तिरिमिरीतले तिरसिंगराव

Submitted by Kiran.. on 19 December, 2010 - 12:44

या धाग्याचा जन्म एक प्रतिसाद देताना झाला. प्रतिसाद देतानाच प्रसववेदना सुरू झाल्या असल्या तरी बीज खूप आधी अंकुरलेलं होतं.

एकदा असाच रविवार सकाळची सप्तरंग (?) पुरवणी वाचत आडवातिडवा पडलेलो होतो. एका काकांचा लेख वाचताना एकदम सावध झालो. सावरून बसलो. काकांच्या लेखाच शिर्षक होत. "माझ काय चुकल .?" यात सावरून बसण्यासारख काय होत ? तर त्या लेखा सोबत जे रेखाचित्र होत ते आणि लेखातला मोठ्या टायपातला मजकूर चौकटीत होता त्याने माझ लक्ष वेधून घेतल काका कुणीतरी प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते अस नाही. सकाळला(च) उपलब्ध असणा-या अनेक काकांपैकी एक ते होते. ( ज्याच्यावर पुरवणीची जबाबदारी असते कदाचित त्याच्या हास्यक्लबाचे किंवा जगण्याची कलाचे मेंबर असावेत. मुक्तपीठ पुरवणी तर छापून घरात येत असतानाही मी ई-सकाळवरच वाचणे पसंत करतो. लेख दोन्हीकड एकच असतो पण ईसकाळवरच्या प्रतिक्रिया भन्नाट असतात. .)

नमुना पहा.
http://72.78.249.107/esakal/20100719/4711632484305432417.htm

प्रतिक्रिया खालून वर या क्रमाने वाचायच्या. कंसातला मजकूर कानात सांगतात तसा वाचावा

तर नमनाला खंडीभर तेल झाल. ज्या लेखाबद्दल मी सांगतोय त्याचे लेखक म्हणजे आपले काका.. अचाट होते. यांना रस्त्यावर कुणी नियम मोडलेले सहन होत नाही आणि त्यासाठी म्हणे त्यांनी हा पत्रप्रपंच केला होता. समाजात जागृती हा त्यांचा स्तुत्य उद्देश होता. अशा लेखात उदाहरणे द्यावी लागतात कि नै ? काकांनी पण उदाहरण दिली होती ती दस्तुरखुद्द त्यांचीच. या उदाहरणातून एकाच वेळी काकांच्या धाडसी / कचखाऊ / हताश मनोवृत्तीचे सुंदर दर्शन घडवण्यात आलेले होते. आपण स्टेप बाय स्टेप सगळ इन शॉर्ट डिट्टेलमधे पाहूच.

धाडसी प्रसंग

एकदा काका पुणे इस्पितळाकडून ( पूना हॉस्पिटल अस नाव आहे ) स्वयंचलित दुचाकी पुलावरून कर्वे मार्गाकडे चालले होते. अर्थातच दुचाकीवरून हे स्पष्ट करतो. (काका चालत चालले होते का अशी शंका कुणीतरी नक्की विचारणार ). कर्वे मार्गावरून त्यांना खंडुजीबाबा चौकाच्या दिशेने वाहन वळवायचे होते. सुदैवाने चौकातला हिरवा दिवा त्यांच्यासाठीच प्रकाशमान झालेला होता. पण हाय रे कर्मा !

काका अजून पुलावरच होते तोच त्यांना एक बस सिग्नल ( मराठी ???) तोडण्याच्या बेतात दिसली. काकांनी आपल्या वाहनाला भन्नाट वेग दिला आणि त्या बसला आपले वाहन आडवे घातले. बसच्या चालकाने करकच्चून ब्रेक्स लावले आणि वर काकांनाच शिव्याची लाखोली वाहीली.

आता सांगा बर. ज्या अर्थी काकांना (दुरून) हिरवा दिवा होता त्या अर्थी बसला लाल दिवा असला पाहीजे कि नै ? मग त्या चालकास समजावयास नको का कि आपले वाहन आपण कसे बरे पुढे न्यावे ? त्यास नियम ठावे नव्हते कि कै ?

तर आपल्या काकांनी जीव धोक्यात घालून नियमभंगाचा एक गुन्हा रोखला तर त्यांनाच शिव्या का बरें ? सांगा बरें आता आपल्या काकांचे काय चुकले ? सांगा सांगा.

कचखाऊ प्रसंग

काका नेहमी एका देवळावरून जातात. तिथे रस्त्यावरून देवळात जाण्यासाठी कठडा खंडित करून एक माणूस जाइल इतकी जागा ठेवली आहे. काकांनी आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी निरीक्षण नोंदवले कि बाबा इथ नेहमी वाहने उभी असतात. एकदा त्या देवळात जायच्या मार्गासमोरच कुणीतरी चारचाकी वाहन उभे केलेले. लोकांना समजतच नाही कि ही जागा आत येण्याजाण्यासाठी आहे. काकांना देखील दर्शन घ्यायच होत. काकांनी आपले वाहन चारचाकीच्या समोर आणून आडवे लावले आणि चालकाची प्रतिक्षा करू लागले. चालक आला. चालकाने काकांना वाहन बाजूला घ्यायल खूणावले. काका कसले दाद देतात ? त्यांचा धाडसी स्वभाव आपण पाहीलेलाच आहे. चालक उतरला.

आडदांड शरीरयष्टी, खादीचे कपडे, सोन्याची चेन, कड वगैरे पाहील्यावर काकांना थोडा अंदाज आला. त्याने गाडी बाजूला घ्या असे सांगताच काकांनी उसळून त्याला गाडी कशी लावली होती यावर थोड बौद्धिक घेतल. शहाणे करून सोडावे सकळ (सकाळ नाही) जन.. हे तर काकांचे ब्रीदच !

झाल उलटच. दणकट शरीरयष्टीने काकांना गाडीवरून उचलल आणि खाली ठेवल आणि गाडी उचलून फेकून दिली. काकांच्या जवळ येऊन माजला का रे अशी सुरूवात करून फुल्या, चांदण्यांचूची मुक्त बरसात केली.

काकांचा प्रश्न कायम आहे.. माझ काय चुकल ?

पुणेकरांना शिस्त लावण्याच एक पवित्र कार्य एक पुणेकर हाती घेतो काय आणि त्याला अशा दुर्दैवी प्रसंगांना तोंड द्याव लागत काय.. खरच काकांच काय चुकल ?

हाच प्रश्न आता माबोकरांना विचारतोय.. काकांच काय चुकलं ?

( आपापले तिरसिंगराव येऊद्यात आता.. )

गुलमोहर: 

.

झंडु Happy
तुझ्या तिरसिंगरावची प्रतिक्रिया वाचली होती Happy
या लेखाचे नाव वाचुनच मला त्या तुझ्या प्रतिक्रियेची आठवण झाली आणि फटकन हसु आले Happy

आता, काकांचे काय चुकले असेल तर इतकेच की त्यांनी माणुस बघुन तिरसटपणा करावा असे मला वाटते Happy

बाकी अजुन एक, तुझा आयडी बघितला की मला एकदम झंडुबाम आठवते Happy आता यात माझे काय चुकले सांग Happy

बापरे काय अशक्य हसतोय मी...
हा हा हा हा हा हा...सॉलीड...
आणि तो इसकाळ मधला लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रीया तर वेड...
अगं आई गं, पोट दुखायला लागले आहे हसून हसून Biggrin

आयला....... काय अशक्य प्रतिक्रिया आहेत Happy
बाकी सकाळची लायकीच तशी आहे म्हणा Happy

तिरसिंगरावांचे अनुभव इतरांनी वर्तमानपत्रामधे छापायला दिले पाहीजेत
सरस्वतीचंद्रांची चांगलीच वाट लागलीय. त्यात ज्या प्रतिक्क्रिया सरस्वतीचंद्रांना सपोर्ट करणा-या आहेत त्या घरच्यांनीच नाव बदलून दिल्या असाव्यात.

Biggrin

राज्या
झंडु म्हटल कि बाम आलाच Happy

आशुचँप, श्री.. सकाळची लिंक भारी पडली कि.. आपले तिरसिंगकाका राहीले बाजूलाच..

खरं तर काल रात्री गारठा होता आणि बोटंही वळेनात टंकनासाठी म्हणून आटोपतं घेतलं...:)

..