॥९॥

किंबहुना सर्वज्ञानी । ऐसा कोणी स्वत:स मानी ।
पाजीजो तयास पाणी । अखंडित ॥१०॥

आणिक वंगाळ लेखणे । अश्लिल शब्द विशेषणे
योजिल अश्लाघ्य दुषणे । पुच्छ तया फ़ुटावेजी ॥११॥

येथं म्हणे श्रीमाबोश्र्वरमाय । हा होईल दान हसाय ।
येणे वरे माबोकरीय । हसता झाला ॥१२॥
.
.
. गंगाधर मुटे
................................................................

गुलमोहर: 

नुकतेच माबोवर हबेश्वरांचे माबेश्वरी वाचन संपन्न झाले.
त्यानिमीत्ताने हे "हसायदान" सादर करीत आहे.

हे हसायदान रुचकर असले तरी त्यातील काही कडवे पचायला जरा अवघडच आहे, याची आम्हांस नम्र जाणीव आहे.
क्षमादान प्रार्थनीय आहे. Happy

छान आहे.

फक्त "जैसी कुणी अलंकारहीन । भिकारडी ती" ही ओळ नाही आवडली :पर्सनल मत:

आणि दूषणे असा शब्द हवा ना. (दू दीर्घ) ???

जैसी ग्रंथावली | तैसी हसायदानावली |
मस्त आहे चिरकूट तुझी गुगली | गंगादर मुते ||

गंगाधरजी,
हसायदान आवडलं.

“काही कडवे पचायला जरा अवघडच आहे” >>>
हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
मला पचलं …… Happy
अंतर्मुख होऊन विचार करणं अनेकदा गरजेचं असतं.

असो ...... मी या आधीही म्हणत आलोय की,
मा.बो. करांत चर्चा, वाद-विवाद झाले तरी
त्याची फलनिष्पत्ती सुसंवाद हीच असावी. आजही तेच म्हणतोय.
----------------------------------------------------------------------------------------------

बोला पुंडलिक वरदा .... हारि विठ्ठल.

कुणी नर असो वा नारी । नसो लेखणी विखारी ।
अनवरत माबोवरी । नांदो संवादू ॥६॥

पुंडलिक वरदा ...........

हसायदान चांगलच रंगलंय.

इये माबेश्वरीच्या पाठी | घातली बर्‍याच जणांनी धोपाटी |
तरी जमली तेवढी पाटी | ओतली मिया ||

ग्रंथू राहिला जरी अपुरा | समाधान न मिळेल असुरा |
त्याचा पोकळ तंबोरा | फुटेल एक दीशी ||

आता हसायदाना उपरी | निंदील जो माबेश्वरी |
सारेच कवी होतील तया घरी | आप जिगा सारखे ||

इये अंडाकरीच्या ताटी | रुसेल जो लिंबू कांद्यासाठी |
त्याने पांढर्‍या रश्श्याची वाटी | सांडल्यासम होईल ||

ग्रंथाचे शेवटी आले हे दान | मी लावून होतोच कान |
संपुर्णतेचे सामाधान | जाहले आज येथ||

इतिहास निंदेल जेव्हा माबेश्वरी | गृहीत धरेल गंगाधरी |
पण ठपका राहिल एकावरी | एके रहावे निश्चींत ||

सर्व भक्तांचा मी आभारी | राहीन जोवरी आहे माबोवरी |
सुफळ संपुर्ण माबेश्वरी | मर्कटार्पणमस्तू ||

पुंडलीक वरदे.....!!!!!!

हसणीय आहे...! ज्यांना मागचे-पुढचे संदर्भ माहित आहेत, त्यांना पर्वणीच ! मूळ रचना आणि त्यावरची टिका (रसग्रहण) ! सगळीच गम्मत ! Lol

>>>
तू खाजव पाठ माझी । मग मीही खाजवितो तुझी
ऐसी सांठगाठ खुजी । जावो लयासी ॥४॥
>>>

ह्या ओव्यांवरून, लहानपणी वाचलेल्या एका सुभाषिताची आठवण झाली-

उष्ट्रानां विवाहेशु गीतो गायंति गर्धभानि ।
परस्परं प्रशंसयंते , अहो रूपं अहो ध्वनि ॥

Proud

Happy एक नम्बर.

टोमणे पोहोचले सुखरुप । कळों ज्यान्चे त्याना ।
मात्र लिहिले आहे फन्डू । हसायदान हे ॥१॥

कधी जमणार अम्हा । असे जबराट लिहायला ।
प्रयत्न करूनि दमलो । गिरिशजी ॥२॥

न घाबरता लिहिणार । भाव आपुले।
बरे-वाइट असले प्रतिसाद । सर्व 'आपुल्यान्चेच' ॥३॥

:))

गंगाधरजी,
ग्रेट , अवर्णनीय.

"जे एकमेकांप्रती जळे । कळे तरीही ते ना वळे ।
तया परस्परांचे लळे । लागावेजी ॥२॥"

हे फार आवडले.

जबरी हो Happy

Happy

Pages