चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - १

Submitted by गजानन on 19 December, 2010 - 12:14

बर्‍याचदा बंदिशीचे शब्द आणि त्यांचे अर्थ कळत नाहीत म्हणून हा धागा.

या धाग्यानंतरची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - २
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - ३

===========================
नंद्याने या धाग्यावरच्या ज्या पोस्टींमध्ये चीजांचे दुवे आहेत अशा पोस्टी शोधून काढलेली ही यादी -
यापुढे ही यादी अपडेट करत राहू.

पान ३:
लट उलझी सुलझा जा बालम-झिला खान (विलायत अली खाँ साहेबांची मुलगी)
दोन-तीन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विषयक ब्लॉग्ज
गुलाम अली खांच्या आणि बशीर अली माही : जंगल भैरवी (म्हणजेच सिंध भैरवी का?) - नैना मोरे तरस गये आजा बलम परदेसी रे
बडे गुलाम अली खां : राग भैरवी - बाजूबंद खुल खुल जाए
भुवनेश कोमकलीच्या आवाजात सावरे ऐजय्यो
राग केदार : पिहरवा घर आओ. - बागेश्री
पान ४:
पंडित छन्नुलाल मिश्र (होरी) - खेलैं मसाने में होरी दिगंबर खेले मसाने में होरी
रचना : परवीन शाकिर, स्वर : बल्किस खानुम गोरी करत सिंगार
गिरीजादेवी : दादरा - गंगा-रेती में बंगला छबा मोरी राजा आवै लहर जमुने की
पान ५ :
रंग जीन डारो
काफी - अभिषेकी बुवांच्या आवाजात - काफीतली चीज.
राग देस - मालिनी राजूरकरांची होरी
पान ६ :
अबदुल करीम खाँच्या आवाजात - जमुना के तीर
पान ७ :
बेगम अख्तर : दादरा - ओ बेदर्दी सपने में आजा
जोहराबाई आग्रेवाली - कोयलिया कूक सुना दे
गिरिजादेवी : भैरवी ठुमरी - नाहक लाए गवनवा
चंद्रकंस - १,
पान ८ :
चंद्रकंस - २
काही दुर्मिळ चीजा
किशोरीताईंच्या आवाजात - गौड मल्हार
दाद यांची पोस्ट
गणपती भटांचा हंसध्वनी
बेगम अख्तर - पपीहा धीरे धीरे बोल
पान ९ :
यमन - ए री आली पिया बिन - लता मंगेशकर
पान १० :
नुसरत फतेह अली खां (उस्ताद रशीद खां यांच्या आवाजातही) : मिश्र काफी - किरपा करो महाराज मोइनुद्दीन
मारवा- (हे शब्द आहेत वसंतरावांच्या मारव्याचे) मदमाती चली चमकत दामनीसी |
श्री रागामधली द्रुत त्रितालामधली ही बंदिश कुमाजींनी अत्यंत भावदर्शी गायली आहे.
इतना तो करना स्वामी, जब प्रान तन से निकले -- शौनक अभिषेकींनी गायलेल
इतना तो करना स्वामी अभिषेकी बुवांच्या आवाजात

* * * * *

पान ११:
D V Paluskar : तिलककामोद
तिलककामोद मधील 'सूर संगत रागविद्या' अश्विनी भिडे-देशपांडे ह्यांच्या आवाजातील
कबीराची सुंदर रचना....पं कुमार गंधर्वांच्या सुवर्णकंठातून ऐकली आहे.
डी व्ही पलुस्कर - कोमल रिषभ आसावरी
पं. रामाश्रेय झा यांची एक सुंदर रागमाला शुभा मुद्गलांच्या आवाजात
उस्ताद रशीद खां : भैरवी - कोई कहियौ रे प्रभु आवन की
पान १२:
गुणकली
आचार्य गोस्वामी गोकुलोत्सव : गुजरी तोडी - मन के पंछी भये बावरे
संजीवच्या आवाजात हंसध्वनी इथे ऐका
रशीदखाँची यमनातली - 'आओ आओ आओ बलमा' पण अप्रतिम आहे.
राग तिलंग : ठुमरी सजन तुम काहे को नेहा लगाये
मालिनी राजूरकर - भैरवी फुल गेंदवा अब ना मारो
शोभा गुर्टू : विभासआ जा रे मीत पिहरवा
राग देसः संजीव अभ्यंकर - नैनन मे छबि छायी सजनी |
पान १३:
निर्मला देवी व लक्ष्मी शंकर यांच्या आवाजात : नैना मोरे तरस गये री श्याम
सविता देवी ( सिध्देश्वरी देवींच्या सुकन्या) यांच्या आवाजातील ही ठुमरी पड गैली नैहरवा में दाग धुमिल भइली चुनरिया
डॉ. अनिता सेन यांच्या आवाजातील चैती माणिक हमरो
बोल गुणिदास यांचे, म्हणजेच पं. जगन्नाथबुवा पुरोहित - 'आई शपथ' सिनेमातली एक सुंदर बंदिश.
गोरख कल्याण -संजीव अभ्यंकर
निर्मला देवी / निर्मला अरुण पहाडी - ठुमरी
पान १४:
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या आवाजात राग : मिश्र तिलक कामोद
ठुमरी : सैंय्या जी बैरन रतियां

राग : इराणी भैरवी
कबीराचे पंडित कुमार गंधर्व व श्रीमती वसुंधरा कोमकली यांच्या आवाजातील निर्गुणी भजन
आशाताईंच्या आवाजात मीराबाईंचं भजन
भीमसेन जोशींचा एक मस्त दुर्गा
मुनावर अली खान यांच्या आवाजात ठुमरी : राग - पहाडी, दादरा
पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या आवाजात राग बिहारी
संजीव अभ्यंकर राग : जौनपुरी
अश्विनी भिडे-देशपांडेंचा एक मस्त यमन
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी यांची जुगलबंदी : कजरी
रशीद खाँ यांच्या आवाजात ही ठुमरी : निस्सार हुसैन खाँ यांच्या आवाजात : राग : मिश्र पिलू
पं. कुमार गंधर्व ह्यांच्या आवाजात : राग भूपाली, तीनताल
पं कुमार गंधर्वांनी गायलेली अजून एक बंदिश : राग : नंद, तीनताल
हे मीराबाईंचे भजन भीमसेनजींच्या आवाजात : राग : पटदीप
पान १५:
एरी मोरी आली पिया घर आए.
गिरिजादेवींच्या आवाजात : राग मालकंस
अण्णांच्या आवाजात बाबूल मोरा
केसरिया बालम आवो नीं
संजीव अभ्यंकर - ऋतुरागरंग= बसंत, मल्हार, रागमाला
शोभा गुर्टूंनी गायलेलं केसरिया बालम ,
रंग रंगीला बदरा मोरा उस्ताद रशीद खाँ ,यात्रा अल्बम ,
कहूँ कैसे सखी मोहे लाज लगे उस्ताद रशीद खाँ , मिश्र मल्हार , ''नैना पिया से'' अल्बम ,
होरी गिरिजादेवींच्या आवाजात ,
जोगिया मेरे घर आये पं राजन साजन मिश्रा.. राग ललत ,
भैरव ,
राम निरंजन न्यारा रे पं कुमार गंधर्वांच्या आवाजातील ही संत कबीराची रचना ,
माया महाठगिनी हम जानी पं कुमार गंधर्वांच्या आवाजातील ही संत कबीराची रचना ,
तोडीमधलं 'तू है मेरा प्रेमदेवता' ,
कुमार गंधर्वांशी गप्पा ,
पान १६:
चैती बरवा कलापिनी कोमकली यांच्या आवाजात ,
झिनी चदरिया कलापिनी कोमकली यांच्या आवाजात,
उस्ताद आमीर खाँ साहेबांच्या आवाजात राग ललत ,
नैहरवा हम का न भावे, न भावे रे संत कबीरांची कुमार गंधर्वांच्या स्वरातील एक अजून निर्गुणी रचना ,
गगन की ओट निशाना है जगजीत सिंग यांच्या आवाजात संत कबीराची ही एक निर्गुणी रचना ,
गले बिच सेली मधे 'सेली' चा काय अर्थ असावा ,
बैरी जा बैरी जा जा जा जा बैरी जा शोभा गुर्टू ,
कुमार गंधर्वांच्या आवाजात - कबीराचे 'कौन ठगवा नगरिया' हे निर्गुणी भजन
पं अजय चक्रवर्तींच्या आवाजात ही भैरवी - बांट चलत नयी चुनरी रंग डारी
पं अजय पोहनकरांच्या आवाजात राग बागेश्री - सखी मन लागे ना
जगजीत सिंग यांच्या आवाजात -दीनन दु:ख हरन देव संतन हितकारी
साजन मिश्रांच्या आवाजात - जागिये रघुनाथ कुंवर, पंछी बन बोले
पं राजन साजन मिश्रा - ए जननी मैं न जिऊं बिन राम
पान १७:
उस्ताद नासिरुद्दीन सामी यांच्या आवाजात - राग तोडी : अब मोरी नैय्या पार करोगे
अजय चक्रवर्तींची एक भैरवी-याद पिया की आये
याद पिया की आए :
अजय चक्रवर्तींची, वडाली बंधूंची, बडे गुलाम अलीं, कौशिकी चक्रवर्ती, शोभा गुर्टूं , मीराबाई की मल्हार पं अजय चक्रवर्तींच्या आवाजात , दयाघनाची मूळ बंदिश रसूलिल्लाह
स्वाती कानेटकर , रंग ना डालो श्यामजी
कलापिनी कोमकली : राग सोहनी , झीनी चदरिया
कलापिनी कोमकलींचंच हे निर्गुणी भजन , झीनी चदरिया मूळ भजनाचे शब्द
सुने री मैंने निर्बलके बल राम
डी एस पलुस्करबुवांच्या आवाजात सूरदासांची ही अजरामर रचना ,
पं भीमसेन जोशींच्या आवाजात : राजस सुकुमार
रसूलिल्लाह
मूळ हृदयनाथ मंगेशकर, लताताईंच्या आवाज , सांझ भयी घर आवो
सिध्देश्वरी देवी , लगन बिन जागे ना निर्मोही
भजन कबीराचं आहे. राग : हंसध्वनी, केहरवा ताल. आर्या , संजीव, लगन बिन जागे ना
अश्विनी भिडे देशपांडेंच्या आवाजात , वही जाओ जाओ जाओ बलम
मालिनीताई राजूरकर, मिया की तोडी : लंगर कंकरिया जी न मारो
पद्मावती शाळिग्राम, पं भीमसेन जोशीं, भीमसेनजी आणि उस्ताद रशीद खाँ , राग : देशकार/ देसकार : हूँ तो तोरे कारन जागी
उस्ताद रशीद खाँ , पं मल्लिकार्जुन मन्सूर , राग : बसंत : पिया संग खेलूँ खेलूँ होरी
उस्ताद रशीद खाँ , उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ , आज आये शाम मोहन
गणपती भट , सुनता है गुरू ग्यानी राहुल देशपांडे
पान १८:
सुनता है गुरु ग्यानी' चे शब्द आणि कुमार गंधर्वांच्या आवाजातील दुवा - सुनता है गुरु ग्यानी -
डी व्ही पलुस्कर बुवांच्या आवाजात तुलसीदासाचं सुंदर भजन - कहां के पथिक कहां कीन्हो है गवनवा
- भोला मन जाने आणि अवधुता कुदरत की गत न्यारी
अजय चक्रवर्तींचा काफी - जा रे जा रे जा रे जा कोयलिया
पं. कुमार गंधर्वांचा राग गौरी बसंत - आज फेरिले / पेरिले गोरी
गुरू नानकांची शबद रचना (गायक पं. राजन साजन मिश्रा) - जगत में झूठी देखी प्रीत
- अवधूता कुदरत की गत न्यारी
विदूषी प्रभा अत्रे- यमन - विलंबित- मन तू गा रे हरीनाम, द्रुत- लागी लागी रे हरीसंग
कजरी - शोभा गुर्टू - तरसत जियरा हमार नैहर
उस्ताद रशीद खाँ : राग पिलू - अब मान जाओ सैंय्या
पं अजय चक्रवर्ती व कौशिकी चक्रवर्ती - वैष्णव जन तो तेने कहिये
पं. भीमसेन जोशी : छाया मल्हार - बदरिया बरसन लागी उमड घुमड कर (गिरे)
पं. भीमसेन जोशी - बीत गये दिन भजन बिना रे
पं. भीमसेन जोशी : राग तोडी - ए री माई आज शुभ मंगल गावो
एम एस सुब्बलक्ष्मी, वाणी जयराम, लता मंगेशकर - श्याम मने चाकर राखो जी चाकर रहसूं बाग लगासूं
गंगूबाई हंगल - मिया की मल्हार - कहे लाडली लाड लडायी बरखा ऋत
पं. भीमसेन जोशी - मिया की मल्हार - करीम नाम तेरो
पान १९:
बडे गुलाम अली खाँ साहेबांची देसी रागातली चीज - जा रे कागा जा
बदर-उझ-नझम आणि कमर-उझ-नझम यांच्या आवाजातजमुना के तीर
पं भीमसेन जोशीं : राग भीमपलासी - ब्रिज में धूम मचावे कान्हा
संजीव अभ्यंकरः पूरिया कल्याण - विलंबित - अंधियारा कर दो उजाला, द्रुत - दिन रैन कछु न सुहावे
शौनक अभिषेकी - शिव तांडव स्तोत्र
अश्विनी भिडे-देशपांडे : राग मधुवंती - शिव आद मध अंत बलवंत जोगी
उस्ताद रशीद खाँ : राग बिलासखानी तोडी - काहे करत मोसे झगरा/डा प्रीतम प्यारे
पाकीस्तानी गायीका नयारा नुर
उस्ताद रशीद खाँ : राग पूरिया धनश्री - पायलिया झनकार मोरी
पं.जसराज भजन
उस्ताद रशीद खाँ : बिहागआली री अलबेली सुंदर नार
पं कुमार गंधर्व : मियां की मल्हार - विलंबित एकताल- करीम नाम तेरो, मध्यलय तीनताल - बोल रे पपैहरा
पं अजय चक्रवर्ती - जमुना के तीर
अश्विनी भिडे-देशपांडें (मीराबाईंचं भजन) - मेरे राणाजी, मैं गोविन्द-गूण गाना
डी व्ही पलुस्कर (कबीराचे भजन)भजो रे भैया राम गोविंद हरी
डी व्ही पलुस्कर, मुनावर अली खाँपग घुँगरू बांध मीरा नाची रे
उस्ताद रशीद खाँ : राग हंसध्वनीलागी लगन पती सखी संग
पान २० :
शोभा गुर्टू - सुनो सुनो सुनो रे दयाल म्हारी अरजी
माणिक वर्मा - जमुना के तीर
फतेह अली खान - पिया नही आए आए सखी
उस्ताद बडे गुलाम अली खाँ, मुनावर अली खाँ (मुघले आझम चित्रपटातील) : सोहिनी - प्रेम जोगन बन के
पं कुमार गंधर्व : शिवमत भैरव - अरी एरी माई मै
पं अजय पोहनकर - दरबारी कानडा - किन बैरन कान भरे
उस्ताद फतेह अली खान : राग : दरबारी कानडा - नैन सो नैन मिलाये रख लीजो
उस्ताद नजाकत अली - सलामत अली खाँ, उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब, बिल्किस खान्नुम - अनोखा लाडला ए मा
पं जसराज - अनोखा लाडला

कुमार गंधर्व - भैरव - ऋत आयी बोले मोरा रे

कुमार गंधर्व - कबीराची निर्गुणी रचना - उड जायेगा हंस अकेला

* * * * *
पान २१ :
उस्ताद सलामत अली खान : भैरवी ठुमरी - शापमोचन कलियन संग करता रंगरलियाँ
पं जसराज, उस्ताद रशीद खाँ - जा जा रे जा (ओ) कागवा
मालिनी राजूरकर : टप्पा काफी; ताल : पंजाबी (पश्तो) - माधो मुकुंद मुरारी
मालिनीताई राजूरकर - राग काफी - चांडो चांडो छैला मोरी बैय्यां
पं राजन साजन मिश्रा - राग अडाना - तान कपतान (कप्तान) कहां गयो
आरती अंकलीकर टिकेकर, सावनी शेंडे, आरती नायक, जानकी अय्यर (''सावली'' चित्रपटातील) - साँवरियां घर नही आये, घनन घनन घन गरजत आये, सुर जन सो मिला दे मैं को
शुभा मुद्गल : संत कबीर यांचे एक भजन - दुलहनी गावहु मंगलचार
उस्ताद रशीद खाँ : राग पूरिया धनश्री - खुश रहे सनम मोरा
उस्ताद रशीद खाँ : राग छायानट - झनन झनन झन नन नन नन नन
कुमार गंधर्वांवरील एक डॉक्युमेंट्री - कोई सुनता है - जर्नी वुईथ कुमार अ‍ॅन्ड कबीर
उस्ताद रशीद खाँ - राग देस - नादान जियरा गुम गयो रे
उस्ताद शाहिद परवेझ (सतार) व उस्ताद रशीद खाँ - करम कर दीजे ख्वाजा
श्रुती सडोलीकर : कुंभनदासांची रचना : हवेली संगीत - सखी बूँद अचानक लागी
श्रुती सडोलीकर - राग पटदीप - होरी खेलत बहार
पं छन्नुलाल मिश्रा - चैती - सेजियां से सैंया रूठ गईलो हो रामा
गिरिजा देवी - बरसन लागी बदरिया, रुमझूमके

पान २२ :
गिरिजा देवीं - बनारसी दादरा - दीवाना किये श्याम क्या जादू डारा
पं. डी व्ही पलुस्कर - अखियाँ हरीदर्शन की प्यासी
उस्ताद रशीद खाँ : भैरवी - मीराबाईंचं सुंदर भजन - कोई कहियौ रे प्रभु आवन की
पं अजय चक्रवर्ती - राग कलावती - मेरा मन हार रसमत
उस्ताद रशीद खाँ - दरस देओ बलमा मोरा
पं डी व्ही पलुस्कर - राग विभास / बिभास - कैस कुमरवा जायल हमरा
अश्विनी भिडे देशपांडे : राग जौनपुरी - पायल बाजन लागी रे मोरी
पंडित भीमसेन जोशी : राग केदार - सावन की बूँदनियाँ बरसत घनघोर
पंडित भीमसेन जोशी : भैरवी - बोले ना वो हमसे पिया संग
पंडित भीमसेन जोशी : केदार (विलंबित) - सोहे लराई माई बनरा जाने आवन ऋतु
पंडित भीमसेन जोशी - राग : यमन कल्याण - काहे सखी कैसे की करीये(विलंबित), श्याम बजाये आज मुरलिया
पान २३ :
उस्ताद रशीद खाँ - राग : चारूकेशी - पलक न लागी मोरी गुइयां
शुभा मुद्गल - मीराबाईचं हे भजन - बंसीवारा आज्यो म्हारे देस
बडे गुलाम अली खान/भीमसेन जोशी/लता मंगेशकर/मुनावर अली खान/फरीदा खान्नुम - बाजुबंद खुल खुल जा
बडे गुलाम अली खाँ - राग : मेघ - मोरे मंदर अब आओ साजन
सलामत अली खान - ठुमरी राग : पहाडी - तोरे नैनोंने जादू किया मोरे सांवरियाँ
सिप्रा बोस - दादरा राग : पहाडी - चले जै हो बेदर्दा हम रोए मरी है
किशोरी आमोणकर - ठुमरी राग : पहाडी - सावन की ऋतु आयी री सजनीया
पं भीमसेन जोशी/सुब्बलक्ष्मी - संत पुरंदरदासांचे प्रसिध्द कानडी भजन - भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
पंडित भीमसेन जोशी / पं जसराज - राग : मधुवंती - काहे मान करो सखी री अब
अश्विनी भिडे देशपांडे - सूरदासांचं भजन - सुंदर वदन सुख सदन श्याम को निरख नयन मन ठाग्यो
पं कुमार गंधर्व - राग मालावती - मंगल दिन आज बन्ना घर आयो
गिरिजा देवी - कजरी - पिया नही आये काली बदरिया बरसे
गिरिजा देवी - झूला - सिया संग झूले बगिया में राम ललना
गिरिजा देवी - होरी - रंग डारूंगी नन्द के लालन पे
कलापिनी कोमकली - चैती - पतिया न भेजे हो रामा
पं भीमसेन जोशी - मीराबाईंचं भजन - चलो मन गंगा-जमुना तीर
वसंतराव देशपांडे/भुवनेश कोमकली/राहुल देशपांडे - दादरा - जमुना किनारे मेरो गाँव ऐ जैय्यो साँवरे
पान २४ :
कैवल्यकुमार गुरव- यमन - सोहे लाल रंग/सोहेला लालन रंग मन मे(विलंबित), रे पिहरवा तोहे घरवा जाने ना दूंगी(द्रुत)
झोहराबाई आग्रेवाली - खमाज मधील बंदिश / झिला - कोयलिया कूंक सुनादे/सुनाये
पं छन्नुलाल मिश्र - होरी - बरजोरी करो ना मोसे होली में
पं छन्नुलाल मिश्र - होरी - कन्‍हैया घर चलो गुईयां आज खेलैं होरी
पं भीमसेन जोशी - रघुवर तुम को मेरी लाज
पं कुमार गंधर्व व वसुंधरा कोमकली - सूरदासांचे भजन - नैन घट घट तन एक घरी
शुभा मुद्गल - संत कबीरदासांची रचना - साहब है रंगरेज चुनरी मोरी रंग डारी
शुभा मुद्गल - संत कबीरदासांची रचना - अवधू मेरा मन मतवारा
गौहर जान/रसूलन बाई/शाहिदा परवीन - दादरा (राग गारा) - आन बान जिया में लागी, प्यारी चित चोर
पं भीमसेन जोशी - राग श्याम कल्याण / पूरिया कल्याण - आज सो बना बन आयो री
उ.रशीद खाँ - राग हंसध्वनी - भज मन नित हरी को नाम (विलंबित), लागी लगन(द्रुत)
पं. सत्यशील देशपांडे : राग चारुकेशी - सुंदर सूरजनवा ठाडो री माई
पं भीमसेन जोशी/अहमद हुसैन महम्मद हुसैन - संत मीराबाईंचे भजन - तुम बिन मोरी कौन खबर ले
उस्ताद अमीर खान - राग चारुकेशी - लाज रखो तुम मोरी गुसाईयां
पं. रघुनंदन पणशीकर :ठुमरी- राग धनाश्री - कटत ना बैरन रैन
पं. कुमार गंधर्व/डॉ. वसंतराव देशपांडे - भैरवी ठुमरी - ना मारो भर पिचकारी जा मे तोपे वारी
उस्ताद रशीद खाँ - राग चारुकेशी - प्रेम बाजे मोरी पायलिया
उस्ताद अमीर खाँ साहेब/उस्ताद रशीद खाँ : राग मारवा - गुरू बिन ग्यान नहीं पावे
उस्ताद अमीर खाँ साहेब/पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग मारवा - पिया मोरे आनत देस गैलवा(विलंबित), पिया बिन जियरा निकसो जात(द्रुत)
पान २५ :
पं भीमसेन जोशी : राग मारवा - बंगरी मोरी मुरक गयी छांडोना बैंय्यां
पं कुमार गंधर्व : राग मालकंस - आये हो जी अजरी रात यही रहियो जी(विलंबित), फूल बेहाग ये बना(द्रुत)
गणपती भट : राग कलावती - सपनोंमें आया पिहरवा
पं कुमार गंधर्व- मालकंस - कैसो निकोला गो मा, आनंद मना आज आनंद मना, छब तेरी छब तेरी
पं जसराज : राग गुर्जरी तोडी - चलो सखी सौतन के घर जइये(विलंबित), बरस उघर गयो मेहा(द्रुत)
पं जसराज : राग भटियार - कोइ नहीं है अपना
पं डी व्ही पलुस्कर : राग देसी - नैय्या मोरी भयी पुरानी, सांची कहत है अदारंग यह(द्रुत)
पं.जसराज - अहीर भैरव - मोहन मधुर आज
पं कुमार गंधर्व : संत कबीरदासाची निर्गुणी रचना - हिरना समझ बूझ बन चरना
पंडित जसराज : अहिर भैरव - रसिया म्हारा आवो जी मेरे द्वार
पं जसराज : राग मुलतानी - सखी कान्हा बिन कछु सूझत नाहीं
उस्ताद मुनावर अली खान : राग गुर्जरी तोडी - भर डारूँगी रंग सों
उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब : राग गुर्जरी तोडी - भोर भयी तोरी बांट तकत पिया
पं कुमार गंधर्वांच्या आवाजात कबीराचे निर्गुणी भजन - सखिया, वा घर सबसे न्यारा
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी - ठुमरी - बिन पिया निंदियां न आये हो रामा
शोभा गुर्टू -ठुमरी : राग पिलू - होरी खेलन कैसे जाऊं
शोभा गुर्टू -ठुमरी : राग मिश्र भैरवी - नैय्या पडी मझधार
शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी - ठुमरी : शिवरंजनी - दगा देके ना परदेसवा सिधारे
मालिनीताई राजूरकर : भैरवी भजन - रूप अरुपी रंगरंगीला बिना अगन उजियारा
कुमार गंधर्व - कबीरांचे निर्गुणी भजन - अवधूता कुदरत की गत न्यारी
पान २६ :
शुभा जोशी : ठुमरी - भोर भइ ना आये पिया
अनिता सेन : ठुमरी / होरी - मोरी भीगी रेशम चुनर हो
पं अजय चक्रवर्ती : ठुमरी - दामिनी दमके जियरा लरजे
पं. भीमसेन जोशी : राग अभोगी - ए री चरण धर आयो
पं अजय चक्रवर्ती : कजरी - निंबुवा तले डोला रख दे मुसाफिर
उस्ताद फतेह अली खान : राग जौनपुरी - आली मोरी लगन लागी
पंडित जसराज : अहिर भैरव - आज तो आनंद आनंद
पं. फिरोझ दस्तुर/चंद्रशेखर वझे/अब्दुल करीम खान : राग सरपरदा बिलावल - गोपाला मोरी करुणा क्यूं न आवै गोपाल
जगदीश प्रसाद, सलामत अली खान - चंचल नार दुधारी कटरिया... रे राम
शोभा गुर्टू : ठुमरी - मिश्र तिलक कामोद - चंचल नार चतर हठधर्मी
शोभा गुर्टू : कजरी - सजणा बांट निरखता हारी
पं मल्लिकार्जुन मन्सूर, डॉ. बालमुरली कृष्णन् : बसवण्णांचे कानडी भाषेतील सुमधुर वचन - कळ बेडा कोल बेडा हुसियनुडियलु बेडा
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग : ललितागौरी - प्रीतम सैंय्या दरस दिखा जा
मोगूबाई कुर्डीकर : सावनी कल्याण - देव देव सत संग श्रीरंग भवदंग
डॉ. वसंतराव देशपांडे : मारु बिहाग - उन ही से जाय कहो मोरे मन की बिथा; मै पतिया लिख भेजू (द्रुत- तीनताल)
पं अजय चक्रवर्ती : मारु बिहाग - तरपत रैना दिना
पं अजय चक्रवर्ती : यमन - चंद्रमा ललाट पर सोहे भुजंग गर; किनारे किनारे किनारे दरिया- कश्ती बांधो रे
पंडित विष्णु दिगंबर पलुस्करबुवांवरील फिल्म्स डिव्हिजनचा - माहितीपट
शोभा गुर्टू : दादरा, मिश्र सारंग - पतझड आयी सखियां
पान २७ :
कृष्णा नी बेगने बारो - कृष्णा नी बेगने बारो
कौशिकी चक्रवर्ती : राग मिश्र तिलंग - मैं तो साँवर के रंग राची
पं भीमसेन जोशी व डॉ. बालमुरलीकृष्णन् : राग दरबारी - जुगलबंदी : नाथ हरे जगन्नाथ हरे
पं भीमसेन जोशी : वृंदावनी सारंग / ब्रिंदावनी सारंग - तुम रब तुम साहिब ; जाऊं मैं तोपे बलिहारी
मालिनी राजूरकर : राग विभास - पिया तुम वहीं जाओ ; बैरन ननदियाँ लागी दराद
उस्ताद आमिर खाँ - मोरे पिया ना बोले बतियाँ
फरीदा खानुम : राग शंकरा - झूलना झुला दे आयी ऋत सावन की
गिरिजा देवी : राग भैरवी - नयन की मत मारो तलवरिया
शशांक मक्तेदार : राग यमन - ननदी के बचनवा सहे न जात
पं. भीमसेन जोशी : राग खमाजी भटियार / झिंझोटी - महादेव देव पार्वतीपते त्रिशूलधारी शंभो
बेगम अख्तर : ठुमरी - ननदिया काहे मारे बोल

पान २८ :
उस्ताद रशीद खान/पं भीमसेन जोशी/गंगूबाई हानगल : राग अभोगी - चरण धर आयो मो पर दया करो
उस्ताद रशीद खान : बिलासखानी तोडी - काहे करत मोसे झगडा1
अजय चक्रवर्ती : राग अभोगी - कासे कहू दुखवा मै कैसे कहू ; लगन मोरी लागी श्यामबदनसो
अश्विनी भिडे देशपांडे : राग गारा - बदरिया बरसे रे सैंय्या, झुला धीरे झूल रे बदरिया
सलामत व नजाकत अली खान : राग अभोगी कानडा - लागी लगन मोहे पिया की ; तुम बिन मोहे पल(कल) नाही जावे
पं भीमसेन जोशी : राग बागेश्री कानडा - गोरे गोरे मुख पर बेसर सोहे
गंगूबाई हनगल : राग चंद्रकंस - कब घर आयो ओ पिया
गंगूबाई हनगल : राग बागेश्री - मान मनावे मेरी माने ; ऋतु बसंत तुम अपने उमंग सो
सुमधुर वाद्यसंगीत व गायनाच्या क्लिप्स आहेत तिथे - http://sarod.free.fr/
डॉ. सोमा घोष : राग कलावती - दरसन दीजो ओ श्याम (विलंबित) बोलन लागी कोयलिया (द्रुत)
अश्विनी भिडे-देशपांडे : राग काफी कानडा - लायी रे मद पिया (विलंबित) व कान्हा कुँवर के करपल्लव (द्रुत)
डी व्ही पलुसकर : राग बहार - कैसी निकसी चांदनी
पान २९ :
उस्ताद रशीद खान : राग जोग - साजन मोरे घर आये
वीणा सहस्रबुद्धे : राग शुध्द सारंग - अब मोरी बात मान ले पिहर
डॉ. प्रभा अत्रे : राग बागेश्री - जा रे जा बदरा तू जा
पं. जसराज : राग बिहाग भजन - किशोरी तोरे चरणन की रज पाऊँ
पं. जसराज (साथीला संजीव अभ्यंकर) : राग भैरव - मेरो अल्लाह मेहरबान
पं जसराज : राग चारुकेशी - लागेला मोरा मन
मालिनी राजूरकर : राग भोपाली - नू मन जोबन मान
शुभा मुद्गल : राग मारु बिहाग - मन ले गयो सांवरा
शुभा मुद्गल : राग नटभैरव - तन मन वारू रे तोपे मोरे पिहरवा
पं. नारायणराव व्यास : राग भैरव - जागो बृज/ ब्रिज राज कुंवर
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग यमनी बिलावल - आली रे कितवे गये लोगवा
पं. भीमसेन जोशी : राग सूर मल्हार - बादरवा बरसन लागी
पान ३० :
उस्ताद रशीद खान : राग अल्हैया बिलावल - सुमिरन भज मन नाम राम को
उस्ताद सलामत अली व नजाकत अली खान : राग जयजयवंती - आयो रे मोरा लालन घरवा
अमानत अली खाँ व फतेह अली खाँ : राग भोपाली - बाजे छुन छुन तेरे घुँगरू
फतेह अली खान : राग भूपाली - लागी रे नैन तुमसे पिया मोरे
उस्ताद अमानत अली, फतेह अली खान : राग मालकंस - प्यार नही है सुर से जिसको
मोगूबाई कुर्डीकर : राग बिहाग बहार - फिर आयी लौट बहारें
गंगूबाई हनगल : राग देशकार - अमिला मदमाती बोलो जी
वीणा सहस्रबुद्धे : मालकंस - दुर्गे भवानी
पं. भीमसेन जोशी : राग मालकंस - (विलंबित एकताल) पग लागन दे महाराज कुँवरा (द्रुत तीनताल) रंग रलिया करत सौतन के संग
पं. कुमार गंधर्व : मीराबाई भजन कजरी - म्हारा ओलगिया घर आया जी
संजीव अभ्यंकर : राग भटियार - (विलंबित) उचट गयी निंदिया मोरी व (द्रुत) पिया मिलन को जाऊं सखी री आज
प्रभा अत्रे/परवीन सुलताना : राग खमाज ठुमरी - कौन गली गयो श्याम
उस्ताद रशीद खान, हिरा देवी मिश्रा : देस ठुमरी - मोरा सैंया बुलावे आधी रात
शोभा गुर्टू : भैरवी ठुमरी (पंजाबी अंग) - छोड गया राम साजन मेरा
उस्ताद बरकत अली खान : राग पिलू ठुमरी - भजन : तुम राधे बनो श्याम
बडे गुलाम अली खाँ : ठुमरी खमाज - पानिया भरन कैसे जाऊं री

पान ३१:
पं मल्लिकार्जुन मन्सूर : सुघराई कानडा - पिया बनजारा बनज सुहाने
सूरश्री केसरबाई केरकर : राग गौड मल्हार - मानन करी रे गोरी
उस्ताद सलामत अली खान : राग मियां की मल्हार - जल रस बूँदन बरसे ('जलसा-घर' चित्रपट)
शोभा गुर्टू : दादरा - छाई घटा घन घोर
मिताली बॅनर्जी भौमिक : कजरी - सजनी छाई घटा घनघोर
बशीर अली माही : राग पिलू ठुमरी - तुम हो गरीब नवाझ दाता
बिदुर मलिक : भैरवी ठुमरी - बँसिया न तेरो कन्हैय्या मोरा
एम. एस. सुब्बलक्ष्मी : मीराबाई भजन - बसो मोरे नैनन में नंदलाल
पं अजय चक्रवर्ती : राग हमीर - मदवा पिया हे
डॉ. बालमुरलीकृष्णन् व पं. अजय चक्रवर्ती जुगलबंदी : राग हंसध्वनी - गायति वनमाली १
बशीर अली माही : खमाज ठुमरी - ना जा पी परदेस बालम
पं अजय चक्रवर्ती : राग रागेश्री, खमाज थाट - (विलंबित) सब सुख देवो मोरे करतार, (द्रुत) बेगुन को गुनवंत दाता
बडे गुलाम अली खान : राग पहाडी - हरी ॐ तत्सत्
पं. मलिक : राग भैरव : ध्रुपद - लंबोदर गज आनन गिरिजासुत
पं. डी. व्ही. पलुसकर/पं. भीमसेन जोशी : तुलसीदास भजन - भज मन राम चरण सुखदायी
उस्ताद रशीद खान : राग मियां की मल्हार - आये बदरा बरसन
पं. भीमसेन जोशी : मियां की मल्हार - मोहम्मद शाह रंगीले बालम
अनुराधा कुबेर : राग भिन्न षड्ज - बैरी बदरा
बिदुर मलिक : भैरवी दादरा - सखियन संग रार करत
शुभा मुद्गल : कबीर भजन - हँमारे राँम रहीम करीमा केसो
शुभा मुद्गल : बनारसी दादरा - सुंदर सारी मोरी
उमाकांत व रमाकांत गुंदेचा : ध्रुपद - एकदंत गजबदन बिनायक (तानसेन रचित)
पंडित जसराज- राग शंकरा - (विलंबित) शिव शंकर महादेव आदिपुरुष अनादि महेश्वर, (द्रुत) विभूषितानङ्गरिपूत्तमङ्गा
शोभा गुर्टू व गिरिजा देवी जुगलबंदी : दादरा - लागी बयरिया में सो गयी
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - सब रस बरसे नयनवा
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - शाम भई बिन शाम
पं भीमसेन जोशी : कबीर भजन - बीत गये दिन भजन बिना रे
पान ३२:
सिध्देश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सीरीज) - आवो आवो नगरिया हमारी रे
पं कुमार गंधर्व व वसुंधरा कोमकली : मीरा भजन - सखी मोरी नींद नसानी हो
बेगम अख्तर : खमाज दादरा पूर्वी - जरा धीरे से बोलो कोई सुन लेगा
पं. डी व्ही पलुसकर : तुलसीदास भजन - जानकीनाथ सहाय करे जब
सिद्धेश्वरी देवी : पूरब ठुमरी (बैठक सिरीज) - अरे गुईयां दरवाजवा
पं. दिनकर कैकिणी : राग परज - सखी मैं क्यों गइ जमुना पानी
गिरिजा देवी/उस्ताद रशीद खान : दादरा - दीवाना किए श्याम क्या जादू डारा
===========================

या धाग्यानंतरची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - २
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.dhrupad.info/
गजानन- इथली माहिती चांगली वाटत होती.
(अवांतर- ध्रुपदियांना खयाल सुगम वाटतात म्हणे. Wink )

केदार- ओह रजिस्टर करावे लागते म्हणजे. घरूनच ऐकावी लागेल आता. Happy

आमच्या हापिसात सध्या तरी कुठलेच दृक श्राव्य बंद नाहीये... तेव्हा असे काही बघायचे असेल ऐकायचे असेल तर त्याचे मूळ दुवे माझ्या विपूत पोस्ट करा.. मग मी योग्य दुवा पोस्ट करीन इथेच..

रजिस्टर करावे लागत नाहिये.. डायरेक्ट ऐकता येते आहे... Language select करुन तिथे मालिनी राजूरकर असा सर्च करा... त्यानंतर view results in all languages वर क्लिक करा.. मग तिथे हिंदुस्थानी मध्ये ही बंदिश आहे.. select करुन play selected करा... एकदम मस्त streaming आहे.. मस्त ऐकू येतय... मी आत्ताच ऐकली...

कोणाला मालकंस मधली

नभ निकस गयो चंद्रमा
चांदनी, चमक रही
कमल खिलो, पवना बहे

ह्या चिजेच्या अंतर्‍याचे शब्द माहितीयेत का ?

रैना, तो दुवा आता घरी जाऊन वाचतोच. हिम्स, तू अशा दुव्यांना बुरखे शिवून देतोस का? Proud दुवे गोळा करून तुझ्या विपूत ठेवतो.

ध्रुपदियांना खयाल सुगम वाटतात म्हणे>>

धृपदियांना खयाल सुगम वाटतात .. खयालीयांना ठुमरी टप्पे सुगम वाटतात .. ठुमरी वाल्यांना भजन-भावगीत सुगम वाटते ..

आम्हाला मात्र सगळेच अवघड वाटते .. Proud

>> धृपदियांना खयाल सुगम वाटतात .. खयालीयांना ठुमरी टप्पे सुगम वाटतात .. ठुमरी वाल्यांना भजन-भावगीत सुगम वाटते ..
आणि भजन भावगीतवाल्यांना सिनेसंगीत. Happy

शिवाय त्या इतर संगीत 'सुगम' वाटण्यात 'म्हणून ते लोकप्रिय!' असा एक 'कोल्ह्याला द्राक्षं' सदरातला हेवायुक्त उपहासही दिसतो बरेचदा.

मला ते कधी समजलेलं नाहीये. मुळात रागाची व्याख्या 'रंजको जनचित्तानाम्' अशी केल्यावर अश्या प्रतवारीला काय अर्थ उरतो?

वरती जौनपुरी आणि चंद्रकंस चा उल्लेख आलाय. दोन्ही राग श्रवणीय आहेत.
जौनपुरी मधे बेगम परवीन सुलताना यांचा तराना ऐकला होता.

चंद्रकंस मधले लताचे एक गाणे आहे. मुनीमजी सिनेमात. घायल हिरनीया मै बन बन डोलू, (सिनेमात ते विनोदी गाणे म्हणून आलेय ) यु ट्यूबवर आहे.
त्यातली लताची सरगम पा पा रे, पा पा नि ऐकाच आणि शेवटी तिने सरगम मधेच अत्यंत अनोखा प्रकार केलाय. मी तरी असा प्रयोग इतर कुठल्याच गाण्यात ऐकला नव्हता. अवश्य ऐका.

दिनेशदा,

नक्की हे चंद्रकंसात आहे ? मला ह्यात प रे लागतायत शिवाय धैवत ही शुध्द वाटतोय.. शुध्द धैवत वापरणारा एक चान्द्रकौंस असतो म्हणे .. पण ऐकला नाही कधी.. मी चुकत असेन तर माफ करा.. लहान आहे असे समजून सोडून द्या.. :D:

बेगम अख्तर यांच्या आवाजातील हा दादरा यूट्यूबवर उपलब्ध आहे: http://www.youtube.com/watch?v=zgtpW7jc8D0

ओ बेदर्दी सपने में आजा,
कुछ तो बिपतिया कम होइ जाये

हम ई नाहीं जानियो साजन,
नैना के मिलते जुलुम होइ जाये

चाँद गगन से झाँके मोहे,
पापी दुनिया ताने देवे
खुल के कहूँ तो होवे रुसवाई,
चुप मा जियरा भसम होई जाये

अनेक थोर शास्त्रीय गायक हे मुस्लीम होते. पण आजवर ऐकलेल्या बहुतेक चीजा किंवा इतर रचना या हिंदू देवतांवर मुख्यतः कृष्णावर आहेत.

वाहवा अरुंधती.
- कुछ तो बिपतीया कम हो जावे.

स्वाती- अनुमोदन.
फक्त त्यातला थोडे holier than thou भाव बाजूला केला तर प्रतवारीतील फरक (तुलनेने) सोपे (सुगम) ते तांत्रिकरित्या अवघड हा जाणवतो (कानांना). ध्रुपद म्हणे जास्त अध्यात्मिक (शब्दांचे सहाय्य कमीकमी होत जाते, लयकारीवरील प्रभुत्व जास्त लागते वगैरे)

आईगं जीडी, हा लईच मोठ्ठा विषय आहे रे. पण याबाबतीत ज्या प्रकारे नमिता देविदयाल ने 'द म्युझिक रुम' मध्ये लिहिले, ते मला खूप आवडले होते.

हिम्या ऐकले रे फायनली. बरेच आहे तिथे मालिनीताईंचे कलेक्शन. गजानन- मोरी गगरी ही आहे.

षडजपंचम- चंद्रकंसचे स्वरसमुह कसे आहेत? लिहीना प्लीज. माझा झाला नाहीये.

नमस्कार,

मला गाण्यातले काहीच कळत नाही पण इथली चर्चा वाचायला आवडतेय. तुम्हा सगळ्याना नक्की आवडेल अशी ही लिंक. वसंतराव देशपांडे यांची पुलनी घेतलेली मुलाखत.. यात बंदिशीबद्दल काही चर्चा आहे.

http://www.esnips.com/doc/80843ef9-d230-42fc-84d1-976dddba42e3/Vasantara...

धन्यवाद.

जोहराबाई आग्रेवालींच्या आवाजात ही रचना आहे: http://www.fileden.com/files/2009/7/17/2511920/zohrabai-agra-zila-koyali...

कोयलिया कूक सुना दे
सखी री मोहे बिरहा सतावे

सजन बिना अंधियारी कारी रात
बिजुरी चमके जिया मोरा डर पावे

इतनी बिनती मोरी उनसे कहियो जाए
तुम बिना जिया मोरा निकसो जाए
चलके जोबन मोरा पिया मोरा घर ना आवे रे....

ही खालील भैरवी मी दोन प्रकारांत ऐकली/ वाचली आहे :

गिरिजा देवींची लिंक : http://www.in.com/music/track/yaadgar-thumriyan-songs/nahak-laye-gawanwa...

१. (गिरिजा देवी)

नाहक लाए गवनवा
आवत सैंय्या बिदेसवा में
छाये मोरा हे राम

कहत छबिले सवत रस बस भए
बीत जात जोबनवा मोरा (ह्या दोन ओळी ऐकून लिहिल्या आहेत, शब्दांत काही फरक असू शकतो.)

२. (गौहर जान)

मोरा नाहक जाए जोबनवा
जबसे गये मोरी सुध हून लिनी
बीती जात जोबनवा रे
नाहक लाए गवनवा...

>> फक्त त्यातला थोडे holier than thou भाव बाजूला केला तर प्रतवारीतील फरक (तुलनेने) सोपे (सुगम) ते तांत्रिकरित्या अवघड हा जाणवतो

हो.

षडज आणि अकु, मी अगदीच कच्चा आहे याबाबतीत. पण हे गाणे नेहमीच या रागातले म्हणून ऐकवतात.
तसा हा राग फारसा ऐकण्यातला नाहीच. वीणा सहस्त्रबुद्धे यांचा ख्यालनूमा या रागात ऐकला आहे.

ह्या धाग्यावर येणं हे अ‍ॅडिक्शन झालय... केवळ केवळ अप्रतिम. खर्‍या अर्थाने माहितीची जुगलबंदी चालू आहे...
होरी, कजरी ह्या बाबतची चर्चा वाचली. पूर्वसुरींनी काही राग क्षुद्रं मानलेत. पिलू हा त्यापैकी एक. त्यांचं वक्री, मुरकी चलन ख्यालातले ठहराव, बढत ह्याला बांध घालत असावेत. ह्या रागांमधे रूढ पद्धतीने ख्याल गायन करता येत नसल्याने कदाचित असेल.
<<होरी, कजरी, ठुमरी, चैती हे मूलतःच लोकसंगीताशी निगडीत आहेत. त्यात वापरल्या जाणार्‍या रागांचा सुगमतेशी संबंध नाही<<>>
पण ते धून उगम आहेत म्हणून... सुगमतेशी संबंध नाही....असं म्हणणं बरोबर होईल का?
कुमारजींनी अनेक धुन उगम (लोकसंगीतातल्या धूनांवर उपज) रागांवर जे काम केलय ते केवळ अलौकिक आहे. त्यांच्या रचना ऐकल्यावर त्या "सुगम" नाहीत असं म्हणणं चूक होईल.
आत्ता ऑफिसातून लिन्का-बिन्का देता येत नाहीयेत.
पण ही मैफिल ओस राहू नये... गुंजत राहूद्या, लोकहो...

कधी काळी दुरदर्शनरच्या एका कार्येक्रमात पं. ह्रदयनाथांनी " गणराज रंगी नाचतो " हे गाणे एका चिजेवरुन शांता शेळके यांना लिहायला सांगीतले; असे सांगितले. कोणाला महित आहे क ती चीज ?

शुध्द धैवत वापरणारा एक चान्द्रकौंस असतो म्हणे

शुद्ध धैवत वापरणारा चंद्रकंस असतो. त्याला बहुतेक बागेश्री अंगाचा चंद्रकंस म्हणतात... कारण सा -कोमल ग- शुद्ध म - शुद्ध ध असे चलन होते, त्यात पंचम नसतो...हे बागेश्रीचेच अंग तयार होते.... ( क्रुपया खात्री कराची.. )

चंद्रकंसाचा आणखी एक घोळ होऊ शकतो ऐकताना.... स्केल बदलले की चंद्रकंसाचा मधुकंस होतो.. किंवा मधुकंस ऐकताना आपली पट्टी बदलली की चंद्रकंसाचा भास व्ह्यायला लागतो.. (याचीदेखील कृपया खात्री करुन घ्यावी.) Happy पंडितजींचे गाणे 'योगी पावन मनाचा ' हे मधुकंसमध्ये आहे. पण चंद्रकंस गुणगुणताना स्केल बदलून या गाण्यावर जाणे होतेच.. Happy

अरे वा, दाद पण आल्या, आता अजून मजा येणार आणखी माहिती वाचायला. Happy

मामी, 'झुकी आयी बदरिया' पुन्हा ऐकली. त्यात 'जोबनवा' नसून 'मोरा मनवा' आहे. मोरा तरी नकी वेगळा ऐकायला येतो.

रैना, 'द म्युझिक रूम' मध्ये काय आहे तेही थोडं सांग ना. उत्सुकता वाढलीय. Happy

मनस्मी, धन्यवाद दुव्याबद्दल. आता या आठवडाअखेरीला खूप काही वाचायला आणि ऐकायला मिळेल.

अवांतर : जागो, तुमची पोस्ट वाचल्यावर असंच आठवलं - भैरवीचे स्वर हे दुसर्‍या पट्टीवर यमनाचे होतात असं मला एकदा कळलं. कोणती पट्टी ते आठवत नाही.

एक राग एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पट्टीत गाणे (जुगलबंदीत - स्त्री-पुरुष गायनाच्या जुगलबंदीत) याला मूर्छना अशी संज्ञा आहे ना?

तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.

:समोर अंथरलेल्या सतरंजीवर, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून, कान आणि डोळे उघडे ठेवून, आपला नसलेल्या प्रांतातीलची अमृतकण मुखी पडतायत का पहात ठीय्या लावून बसलेली गुणी बाहुली:

जामोप्या, ते गाणे ऐकून (घायल हिरनीया मै बन बन डोलू ) सांगणार का नक्की. ते गायन फार गोड वाटतं कानाला, आणि अर्थातच लताची कारागिरी...

नमस्कार मंडळी,
माझी एक रचना देतो आहे (मी यथामती चालही बांधली आहे, पण राग वगैरे सांगता नाही येणार Sad तेवढी जाण नाहिये)
आपल्यापैकी कुणी गाणारे/ गाणे शिकणारे असेल, तर त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून मिळू शकेल काय?
मी माझ्या गोड (?) आवाजात रेकॉर्ड करून पाठवू शकेन Happy

तालः मध्यलय एकताल
सम- सहज मधल्या 'स' वर

सहज सरल भाव-मधुर,
ध्यान धरन को उपाय?
हरी मिलत प्रेमभरे,
काहे को तन तपाय? ||
सहज सरल, भाव-मधुर ||
जो है तुमरे भीतर,
वो ही जग के अंदर,
देख खोल नयनन को,
अमृतपल काहे गवाय? ||
सहज सरल, भाव्-मधुर ||
दास कहे मंगल हरि,
माधव राजाधिराज,
पावत जब भाव मधुर,
मंगलही करत जाय ||
सहज सरल, भाव्-मधुर ||

- चैतन्य

http://chandrakantha.com/raga_raag/film_song_raga/kafi.shtml

घायल हिरनिया गाण्यासाठी ही लिंक पहा ..

रैना, चंद्रकंस मी सुध्धा कधी शिकलो नाहिये.. ऐकून सांगतोय.. मालकंसच्या कोमल निषादा ऐवजी तो शुध्ध निषाद लावतो.. प रे लागत नाहीत ..

मालकंसापासून वेगळा ठेवण्यासाठी शुध्ध निषाद सारखा लावत रहावा लागतो.. दीर्घ.. बाकी कंस अंग कायम राखणारे गुणधर्म असतातच.. पर्रीकर साईट पहा.. मालकंसाप्रमाणेच शुद्ध मध्यम बलवान ... अतिशय मींड युक्त आणि सुरेख राग.. संगती, न्यास स्वर वगैरे आणखी तांत्रिक बाबी देत नाही.. कारण राग त्याच्या 'फील' मुळे लक्शात येतोच.. स्वर समजले नाही तरीही... मलाही फार काही समजत नाही .. .. कदाचित शस्त्रीय संगीत नेहमी न ऐकणार्याला मालकंसापसून वेगळा करणे अवघड वाटेल.. मालकंसाप्रमाणेच रात्रीचा शांत गंभीर असा अफाट मूड ह्या रागाला आहे..

प्यारे, बागेश्री अंगाचा चंद्रकंस असतो हे खरेय.. पण कधीही ऐकला नाही.. त्यामुळे बोलणार नाही...

मी काही दुवे देतोय.. मी अपलोड केले नाहीयेत .. कुणीतरी दुसर्याने केलेत.. हे दोन चंद्रकंस पहा.. तुम्हा लोकांना माहिती असेल तरीही सांगतो.. CMS community on orkut is best online collection... recently there are problems with links .. माझ्याकडे आमिर खां , नझाकत सलामत अली, कुमार गंधर्व इ बरेच आहेत.. पण सध्या नेट वर हे सापड्तायत म्हणून हेच देतोय..

माझे सर्वात आवडते वादक... निखिल बनर्जी... http://www.mediafire.com/?1mutdo5hxzq

वसंतराव देशपांडे .. http://www.mediafire.com/?adhm9mf4zzj

Pages