रत्ननगरी "रत्नागिरी" – (२) श्री क्षेत्र मार्लेश्वर

Submitted by जिप्सी on 21 December, 2010 - 22:48

=================================================
=================================================
श्री मार्लेश्वर देवस्थान – संगमेश्वर तालुक्यातील देवरूख गावापासुन अंदाजे १६-१७ किमी अंतरावर सह्यद्रीच्या कुशीत वसलेल्या मारळ या गावातील डोंगरावर असलेले अतिशय जागृत देवस्थान म्हणुन श्री मार्लेश्वर ओळखले जाते. जवळच असलेला धारेश्वर धबधबा मार्लेश्वराच्या सौंदर्यात अजुन भर टाकतो. भर पावसात येथील निसर्गसौंदर्य शब्दातीत असते. मार्लेश्वर येथील गुहेत असलेल्या मंदिरात श्री शंकराची मूर्ती आणि शिवपिंड असुन भगवान श्री शंकर नागरुपाने दर्शन देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील शांत व गूढ वातावरण निश्चितच मनाला विलक्षण अनुभव देणारे आहे. येथे विविध प्रकारचे पक्षीहि पाहवयास मिळतात. मकर संक्रांत, महाशिवरात्री, श्रावणी सोमवार हे उत्सवाचे दिवस. चला तर आज या मार्लेश्वराचे दर्शन घेऊया.

मार्लेश्वरला जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक संगमेश्वर
मुंबई-संगमेश्वर अंतर (रस्याने) – साधारण ३१५ किमी
संगमेश्वर - देवरूख अंतर – १६-१७ किमी
देवरूख-मारळ अंतर – १५ किमी
=================================================

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================

गुलमोहर: 

व्वा!! सही! Happy
रच्याकने, मंदीर धबधब्याच्या वरच्या भागात आहे का? आणि मंदीरात अनेक साप छताला लटकुन असतात म्हणे! Uhoh

धन्यवाद सर... घरी (गावी) जाऊन आल्यासारख वाटल..... आमच्या घरापासुन साधारण १ तासाच्या अंतरावर आहे मार्लेश्वर..... मनापासुन आभार

मस्त फ़ोटो. या परिसराची तशी फ़ोटोमधून नीट कल्पनाच येत नाही. देवरुखला मावशीकडे
अनेकदा जाणे होते, पण अजून मार्लेश्वरला जायला जमलेले नाही.

छानच मार्लेश्वर दर्शन ! धन्यवाद जिप्सीजी.
आता पायर्‍या, कठडे असलेल्या वाटा पाहून खूपच सुधारणा झालेली दिसते. भर पावसात मार्लेश्वर व मागचा धबधबा यात समरस होणं म्हणजे देव पावल्या सारखंच !!

बर्‍याच जणांनी तिथे वास्तव्य करणार्‍या सापांच्या फोटो विषयी विचारले. परंतु मला असे वाटते की असे फोटो घेणे चुक आहे. कारण ते त्या गुहेत अंधार्‍या जागेत कपारीत बसलेले असतात. कॅमेरा फ्लॅश लाईटचा त्यांना त्रास होवु शकतो. बरेचदा पर्यटक देखिल स्थानिकांकडे असे सर्प दाखवीण्याचा आग्रह धरतात. आणि स्थानिक लोक देखिल टॉर्च चा झोत सोडुन त्यांचे दर्शन घडवीतात. मला हे चुकीचे वाटते. बाकी फोटो खुप छान .. एकंदर परिसरच मोहुन टाकणारा आहे .. Happy

योगेश,
ने. अ. फो.

प्रचि १, ३, ५ आणि १० फार आवडले.

मी मार्लेश्वरला लहानपणी गेलो होतो. पण आता काही आठवत नाहीये.
आता फोटो पाहील्यावर वाटतय लगेच फेरी मारावी...

१४ तारखेला जत्रा आहे तिथे. त्याचीच रंगरंगोटी चालु आहे.

मस्तच रे योगेश..
माझ्या लहानपणी आम्ही श्रावणात देवरुखहून मार्लेश्वरला चालत जायचो त्याची आठवण झाली.

वॉव्..मस्त फोटो आनी माहिती.. आम्हालाही भारतातील अशी स्थळे पाहायला खूप आवडतील.. नेक्स्ट टायमाला भारत भ्रमणाची आयटनररी तुझ्याकडूनच बनवून घेईन.. Happy

सापाचे फोटो म्हणून कसले मागे लागले आहात... फोटो नीट बघत पण नाही कोणी... देवळाच्या प्रवेशद्वाराचा फोटो आहे त्यावर अतिशय सुस्पष्ट लिहिलेले आहे... श्री मार्लेश्वर गुहेमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. आढळल्यास कारवाई केली जाईल.. .

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

हिमांशुने सांगितल्याप्रमाणेच गुहेमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे आणि टॉर्चच्या प्रकाशात गुहेत साप बघण्यासही मनाई आहे. (तशी सुचनाच आहे फलकावर). गुहेत फक्त समईचाच प्रकाश आहे. मलातरी अजुन एकदाही साप दिसला नाही :(. पण सापामुळे या परिसरात अजुनतरी एकही अपघात झालेला नाही.

कारण ते त्या गुहेत अंधार्‍या जागेत कपारीत बसलेले असतात. कॅमेरा फ्लॅश लाईटचा त्यांना त्रास होवु शकतो.>>>>>सतिशला अनुमोदन.

आम्ही सहा वर्षापुर्वी गेलो होतो, पण पावसाळ्यात नाही त्यामुळे धबधबा नाही दिसला. प्रचि खूप छान.

देवळाच्या प्रवेशद्वारापासून गुहेपर्यंत जायला किमान १५-२० मिनिटं लागतात... १९९४ला जेव्हा प्रथम गेलो होतो तेव्हा पायर्‍यांची सोय नव्हती... काळोखातून परत येताना तेथील गुढमय वातावरणाचा एक वेगळाच अनुभव घेता आला... त्यानंतर पावसाळ्यात विशालगड केल्यावर मार्लेश्वर दर्शन केले होते... तेव्हा गुहे बाहेरील कपारीत एका नागाचे दर्शन झाले... पावसाळ्यात धबधब्याचा रुबाब काही औरच असतो... जवळ जाण्यास मनाई असते...

योगेश ही सफरही खूप आवडली Happy